Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मिते, कैरोत आशुतोषच्या
स्मिते, कैरोत आशुतोषच्या नंबरवर नाजुक आवाज???? संपदाSSSSSSSSSS, तू तर म्हणालीस की तू कध्धीच इजिप्तला गेली नाहियेस इतक्या वर्षात !!!
स्मि, तोषा.. वेंधळेपणाचे
स्मि, तोषा.. वेंधळेपणाचे वर्तुळ पूर्ण केलेत... क्या बात है
तोषा एक्स्प्लेनेशन दे आता आशु
तोषा एक्स्प्लेनेशन दे आता आशु ला
कैरोत आशुतोषच्या नंबरवर नाजुक
कैरोत आशुतोषच्या नंबरवर नाजुक आवाज >>
.. तोषा बरोब्बर सापडलास 
अरे तो चूकुन सिरियात असेल तेव्हा
आशु, अग ती ईजिप्शियन संपदा
आशु, अग ती ईजिप्शियन संपदा होती बरोबर. तिला कुठे माहितीय स्मिता? म्हणुन तिने भाबडेपणाने सांगितल की तो ड्रायव्हिंग करतोय

बादवे,तुला बॉम्बच टाकायचा असेल तर माझी ना नाही, पण माझ्या घरात तालिबानी अतिरेकी आहे, तिच्याकडे शस्त्रसाठा मुबलक आणि अतिसंहारक आहे
तोषा, केद्या केदारा सिरीयाच
तोषा, केद्या

केदारा सिरीयाच फारच सिरीयसली घेतलयस मनावर
पण माझ्या घरात तालिबानी
पण माझ्या घरात तालिबानी अतिरेकी आहे, तिच्याकडे शस्त्रसाठा मुबलक आणि अतिसंहारक आहे >>>> अरे वा ! माझा बाँब वाचला म्हणायचा. ती अतिरेकीच काफी है तुझ्यासाठी.
केदारा सिरीयाच फारच सिरीयसली
केदारा सिरीयाच फारच सिरीयसली घेतलयस मनावर<<<<<
पुण्यात असताना एकदा मंडईत
पुण्यात असताना एकदा मंडईत गेले होते भाजी आणायला आणि येताना एक मोठ्ठ भरीताच वांग फुकट घेउन आले.
मडईतुन ओझी घेउन घरी आले आणि घरी आल्यावर नवरा आणि मुलगा माझ्याकडे बघुन हसायला लागले जोरजोरात. मला कळेचना. मग म्हणायला लागले चोरी केली ती केली वर गावभर मिरवली.
मग मला कळलं माझ्या ओढणीच्या गोंड्यात अडकुन एक मोठ्ठ वांगपण घरी आलेलं. आता हातात इतकं ओझं होत की ओढणी जड लागलीच नाही किंवा तेवढं जाणवलंच नाही. मंडई पासुन गाडगिळ रोडवरच्या माझ्या घरी आख्खा रस्ताभर मी ते मिरवत आणलं आणि ते मला कळलही नाही.
बरं कुठल्या भाजीवाल्याकडे ते माझ्या ओढणीत अडकल हेह्दी माहीत नाही
नंतर जाम लाज वाटली की लोकांनी वाटेत माझी ही मिरवणुक नक्कीच बघितली असणार ना.
पण माझ्या घरात तालिबानी
पण माझ्या घरात तालिबानी अतिरेकी
माझ्या घरातपण 'धानू' आहे. तिनं माझ्या गळ्यात हार घालून ( आणि त्यात एक बॉम्ब घालून) मला कायमचा राजीव गांधी करून ठेवलं आहे..
काय पण एक एक किस्से आहेत ...
काय पण एक एक किस्से आहेत ... ह. ह. पु.वा.
वरणाचा किस्सा तर
अजुन २ पानावरचे किस्से वाचलेत तर ह. ह. पु.वा. झाल अजुन मागे गेले तर काय होईल!!!
सास, खरच जा आणि सगळी पान
सास, खरच जा आणि सगळी पान वाचून काढा. वेड लागेल हसुन हसुन.
मनिषा!
मनिषा!
मुग्धा, हो वाचायची आहेत सग्ळी
मुग्धा,
हो वाचायची आहेत सग्ळी पान पण आज, आता हिंमत नाही आणखी हसण्याची... रोज १-२ पान असा बेत आहे...
... ईथले किस्से म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, टेंशन वै. वै. विसरण्याचा जालीम ऊपाय
... रोज एक डोस लेनाईच मंगता 
मनिषा
मनिषा
मने पुण्यात किती सज्जन लोक
मने
ठाण्यात असतीस तर वांग्यासकट भाजी ही जाऊन रिकाम्या पिशव्यानी घरी आली असतीस
पुण्यात किती सज्जन लोक रहातात अजुन्हे, मागच्या मागे वांग पळवल नाही कोणी
सास १०० मोदक तुला
माझा वेंधळेपणा / मुर्खपणा /
माझा वेंधळेपणा / मुर्खपणा / शहाणपणा ( Three in One )
अकरावीत असताना केमिस्ट्री प्रयोगशाळेत खेळत
बसलो होतो.
ते दिलेले सॉल्ट कसले आहे ह्याची काहीही चिन्ता न करता ते सॉल्ट मी fuming acid ( boiling mixture of sulfuric acid , nitric acid and hydrochloric acid ) मध्ये टाकले.
मग काय अख्खे acid अन्गावर पडले ... चेहेरा , शर्ट etc.
मग एकदम शहाणपणा सुचला rack वरची एक base ची (Sodium hydroxide ) बाटली अख्खी चेह्र्यावर ओतली आणी बचावलो.
सुदैवाने काहीही झाले नाही.
बेसीक नॉलेज कुठे कामाला येईल ..... सान्गता येत नाही
निलुभाऊ, तुम्हि कोणत्या
निलुभाऊ, तुम्हि कोणत्या कॉलेजला होता जरा सांगाल का?
सास, तुम्हाला म्हणाल तितके %
सास, तुम्हाला म्हणाल तितके % अनुमोदन.
सानुला केक हवा होता म्हणुन
सानुला केक हवा होता म्हणुन दुपारी करायला घेतला. वेळ काही फारसा लागणार नव्हता मावेत ५ मि. होणार होता केक पण जेवुन "पा" बघायला जायच होतं, सकाळ पासुन किचन मधेच बिझी होते त्यात सानु मी मदत करणार म्हणुन पाठी लागलेली त्या गडबडीत मी हँड ब्लेंडर नी बॅटर करुन मावेत सेट करुन ठेवल नी ब्लेंडर च ब्लेड शोधत बसले किचन प्लॅटफॉर्मवर. केक थंड झाल्यावर भांड्यातुन उलट करुन ठेवला तेव्हा केक मधेच चकाकणार काय बघायला गेले तेव्हा ब्लेंडर च ब्लेड मिळाल
मने अगं काय हे !!!! मी
मने

