क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*ड्रॉ चालतील का पण भाऊ ?* - हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य क्रिकेटप्रेमींना विचारून काय उपयोग ? मर्यादित क्रिकेटच्या अफाट लोकप्रियतेचा, प्रचंड आर्थिक उलाढालीचा पुरेपूर फायदा घेत असलेले अगणित आजी व माजी क्रिकेटपटू ढेकर देत, " पण कसोटी क्रिकेट हेंच खरं क्रिकेट " असं आम्हाला सतत सुनवत असतात, त्यांना विचारावा हा प्रश्न. ड्रॉ हा कसोटी क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे, हे त्यांनाही माहीत असेलच ना !
असामीजी, माझी प्रामाणिक शंका ही आहे की, जर कसोटी क्रिकेट आता पूर्णपणे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मानसिकतेने व पद्धतिने खेळलं जात असेल तर तांबडा चेंडू, दोन इनिंगज, अमर्याद षटकं इ. नियमातर्गत बाबी सोडल्या, तर आतां असं कोणतं वैशिठ्य आहे ज्यामुळे कसोटी क्रिकेट हेंच खरं क्रिकेट म्हटलं जातं .

दोन इनिंगज, अमर्याद षटकं हेच वैशिष्ट्य आहे भाऊ! त्यामुळेच फलंदाजाला टिकून रहावं लागतं. मर्यादित षटकांमधे बॅट फिरवावीच लागते कधी ना कधी.

तांबडा चेंडू, दोन इनिंगज, अमर्याद षटकं इ. नियमातर्गत बाबी सोडल्या, तर आतां असं कोणतं वैशिठ्य आहे ज्यामुळे कसोटी क्रिकेट हेंच खरं क्रिकेट म्हटलं जातं .
>>
बॉलर आणि फिल्डींग वर कोणतेही निर्बंध नसल्याने Equal opportunity. Batter friendly नियम नाहीत

पाच दिवस वापरली जाणारी खेळपट्टी..
ऐशी ओवर वापरला जाणारा चेंडू
यातून निर्माण होणारे विविध कॉम्बिनेशन..

तर आतां असं कोणतं वैशिठ्य आहे ज्यामुळे कसोटी क्रिकेट हेंच खरं क्रिकेट म्हटलं जातं . >> Need for adaptability ! कसोटी एव्हढे क्रिकेटरचा वेगवेगळ्या पैलू मधून कस पाहणारे अजून काय आहे ? एक आक्रमकतेची कमी होती तीही बाझबॉल ने वाढवली आहे. जेव्हढे वैविध्य कसोटी क्रिकेट मधे पाहायला मिळते तेव्हढे इतर प्रकारांमधे मिळत नाही हा मुख्य फरक आहे.

हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य क्रिकेटप्रेमींना विचारून काय उपयोग ? >> सामान्य क्रिकेटप्रेमींमूळेच क्रिकेट टिकून आहे ना Happy

मुशिर खानचा सध्याचा फॉर्म बघता त्याला टी २० वर्ल्ड कप साठी घेऊन जायला हवे Happy

विदर्भचा दारुण पराभव होणार वाटते. >> पंडीत च्या कोचिंखालची टीम आह रे. झुंजतील. जिंकणे अवघड वाटते.

असामिजी, आपण कसोटी क्रिकेटची वैशिष्ट्यं संगितलीत त्याच्याशी 100% सहमत. पण आता असं कसोटी क्रिकेट खरंच खेळलं जातं का ? *आक्रमकतेची कमी होती तीही बाझबॉल ने वाढवली आहे * , की आता बाझबॉल व इतर करणामुळे वरील वैशिष्ठे बाजूला पडून, कसोटी क्रिकेट व इतर क्रिकेट यातील फरकच नाहींसा होत आला आहे ?
असो, हा विषय काढून मी उगीचच इथे ' कबाबमे हड्डी ' होतोय, असं मलाही वाटतंय ! Wink

बाझबॉल व इतर करणामुळे वरील वैशिष्ठे बाजूला पडून, कसोटी क्रिकेट व इतर क्रिकेट यातील फरकच नाहींसा होत आला आहे ?
>>
भाऊ, इतर कारणे कुठली ते परत सांगाल का? मी मिसली बहुतेक पोस्ट.

