माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केळ्याचे वेफर्स केळी डायरेक्ट तेलात धरून करतात. तळून झाले की ते तेलात असतांनाच मिठाचे पाणी घालतात त्यामुळे ते कुरकुरीत होतात.
पण माझा मुळात हा खाक्या की असले प्रकार खात्रीच्या गुणवत्तेचे आपल्या त्या ह्या बंधूंचे आणि इतरही बरेच प्रकार 'गरम काप' दुकानांत सहज मिळतात तस्मात तिथूनच ते आणावेत अन खावेत. दोन केळी, मीठ, तेल पाणी आणि स्वमेहेनत यात दुकानातले नेहेमीच जिंकतात.
सेम लॉजिक गोडाच्या पदार्थांच ही अगदी काही अपवाद वगळता.

सगळे लिहीत आहेत तर माझे पण 4 आणे!
मला एका मैत्रिणींनी राजमा व छोले शिजवायची युक्ती सांगितली होती. ती म्हणजे डायरेक्ट अल्युमिनियमच्या कुकरमध्ये राजमा शिजवायचा. आणि खरच एक नंबर शिजतो. मी घरच्यांसाठी म्हणुन एक छोटा कुकर विकत घेतला. बाकी मी त्यात काही करत नाहीं पण छोले, राजमा, चणे हे एक नंबर शिजतंय. घरी असेल तर करून बघा. माझा मेन कुकर स्टीलचा आहे, त्यात राजमा काय पण छोले पण धड शिजत नाहीत. करून बघा आणि मग इथे फीडबॅक द्या.

आता अल्युमिनियम आणि राजमा ह्यांची तात्विक वैचारिक आध्यात्मिक सांगड घालणारे व्हाट्सअप फॉरवर्ड आले की ... साता राजम्याची कहाणी सफळ संपूर्ण झाली म्हणून घोषित करण्यास हरकत नाही.

केळ्याचे वेफर्स केळी डायरेक्ट तेलात धरून करतात. तळून झाले की ते तेलात असतांनाच मिठाचे पाणी घालतात त्यामुळे ते कुरकुरीत होतात.-- हे केलं होतं तरी मऊ झाले

तेच मावेत तीस सेकंद गरम करून बघ किल्ली. गार झाल्यावर कडक होतात का बघ.

मुलगा लांबट तिखट केळ्याचे वेफर्स खातो, ते विकत आणते पण ते तो झटकन खात नाही आणि भरपूर हवे असतात, खेळत खेळत खातो, पावसाळी हवा असेल तर मऊ पडतात, ते मऊ चालत नाहीत त्याला मग असे गरम करते आणि ते थंड झाल्यावर कडक होतात.

Chips साठी मी मावे विकत घेणार नाहीये Lol
आधीच सामान मावेना kichen मध्ये Proud
वो खास युक्ती शोध के दो (आज हिंदी दिवस आहे )

मऊ chips खाल्ले, एवढी मेहनत केली होती. मुलांनी पण खाल्ले त्यांना अजून कळत नाही फार चिकित्सा Happy

मुलांनी पण खाल्ले त्यांना अजून कळत नाही फार चिकित्सा.>>> हेच ते दिवस आहेत किल्ली बाई. रिलॅक्स व्हा. नंतर आहेच - "हे असंच केलंस. ते तसंच केलंस. उकडायच्या अंड्याची भुर्जी केलीस आणि भुर्जीची अंडी उकडलीस. असंच करतेस तू आई नेहमी."

किल्ली Lol

ओहह सॉरी मी मावे असेल तर असं करता येईल लिहायला हवं होतं. चिप्स संपले नाहीतर दुसरा उपाय सांगितला असता. जाऊदे सांगते, कढईत मंद गॅस वर परतणे.

खरंय चिन्मयी, सध्या हाच नको तो dress पाहिजे अशा type चे नखरे सुरु असतात दोघांचे.
खाण्यासाठी नाहीत अजून तरी चिकित्सा.
अंजू -नोटेड. पुढच्या वेळी ध्यानात ठेवीन

हाच नको तो dress पाहिजे अशा type चे नखरे>> यावर माझी भाची तिच्या पहिल्या वाढदिवसाला मला नविन फ्रॅाक नको बनियनच घालायचा आहे म्हणून तासभर रडत होती ते आठवले Happy

अरे मग द्यायचं की काय हवं ते घालू.
छान फ्रॉक मधले फोटो काढून बघितले जातील फारतर दोन चार वेळा. असं बनिअन मध्ये केक कापतानाचा फोटो कायमची आठवण राहिला असता. कायम चेरिश केला असता की! Happy

यावर माझी भाची तिच्या पहिल्या वाढदिवसाला मला नविन फ्रॅाक नको बनियनच घालायचा आहे म्हणून तासभर रडत होती ते आठवले >>> माझी ३ वर्षांची भाची माझ्याच लग्नात चांगला पायघोळ ड्रेस घालायचा सोडून चड्डी-बनियनवर फिरत होती. आता फोटो बघून रडते. म्हणे सगळ्यांनी चांगले कपडे घातले आणि मलाच खराब कपड्यात ठेवलं.

