Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारण ड्रेसींग रुम मध्ये
कारण ड्रेसींग रुम मध्ये द्रवीड बसला होता.... न जाणे कधी डिक्लेअर करेल >>
जयस्वाल भयंकर मॅच्युरिटीने खेळतोय नि शंभर झाले कि दोनशे करायच्या अशा मूडमधे असतो. सरफराझ ला जय्स्वालचे दोनशे झाल्यावर जयस्वाल च्या आधी सेलीब्रेटरी उडी मारताना बघून गम्मत वाटली. तेच पॅव्हिलीयन मधे परत येताना जय्स्वाल ला पुढे जायला सांगणे पाहून मस्त वाटले. खर तर सर्फराज ला टीम मधे दोन वर्षांपूर्वी जागा मिळायला हवी होती हे बघता हे जेश्चर पाहून ही ईज गूड किड हे पटले. त्यालाही लाँग रोप मिळूदे.
पाचशे करून जिंकणे अशक्य आहे माहित असताना इंङ्लंड चा नक्की अॅप्रोच काय होता ते कोणाला कळले का ? ना ते धड अॅग्रेसीव्ह होते ना डीफेन्सीव्ह . डकेट च्या बडबडी नंतर आता स्टोक्स ने अजूनही ३-२ जिंकू शकतो वगैरे म्हटले आहे.
चौथ्यामधे बुमरा नसल्यामूळे मजा येईल. आकशदीप ला डेब्यू मिळेल असे दिसतेय.
आकाशदीप ने सकाळ गाजवली.
आकाशदीप ने सकाळ गाजवली. पहिल्या सेशनला ५ विकेट गेल्या त्यात तीन विकेट त्याच्या...
दुसर्या सेशनला इन्ग्लन्डने बाझबॉल गुण्डाळले आणि रूट फॉर्मात आला.. या सिरीजमधील पहिले विकेटलेस सेशन इन्ग्लंडचे..
तिसर्या सेशनला फोक्सचा फोकस जाऊन तो लूज शॉटवर बाद झाला आणि पार्टनरशिप तुटली...
आता बघूया दिवस अखेरीस गुंडाळले जातात का...
सध्याचा स्कोअर २४०-६ ... रूट ८२ नाबाद
IND 219-7
IND 219-7
ENG 353
Kuldeep Yadav*: 17 (72)
Dhruv Jurel: 30 (58)
Tom Hartley 19-5-47-2
Day 2: Stumps - India trail by 134 runs
पुन्हा फलंदाजांनी निराशा केली आज.
तीन एलबीडब्ल्यू अंपायर कॉल वर बाद झाले.
सरफराज शेल मध्ये गेला तिथे गडबड झाली. आणि यशस्वी दुर्दैवाने तेव्हाच बाद झाला. त्यानंतर तो शेल मधून बाहेर आलाच नाही.
इथे चुम्माची आठवण येते..
तो अश्या सिच्युएशनला मस्त काऊंटर अटॅक करायचा.
जुरेल कुलदीप ने नंतर डाव सावरला.
अन्यथा भरत असता तर आजचा सगळे परत आले असते.
तरी उद्या कितपत टिकतील शंका आहे.
तरी इंग्लंडच्या पहिल्या इनिंगच्या जास्तीत जास्त जवळ जायला हवे. तर दुसऱ्या डावात त्यांना लवकर गुंडाळून सामन्यात परत यायची आशा राहील.
भारताचा विजय. अभिनंदन.
भारताचा विजय. अभिनंदन. बरेचजण खूप चांगले खेळले. फलंदाजी, गोलंदाजी दोन्ह्यीहि छान.
आता पुढच्या सामन्यात सगळे नविन लोक आणा. त्यांना संधि मिळेल.
अरे वाह.. माझ्या वरच्या
अरे वाह.. माझ्या वरच्या पोस्टाच्या शेवट दोन लाईन अगदी खरया ठरल्या... मजा आली गेले दोन दिवस.. ओवर ऑल टेस्ट क्रिकेट धमाल चालू आहे सध्या.. म्हणजे अगदी गाबां पासून जी धमाल सुरू झाली आहे ती चालूच आहे कसोटीमध्ये..