बाझबॉल अप्रोच हा गेल्या दोन एक वर्षांत रुळलेला शब्द आहे, पण हा अप्रोच मला तरी नवीन वाटत नाही. 2001 च्या स्टीव्ह वॉ च्या ऑसी संघाचाही असाच जलद धावा गोळा करायचा अप्रोच होता, हेडन अन् गिलख्रिस्ट बत्ते घालत कुटायचे अन् बाकी लोकं रनारेट 3.5 - 4 च्या आसपास राहील हे बघायचे (जे तेंव्हाही सर्वसाधारण पणे असलेल्या 2-3 पेक्षा आक्रमक होत). याच्याच जिवावर ते सलग 16 टेस्ट जिंकले होते.
नंतर सेहवाग ओपन करायला लागल्यावर आपलाही अप्रोच आधीपेक्षा थोडा फार तरी आक्रमक झाला होता.

तेंव्हा हाणामारी करणारा एखाद दुसरा असायचा, आता इंग्लंड मधले सगळेच तसं व्हायला बघतात. (पूर्वी सिनेमात एखादं आयटम साँग असायचं, हल्ली सगळीच गाणी आयटम साँग्ज असलेले सिनेमे ही आले आहेत, पडले आहेत)
पण कसोटी क्रिकेटचे बाकी सर्व बारकावे, जे त्याला स्पेशल बनवतात, ते अजूनही तसेच आहेत असं मला वाटतं...

2001 च्या स्टीव्ह वॉ च्या ऑसी संघाचाही असाच जलद धावा गोळा करायचा अप्रोच होता, >> जलद पेक्षाही डॉमिनेट करायचा अ‍ॅप्रोच होता असे मी म्हणेन. इंग्लंडचा वासरात लंगडी गाय शहाणी प्रकार वाटतोय.

पण आता असं कसोटी क्रिकेट खरंच खेळलं जातं का ? >> मला तरी वाटतेय कि तसे होतेय. भारताचीच बॅटींङ बघा ना - गरजेप्रमाणे अक्रमक झाली नि नाही तेंव्हा कमी केलय. अ‍ॅशेस मधे पण हेच दिसले होते. एक इंग्लंडच आहे जे जिंकू किंवा हरू ह्या मोड मधे खेळतेय. ड्रॉ ऑप्शन ला टाकलाय.

आज अश्विनची मुलाखत ऐकली. त्यात त्याने हेच पॉईटं केले आहे कि ईंग्लंड चा पूर्ण अ‍ॅप्रोअच डीफेन्सलेस होता. बॉल्डीफेंड करायची गरज नाही हे सगळ्यांनी ठरवून खेळले होते. त्यात रूट सारखा बेस्ट डीफेन्स टेक्निक असलेला खेळाअडू होता ह्याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केले. अँडरसनच्या आमही नव्वद ऐवजी पन्नास साठ ओव्हर्स मधे पाचशे चेस करणे पसंत करू ह्या ट्रिगर पॉईंट वरून हे सगळे मत त्याने व्यक्त केले.

2001 च्या स्टीव्ह वॉ च्या ऑसी संघाचाही असाच जलद धावा गोळा करायचा अप्रोच होता, हेडन अन् गिलख्रिस्ट बत्ते घालत कुटायचे अन् बाकी लोकं रनारेट 3.5 - 4 च्या आसपास राहील हे बघायचे >>> कोलकाता २००१ मधे त्यामुळेच हरले बहुधा. ड्रॉ त्यांच्या प्लॅन मधे नव्हतीच. १६ मॅचेस सलग जिंकल्यावर ड्रॉ करता प्रयत्न म्हणजे नामुष्की वाटली असती - "मेरे उसूल, मेरे आदर्श मुझे इसकी इजाजत नहीं देते" Happy तेव्हाही हेडन, स्लेटर वगैरेंनी धमाक्यात सुरूवात केली होती. पण टिकले नाहीत.

रणजी फायनल पाचव्या दिवसापर्यंत ताणली गेली आहे. तो मुशीर खान सर्फराजचा भाऊ आहे हे माहीत नव्हते.

रोहीत शर्मा आयसीसी कसोटी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर..
आजच्या तारखेला भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज !

१६ मॅचेस सलग जिंकल्यावर ड्रॉ करता प्रयत्न म्हणजे नामुष्की वाटली असती
>>>>
हे दादाने सुद्धा ओळखले होते. म्हणून त्याने टारगेट थोडे अवघड करायला आणि त्यांना तडफडवायला लेट declare केले होते. असे नंतर तोच म्हणाला होता. माईंड गेम.

विदर्भ ३०३-५
मुंबईचा धक्कादायक पराभव होणार का?
अजून ६९ ओवर मध्ये २३५ धावा हव्या आहेत.
दोन सेट फलंदाज.. ८० ची भागीदारी झाली आहे..

म्हणून त्याने टारगेट थोडे अवघड करायला आणि त्यांना तडफडवायला लेट declare केले होते. >>> हो. स्टीव वॉ ने सुद्धा लिहीले आहे त्याच्या पुस्तकात हेच. आणि त्याचा इफेक्ट झाला हे मान्यही केले आहे.

