आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कलकत्ता कवालिफाय होणारा पहिला संघ!

एलिमनेट होणारा पहिला संघ मुंबई इंडियन्सला हरवून प्ले ऑफ मध्ये दाखल!

थ्री चिअर फोर मुंबई इंडियन मॅनेजमेंट

आशा करतो ते जबाबदारी घेतील या पराभवाची Happy

आशा करतो ते जबाबदारी घेतील या पराभवाची
>>
आजच्या पराभवाची जवाबदारी २४ बॉल १९ आणि १४ बॉल ११ करणारे संघातले बडे खेळाडू घेणार का?
त्यांच्या संथ फलंदाजीने हातातला सामना गेला...

अरे विसरलो

आयपीएल मधे बॅटिंग सिरीयसली घ्यायची नसते नाही का...

आजच्या पराभवाचे नाही बोलत आहे. एकेका पराभवाचा विचार करून त्या सामन्यात चांगले न खेळलेल्या एक दोन खेळाडूंवर खापर फोडणे ही छोटी सोच झाली. अशाने संघ पुढे सरकत नाही. त्यादिवशी हार्दिक पांड्याने टिळक वर्मा चे नाव घेत एक वाईट उदाहरण दिले आहेच. असो, मी मात्र एकूणच या आयपीएलमध्ये जो मुंबईचा परफॉर्मन्स आहे त्याबद्दल बोलत आहे.

“ मी मात्र एकूणच या आयपीएलमध्ये जो मुंबईचा परफॉर्मन्स आहे त्याबद्दल बोलत आहे.” - मुंबई हारावी अशी खुनशी भुमिका घेऊन, मुंबईचा प्रत्येक पराभव साजरा करणार्याने, मुंबई चा संघ बाहेर पडल्यावर असली उच्चासनी भुमिका घेणं हा दांभिकपणा वाटतो.

मुंबई हरावी अशी खूनशी भूमिका
>>>>>
Happy
बरे..

बाई दवे
मुंबई इंडियन्स म्हणा .. माझ्या मुंबईचा रणजी संघ नाहीये तो Happy

आणि हो,
ऑस्ट्रेलिया किंवा बांगलादेश हे संघ सुद्धा हरावे असे मला त्यांचे सामने बघताना वाटते..
तेच आफ्रिका वेस्टइंडीजचे हे संघ जिंकावे असे वाटते.
याचे कारण त्या त्या संघासोबत जोडली गेलेली खिलाडी वृत्ती..
ज्या संघांकडे खिलाडवृत्ती चांगली आहे ते जिंकावे असे वाटते..
असो,
तुम्हाला नाही कळणार ते.. कारण मुंबई इंडियन्स ने काहीही चुकीचे केले नाही असे सोंग तुम्ही घेतले आहे. त्यामुळे वाद नाही घालत Happy

“ ज्या संघांकडे खिलाडवृत्ती चांगली आहे ते जिंकावे असे वाटते” - मुंबई तर खिलाडूवृत्तीसाठी दिल्या जाणार्या फेअरप्ले अ‍ॅवॉर्ड लिस्टवर सहाव्या क्रमांकावर आहे. म्हणजे खिलाडूवृत्तीचा प्रश्न तितकासा निकराचा नसावा. असं तर नाहीये ना कि तुझ्या मुंबईच्या संघाकडे बघण्याच्या दृष्टीकोनासाठीच तू तो 'नावडतीचं मीठ अळणी' हॅशटॅग सुरू केलायस?

मुंबई तर खिलाडूवृत्तीसाठी दिल्या जाणार्या फेअरप्ले अ‍ॅवॉर्ड लिस्टवर सहाव्या क्रमांकावर आहे.
>>>>

काय गंमत चालू आहे?
ते फेअर प्ले पॉईट आणि मुंबई मॅनेजमेंटने जे केले आहे त्याचा आपसात काहीतरी संबंध आहे का?

त्यादिवशी लखनऊच्या मालकाने जे राहुलशी केले ते सुद्धा तुम्हाला योग्यच वाटले असेल..

बेछूट, बेलगाम आणि बिनबुडाचे आरोप आणि सबगोलंकार वक्तव्य करतोच आहेस, तर यंदा इलेक्शनही लढवूनच टाक.