बरं, डोसे शाळेतही डब्यात मऊ रहावेत म्हणून काय करावं? सेट डोसाच करते मी. तरीही दुपारी कोरडा वाटतो खाताना.

पुरण केले होते पण गडबडीत गॅसवर जास्त वेळ ठेवले गेल्याने कोरडे झाले आहे. आता त्याला दुरुस्त करता येईल का?

याच धाग्यावर मागे कुठे तरी राजमा मऊसूत कसा शिजवावा असा प्रश्न मी विचारला होता. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता. त्यावर खूप सल्लेही मिळाले होते. पण त्यानंतर ड्राय राजमा बीन्स वापरून केलाच नव्हता.

परवाच मावसभावाने काश्मीरवरून आणलेला राजमा दिला. तो माझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे एक शिट्टी काढून ३० मिनिटे बारीक गॅसवर शिजवला. नेहमीसारखा ऍल्युमिनिअम च्या कुकरमध्ये डायरेक्ट न शिजवता स्टीलच्या कुकरमध्ये टोपात घालून शिजवला. राजमा अगदी मस्त शिजला. काश्मीरी मुलींनी सांगितल्याप्रमाणे 'हमारे यहां ३०-४० मिनटमें राजमा गलता हैं'चा खरोखरी प्रत्यय आला.

सो राजमा मऊ शिजवू न शकणाऱ्या मित्र-मैत्रिणींनो दोष आपला नसतोच मुळी. दुकानदार/अमेझॉन/ब्लिंकइट, जून राजमा, ताजा राजमा आणून न देणारे नातेवाईक, काश्मिरी नसलेला राजमा, 'हमारे यहां कि हवा/पानी' नसलेले आपापल्या ठिकाणचे वातावरण असे सगळे फॅक्टर्स आपापल्या कुंडलीत एकत्र आले कि राजमा हमखास शिजत नाही.

"काश्मीर ची तिकिटं काढतोय"
"वा,व्हेकेशन का?"
"नाही हो, राजमा विकत घेऊन संध्याकाळी परत, उद्या दाल माखनी चा बेत आहे."
(आमचे एक नातेवाईक टाकतायत काश्मीर ची रिल्स, त्यांना सांगावे की काय राजमा आणायला Happy )

त्यांना सांगावे की काय राजमा आणायला >>>
सांग सांग. एवढे काश्मीरला जातात आणि राजमा आणत नाहीत म्हणजे काय? शिवाय केशर आणायला सांगत नाहीस म्हणून हायसं वाटेल त्यांना. आणि परत कुठे गेले तर रील्स वगैरेही टाकणार नाहीत.

राजम्याने किडनी सुधारते, वजन कमी होते, शुगर कंट्रोल होते, हार्ट ब्लॉकेज निघून जाते असे एक फॉरवर्ड तयार करून त्यात राजमा कसा निवडावा यावर विवेचन करून काश्मीरचा राजमा नंबर एक वर ठेवा आणि पाठवा नातेवाईक ग्रुप मध्ये अहोंकडुन.
मग तुम्ही "अय्या खरंच? पुण्यात कुठे मिळतो काश्मीर राजमा, खात्रीने?"
अशी पोस्ट टाका.
एवढ्याने काम व्हायला हवे.
नाही झाले तर "अरे हो, तुम्ही काश्मीरला आहात ना, काय भाव आहे तिकडे राजम्याचा?" अशी सुरवात करा.

मानव >>>> Lol Lol
शेवटचे वाक्य टाकण्याआधी 'त्या हिच्या मावसभावाने काश्मीरवरून आणलेला राजमा ३० मिनिटात शिजला' हे टाकून पहा.

मला आजूबाजूला पाट्या दिसायला लागल्या
"आमच्या इथे रोज काश्मीरहुन विमानाने ताजा मागवलेला आणि एका शिटीत शिजणारा राजमा मिळेल.कोणाला चाचणी करायची असल्यास 5 ग्रॅम राजमा बॅग 10 रु मध्ये मिळेल.इंडकशन प्लेट व कुकरचे वेगळे भाडे 20 रु वेगळ्या काऊंटरवरून जमा करून कुपन घेणे."

All राजमा posts Lol
अनु तुम्ही राजमा ता आहात Happy

Pages