
१ कप* गव्हाचा बारीक^ रवा
१ कप* आंब्याचा रस
अर्धा कप* दही
साखर चवीप्रमाणे
मिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिक
दीड टेबलस्पून तूप
थोडंसं दूध
तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.
भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.
तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.
निवलेला रवा रसात हलक्या हाताने (व्हिस्कने) नीट मिसळून घ्या, त्यात गुठळ्या राहू देऊ नका.
मिश्रणात चवीनुसार साखर आणि आवडत असेल तर किंचित मीठ घाला.
दोनेक तास हे मिश्रण मुरत ठेवा.
दोन तासांनी रवा रसात मस्त फुलून आलेला असेल.
आता वाफवायची तयारी - पाणी उकळायला ठेवा आणि इडलीपात्राच्या वाट्यांना तुपाचा हात लावा.
मिश्रण घट्ट वाटलं (आणि वाटेलच) तर थोडं दूध घालून इडलीच्या पिठासारखं सरसरीत करून घ्या.
डावेने इडलीपात्रात घालून वीस मिनिटं वाफवा.
तुपाशी किंवा नारळाच्या दुधाला लावून छान लागतात.
१. *कप म्हणजे मेझरिंग कप
२. ^मी बारीक रवा, लापशी रवा, इडली (तांदुळाचा) रवा असे बदल करून पाहिलेत. गव्हाच्या बारीक रव्याच्याच छान होतात या पद्धतीने.
३. मोसमात ताज्या रसाच्या इडल्या उत्तमच होतील, पण या मी देसाईंच्या कॅन्ड रसात केल्यात आणि सुंदर झाल्यात.
ताजा रस हॅन्ड मिक्सीने घुसळून मग गाळून घ्यावा लागेल.
४. सांदणांच्या पारंपरिक रेसिपीत दही घालत नाहीत, दूधच वापरतात, आणि ती सहसा तांदुळाच्या रव्याची करतात. म्हणून पाककृतीच्या नावात ‘पण’ आहे.
५. कृती फार म्हणजे फारच सोपी आहे. मी तर म्हणते चुकवून दाखवाच!
रेसिपी तंतोतंत फॉलो करून
रेसिपी तंतोतंत फॉलो करून चुकवून दाखवायची होती ना, देवकी? तुम्ही साखरेऐवजी गूळ घालणार, दही वापरणारच नाही, आणि तरी तुम्हाला बक्षीस हवं म्हणता?
आचार्य

सूनबाईंनी म्याजिकने प्लेट अधांतरी तरंगती ठेवली आहे वाटतं.
भरत, बघा - आपल्या वेळी असं नव्हतं की नाही?
आम्रसांदणी >> नाव आवडेश. आता
आम्रसांदणी >> नाव आवडेश. आता करून बघेन. लगेच नाही, पण काही दिवसांनी. चुकल्यास इथे आनंदाने सांगायला येईन.
सूनबाईंनी म्याजिकने प्लेट
सूनबाईंनी म्याजिकने प्लेट अधांतरी तरंगती ठेवली आहे वाटतं >>
ज्या सूनबाईंनी साक्षात साबांना कामाला लावून खुर्चीत पाय मोकळे सोडून आमरसावर ताव मारलाय तिला जादू येत असणारच ना ?
आम्रसांदणी नाव आवडले. अपभ्रंश होऊन आम्रसांडणी , अंबरसांडणी असं होत होत वीस पंचवीस वर्षांनी सुटसुटीत नावाने मायबोलीवरच कुणीतरी रेसिपी लिहील.
>>> आम्रसांडणी , अंबरसांडणी
>>> आम्रसांडणी , अंबरसांडणी असं होत होत
कुणी सांगावं, बृहद्कोशाच्या एखाद्या शाखेत ‘अंबारीसांडणी - जमिनीला पाय न टेकवता डायरेक्ट अंबारीत चढणारा सांडणीस्वार’ असा ‘पाठभेद’ सापडायचा.
जमिनीला पाय न टेकवता डायरेक्ट
जमिनीला पाय न टेकवता डायरेक्ट अंबारीत चढणारा सांडणीस्वार >>>
हे धमाल आहे. मायबोली स्पेशल !
स्वातीची कृती वापरून सांदण
स्वातीची कृती वापरून सांदण बिघडवण्यात माझा पैला नंबर.