यशस्वी, रोहित, जुरेल आणि गिल
यशस्वी, रोहित, जुरेल आणि गिल ने काल फारच सुंदर बॅटींग केली. परवा अश्विन आणि कुलदीपने कमाल केली. जबरदस्त कौतुक आहे ह्या टीमचं.
मागच्या मॅच नंतर डकेट म्हणाला होता की यशस्वीच्या धडाकेबाज खेळीचं श्रेय इंग्लंडला मिळायला हवं. त्या न्यायानं रूटच्या ह्या मॅचमधल्या सेंच्युरीचं श्रेय भारतीय संघाला मिळायला हरकत नसावी.

मागच्या मॅच नंतर डकेट म्हणाला
मागच्या मॅच नंतर डकेट म्हणाला होता की यशस्वीच्या धडाकेबाज खेळीचं श्रेDय इंग्लंडला मिळायला हवं. त्या न्यायानं रूटच्या ह्या मॅचमधल्या सेंच्युरीचं श्रेय भारतीय संघाला मिळायला हरकत नसावी. >>
You have to tip a hat to English hubris. 
दुसर्या इनिंगमधे रोहित, सर्फराझ नि पटिदार तिघेही एकाच प्रकारच्या बॉल वर बाद झाले. तिघेही फारसे उंच म्हणता येणार नाहीत नि ऑफ च्या बाहेर पडलेल्या बॉलच्या पिचपर्यंत पोहचू शकले नाहित. बॉलची फ्लाईट म्हणा किंवा बाउन्स म्हणा - घात करून गेला. गिल नेम्का तशाच बॉल्स ला पिच पॉईटं पर्यंट पोहोचत होता. जाडेजा बॅटींग् करताना मिडॉन पुढे आणला जातोय. मागच्या टेस्ट मधे सरफ्राज ला रन आउट करून गेला नि ह्या वेळी जाडेजा सतः बाद झाला त्याच फिल्डर कडून.
जाडेजाला सर्फराज नि जुरेलच्याअ वर पाठवून डावा फलंदाज आणण्याच्या आपला प्रयत्न बघता, पटीदार अच्या जागी पड्डीकल चीवर्णी लागण्याचे चान्सेस अधिक वाटतात. तुम्ही राहुल फिट असेल तरीही सर्फराझला खेळवाल का ?
"You have to tip a hat to
"You have to tip a hat to English hubris"
"दुसर्या इनिंगमधे रोहित, सर्फराझ नि पटिदार तिघेही एकाच प्रकारच्या बॉल वर बाद झाले. " - मला तरी रोहितचा शॉट अनाकलनीय वाटला. तो पुढे येऊन मोठा शॉट मारायचा प्रयत्न करत नव्हता. ऑफ साईडला कव्हर पॉईंट आणि लाँग ऑन फिल्डर्स बाऊंड्रीवर होते - म्हणजेच ती सिंगल त्याला क्रीझमधूनही शक्य होती. लेफ्ट आर्म हार्टली चा ऑफ स्टंपच्या बाहेर पडून आणखी बाहेर वळणारा बॉल त्याला एलबीडब्ल्यू सुद्धा करणार नव्हता. त्यामुळे तो अस्स का खेळला ते कळलं नाही.
"पटीदार अच्या जागी पड्डीकल चीवर्णी लागण्याचे चान्सेस अधिक वाटतात. तुम्ही राहुल फिट असेल तरीही सर्फराझला खेळवाल का ?" - राहूल फिट असेल तर पटीदारच्या जागी तो खेळेल असं वाटतं. राहूल फिट नसेल तर पड्डीकल, पटीदारच्या जागी येऊ शकेल असा माझा अंदाज आहे.
आकाश दीप चं काय? इंप्रेसिव्ह आहे. बुमराह, शामी, सिराज, मुकेश इतके फास्ट बॉलर्स असताना त्याला संधी मिळेल का? का तो मुकेश ला लीपफ्रॉग करून पुढे जाईल? मला वाटतं ह्या नंतरची फास्ट बॉलर्सचा ताफा घेऊन जावं लागेल अशी सिरीज एकदम २०२४ च्या शेवटी ऑस्ट्रेलियात आहे.
