नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील.
ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.
मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.
२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.
३. Health आणि व्यायाम :
A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.
४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.
५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.
६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!
अज्ञानी
अज्ञानी
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
सर्वांना नवीन वर्ष सुखसमाधानाचे, आरोग्याचे आणि उत्कर्षाचे जावो.
@बोकलत, तुमच्या कवितेला हा
@बोकलत, तुमच्या कवितेला हा मोडका-तोडका झब्बु.
अविरत अजस्त्र समुद्रामध्ये अजुनी एक लाट खिरुन गेली.
नव्या लाटेवर आरुढ होण्याची कंबर कसूनी करा तयारी
जुने पुराणे त्यजुनी फुलवा सुगंधाचे फुले-ताटवे
स्वप्नाकांक्षांचे पंख लावुनी नवीन वर्ष करु साजरे
घड्याळ बोले टिक टिक टिक टिक, बघता बघता काळही सरतो
आज पेरले बीज तयाचा, वॄक्ष उद्याला उंच बहरतो
नूतन वर्षाच्या समस्त
नूतन वर्षाच्या समस्त मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा.
भारतातील सर्व माबोकरांना -
भारतातील सर्व माबोकरांना - नूतन वर्षाच्या असंख्य शुभेच्छा.
रोज केल्या पाहिजेत अशा
रोज केल्या पाहिजेत अशा गोष्टींसाठी एक्सेल शीट बनवली आहे (होती). डिसेंबरमध्ये व्यायामात खंड पडला होता.
आज पुन्हा सुरू केला. चालणं, स्ट्रेचिंग, स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग, श्वसनाचे व्यायाम झाले. घरी शिजवलेला पदार्थ ब्रेकफास्टला खाल्ला. आज शिरा.
उरलेल्या गोष्टींत रोज घरातला एकेक कप्पा स्वच्छ करणे, नको त्या गोष्टी काढणे , ध्यान करणे , रोज किमान १ तास पुस्तक वाचणे . रोज किमान एक सर्व्हिंग फळ / कोशिंबीर खाणे. या प्रत्येकासाठी एकेक गुण
देघेणार आहे.या शिवाय वर्षभरात करायच्या मोठया गोष्टींचीही यादी करायची आहे. त्यात या महिन्यात करायच्या गोष्टी ठरवायच्या आहेत.
यात कागदपत्रे, क्लेम्स , आरोग्य- वैद्यक संबंधित, घरासंबंधी मोठ्या - कधी न केलेल्या गोष्टी आहेत.
माझ्या पोर्टफोलियोतल्या फंडांची संख्या कमी करून रिबॅलन्सिंग करायचे आहे. हे बरीच वर्षे रेंगाळते आहे.
यातल्या इथे लिहिण्यासारख्या गोष्टी केल्या की नोंदवेन.
इथे लिहिणार्या सर्वांचे संकल्प पूर्ण होवोत या शुभेच्छा!
नूतनवर्षाभिनंदन!!
नूतनवर्षाभिनंदन!!
स्वतःसाठी वेळ आणि स्वतःकडे लक्ष देण्याला ह्या नवीन वर्षात प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. वरवर जरी सोपी वाटली तरी प्रत्यक्षात सहज सोपी गोष्ट नाही, हा अनुभव ह्यापूर्वी आला आहे. त्यासाठी वरील स्वतःला एकेक गुण द्यायची कल्पना चांगली आहे, ती अमलात आणायचा प्रयत्न करीन.
या धाग्यावर जे संकल्प लिहीले
या धाग्यावर जे संकल्प लिहीले होते त्यातले मर्म कळालेल्यांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ! ज्यांनी माझे संकल्प पूर्ण व्हाव्यात म्हणून मनापासून शुभेच्छा दिल्या त्यांनाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्या सर्वांना तसेच कुटुंबियांना हे वर्ष आनंदी, सुखाचे , समाधानाचे आणि आरोग्यपूर्ण जावो, समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी संधी आणि गुणांची वृद्धी होवो.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
सर्वांना नवीन वर्ष सुखसमाधानाचे, आरोग्याचे आणि उत्कर्षाचे जावो
रोज केल्या पाहिजेत अशा
रोज केल्या पाहिजेत अशा गोष्टींसाठी एक्सेल शीट बनवली आहे (होती).>>>>
मी पण ऑगस्ट २०२२ पासून अशी सुरुवात केली होती. या सप्टेंबर मधे त्यात खंड पडला.
मी पण आता त्याला परत सुरुवात करतोय.
आपली यादी अगदी सेम आहे. माझ्या यादीत पण रोजचा व्यायाम, मेडीटेशन, वाचन, फळे व सलाड आहे. शिवाय जंक फुड काय खाल्ले आणि टाईमपास स्क्रिन टाईम किती होता ते पण मॉनिटर करायचो. हे सगळे सप्टेंबर नंतर करत होतो पण एक्सेल शीट मेंटेन नाही झाली.
मी सुद्धा रोज घरातली एक गोष्ट स्वच्छ करायचे ठरवले होते पण ते बारगळले.
