वर्ष २०२४: संकल्प आणि plans

Submitted by किल्ली on 25 December, 2023 - 01:54

नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील. Happy

ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.

मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.

२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.

३. Health आणि व्यायाम :

A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.

४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.

५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.

६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यायाम - अगदी ५ मिनीट जमला तरी करा. एखादी नेहमीची गोष्ट असोशिएट करा की किमान ५ मिनीटे व्यायाम केल्याशिवाय ही गोष्ट करायची नाही.
पब्लिक ट्रान्सपोर्ट/रिक्षा वापरत असाल तर एक स्टॉप आधी उतरून चालत या.

डाएट- सर्वप्रथम जंक फूड घरात ठेवणे बंद करा. फळं, काकडी, गाजर, स्वीट कॉर्न इ. आणून समोर दिसेल असे ठेवा. दररोज एक मूठ कडधान्य भिजत घालून भाताबरोबर तेही उकडून घ्या. कांदा, टमेटो, थोडा चाट मसाला घालून ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्ससाठी उत्तम.
एका जेवणात एकच कार्ब ठेवा. दुसर्या कार्बची जागा फळं, सलाड, प्रोटीनने भरून काढा.
सूर्यफुलाच्या, कलिंगडाच्या बिया, चार मगज, अळशी आणून भाजून एकत्र करून ठेवा. दररोज एका छोट्या डबीत २ टी स्पून कॅरी करा.
बाहेरून ऑर्डर करायची/ जेवायची वेळ आली तर स्वतःसाठी सलाड ऑर्डर करा. घरी जेवताना आधी सलाड संपवून मगच मेन कोर्स सुरू करा.

किल्ली, नॉलेज अपडेशनसाठी अभिनंदन !!
पुढेही भरपूर कोर्सेस होतीलच. इतरांसाठी प्रेरणादायी !

व्यायामाला शॉर्टकट नाही. कंटाळा येत असेल तर बदलून बदलून करायचा. आज चालणे, उद्या सायकलिंग, रविवारी पोहणे , बॅडमिंटन असं. कॅलरीजबर्न झाल्या पाहिजेत. खूप दिवस गॅप असेल तर चालण्याने सुरूवात करावी.

डाएट - गव्याच्या पीठात सोयाबीन पीठ ४:१ प्रमाणात मिसळून बिनधास्त रहा. पालेभाज्या, काकडी, टोमॅटो असायला पाहिजे.
ब्लॅक वॉटरची रेसिपी युट्यूबवर मिळेल. ते दिवसभर पीत रहायचं. शरीर अल्कलाईन साईडला ठेवायचं.
आवळा, चिंच, गावरान मेवा, डोंगरची मैना मिळेल तितके खायचे. फळं, नारळाचे पाणी इत्यादी.
जेव्हढे जमेल तसे आठवडा, महिन्याचे नियोजन केले कि झाले. मुद्दाम टेबल न बनवताही जमायला लागते. एकदा रूटीन बसलं कि एखाद्या आठवड्यात कमी पडलेले क्षार वगैरे पुढच्या आठवड्यात भरून काढता येतात.

तेला साठी इतर लोक सांगतीलच.

युडॅमी वगैरे वरती, भारतिय लोकांनी दिलेले टेक्निकल ट्रेनिंग घेउन टेक्निकल स्किल्स वाढतायत पण इंग्रजी बिघडतय त्याचं काय Happy

या शनिवारच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीतला डॉ यश वेलणकर यांचा "मेंदूला कामाला लावताना" हा लेख वाचला. हा लेख जणू माझ्यासाठीच लिहिला असावा. माझ्या मावसबहिणीने त्यांचं ध्यानावरचं पुस्तक मला कधीचं दिलेलं आहे. ते पडून आहे. ते वाचेन तेव्हा वाचेन.

यातले दोन मुद्दे - मेंदू सतत मल्टिटास्कींग करत असतो आणि त्याला विश्रांती मिळत नाही, हे फारच भिडले.

आधी व्यायाम करतानाही डोक्यात विचार चालत असत. आज प्रयत्नपूर्वक व्यायामावरच पूर्ण लक्ष दिलं.
सकाळी नाश्ता करताना पेपर, जेवणाच्या वेळी फोनवर मालिका बघणे हे आजपासून बंद केलं /करणार. पूर्ण लक्ष खाण्यावर.

ठरवलेल्या गोष्टींतल्या किती जमल्या , किती गुण मिळाले त्याचा रिपोर्ट दर महिनाअखेरीस इथे लिहीन.

भरत >>> हे डीप वर्क सारखे काहीतरी वाटते आहे. चतुरंग पुरवणी शोधतेच आता. पण यावर एक वेगळा लेख लिहाल का?

वाह! पहिल्याच महिन्यात संकल्प पूर्ण होत अभिनंदन पोस्ट सुद्धा सुरू झाल्या धाग्यावर Happy
अभिनंदन किल्ली.. ग्रेट !!

बाई दवे,
म्हणून मायबोलीवर धागे काढावेत, प्रतिसाद द्यावेत. जेणेकरून संकल्प पूर्ण करायची नैतिक जबाबदारी वाढते आणि ते पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा Happy

भरत लेख छान आहे, तुमची post सुद्धा आवडली.
मेंदू सतत मल्टिटास्कींग करत असतो आणि त्याला विश्रांती मिळत नाही, हे फारच भिडले.+११११
Thoughtless होणं महत्वाचं.
ते साधायचं कसं?
तर ध्यान, वाचन वगैरे डोक्यात येत आहे. अजून काही सांगता येईल का?
एका मुलाखती मध्ये असं ऐकलं होतं की आपण जे करतोय त्या क्षणाशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे.
इतकं पटलं की काय सांगू.
नाहीतर मी..एक काम करताना दुसरं आठवतं, मग तिसऱ्याचा वीचार, पहिलं विसरून जातं. मनाला पकडून पकडून जागेवर आणावं लागतं. कठीण आहे

लेख आवडला.