एक गम्मत म्हणून, एलएसजी च्या मालकाला मी कधी आणि कुठे सपोर्ट केलंय ते दाखवून दे.

खिलाडूवृत्तीसाठी टीमला सपोर्ट करण्याचा मुद्दा तुझा आहे, माझा नाही. मी फक्त तुझ्या लिहिण्यातली विसंगती दाखवली.

आजची मॅच सीएसकेसाठी सोपी ठरावी. राजस्थानचं क्वालिफिकेशनच्या उंबरठ्यावर अडखळणं चालूच आहे.

राजस्थानचा अपेक्षेप्रमाणे पराभव.
आयपीएल पॉइंट टेबल आपला दरवर्षीचा पॅटर्न फॉलो करत आहे.
आता हे बहुतेक सर्वानाच समजू लागले आहे हे बघून बरे वाटले.

खिलाडूवृत्तीसाठी टीमला सपोर्ट करण्याचा मुद्दा तुझा आहे, माझा नाही. मी फक्त तुझ्या लिहिण्यातली विसंगती दाखवली.
>>>

कुठली विसंगती?
मुंबई मॅनेजमेंट ने जे रोहित शर्मा सोबत केले ते आणि ते फेअर प्ले मध्ये सहाव्या क्रमांकावर असने याचा आपसात काहीतरी संबंध आहे का? भाई मजाक चल रहा है क्या?
नावडतीचे मीठ अळणी हेच खरे Happy
सोडा हा विषय.. जे जगाला दिसते आहे.. आणि ज्याला पब्लिक सपोर्ट सुद्धा करत आहे.. ते मला इथे मुद्दाम सॉंग घेतलेल्या कोणाला पटवून द्यायची बिलकुल इच्छा आणि गरज वाटत नाही Happy

तसेच या प्रकरणात रोहित शर्माला सपोर्ट करणाऱ्या क्रिकेट प्रेमींना खुनशी वगैरे विशेषने लावून कोणाला आनंद मिळत असेल तर तो देखील हिरावून घेण्याची मला इच्छा नाही Happy

मुंबई हारल्याचा तुला आनंद का होतो हे लिहिताना “ ज्या संघांकडे खिलाडवृत्ती चांगली आहे ते जिंकावे असे वाटते” असं तूच लिहिलंयस. आता म्हणतोयस ‘मजाक चल रहा है क्या‘. विसंगतीला काही मर्यादा??

आता तुझ्या बिनबुडाच्या आरोपांविषयी: संपूर्ण हार्दिक पंड्या प्रकरणात मी फॅन्सच्या ओव्हर-रिअ‍ॅक्शनविषयी आणि खेळाडूला मिळणार्या अवमानकारक वागणुकीविषयी निषेध नोंदवलाय. लखनौ विषयी तर मी काही लिहिलेलंच नाहीये. त्यामुळे ते 'सोंग', 'मीठ' वगैरे तुझ्या कल्पनेचे बुडबुडे आहेत.

ओके Happy

आरसीबी ने गेल्या ५-६ मॅचेसमधे चांगलाच मोमेंटम पकडलाय. ह्या मोमेंटमच्या जोरावर कितपत मुसंडी मारतात ते बघायचं. आजच्या सीएसकेच्या विजयानंतर आरसीबीच्या आशा काहीश्या धूसर झाल्या असाव्या.

बेंगलोरचा शेवटचा सामना चेन्नईशी आहे.
त्यामुळे बेंगलोरला दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही.
दोघांच्या रनरेटमध्ये जेवढा डिफरन्स आहे तो मिटवून बेंगलोरने चेन्नईला हरवले तर बेंगलोर पुढे जाईल.

दिल्लीचा रनरेट मात्र खूपच मागे असल्याने त्यांना पॉईंटच हवे होते. आजच्या पराभवामुळे ते जवळपास बाहेर गेले.

महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी नुसार BCCI मधील गुजरातच्या अधिकाऱ्यांमुळे अजित अगरकरला पांड्या ला T२० संघात स्थान द्यावे लागले. जय शहांमुळे BCCI मध्ये गुजरातचे महत्त्व वाढलेले आहे. रोहित शर्माला T २० captain केल्याची घोषणाही शहानेच केली होती. नक्की हा अधिकार कोणाचे असतो ते माहिती नाही. शहाचे एवढे महत्त्व आहे की BCCI सध्याचा प्रेसिडेंट कोण हे बऱ्याच लोकांना माहितीही नाही.