आकाश दीप चं काय? इंप्रेसिव्ह
आकाश दीप चं काय? इंप्रेसिव्ह आहे. बुमराह, शामी, सिराज, मुकेश इतके फास्ट बॉलर्स असताना त्याला संधी मिळेल का? >> हो तोच वांदा आहे. पण टेस्ट मधे खेळवायला हवे त्याला बाकी रोटेट करून. धर्मशाला ला सिराज ला आराम करायला देऊन आकाश दीप ला आणता येईल . त्याची निप असलेली बॉलिंग कामाला येईल.
स्टोक्स च्या कॅप्टन्सी चे कौतुक ऐकून कोणाला अजीर्ण झालाय का ? काल त्याने दोन्स्पिनर्स स्तत चालवले म्हणून कौतुक करणार्यांना मला खूप विचारावेसे वाटत होते कि भावांनो, नवीन बॉल अॅण्डरसन ला न देणे कितपत पटते नि दोन स्पिनर्स वगळता अजून कोण स्पिनर्स होते ज्यांना बॉलिंङ देऊ शकत होता ? रूट ला ओव्हर देताच त्याने विकेट काढली ना. कौतुक कशाचे मग ?
“ स्टोक्स च्या कॅप्टन्सी चे
“ स्टोक्स च्या कॅप्टन्सी चे कौतुक ऐकून कोणाला अजीर्ण झालाय का ?” - बिंगो!!! New ‘you know who’ in making?

New ‘you know who’ in making?
New ‘you know who’ in making? >>
अय्यर ने रणजी सेमी खेळणार असे ठरवलं . जय शाह , नि रोहित च्या कान पिचक्या कामाला आलेल्या दिसत आहेत. दुबे जो मुंबई सेमी मधे जाण्यामधे मोठा फॅक्टर होता मिस करणार. अजिंक्य चा स्कोअर बघवत नाहिये. नक्की काय झालय कोणाला ठाऊक. एहढे शून्य तर आगाकर चे पण नव्हते.
“ अय्यर ने रणजी सेमी खेळणार
“ अय्यर ने रणजी सेमी खेळणार असे ठरवलं” - good for him. मुंबईच्या प्लेयरने तसं नसतं केलं तरच आश्चर्य वाटलं असतं. किशन विषयी मात्र मला सहानुभूती वाटत नाहीये. रहाणे सिरियस बॅड पॅचमधे आहे. त्याला इंडिया कमबॅकचा चान्स कितपत आहे ते माहित नाही - कदाचित नसावा - पण रणजीसाठी सुद्धा त्याचे स्कोअर्स दयनीय आहेत.
मुंबईच्या दुसर्या डावात
मुंबईच्या दुसर्या डावात शेवटच्या जोडीने सेंच्युर्या मारल्या!
रहाणे कॅप्टन आहे ना ?
रहाणे कॅप्टन आहे ना ? >> हो
रहाणे कॅप्टन आहे ना ? >> हो नि अशा स्कोअर नंतर पण ठेवलय ही पण कमाल आहे. त्यावरून विहारी चे वाचून कमाल वाटली. कोणाच्याही अध्यात ना मध्यात नसणारा माणूस व्यक्त होतो म्हणजे किती त्रासदायक असेल.
मुंबईच्या दुसर्या डावात शेवटच्या जोडीने सेंच्युर्या मारल्या! >> हो - असे १९३९ मधे झाले होते म्हणे.
हो नि अशा स्कोअर नंतर पण
हो नि अशा स्कोअर नंतर पण ठेवलय ही पण कमाल आहे >>>> एकंदरीत स्पर्धेत रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मुंबईचं बरं चाललं असेल तर स्पर्धा सुरु असताना (विशेषतः बाद फेरीत) त्याला बदलणार नाहीत. पुढच्या सिझनला नाही ठेवणार कदाचित.
हो विहारीचा किस्सा वाचून आश्चर्य वाटले आणि खरच तसं काही झालं असेल तर अवघड आहे.
“ खरच तसं काही झालं असेल तर
“ खरच तसं काही झालं असेल तर अवघड आहे.”. - असं होणं अशक्यही नाहीये त्या सिस्टीममधे. त्याने बोलून दाखवणं मात्र विशेष आहे.
मोह न आवरल्यानी रणजी सेमी चा
मोह न आवरल्यानी रणजी सेमी चा स्कोअर चेक केला अन् रहाणे गचकला...