वाचन / संगीतातून दुसरीकडे मन गुंतवता येते, thoughtless नाही होता येत. आणि मानसिक तणाव जास्त असेल तर असे दुसरीकडे मन गुंतवताना सुद्धा तेच विचार येत रहातात. तेव्हा त्या लेखात लिहिलेले mindfulness technique छान उपयोगी येईल. (यालाच बहुतेक साक्षीध्यान म्हणतात मराठीत.)
Thoughtless होण्यास ध्यान आणि त्या आधी धारणा(?) आहे. धारणेमध्ये (धारणा म्हणजे हेच की याला दुसरा शब्द आहे?) येणारे विचारांचे निरीक्षण करत रहायचे, येतात तसे येऊ द्यायचे थांबवायचा प्रयत्न करायचा नाही, फक्त त्यात न गुंतता निरीक्षण करायचे, एखाद्या विचारात गुंतलो आणि ते लक्ष्यात आले की त्यांची नोंद घेऊन विचार सोडून परत निरीक्षण करत रहायचे. मग पुढे श्वासावर लक्ष केंद्रित करणे - त्यांचे निरीक्षण करणे (आनापान) आणि पुढे ध्यान अशा पायऱ्या आहेत.
कधी केले आहे, आता परत नीट माहिती काढुन करावे म्हणतो.

Mindfulness चे वेलणकरांचे ऍप सुद्धा आहे त्यात वेगवेगळ्या स्टेजेसचे mindfulness training आहे. सबस्क्रिप्शन घ्यावे लागते.

हो. साक्षीभाव की साक्षीध्यान हा शब्द आहे बहुतेक.

मी ब्रह्मविद्येचा कोर्स केला. त्यातही ध्यान शिकवतात. त्यातही विचारांवर नियंत्रण करायचे नाही, इ. गोष्टीच सांगितल्या आहेत.

श्वासावर लक्ष केंद्रित करणे हे बहुतेकांना जमण्यासारखे आहे. आणखी सोपे होण्यासाठी एक हात छातीवर आणि एक पोटावर ठेवायचा.

ब्रह्मविद्यावाल्यांनी आम्हांला सीडीज दिल्या होत्या. त्या लावून ध्यान केले आहे. एक सेशन संपून दुसरे सुरू होऊन संपलेले कळलेही नाही. (
(झोपलो नव्हतो Wink )

>>>>मी ब्रह्मविद्येचा कोर्स केला. त्यातही ध्यान शिकवतात. त्यातही विचारांवर नियंत्रण करायचे नाही, इ. गोष्टीच सांगितल्या आहेत.
खूप छान.

जवळ जवळ एक वर्षाने मायबोली वर येत आहे , नवीन वर्षाचा संकल्प जिव्हाळ्याचा विषय Happy ... सर्वांचे अनुभव वाचायला मजा येत आहे

Guys guess what?
मी आज एकटीने गाडी चालवली..
रस्ता मोकळा होता म्हणून जमली. Traffic मध्ये कुणी आडवा आला की मी panic होते. ते घालवायचं आहे fear.
Driving Course पूर्ण झाला.

वाह मस्त किल्ली
आता गाडी चालवत माझ्या घरी ये, मस्त च्या बिस्कुट खाऊ.

धन्यवाद सर्वांना.
अनु नक्की
आता बरेच रस्ते खुले झालेत.
आस्मा हमारा है

अभिनंदन किल्ली !!! तुझी उरलीसुरली भीती ही लवकर जाऊ दे !( जी माझी गेली नाही ) पण तुझ्या मुळे थोडा हुरूप आला आहे . नवीन वर्षात जरूर विचार करीन कार चालवण्याचा.

माझी trainer खरंच छान आहे. तिच्यामुळे ५०% मानसिक धक्का आणि भीती कमी झाली. हसरी, संयमी आणि detail मध्ये शिकवणारी आहे. कुणाला गरज असेल तेव्हा तिचा संपर्क क्रमांक देईन.
धन्यवाद.
Practice करायची आहे अजून. Long way to go

अभिनंदन किल्ली! आता ड्रायव्हिंगमध्ये खंड पडू देऊ नको. नाही तर सवय जाईल. नियमितपणे चालवत रहा. आपोआप आत्मविश्वास वाढेल. हळूहळू जास्त ट्रॅफिकच्या रस्त्यावर न्यायची. एकदा चांगली सवय झाली की मग खंड पडला तरी फार बिघडत नाही. लगेच परत सवय होते. पण सुरुवातीला मात्र नियमितपणे चालवायची.

अरे वाह किल्ली
आपणच आपल्या मनाला लावलेले साखळदंड तुटताना फ्रीडम फ्रीडम आनंद जोरात होतो.
ट्रेनर ना हवेतर रिक्वेस्ट करून ट्रॅफिक आणि गर्दीत देखील प्रॅक्टिस साठी सोबत ने हवेतर.

अभिनंदन किल्ली !!

मी आता ऑफिसला गाडी नेणं बंद केलय ..बस झिंदाबाद... बस स्टॉप पासून ऑफिस बरोबर १५ मिन. वर आहे.. सो दररोज ३० मिन. कम्पल्सरी चालणं होतंय... आणि साखर बंद केलिये...माझ्यासाठी हे ही नसे थोडके... आधी काहीच करत न्हवते...

Pages