काल संध्याकाळी रवा भिजवून ठेवला, म्हटलं जेवणानंतर करू नी झोपतानाच आठवण आली. मग उचलून फ्रीजमधे टाकलं.सकाळी फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मल टेम्पला आणलं. दूध मिसळून कन्सिस्टन्सी सारखी केली व इडली पात्रात वाफवले. दिसायला बरे झाले. पण पहिल्या घासाला नवऱ्याने विचारले की यांत साखर घालत नाहीत का?
मिश्रण भिजवले तेव्हा व्यवस्थित गोड लागत होते. माकाचु? आणि आता या अगोड सांदणाचं काय करू?
दिसताहेत मस्त.
दिसताहेत मस्त.
गोड दूधात, गोड नारळीदूधात बुडवून त्यातच तुकडे करून खाता येतील का?
ममोंच्या सांदणं धाग्यात कोणीतरी अगोड झाल्या म्हणुन साखरेचा पाक करून वरून घातला असे वाचल्याचे आठवते, ती पोस्ट बघा उपयोगी पडेल का.
तुकडे करून पाकात टाका.पाकातली
तुकडे करून पाकात टाका.
पाकातली अमृत इडली !
कदाचित, रबडी वरून टाकली तरी छान लागावे.
मालपुवा रबडी सारखे...
गोड नारळी दूधाचा ऑप्शन चांगला
गोड नारळी दूधाचा ऑप्शन चांगला वाटतोय. मानव थॅंक्यू
साखरेचा पाक करून वरून घातला
साखरेचा पाक करून वरून घातला असे........ मीच ती!
ढोकळावर साखरेचे पाणी घालतात तसे वरून घातले होते.
वरून आमरस आणि त्यावर
वरून आमरस आणि त्यावर आंब्याच्या फोडी घातल्या तर?
पोटात ?
पोटात ?
भारी आहे फोटो!
भारी आहे फोटो!
गोडासाठी वर सुचवण्या आल्याच आहेत, कदाचित वरून नुसती पिठीसाखरही पेरता येईल.
अगोड आम्रसांदणी मध्ये आडवी
अगोड आम्रसांदणी मध्ये आडवी कापा आणि त्यात मध किंवा पंचामृत पसरवून पुन्हा जोडा सॅन्डविचसारखे.
धमाल चर्चा नावही मस्त.
धमाल चर्चा
नावही मस्त.
माझेमन सेम पिंच.. काल
माझेमन सेम पिंच.. भारी प्रेझेंटेशन आहे तुमचं!
काल मुहुर्त लावला हे करायला पण माझ्याही आम्रसांदण्या अगोड झाल्या आहेत. तरी मी मिश्रण खाऊन पाहिल्यावर आंबट लागत होते म्हणून बर्यापैकी साखर घातली होती. मी आमरसाबरोबर खाल्ल्या
स्वाती आणि मनीमोहोर ताईंना धन्यवाद! रेसिपी हीट्ट आहे.
हा फोटो
कसला भारी रंग आहे सगळ्यांच्या
कसला भारी रंग आहे सगळ्यांच्या सांदण्याचा !
मस्त फोटो, अंजली.
मस्त फोटो, अंजली.

आता दोघींनीही पुढच्या वेळी करताना जास्त साखर घाला.
किंवा अगोड म्हणेल त्याला/तिला नाक मुरडून ‘सांदणं बेताचीच गोड असतात’ / ‘मला अशीच आवडतात’ / ‘तुमच्याकडे इतकं गोडमिट्ट खातात?!’ यापैकी काहीतरी उत्तर फेकून मारा.
दम बिर्याणी च्या दम सारखं
सांदणं कमी गोडच असतात. खरंच!
सांदणं कमी गोडच असतात. खरंच!

गरम गरम वाफेची भरपूर तूप लावून खाल्ली की गोड लागतात.
मस्त आहे रेसिपी. फोटोही भारी.
मस्त आहे रेसिपी. फोटोही भारी.
मस्त चालल्या आहेत सगळ्या
मस्त चालल्या आहेत सगळ्या गप्पा , नाव आवडलं, पाळणा आवडला, सगळ्यांचे फोटो पण एक नंबर दिसतायत.
रेसीपी, फोटो, पाळणा आणि बाकी
रेसीपी, फोटो, पाळणा आणि बाकी प्रतिसाद सगळेच मस्त!
स्वाती 2 मम.
स्वाती 2 मम.
एकेक आम्रसांदणी फोटो भारीच.
स्वाती, रेसिपी तशी सोपी वाटते
स्वाती, रेसिपी तशी सोपी वाटते, वाचताना तरी.
लवकरच करणार. सगळ्याच सांदणींचे फोटो जबरी आले आहेत.
हा प्रकार कधी खाल्ला वा
हा प्रकार कधी खाल्ला वा पाहिलेला नाहीय. तांदळाचा करतात हे ऐकलेले पण इथे गव्हाचा रवा वापरायचाय…
मला बिघडवण्याची संधी मिळायला घरात ताजा बनवलेला बारिक रवा, आंबे, साखर, दही सगळे आहे. बघते प्रयत्न करुन.
आम्रसांदणी हे नाव आवडले.
आम्रसांदणी हे नाव आवडले. आम्रसांदण चालले असते पण णी केल्यावर एकदम राजसी भारदस्तपणा आल्यासारखे वाटले.
नुसत्या सांदणाची लिंक देणार
नुसत्या सांदणाची लिंक देणार का कोणी?
आम्रसांदणी बिघडो ना बिघडो, फोटो मात्र कोणालाही बिघडवता आला नाहीये...
आम्रसांदणी नाव आवडले. हा
आम्रसांदणी नाव आवडले. हा प्रकार पाहिला,खाल्लेला नाही. थोड्या प्रमाणात करून पाहीन. इतकी परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे पाककृती बिघडण्याची शक्यता कमी दिसतेय पण फोटो बिघडू शकतो.
आंब्याचा शिरा बनवुन का खात
आंब्याचा शिरा बनवुन का खात नाही. गोडाची इडली ?! कोक ण स्पेसिफिक पदार्थ आय गेस.
Pages