कालच मी व्हॉटसपग्रूप वर खालील
कालच मी व्हॉटसपग्रूप वर खालील पोस्ट केली होती..
----+--
तामिळनाडूचा साई किशोर बॉलर फॉर्मात आहे. उद्या त्याला मदत मिळाली तर मुंबईच्या सुद्धा विकेट जातील. रहाणे असेल एक बोनस विकेट सकाळीच. त्यात फॉर्मात नसलेल्या अय्यरचे ओझे मुंबईला आहे. एका बरे आहे की मुंबईचे नंबर दहा अकरा सुद्धा शतकवीर आहेत. तरी मुशीर खानवर बरेच काही अवलंबून राहील.
लॉर्ड शार्दुल नी तारलं
लॉर्ड शार्दुल नी तारलं
शार्दुल ने एकहाती मॅच जिंकून
शार्दुल ने एकहाती मॅच जिंकून दिली आहे. त्या नंतर दोन मॅचेस मधे फक्त तीन दिवसांच्या गॅपबद्दल योग्य नाराजी व्यक्त केली आहे. फायनल पर्यंत दुबे फिट झाला तर धमाल येईल. विदर्भ नि मध्य प्रदेश एकदम झकास होतेय.
अय्यर चे ग्रह खराब आहेत असे म्हणून शकतो. संदीप वॉरीयर ने नाचवलेय त्यावरून खरच त्याची पाठ गेली आहे असे वाटतेय. निव्वळ जय शाह ने बोंबाबोंब केल्यामूळे सेमी खेळला असे वाटले. रणजीचे एकंदर स्केड्यूल बघता मेन टीम मधले नाही खेळले तर नवल वाटायला नको. माजी खेळाडू 'आम्ही नाही का खेळलो " म्हणून म्हणतात त्यांन खरच त्यांच्या वेळी दोन मॅचेस मधे असलेल्या गॅप आठवायला हव्यात. रणजी नि आयपील मधे असलेली गॅप बघता खेळाडूंनी आयपील वर डोळा ठेवला तर खरच फार चुकलय असे म्हणून शकतो का ? रणजी आधी सुरू करता येणार नाही का ? किशन ला फक्त आयपील खेळायची असेल तर हरकत असावी का ?
पाट्या टाकणारा उद्या पुन्हा
पाट्या टाकणारा उद्या पुन्हा खेळणार असं दिसतंय..
पडी टाकणारा असायला हवा होता मधल्या फळीत.
हेमावैम.
मला वाटते पटीदार ला अजून संधी
मला वाटते पटीदार ला अजून संधी द्यायला हरकत नाही. शेवटची (किमान अजून काही वेगळे होईतो तरी) संधी. किरकोळ खेळला तर नक्की मूव्ह ऑन करायची वेळ असे धरायचे. एक तरी खमकी (मॅचच्या काँटेक्स्ट मधे अधिक धावा किंवा/व गरज असेल तर भरपूर टाईम घालवलेली इत्यादी ) इनिंग हवी. त्याचे काही डीसमिसल्स तंत्रापेक्षा 'होता है' टाइप्स मोडमधे होते. पड्डीकल ला संधी दिली नि फेल गेला तर उगाच पटकन काट मारली जायला नको.
उद्या जर राहुल कोहली परत आले.
उद्या जर राहुल कोहली परत आले. पुजाराचे सुद्धा कमबॅक झाले. सरफराज पुन्हा चमकला. तर पडीकलला संधी मिळेल का लगेच हा सुद्धा एक प्रश्न आहे..
पाटीदारला शेवटची संधी द्यावी की पडीकलला एखादी संधी द्यावी हा एक प्रश्न झाला.
पण सिरीज जिंकलो तरी WTC पाहता सामना जिंकायचा आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. अश्यावेळी बेस्ट प्लेईंग इलेव्हनचा सुद्धा विचार व्हायला हवा.
असो, पाटीदारला संधी मिळतेय अशी न्यूज आहे. तसे झाल्यास त्याने चमकदार कामगिरी करावी आणि पुन्हा आयुष्यात संधी नाही मिळाली तरी काहीतरी चांगली आठवण घेऊन जावे यासाठी शुभेच्छा.