मुंबई - टोटल रिस्पेक्ट. ४३ वा विजय ना?

हो. स्टीव वॉ ने सुद्धा लिहीले आहे त्याच्या पुस्तकात हेच. आणि त्याचा इफेक्ट झाला हे मान्यही केले आहे. >> गमतीचा भाग हा आहे की सेंत्युरी इज नॉट एनफ ह्या सौरवच्या पुस्तकात त्याने असे काही विचारपूर्वक केल्याचे लिहिले नाहिये. त्यात स्टीव वॉ बद्दल एक पूर्ण चॅप्टर आहे ज्यात गेम्समनशिप वगैरेबद्दल बरेच लिहिलेय पण असे मुद्दामहून डीक्लेअर केल्याचा उल्लेख नाहिये. बहुतेक सगळे ब्लेझर नि अलार्म क्लॉक बद्दल आहे. स्टीव वॉ बहुधा भित्यापाठी ब्रह्मराक्षस चा शिकार झाला होता कि काय Happy

मुंबई ४२
आठ वर्षांनी जिंकली यंदा..
पण यावेळी डिझर्व्ह करत होती..
सातत्याने चांगला खेळ करत होती. आणि बरेच सामन्यात गरजेच्या वेळी आपला खेळ उंचावला त्यांनी. त्यामुळे कधी नव्हे ते मी त्यांचे सामने फॉलो करत होतो.

स्टीव वॉ बहुधा भित्यापाठी ब्रह्मराक्षस चा शिकार झाला होता कि काय >> असू शकेल. मी गांगुलीचे पुस्तक पूर्ण वाचलेले नाही अजून. पण वॉ ला तसे वाटले हे त्याने लिहीले आहे आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला, हे ही. कारण तेव्हाच्या त्या टीमला दुसर्‍याच्या मर्जीवर (कधी आता डिक्लेअर करतो त्याची वाट पाहात) गेम सुरू राहणे याचा राग आला होता आणि तोच इफेक्ट गांगुलीला साधायचा होता असे त्याने लिहीले आहे.

पण गांगुलीने तसे काही नव्हते हे लिहीले असेल तर तो मॅटर ऑफ फॅक्ट बोलायचा त्याला धरूनच ते आहे. नाहीतर तो क्रेडिट घेऊ शकला असता. वॉ चे पुस्तक त्याच्या बरीच वर्षे आधी आले आहे.

मुंबई ४२ >>> हो करेक्ट.

मुंबई च्या टीम मधे नेहमीचे दिग्गज नसतानाही ते जबरदस्त खेळले होते. ठाकूर, दुबे वगैरेनी ऐन मोक्याच्या वेळी मोठ्या खेळी केल्या आहेत. दुबे बाद फेरी खेळू शकला नाही हे खरच दुर्दैवी होते. त्या आधी तो तारण्हार झाला होता मोक्याच्या वेळी.

मुशीर खान, कोटियन ने मोक्याच्या क्षणी दाखवलेली चमक, रहाणे चं नेतृत्व (आणि त्याला फायनलला गवसलेला फॉर्म), ठाकूरच्या एक-दोन महत्वाच्या इनिंग्ज - सगळंच जुळून आलं मुंबईच्या टायटल जिंकण्यात. अभिनंदन मुंबई!!

स्पेअर अ थॉट फॉर विदर्भ.. फझल च्या कॅप्टन्सीत चांगली स्थिरावलेली टीम वाडकरने चांगली लीड केली. वाडकर, ठाकूर चांगले खेळले. उमेश यादवने त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा जास्त उपयोग करून द्यावा विदर्भाला असं वाटतं.

बाय द वे, आयपीएल चे विजय कितीही दिमाखदार असले तरी रणजीतील विजयांचे महत्त्व आणि व्हॅल्यू जास्त आहे असे तुम्हाला वाटते का? मला तरी वाटते. असल्या डॉमिनन्स वर अमेरिकेत पिक्चर निघाले असते, जर हे तेथे असते तर Happy

आकाश चोप्राने राजस्थान संघाच्या लागोपाठ दोन वर्षे रणजी करंडक जिंकण्यावर दोन पुस्तके लिहीली आहेत. ती मी आणली आहेत पण पुण्यात राहिली आहेत. वरवर चाळली तेव्हा वाचनीय वाटली होती. हृषिकेश कानिटकर ने राजस्थानचे कप्तानपद स्वीकारून ते विजय मिळवून दिले होते इतके लक्षात आहे.
https://en.wikipedia.org/wiki/2010%E2%80%9311_Ranji_Trophy
https://en.wikipedia.org/wiki/2011%E2%80%9312_Ranji_Trophy

मुंबईच्या काही संस्मरणीय मॅचेस मधे वेंगसरकरने शेवटपर्यंत लढत देऊनही थोडक्यात (२ रन्सने) हरलेली हरयाणा विरूद्धची फायनल- याबद्दल वाचले आहे.
https://www.espncricinfo.com/series/ranji-trophy-1990-91-545553/bombay-v...

