आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२००८ ला सिनियर खेळाडूंना बसवून नवीन टीम बनवली होती. ह्यावेळी हे शक्य वाटत नाही. जय शहाने तर आधीच रोहित शर्माला captian बनवून टाकलाय आणि कोहलीला बसवण्याची हिम्मत नाही.

“ २००८ ला सिनियर खेळाडूंना बसवून नवीन टीम बनवली होती.” - हे अर्धसत्य आहे. ऐकायला/वाचायला छान वाटणारी स्टोरी. निम्मी टीम ही बर्यापैकी क्रिकेट (३-९ वर्ष) खेळलेली होती. हरभजन, आगरकर (१९९८), युवराज (२०००), सेहवाग (२००१), इरफान (२००३), गंभीर, धोनी, कार्थिक (२००४) हे नवखे नव्हते. तो फॉर्मॅट इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांसाठीच नवीन होता. त्यामुळे थोड्याफार फरकाने सगळ्याच टीम्समधे हे जुन्या-नव्याचं मिश्रण होतं.

न्यूझिलंडमधे लेट ९० ज मधे क्रिकेट मॅक्स ने ह्या प्रकाराची मुळं रोवली होती आणि २००३ मधे कौंटी क्रिकेटमधे ऑफिशियली टी२० ची सुरूवात झाली होती.

Sanjay Manjrekar's India squad for ICC Men's T20 World Cup 2024:

कोहली आणि हार्दिकला बाहेर ठेवले..

Rohit Sharma, Yashasvi Jaiswal, Suryakumar Yadav, Rishabh Pant, Sanju Samson, KL Rahul, Ravindra Jadeja, Krunal Pandya, Harshit Rana, Jasprit Bumrah, Mayank Yadav, Avesh Khan, Mohammed Siraj, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav.

कोहली आणि रोहित एकावेळी दोघे नकोत हे बरोबर, हार्दिक त्याच्या करंट फॉर्मवर नसलाच पाहिजे संघात!!
KL Rahul, Krunal Pandya, Siraj ने असे काय दिवे लावलेत??

आपला प्रॉब्लेम हा दर्जेदार ऑल राउंडर नसण्याचा आहे आणि त्याच बरोबर बॅट्समननी जराही कामचलाऊ बॉलिंग न करणे आणि मेन बॉलर बॅटींगमद्ये शून्य असणे हा आहे आणि तो आता उरलेल्या वेळात सोडवता येण्यासारखा नाही हे नक्की!!

>>हे अर्धसत्य आहे.
अगदी बरोबर.... तो संघ सुद्धा बऱ्यापैकी अनुभवी होता!!
आणि बुजुर्ग लोक आपणहून बाहेर बसले होते..... आत्ताच्या बुजुर्ग लोकांना जमणार आहे का ते?
रोहित, कोहली वगैरे लोकांना बसवून नवा संघ नेला तर ट्रोलिंगने जीव नकोसा करतील यांच्या आर्मीज नव्या संघाच्या Proud

ज्युरेल एकटाच राहिला होता परफॉर्म करायचा, तो ही टिकमार्क झाला!!
काल एक मिनिटभरही LSG चे पारडे जड वाटले नाही.... RR was always in control Happy
Well deserved top spot

सॅमसन दिवसेंदिवस परिपूर्ण कर्णधार होत चाललाय
KL Rahul मला कधीच कॅप्टन्सी मॅटेरीयल वाटला नाही आणि दर सामन्यागणिक तो ते प्रूव्ह करतोय Wink

कोहली वगैरे लोकांना बसवून नवा संघ नेला तर ट्रोलिंगने जीव नकोसा करतील यांच्या आर्मीज
>>>>>

पण त्यांचा परफॉर्मन्स काही उतरला नाहीये. ते काही पूर्वपुण्याईवर खेळत नाहीयेत किंवा कुठला रेकॉर्ड करायला कारकीर्द लांबवत नाहीयेत.

ऐकायला कडू वाटेल पण कपिल आणि सचिनबाबत त्यांच्या निवृत्तीची वेळ टळून गेली तरी ते रेकॉर्डसाठी खेळत होते. ती वेळ अजून या दोघांबाबत आली नाहीये. गेल्या वर्ष दोन वर्षातील आकडे उचलले तर हे दोघेच टॉप वर दिसतील.

