माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
अनु तुम्ही राजमा ता आहात
अनु तुम्ही राजमा ता आहात
नही.....(इथे मी कानावर हात
नही.....(इथे मी कानावर हात ठेवून 100 मीटर धावले)
किमान ता च्या पुढे एखादा ई लावायचा
सगळ्या राजमा पोस्ट्स
सगळ्या राजमा पोस्ट्स
राजमा ता
राजमा ता

मी हा उपाय आधीच सांगितला होता हे लक्षात घ्या. काश्मीरऐवजी उत्तराखंड एवढाच काय तो फरक.
विशाखा तू सुद्धा राजमा ता,
विशाखा तू सुद्धा राजमा ता, बंगलोर घे तुला.
पुणे आणि pcmc साम्राज्य अनु चं आहे.
.

अनु
राजमा ताई मध्ये मजा नाय
इथेच एक घमासान हिलेरिअस चर्चा
इथेच एक घमासान हिलेरिअस चर्चा झालेली आठवते राजम्यावरून!
माबोवरचे एव्हरग्रीन टॉपिक्स
आईने अकबरी
राजमा कसा भिजवावा
कात्रीने पाव कापणे
घेवडा/बीन्स्/पावटा
बिर्याणी/ खिशात ड्रायफ्रूट्स
कुत्रा मांजर गावी नेणे
ई. ई.
राजमा चर्चा भारिये!
राजमा चर्चा भारिये!
लोक काश्मीरला जाऊन अक्रोड
लोक काश्मीरला जाऊन अक्रोड फोडायचं ते कायसंस घेऊन येतात...त्यापेक्षा सरळ राजमा आणावा!
तसेही पुण्यात लक्ष्मी रोड आणि दादरला रानडे रोड वर सगळ्या वस्तू मिळतात!
सगळेच
सगळेच
आईने अकबरी
आईने अकबरी
राजमा कसा भिजवावा
कात्रीने पाव कापणे
घेवडा/बीन्स्/पावटा
बिर्याणी/ खिशात ड्रायफ्रूट्स
कुत्रा मांजर गावी नेणे
ई. ई.>>>
- सुतार पक्षी
- मांजर रोज शी करते बाल्कनीत की कुठेतरी ते कसे थांबवू
- फरसबी / श्रावण घेवडा
सगळेच
सगळेच
बाकी अनु म्हणजे एकदम शाही वड्डे वड्डे लोग वाटली, केवळ राजमासाठी कश्मीरला जाणारी.
मांजर रोज शी करते बाल्कनीत >>
मांजर रोज शी करते बाल्कनीत >>>हे त्या कुत्री असलेल्या मांजरीच काम असणार
कुत्री असलेली मांजर>>> अनुचा
कुत्री असलेली मांजर>>> अनुचा मास्टरपीस आहे तो
हो अगदी अगदी.
हो अगदी अगदी.
इथे विषयांतर नको म्हणून
इथे विषयांतर नको म्हणून तिकडेच लिहिलं, शी करणाऱ्या मांजरीचे उपदाते(अपडेट)
कुत्री असलेली मांजर>>> अनुचा
कुत्री असलेली मांजर>>> अनुचा मास्टरपीस आहे तो>>> अरे हा कोणता पिएसपिओ? लिन्क द्या!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/64886
अनु
अनु
थॅन्क्स अनु!
थॅन्क्स अनु!
कबुतर राहिलं एव्हरग्रीन
कबुतर राहिलं एव्हरग्रीन टॉपिक्समधे.
कुत्री असलेली मांजर >>>
कुत्री असलेली मांजर >>>
बिर्याणी/ खिशात ड्रायफ्रूट्स>
बिर्याणी/ खिशात ड्रायफ्रूट्स>>> हा विरंगुळा कुठाय? लिंक प्लीजच
मोदकाची उकड चिकट झाली होती.
मोदकाची उकड चिकट झाली होती. मळून घेताना तुपाचे पुसट बोट लावून मळता आणि मोदक करताही आले, पण उकडून आलेले मोदकही चिकट वाटत होते. (मोदकाचे आवरण शिजले होते, चवही योग्य, पण मोदक हाताला चिकटत होते)
मला वाटत असलेली कारणे:
१. उकड करण्यासाठी उकळत ठेवलेल्या पाण्यात तूप कमी घातले.
२. मोदक पिठी: घरात एका ब्रँडची उरली होती (सकस होती बहुतेक) पण पुरेशी नव्हती. म्हणून इथल्या भारतीय ग्रोसरी दुकानात दिसलेली काटदरे ब्रँडचीही मिक्स करुन वापरली होती.
३. मोदक उकडण्यासाठी पातेल्यात चाळणीवर ठेवून न उकडता, इन्स्टापॉटमध्ये उकडले.
यापैकी काही असू शकेल का, किंवा इतर काही कारण?