तर दिल्ली जिंकेल अशी शक्यता असताना (३०० चे टार्गेट असतना १००/१) शास्त्रीने ८ विकेट्स घेउन मुंबईला जिंकून दिलेली फायनल
https://static.espncricinfo.com/db/ARCHIVE/1980S/1984-85/IND_LOCAL/RANJI...

तर दिल्ली जिंकेल अशी शक्यता असताना
>>
97 ला, ग्वाल्हेर च्या मैदानात रंगीत कपडे, पांढरा चेंडू वापरून डे - नाईट खेळलेल्या फायनल मधे ही शेवटच्या दिवशी दिल्ली जिंकेल अशीच शक्यता होती. (त्यांच्या मुख्य खेळाडूंनी आपल्या फॅमिली मेंबर्स ना स्टेडियम वर बोलावलं होतं) पण नीलेश कुलकर्णी नी अफलातून स्पेल टाकून मुंबईला जिंकवलं होतं

"मुंबईच्या काही संस्मरणीय मॅचेस मधे वेंगसरकरने शेवटपर्यंत लढत देऊनही थोडक्यात (२ रन्सने) हरलेली हरयाणा विरूद्धची फायनल- याबद्दल वाचले आहे." - मे महिन्याच्या सुट्टीसाठी मुंबईला आत्याकडे गेलो होतो. तेव्हा ह्या मॅच चा रोज मटामधे रिपोर्ट वाचला जात होता आणि आजुबाजूची क्रिकेटप्रेमी मंडळी चवीनं चर्चा करत होती ते आठवतंय. शेवटच्या दिवशी हार्टब्रेक नंतर वेंगसरकरचा ग्राऊंडवर रडतानाचा फोटो पाहून फार वाईट वाटलं होतं.

त्या काळी एक फार वेगळी पद्धत होती. पहिली बॅटिंग करणार्या टीमने रन्स चा डोंगर उभारला की दुसरी टीम त्यांच्या बॅटिंगच्या वेळी प्रत्त्युत्तर देणारा, त्याला साजेसा मोठा स्कोअर करायचे. आता ती पद्धत बदलत चाललीय. एकाने मोठा (म्हणजे ३०० वगैरे. ५००+ इतका वेळ नसतो) स्कोअर केला की ते जवळ जवळ जिंकल्यात जमा असतात - कधी कधी डावानं सुद्धा. Happy Happy

हो त्या मॅच मधे वेंगसरकरपासून कपिल पर्यंत सगळे खेळू शकले होते. असे बर्‍यच वर्षांनी झाले होते. मला अजूनही ती मॅच लाईव्ह पाहिलेली आठवते. कुर्विला ने अ‍ॅलन डोनाल्ड सिंप्टम्स दाखवून मॅच घालवली Happy बहुधा त्याचा पहिलाच सामना होता नि वेंगरसरकर ला क्रॅम्प्स आल्यामूळे राजपुत रनर म्हणून आला होता.

बाय द वे, आयपीएल चे विजय कितीही दिमाखदार असले तरी रणजीतील विजयांचे महत्त्व आणि व्हॅल्यू जास्त आहे असे तुम्हाला वाटते का? >> मला हि तुलना पटली नाही. दोन्ही फॉर्‍मॅट वेगळे आहेत.
आयपील : मोठ्या प्रमाणात भरपूर सामने खेळावे लागते नि सातत्य जमवावे लागते. एकदम हेटेरोगिनियस टीम्स एकत्र येतात नि त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. कोचिग स्टँडर्ड जास्त उच्च आहे. इंटरनॅशनल खेळाडूंशी खेळावे लागते (ज्याची काँपीटीटीव्ह व्यॅल्यू वेगळी आहे) , फायनांशियल प्रेशर आहे इत्यादी
रणजी : अधिक काँपिटीशन आहे, भरपूर राजकारणाला तोंड द्यावे लागते , दीर्घ काळ खेळ किमान लेव्हलचा करावा लागतो , सेल्फ मोटिव्हेशन ची गरज अधिक असते, कमकुवत संघामधे असाल तर बाकीचे सपोर्ट स्ट क्स्चर कमी असते इत्यादी

Pages