आणि खेळाडूंच्या चाहत्यांनी नाराजी रोष व्यक्त करणे या प्रकाराला व्यक्तीपूजा म्हणत असाल तर ती काही कोहली शर्मा पासून सुरू झाली नाही या देशात.

1 वर्षापूर्वी रोहित आणि विराट 2024 चा t20 विश्वचषक खेळणार नाहीं हे जवळपास ठरल्यासारखे होते, हार्दिक कर्णधार आणि बरीच तरुण टीम t20 खेळत होती. पण 2023 मध्ये 50 ओव्हर्स चा विश्वचषक फायनल आपण हरलो आणि रोहित आणि विराट ला अजून एक विश्वचषक खेळावा व जिंकावा असे वाटू लागले. ते परत t20 खेळू लागले आणि सगळे समीकरणच बिघडले.

न्यूझिलंडमधे लेट ९० ज मधे क्रिकेट मॅक्स ने ह्या प्रकाराची मुळं रोवली होती
>>
आपण या टाईप ची एक मॅच खेळलो होतो त्यांच्या सोबत असं आठवतंय.
१०-१० ओव्हर चे दोन डाव व्हायचे. मॅक्स झोन मधे बाऊंड्री मारल्यावर डबल (८ अन् १२) रन मिळायच्या. आपण पहिल्या डावात वन डे टाईप खेळलो होतो. दुसऱ्या डावात सचिन नी फोडला होता, पण ओव्हर ऑल पहिल्या डावाच्या परफॉर्मन्स मुळे कचकून हरलो होतो...

“ बुजुर्ग लोक आपणहून बाहेर बसले होते..... आत्ताच्या बुजुर्ग लोकांना जमणार आहे का ते?” - ह्यात कदाचित फॉर्मॅटची बदललेली लोकप्रियता हा पण मुद्दा असू शकेल. त्यावेळी टी२० कडे इतक्या सिरियसली बघितलंही गेलं नसेल जितकं आता तो कुठल्याही टूर चा महत्वाचा भाग झालाय.

+786
कदाचित - म्हणून जे आहे ते तसेच होते. तेव्हा या फॉरमॅट मध्ये आज सारखा पैसा होता ना लोकाश्रय.. ना तिथे काही रेकॉर्ड होते. बहुधा वर्षाला अमुक तमुक 20-20 खेळावेत जास्त नाही असे लिमिट सुद्धा होते. त्यामुळे सिनिअर खेळाडूंनी काही त्याग वगैरे केला नव्हता. नाईंटीज किड म्हणून त्या जनरेशन खेळाडू बद्दल कायम मनात वरची जागा आणि हळवा कोपरा राहणार.. स्पेशली फिक्सिंग मुळे क्रिकेट बघायची उडालेली इच्छा या लोकांनी टिकवली. पण जे फेक्ट आहे ते आहे. आताचे खेळाडू फक्त आयपीएल जीव झोकून पैशासाठी खेळतात, त्यांना देशाचे पडले नाही वगैरे जे आरोप होतात ते मला कधीच पटत नाहीत.

1 वर्षापूर्वी रोहित आणि विराट 2024 चा t20 विश्वचषक खेळणार नाहीं हे जवळपास ठरल्यासारखे होते,
>>>

मला नाही वाटत असे काही ठरले होते. येते वर्ष वन डे वर्ल्ड कप चे होते. दोघानी त्यावर फोकस करत 20-20 बिन महत्त्वाच्या मालिका आराम करत वर्क लोड कमी केले. कारण दोघे कसोटी खेळणारे सुद्धा होतेच. आणि आयपीएल सुद्धा दर वर्षी असतेच.
या पलानिंगचा फायदा सुद्धा झाला. दोघानी वर्ल्डकप मध्ये चांगले परफॉर्म केले होते.
बाकी 20-20 वर्ल्डकप सरावासाठी आयपीएल असतेच. द्विपक्षीय मालिका कमी जास्त खेळले तरी चालून जाते.

आणि हो पैसा काही फक्त कोहलीला कमवायचा नसतो, तर बोर्डाला आणि आयसीसीला सुद्धा कमवायचा असतो..
त्यासाठी कोहलीची ब्रँड व्हॅल्यू कामात येते.

वर्ल्ड कप ट्रॉफी पेक्षा कोणताही मोठा ब्रँड नाही आणि तेच २०११ पासून मिसिंग आहे. बर ह्या दरम्यान भारतातही स्पर्धेचे आयोजन झालं. म्हंजे host देशाला जो फायदा मिळतो तोही मिळूनही आपण जिंकलो नाही.