५. माझ्या कामाला पूरक अशी
५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे>>> हे सुरु केलं आहे. Dataiku tool शिकत आहे. जमलं तर certification करेन
रोज उठते त्या वेळेपेक्षा फक्त
रोज उठते त्या वेळेपेक्षा फक्त १५ मिनिटे अगोदर उठायचे असे ठरवले होते. आणि १ तारखेपासून नाही तर ४-५ दिवस आधीच सुरु केले. १/२ वेळचा अपवाद वगळता सध्या अजून तरी जमले आहे. त्यामुळे सकाळी व्यायाम करायला वेळ मिळत आहे. फक्त हे टिकले पाहिजे. खूप बेबी स्टेप आहे पण फार गरजेची होती.
घरातील व डिजिटल पसारा डिक्लटर करणे हेही ठरवलेआहे व प्रयन्त चालू आहे.
बाकीही व्यवसाय विषयक गोष्टी आहेत पण काही substantial झाले तर लिहीन.
सगळ्यांचे संकल्प वाचून माझा
सगळ्यांचे संकल्प वाचून मजा वाटली.
किल्ली छान धागा आणि संकल्प! अनेक शुभेच्छा!
https://youtu.be/-nM1rz3HjQU
https://youtu.be/-nM1rz3HjQU?si=iDNDSd8-yRvVv7X4
ह्या विषयावर मस्त video आला आहे.
हा channel खरंच छान आहे. नक्की बघा
गेल्या वर्षी चे ,त्याच्या
गेल्या वर्षी चे ,त्याच्या मागच्या वर्षाचे संकल्प आठवा आणि आपण ते पुरे केले आहेत का?
त्याचा आढावा घ्या...
नंतर नवीन संकल्प करण्याची हिम्मत करा
मी २ वर्षापूर्वी एका वर्षात
मी २ वर्षापूर्वी एका वर्षात निदान ३ धागे काढण्याचा संकल्प एका धाग्यावर लिहिला होता. तो त्या वर्षी पूर्ण केला. पण असे विचित्र संकल्प केले तर आपला त्यात अडकून सीताराम होतो, त्यामुळे आता साधेच संकल्प करतो आहे - रोज दात घासणे, अंघोळ करणे वगैरे जे पूर्ण होतातच ... सहसा
तीन धाग्यांचा संकल्प नेमका
तीन धाग्यांचा संकल्प नेमका पूर्ण केलात! नाही तर 'तीन 'अडकून सीताराम जोक करता आला असता.
मी महिन्यातून एक तरी नवं गाणं कीबोर्ड वर बसवायचं.
घर रोज थोडं थोडं आवरायचं/ क्लटर काढायचा.
वाचन/ लेखन जमेल तेव्हा जमेल तसं करायचं
चालढकल कमी करायची.
फिजिकल ॲक्टिव्हिटी करत राहायच्या. जिम, धावणे, चालणे, स्केटिंग, स्विमिंग, खेळ.... काहीही.
Core designer certification
Core designer certification (Dataiku) पूर्ण केलं.
ore designer certification
ore designer certification (Dataiku) पूर्ण केलं.
>>> अरे वा किल्ली! नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच एक गोल पूर्ण ...
वाह मस्तच!! अभिनंदन.
वाह मस्तच!! अभिनंदन.जमल्यास एक डिझाईन थिंकिंग चा कोर्स पण कर, cv मध्ये गोंडस दिसतो(लोका सांगे ब्रह्मज्ञान.. मला अजून जमलेला नाहीये )
Hearty congratulations killi.
Hearty congratulations killi.
धन्यवाद
धन्यवाद.
डिझाईन थिंकिंग->> ह्याचं internal training झालंय company कडून बिना कागदाचं
मला खरं तर ml practioner पूर्ण करायचं आहे, त्याचं हे pre requisite होतं.
अभिनंदन किल्ली.
अभिनंदन किल्ली.
>> Core designer
>> Core designer certification (Dataiku) पूर्ण केलं.
अभिनंदन किल्ली! इतकी वर्षं या धंद्यात असून मी अजून कुठलंच सर्टिफिकेशन केलेलं नाही आणि आता करेन असं वाटत नाही
Professional Visibility आणि
धन्यवाद
Professional Visibility आणि knowl sharing साठी कराव्या लागतात अशा गोष्टी!!
आणि अर्थात थोडीफार upskilling सुद्धा होते.
मीही खूप वर्षानंतर external training घेतलंय.
फारसा फरक कामाच्या दृष्टीने जाणवत नाही. Actual hands on/ on job training च सत्य आहे बाकी मोहमाया.
अभिनंदन किल्ली.
अभिनंदन किल्ली.
चिमण सारखंच. एकही सर्टिफिकेशन केलेलं नाही ला +१
अभिनंदन किल्ली.
अभिनंदन किल्ली.
पहिल्या पंधरवड्यात संकल्पपूर्तीसाठी पावलं उचलून त्याप्रमाणे कामगिरी बजावली हे बघून एक्स्ट्रा कौतुक वाटलं.
अभिनंदन किल्ली .. !
अभिनंदन किल्ली .. !
पुढचे संकल्प पूर्ण करण्यास खूप शुभेच्छा..!
किल्ली, भारीच! संकल्प पूर्ण
किल्ली, भारीच! संकल्प पूर्ण झालेला बघून मस्त वाटलं. अभिनंदन.
किल्ली आर्थिक आणि व्यावसायिक
किल्ली आर्थिक आणि व्यावसायिक यशाची पायाभरणी यशस्वी होउ देत. हे सर्व समर्थपणे , एकहाती सांभाळण्याबद्दल, तुझे कौतुक आहे.
अभिनंदन किल्ली
अभिनंदन किल्ली
Pages