शहाचे एवढे महत्त्व आहे की BCCI सध्याचा प्रेसिडेंट कोण हे बऱ्याच लोकांना माहितीही नाही. >> +१. शहा अतिशय चतुराईने वक्तव्य करतो. पांड्या च्या समावेशाबद्दल शंका येताच आगरकर ला तो नको होता हे पिल्लू सोडून दिले. रोहित च्या लास्ट गेम आहे वक्तव्यावर ' तो पन्नास पर्यंत खेळू शकतो' असे सोडून दिले. नि त्याच बरोबर निवडीचे सगळे अधिकार निवडसमितीकडे आहेत हेही पिल्लू सोडलेले आहेच Wink

महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी नुसार BCCI मधील गुजरातच्या अधिकाऱ्यांमुळे अजित अगरकरला पांड्या ला T२० संघात स्थान द्यावे लागले.
>>>>

काहीही आहे हे..
जो पांड्या मुंबई इंडियन्स मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला हटवून कर्णधार होतो..
तो भारतीय संघात स्थान नाही मिळवू शकत का.. त्याला वाशिल्याची गरज का पडावी?

मटाकडे किंवा कोणाकडे काही पुरावे आहेत का? की उगाच हवेत गोळीबार..

मटा हवेत गोळीबार करतय का ते नाही माहिती. पण संघ निवडायचा अधिकार आगरकरचां आहे.आणि आगरकरला पांड्या नको असेल तर नकोच घ्यायला पाहिजे.

आगरकरचे तसे स्टेटमेंट आहे का?

पांड्या नको होता तर त्याला मध्यमगती किंवा वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू असा पर्याय होता का? आगरकरांनी असा पर्याय कधी आधी कुठल्या सामन्यात चाचपला का?

एक्झॅक्टली
फुटावे यासाठीच लिहिले आहे ते..
पुरावे हवेत हा निकष सगळ्यांना सेम आहे का हेच चेक करत होतो Happy

अन्यथा सर्व प्रकारच्या क्षमता कुशंका इथे मांडण्यास माझी हरकत नाही.
फक्त पुराव्यांचा हट्ट सोयीने नको Happy

नाही.
मी निपक्ष असायचे चान्सेस जास्त आहेत.
पण आजच्या काळात एखादे वृत्तपत्र पक्षपाती असायचे चान्स जास्त आहे.

वृत्तपत्रांनी जर पुराव्याशिवाय बातमी छापली तर त्यांच्या विरोधात केस ठोकता येईल (तुमच्याकडे विरुध्द पुरावे असले तर सिद्ध ही करता येईल)
हे त्यांनाही माहिती आहे, अन् म्हणून त्यांच्याकडे काहीतरी बेसिक पुरावा असल्याखेरीज ते काही छापणार नाही असा विश्वास येतो...

तुझ्या बाबतीत हे ग्राह्य नसल्याने तुला पुरावे मागितले जातात...

सोर्सेसपेक्षा उद्देश मॅटर करते. निपक्षपातीपणा मॅटर करते. वृत्तपत्र किंवा बातम्या हा सध्या एक व्यवसाय आहे. हल्ली बातम्या कशा असतात इथे कोणाला सांगायची गरज नाही. प्रश्नचिन्ह टाकायचे, शक्यता वर्तवायची, आमच्या सूत्रांकडून असे म्हणायचे.. एकच बातमी प्रत्येक वृत्तपत्र आणि चैनल मध्ये वेगवेगळ्या प्रकारे येते. कोर्टात केस वगैरे सगळे बोलण्यापुरते आहे. अश्या फुटकळ बातम्यांना घेऊन कोणी कोर्टात जात नाही.

असो,
सांगायचा मुद्दा असा की
वृत्तपत्राने म्हटले म्हणजे ती बातमी खरी असे नसते. तेवढ्यावर तिला खरी समजणे हा भाबडेपणा आहे.

आगरकरने असे स्टेटमेंट दिल्याचा व्हिडिओ नसेल तर विश्वास ठेऊ नका इतकीच अपेक्षा आहे.

Pages