सारणः यूट्यूबमध्यल्या काही सुगरणी सारणासाठी अर्धा पिवळाधमक गूळ + अर्धा डार्क चॉकलेटी गूळ वापरताना दिसल्या. तसं का करत असतील? सारणाच्या योग्य रंगांसाठी की हे गूळ चवीतही वेगवेगळे असतात? माझे सारण डार्क गूळ वापरल्याने सोनेरी न दिसता चॉकलेटी दिसत होते पण चव उत्तम झाली होती.
humm !! instapot मुळे असावे
humm !! instapot मुळे असावे का ? मी एक्स्पर्ट नाहीचे.. अजिबातच पण
कधी ऐकले / पाहिले नाही instapot मध्ये मोदक असं..
माझ्याकडे पण एक सकस की कुणाची बासमतीची आहे ती मी यावेळी मिक्स करणार आहे इथल्या मिळेल त्या पिठात .. आता करू की नको असे वाटते आहे ..
येईनच काही चुकले तर इथे सांगायला
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/50159
मुलींनो, ह्या पाकृ प्रमाणे उकड काढा. चुकीची शक्यता खूप कमी. धन्यवाद मनिमोहोर
आमचा मिक्सर नाही ना इतके
आमचा मिक्सर नाही ना इतके गंधासारखे वाटणार !! जेव्हा कधीच काही काम करायला नसेल तेव्हा मी करून बघेन मात्र हे नक्कीच..
मोदकाची उकड चिकट झाली होती>>
मोदकाची उकड चिकट झाली होती>> पाणी जास्त झाले असावे त्यामुळेच चिकट झाली उकड..पुढे मग मोदक पण चिकट झाले, मोदक वळताना तुपाएवजी तादळाची कोरडी पिठि लावली असती तर थोडा चिकटपणा कमी झाला असता.
आमचा मिक्सर नाही ना इतके
आमचा मिक्सर नाही ना इतके गंधासारखे वाटणार >> तुम्ही ते वाटलेले तांदूळ गाळण्याने गाळून घ्या म्हंजे बारीक कणी राहिली असेल तर ती वर राहिलं आणि गुळगुळीत मिश्रण खाली पडेल.
धनवन्ती, थँक्स.
धनवन्ती, थँक्स.
++१ माझाही मिक्सर गंध टाईप वाटणार नाही बहुतेक, पण ट्राय करेन.
anjali_kool
प्राजक्ता, धन्यवाद. हे तांदळाच्या पिठीचे लक्षात ठेवते.
रच्याकने काल हा प्रतिसाद
रच्याकने काल हा प्रतिसाद लिहिला आणि चिडून (म्हणजे अति उत्साह संचारल्यामुळे ) लगेच दीड वाटी तांदूळ भिजत घातले.(माझा चटणी वाटायचं मिक्सर तसा मोठा आहे, खूप चिंडूकला नाहीय म्हणून एका ऐवजी दीड वाटी म्हणजे जरा निम्मा तरी भरेल) योगायोग म्हणा किंवा काही म्हणा तू नळी वर काहीतरी शोधताना असलाच एक विडिओ दिसला priya s kichen कि कोणाचा ... actualy रीळ दिसले म्हणून विडिओ शोधला.. तिने पहिले तर उकड अक्षरशः २ मिनटात मळली मळली नाहीच!! फक्त एकत्र केली...
आणि म मो तुम्हाला सांगते ४ तासांनी मी तांदूळ वाटले आणि त्या अंदाजाने पाणी बिणी घालून उकड काढली आणि इतकी सुंदर मऊ लुसलुशीत तलम रेशमी उकड झाली ... त्याला मोदकाचा आकार दिला फक्त .. कि कसे होतेय वगैरे (करणार मी त्याच्या भाकऱ्याच आहे) इतक्याsss स्मूथलीss उकड कशीही हाताळता येत होती कि मला १०००००००% असे वाटले कि yes याचे मोदक नक्की होणार.. बाकी काही तयारी करायला वेळ नव्हता व आता शनिवारी करायचेच आहेत म्हणून फक्त निवेगऱ्या करतो तसे पीठ १२-१५ min उकडून पाहिले अप्रतिम लुसलुशीत शिजले व २ मुद्दाम आज सकाळी पहिले तर अजिबात कडक नाही का वातड नाही कि काही नाही !! म्हणजे हि उकड इतकी रेशमी कि माझे हात / बोटे सुद्धा मला नंतर मऊ मऊ भासू लागली इतर कुठे हात लावू नये असे वाटू लागले ..! इतकी भारी उकड की माझा नवरा सुद्धा त्याचे मोदक वळू शकेल इतके भारी झालेली .. उरलेली उकड फ्रीझ मध्ये आह इलाज एक वाफ देईन जस्ट .. व भाकरी करेन ..
शनिवारी ९९.९९% याच पद्धतीने करेन मोदक पण पहाटे ६ ला तांदूळ भिजत घालायचे काम करावे लागेल
वर्षा ताई नक्की try करा .. मी माझ्या मिक्सर वर करू शकले तरीही मी २ चाळण्या ठेऊन चाळून /गाळून घेतले .. काही जाड नव्हते उरले.. पण भारतात असतात तशा माझ्या चाळण्या खूप बारीक नाहीत म्हणजे मैदा चाळायची असते तसे नाहीये माझ्याकडे तरीपण उकड उत्तम झाली ..
Pages