अगं काय हे !!!! मी इमॅजिन करून हसतीए.
कालचा एक जपान मधला
कालचा एक जपान मधला किस्सा...
सुपर मार्केट मधे गेलो होतो.. हातमोजे घ्यायचे होते.. पण कुठे आहेत ते सापडत नव्हते.
मी कंप्लीट ब्लँक झालो
तिला म्हणालो..
).
मग मी हातवारे पण केले.. तरी तिला काय कळेना... तेथे एक पुतळा होता.. आणि मला त्याच्या हातातले हातमोजे दिसले.. पटकन तिकडे हात केला, कि हे कुठे मिळेल? ती फिस्सकन हसली.. आणि म्हणाली.. ओह्ह,.. हँड्ग्लोव्ज ?..
तिथे शॉप असिस्टंट उभी होती... मी तिला विचारायला गेलो... आणि हातमोज्याला जपानी आणि इंग्लिश मधे सुद्धा काय म्हणतात तेच आठवेना..
'ते नो सॉक्स वा दोको ? '(हातमोज्याचे जपानी भाषांतर.. ते नो सॉक्स.. हाताचे मोजे
आता तिच्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या...
ते नो सॉक्स
ते नो सॉक्स
केद्या, कवे
केद्या, कवे
परवाची गोष्ट........ मी
परवाची गोष्ट........ मी थालिपीठाचं पीठ भिजवून ओट्यावर ठेवलं होतं नंतर दूध पिशवी फोडून पातेल्यात ओतलं तेवढ्यात मुक्ताने काहीतरी विचारलं म्हणून मागे वळून तिला उत्तर दिलं आणि परत ओट्याकडे वळून गॅस वर दूधा ऐवजी थालिपीठाच्या गोळ्याचं ताट ठेवलं..... थोड्यावेळाने असा काय वास येतोय म्हणून बघितलं आणि कपाळावर हात मारून घेतला, नंतर तासभर ते करपलेलं ताट उलथण्याने खरवडत बसले
आत्याबाई सॉलीड
आत्याबाई सॉलीड
मंजे
मंजे

मंजे
मंजे
केद्या मी बंगळुरुला असताना
मी बंगळुरुला असताना एकदा मार्केट मधे फिरत होते. मला रताळी घ्यायची होती, त्याला कन्नड मधे काय म्हणतात ते विचारुन घेतलं होतं एका ओळखीच्या बाईला पण आयत्या वेळी केद्यासारखी ब्लँक झाले. एकाही भाजीवाल्याकडे मेली रताळी दिसेनात
शेवटी हिय्या करुन एका रिकामटेकड्या भाजीवाल्याला वर्णन चालू केलं......."वो जो उपवास मे खाते है ना, पोटॅटो जैसा, लेकीन लाल होता है, मूली के जैसा..." त्याने शांतपणे सगळं ऐकलं आणि विचारलं.......रताळं ???? (:चक्कर येऊन पडलेली बाहुली:)
रताळं ???? >> खूप ठीकाणी
रताळं ???? >> खूप ठीकाणी वेडा ह्या अर्थाने शिवी देतात 'ए रताळ्याऽऽऽ'
आत्या ग्रेटेस
Pages