मला नाही वाटत असे काही ठरले होते. + बाकी 20-20 वर्ल्डकप सरावासाठी आयपीएल असतेच. >> हो पण आय पील च्या कामगिरीला मह्त्व न देता आधीच्या वर्षामधल्या इंटरनॅशनल सामन्यांना मह्त्व दिले जाईल हे जय शाह ने सांगितलय . म्हणून तर अफगाणिस्तानविरुद्ध घाई घाई मधे तीन साम्ने खेळले ज्यात रोहित नि कोहली ९दोन साम्न्यांमधे) खेळला होता. आधीच्या ऑस्ट्रेलिया (५) नि आफ्रिके विरुद्ध (३) सामन्यांमधे हे दोघेही नव्हते (सूर्या कप्तान होता)

रोहित आणि विराट ला अजून एक विश्वचषक खेळावा व जिंकावा असे वाटू लागले. ते परत t20 खेळू लागले आणि सगळे समीकरणच बिघडले. >> ह्याला अनुमोदन !

आताचे खेळाडू फक्त आयपीएल जीव झोकून पैशासाठी खेळतात, त्यांना देशाचे पडले नाही वगैरे जे आरोप होतात ते मला कधीच पटत नाहीत. > आयडी हॅक झाला कि काय रे Lol

पण आय पील च्या कामगिरीला मह्त्व न देता आधीच्या वर्षामधल्या इंटरनॅशनल सामन्यांना मह्त्व दिले जाईल हे जय शाह ने सांगितलय
>>>>

ते नवोदितांना..
ज्यांनी स्वताला सुद्धा केले आहे त्यांना लागू नाही.
अन्यथा ऋषभ पंतचा विचारच होणार नाही.

आयडी हॅक झाला कि काय रे
>>>>
छे .. तुम्ही गल्लत करत आहात. म्हणजे तुम्हाला माझ्या पोस्ट कधी समजल्याच नाहीत.
आयपीएल हे सर्कस आहे. यात खेळाडूंनी पैसे जरूर कमावावेत या मताचा मी आहे. पण देशासाठी मात्र पूर्ण निष्ठेने झोकून खेळावे. जे जे माझ्या आवडीचे प्लेअर आहेत ते असे आहेत म्हणून आवडीचे आहेत.
देशासाठी फिट राहायला म्हणून आयपीएल खेळूच नये या अपेक्षा अवास्तव आहेत. ते बोर्डाचे काम आहे की शेड्युल कसे करावे.

ते नवोदितांना.. >> आपण दोघेही सेमच गोष्ट सांगतोय रे. त्यात अधिक म्हणून मी आयपीएल कामगिरीला मह्त्व नसणार हे आधीच क्लीयर केलय हे म्हणतोय. सराव करा नाहितर नको. पंतच्या कामगिरीपेक्षा मॅच फिटनेस कडे लक्ष असणार होते.

छे .. तुम्ही गल्लत करत आहात. म्हणजे तुम्हाला माझ्या पोस्ट कधी समजल्याच नाहीत. >> तुला तुझ्याच पोस्ट कधी समजत नाही असे मला वाटते Lol

म्हणून तर अफगाणिस्तानविरुद्ध घाई घाई मधे तीन साम्ने खेळले
>>>>
अफगाणिस्तानचे सामने रोहीत कोहली यांनी स्वतःला इंटरनॅशनल मध्ये सिद्ध करावे यासाठी नाही खेळले गेले.

अफगाणिस्तानचे सामने रोहीत कोहली यांनी स्वतःला इंटरनॅशनल मध्ये सिद्ध करावे यासाठी नाही खेळले गेले. >> आधीच्या आठ सामन्यांमधे त्यांच्या जागी आलेल्यांनी दणदणून खेळल्यामूळे रोहित - कोहलीला वर्षभर न खेळता नुसते आत येऊन देणे चुकीचे दिसले असते हे उघड होते. ते (विशेषतः कोहली) पण बदलता रोल करू शकतात हे उघड नव्हते. ज्या तर्‍हेने कोहली खेळला होता त्यातून हे उघड होत होते. असो.

बुमरा चा पार्टनर कोण असणार आहे कोण जाणे ? मयांक फिट असेल तर नक्कीच जाईल. तिसरा सिराज, अर्शदीप , आवेश ह्या क्रमाने असेल असे वाटते. संदीप शर्मा, हर्शित राणा कींवा मोहसीन ला संधी मिळेल असे वाटत नाही.