IND v ENG, 5th Test
IND v ENG, 5th Test
IND 135-1
ENG 218
Rohit Sharma*: 52 (83)
Shubman Gill: 26 (39)
Tom Hartley 12-0-46-0
Day 1: Stumps - India trail by 83 runs
Bazzball च्या डोक्यात शेवटचा
Bazzball च्या डोक्यात शेवटचा हातोडा मारला जाणार या सामन्यात...
उद्याचे पहिले सेशन मह्त्वाचे
उद्याचे पहिले सेशन मह्त्वाचे असेल एकदम. ते नीट काढले तर पहिल्या इनिंगचा लीड वाढता वाढता वाढे मधे जाऊ शकतो.
इंग्लंड ने कोचेस ना फिल्डींग सब म्हणून नॉमिनेट केले होते हे वाचलेत का ? मॅच सुरू झाल्यावर काही खेळाडू इंजर्ड झाले म्हणून करणे समजू शकतो पण अपुरी टीम घेऊन दौर्यावर आल्याने असे करावे लागणे ह्यात गडबड आहे राव. त्यातही मधे दहा दिवसांची गॅप होती.
शर्मा शतक
शर्मा शतक
गिल शतक
शर्माने आज आल्या आल्या सिक्स फोर मारून ईंटेंशन क्लीअर केले.
आज पुन्हा एकदा ईंग्लंडला दाखवून द्यायला खेळत आहेत की आम्हीच ईथले दादा आहोत.
भारत लंच - २६४- १
सेशनमध्ये बिनबाद १२९ धावा
असे मारतील तर आज दिवस अखेरीस पाचशे होतील...
*Most Test hundreds for India
*Most Test hundreds for India since 2021*
*6 - Rohit Sharma*
4 - Shubman Gill
3 - Ravindra Jadeja
3 - Yashasvi Jaiswal
3 - Rishabh Pant
3 - KL Rahul
*Most Test hundreds by an India opener vs England*
4 - Sunil Gavaskar
*4 - Rohit Sharma*
3 - Vijay Merchant
3 - Murali Vijay
3 - KL Rahul
*Most hundreds as an opener in international cricket*
49 - David Warner
45 - Sachin Tendulkar
*43 - Rohit Sharma*
42 - Chris Gayle
41 - Sanath Jayasuriya
40 - Matthew Hayden
*Most hundreds by an India batter in international cricket*
100 - Sachin Tendulkar
80 - Virat Kohli
48 - Rahul Dravid
*48 - Rohit Sharma*
38 - Virender Sehwag
38 - Sourav Ganguly
भारता तर्फे रोहीत शर्माने
भारता तर्फे रोहीत शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये 9 शतकं मारले आहेत...
त्या खालोखाल गिल आणि कोहली 4 शतके...
वरच्या काही पोस्ट पाहून असं
वरच्या काही पोस्ट पाहून असं वाटेल की ही रोहित शर्मा वि इंग्लंड मॅच होती की काय.
माझ्या दृष्टीनी काही हायालाईट्स:
- पहिल्या दिवशी बुमराचा ओपनिंग स्पेल (विकेट नसली तरीही)
- कुलदीप नी टॉप लाईन चे 5 उडवणं
- शेपूट फार वळवळणार नाही याची आश्विन नी घेतलेली खबरदारी
- आपल्या टॉप 5 नी प्रत्येकी 50+ स्कोअर करणं (त्यात रोहित अन् गिल ची शतकं, देवदत्त चं पहिल्या टेस्ट मधे अर्धशतक)
- गिल आल्यावर रोहितनी बदललेले गिअर अन् दाखवलेली प्रगल्भता (गिल आला तेंव्हा तो 47 वर होता, पण दोघांची शतकं 3 बॉल च्या अंतराने झाली)
- कुलदीप अन् बुमारा नी लोअर ऑर्डर ला केलेली बॅटिंग
- अँडरसन च्या 700 विकेट्स पूर्ण, पहिला पेसर
- दुसऱ्या डावात आश्विन चं 36 वं पंचक
आश्विन अन् जॉनी दोघांचा 100 वा सामना होता. जॉनी नी इंटेंट दाखवला, पण इफेक्ट नाही पाडू शकला. आश्विन नी सामन्यात विकेट चं दशक पूर्ण करावं ही ईच्छा.
Pages