नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखांचे यूट्यूब वरचे दृकश्राव्य भाग ही सुंदर आहेत.
पुढील भागही पूर्ण होतील तसे upload करावेत ही विनंती.

भाग 66 वाचला.कापूस विक्री आणि हरिजन पाणी याबाबत वाचून वाईट वाटले.समाज म्हणून आपण (भारतीय) अजून बरेच मागे आहोत हे जाणवलं.

41 भाग वाचून झालेत, सुंदर लिहिलेत सगळे भाग. डोळ्यासमोर सगळं उभं राहतं. एकच पुस्तक आत्तापर्यंत वाचलंय याबद्दल जगन्नाथ कुंटे यांचं नर्मदे हर. एक अनामिक आकर्षण आहे या परिक्रमेबद्दल. कदाचित कधीही जमणार नाही आपल्याला म्हणून . डिटेल्स , वाटेत भेटलेल्या माणसांचे अनुभव, पूरक चित्रे , व्हिडीओ सगळंच आवडलं लेखमालेतलं.

नर्मदे हर !
आज नर्मदा जयंती आहे . त्या सुमुहूर्तावर
अर्ध्या परिक्रमेपर्यंत अर्थात ओंकारेश्वर पर्यंतचे यात्रावर्णन पूर्ण झाले आहे . ३२ एक लेखांकांचे दृक्श्राव्य देखील सिद्ध आहे .
सर्व मायबोलीकरांना नर्मदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांचे अभिजात साहित्यावर असेच वर्धिष्णु प्रेम राहो ही नर्मदेचरणी प्रार्थना . इथे देण्यात आलेल्या जवळपास प्रत्येक सूचनेचे अवलंबन करण्याचा प्रयत्न केला आहे . वाचनानंद घ्यावा !
नर्मदे हर !

वाचतोय.....
चित्रदर्शी लेखन
इथे कळवल्याबद्दल धन्यवाद

दृक्श्राव्य लेखांक U Tube वर पण आहेत लेखकाच्या च्यानेलवर . छान आहेत. उर्वरीत लेखांक ही दृक्श्राव्य माध्यमात जमेल तसे टाकावे. ज्यांना वाचनाची फारशी आवड किंवा सवड नाही पण ऐकण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत हे उत्तम, प्रामाणिक आणि रोचक अनुभवकथन पोहोचु शकेल. ज्यांना ही परिक्रमा करायची आहे त्यांना ह्यातून मार्ग दर्शन ही मिळे ल. धन्यवाद.

श्री नर्मदाजयंतीच्या शुभेच्छा.

प्रिया

कुठे वाचायचे?
ब्लॉग चा दुवा दिसत नाहीये.

पन्नास भाग वाचून पुर्ण झाले. फार मस्त वाटतं वाचताना.

नर्मदाजयंती आणि रथसप्तमी एकाच दिवशी येते हा फार छान योगायोग, नर्मदे हर हर.

बडोद्याला आजोळ असल्याने लहानपणी सुट्टीत जाताना नर्मदामाई आधी भेटायची, तिला दक्षिणा अर्पण करुन, नमस्कार करुन पुढे जायचं ही बाबांची शिकवण, बरेचदा बाबा नसायचे बरोबर पण आम्ही ते भक्तीभावाने करायचो. आता आजोळ जवळ आलं हे ही मैय्या सांगायची. अजुनही नर्मदा म्हटलं की डोळ्यासमोर हे सर्व उभं रहातं.

ज्ञान प्रबोधिनी पुणे इथे लेखकांसोबत झालेल्या गप्पांचा कार्यक्रम.
लेखक ज्ञानप्रबोधिनी चे माजी विद्यार्थी आहेत. वेगळ्या क्षेत्रात काहितरी काम करणार्या किंवा काही हटके करणार्‍या माजी विद्यार्थिनी/विद्यार्थ्यांचा ऐस-पैस गप्पा हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रशालेत होत असतो.त्या अंतर्गत झालेल्या या गप्पा. या कार्यक्रमाला प्रबोधिनी परिवारातले विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
https://youtu.be/4f4fcfMdZe4?si=Qy1VHkm49IpXOeH9

ही लेखमाला मायबोलीवर देखील प्रकाशित करावी असे वाटते. आता विचार केला तर प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून लेख कसे काय काढले असे सखेद आश्चर्य वाटले!

स्मिता श्रीपाद YouTube link Sathi धन्यवाद.

फार छान झालाय कार्यक्रम. विशेष करून त्यानच्या पत्नीची प्रतिक्रिया अधिक भावली.

प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून लेख कसे काय काढले असे सखेद आश्चर्य वाटले!
>>>

जि, तुझी आवडती Wink कविता तुम भी हम जैसे निकले आठवली.

युट्युब व्हर्जन पाहिले. लेखक अर्थातच लिहिण्या इतकेच बोलण्यातही अतिशय स्पष्ट आणि सॉरटेड आहेत.
पुढील उपक्रमांसाठी लेखकांस शुभेच्छा.
मला परिक्रमा सिरीज चा शेवटचा भाग(घरी पोहचले) वाचण्याची उत्सुकता आहे.66 भाग वाचून झाले.

मुलाखतीची लिंक दिल्याबद्दल स्मिता धन्यवाद !! लिखाणा इतकेच बोलणे ही स्पष्ट आहे लेखकांचे . आता ब्लॉग वाचीन .

स्मिता,
मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
वर स र्वांनी म्हंटल्याप्रमाणे लिखाणा इतकेच बोलणे ही स्पष्ट आहे लेखकांचे.
नवीन दृक्श्राव्य भाग नेमाने युट्युब वर येत आहेत त्यासाठी लेखकांस धन्यवाद.

मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
वर स र्वांनी म्हंटल्याप्रमाणे लिखाणा इतकेच बोलणे ही स्पष्ट आहे लेखकांचे.>>>> +१
ब्लॉग अर्धा वाचून झालाय.

ही लेखमाला मायबोलीवर देखील प्रकाशित करावी असे वाटते. आता विचार केला तर प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून लेख कसे काय काढले असे सखेद आश्चर्य वाटले! >> सध्या मायबोली वर कोणताही विषय कोणीही लिहायला घेतला की त्यावर नकारत्मक प्रतिक्रिया, एकमेकांचे जुने हिशोब काढत प्रतिसाद, राजकारण मधे आणणे असे प्रकार चालु आहेत. अनेक चांगले लेखक माबो सोडुन गेले तरी मंडळींच्या जीवाला चैन नाही. विनाकारण चर्चा करुन प्रतिसाद वाढवत बसायचे आणी मूळ विषय बाजुला सारायचा यात काय अर्थ आहे ? अशा दुषित वातावरणात लिखाण पुढे चालु ठेवण्यात कोणाला स्वारस्य वाटेल ? प्रबोधिनी चा माजी विद्यार्थी आहे म्हणुन दगडावर डोकं आपटुन घेण्यात काय अर्थ आहे ? उलट आपल्यासाठी ही जागा योग्य नाही हे लेखकांना लवकर कळलं आणि त्यांनी रस्ता बदलला हेच चांगलं Happy
पण माबोच्या निमित्ताने लेखकांचा परिचय झाला आणि ब्लॉग सापडला म्हणुन माबोचे आभार Happy

(बाकी विचार भिन्नता वगैरे जाऊदे, पण 71 भाग विथ त्यातले मॅप आणि इमेजेस योग्य जागी परत मायबोलीवर किंवा अन्यत्र टाकणे हे बरंच वेळखाऊ असेल बहुतेक.अर्थात लेखक इच्छा.)

Pages