पांड्याला नेण्याची शक्यता कमी वाटते पण दुबे ला नेले तर चेन्नई ला त्याला बॉलिंग करू दिली जावी अशी सूचना दिली जाईल का ?

"बुमरा चा पार्टनर कोण असणार आहे कोण जाणे ?" - माझा अंदाज अर्शदीप आहे. कदाचित आवेश बॅक-अप असेल. आयपीएलच्या दोन परफॉर्मन्सेस (आणि नंतर इंज्युरी) ह्या सॅम्पल साईझ वर मयंक यादव एकदम वर्ल्डकपला जाईल असं वाटत नाही. तेच दुबेच्या बाबतीतही थोड्याफार फरकानं लागू आहे. पंड्याला प्रेफरन्स मिळेल असा अंदाज आहे. पंड्या तिसरा सीमर म्हणून खेळू शकतो. अ‍ॅट हिज बेस्ट दुबे हा रॉबिनसिंग, गांगुली, कॉलिंगवूड कॅटेगरीतला बॉलर आहे. बाकी संदिपचा कमबॅक किंवा हर्षित/मोहसीन चा डेब्यू वर्ल्डकपमधे व्हायची शक्यता मला तरी धूसर वाटते.

रोहित - कोहलीला वर्षभर न खेळत...
>>>>
ते जसे वर्ल्ड कप खेळले ते त्यांचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करायला पुरेसे होते. त्यानंतर अफगाणिस्तान सोबत खेळून काय आणखी वेगळे सिद्ध होणार होते... बरे ट्वेंटी-ट्वेंटी फॉर्मेट सुद्धा काही त्यांच्यासाठी नवखा नव्हता. जे एकदा फॉर्म फिटनेस वर्ल्ड कप लेवलला खेळून सिद्ध झाल्यावर आम्हाला ट्वेंटी-ट्वेंटी सुद्धा खेळता येते हे त्यांना कोणाला दाखवून द्यायची काही गरज नव्हती.

तेच दुबेच्या बाबतीतही थोड्याफार फरकानं लागू आहे. पंड्याला प्रेफरन्स मिळेल असा अंदाज आहे. पंड्या तिसरा सीमर म्हणून खेळू शकतो. >> पांड्या सध्या दोनच्या वर ओव्हर्स टाकत नसल्यामूळे हा फिटनेस चा प्रॉब्लेम आहे कि फॉर्म्स हे कळेतो ठरवणे कठीण वाटते.

शर्मा कप्तान असताना उपकर्णधार पांड्याला करणार नाहीत असे वाटते.
बुमाराह किंवा पंत पर्याय योग्य वाटत आहेत.

काहीही फरक पडत नाही , जितेगा तो .... Lol

शर्मा ईलेव्हन वाचली का ? Lol
रोहित, अभिशेक, शिवलिक, हिमांशु , आशुतोश, जितेश, संदीप , मोहित , इशांत, करण, सुयश

अरे टि२० वर्ल्ड कपला मॅच गायडन्स करता एक सिनियर प्लेयर जो तुफान फॉर्म मध्ये आहे आणि त्या नंतर इतर पुर्ण मेरिट वर म्हणजे परफॉर्मनसच्या मेरिट वर जरा यंगर पब्लिक घेऊन जायला पाहिजे. मला तर २००७ ची वर्ल्डकप टीमच आठवते. काय मजा आणली होती सगळ्यांनी! आता तर एक से एक टॅलेंट उपलब्ध आहे.
आय पि एल परफॉर्मन्स टि२० करता तरी दुर्लक्ष करुन चालणार नाही.

संघ जाहीर झाला हो...
रोहीत, जयस्वाल, कोहली, सूर्या, पंत, संजू, पांड्या, दुबे, जाडेजा, अक्षर, कुलदीप, चहल, अर्षदीप, बुमरा, सिराज
(राखीव : गिल, रिंकू, आवेश अन् खलील)
(दुर्लक्षित : राहुल, ऋतुराज, अभिषेक अन् इतर)
ऑल द बेस्ट...

खलील वगळता बाकी कोणी सरप्राईज नाही. पांड्या नि दुबे असे दोघे दोघे आणताना रिंकु बिचारा उडाला. त्याला म्हणे फिनिशर म्हणून ग्रूम केले होते. Wink

Pages