नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील.
ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.
मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.
२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.
३. Health आणि व्यायाम :
A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.
४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.
५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.
६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!
पुढच्या आठवड्यात test आहे.
पुढच्या आठवड्यात test आहे. Rto मध्ये. ती pass झाली की हा संकल्प done होईल
>>>>>>>बस स्टॉप पासून ऑफिस
>>>>>>>बस स्टॉप पासून ऑफिस बरोबर १५ मिन. वर आहे.. सो दररोज ३० मिन. कम्पल्सरी चालणं होतंय... आणि साखर बंद केलिये
सुंदर!!
मला साखर बंद करायला हवी. स्टारबक्स्मध्ये चॉकलेट चिप कुकी घेतली की रिफाईन्ड फ्लावर (पीठ) आणि साखर दोन्ही जाते
बस स्टॉप पासून ऑफिस बरोबर १५
बस स्टॉप पासून ऑफिस बरोबर १५ मिन. वर आहे.. सो दररोज ३० मिन. कम्पल्सरी चालणं होतंय... आणि साखर बंद केलिये ->> वाह.. भारी
Guys guess what?
Guys guess what?
मी आज एकटीने गाडी चालवली >>>
अभिनंदन! महत्वाचा टप्पा !
आता बरेच रस्ते खुले झालेत.
आस्मा हमारा है >>> . एन्जॉय
मला साखर बंद करायला हवी.
मला साखर बंद करायला हवी. स्टारबक्स्मध्ये चॉकलेट चिप कुकी घेतली की रिफाईन्ड फ्लावर (पीठ) आणि साखर दोन्ही जाते >>
हा हा हा!
. स्टारबक्स्मध्ये चॉकलेट चिप कुकी - > ३ -३.५० डॉलर का एक कुकी तिची किमंत च मला तिच्या पासून दूर ठेवायला मदत करते.
अभिनंदन किल्ली.
अभिनंदन किल्ली.
३ -३.५० डॉलर का एक कुकी तिची
३ -३.५० डॉलर का एक कुकी तिची किमंत च मला तिच्या पासून दूर ठेवायला मदत करते.>> भारतात रु.२८८/- ला आहे चॉकलेट चिप कुकी. सेम किंमत पण आम्ही Starbucks ला सणासुदीला जातो सो चालतय. रोज जाउन बसणारे पण आहेत भारतात.
इकडे स्टार बक्स म्हणजे वडा
इकडे स्टार बक्स म्हणजे वडा पाव गाडी सदृश... ओळखीचं, मेन्यू ओळखीचा त्यामुळे कुठल्याही अनोळखी ठिकाणी गेलं की तो safest aani quickest ऑप्शन म्हणून बघितले जाते.
मुंबई स्टार बक्स च मेन्यू पण छान आहे.. तिकडचे चिक पी raps, paneer raps इकडे ही सुरू केले पाहिजेत.
आ हा ओ हो
आ हा ओ हो
>>>>स्टारबक्स्मध्ये चॉकलेट
>>>>स्टारबक्स्मध्ये चॉकलेट चिप कुकी
नाही गं $२. पण मी वरचेवर खाते. तिथल्या को ल्ड कॉफीज फार महाग अहेत. स्मॉल ला सुद्धा $६ फटकन जातात.
स्टारबक्स मधली ड्रिप कॉफी
स्टारबक्स मधली ड्रिप कॉफी अजिबात महाग नाही. बाकी ठिकाणी मिळते जवळपास त्याच भावात मिळते. पण अरोमा! फ्लेवर! चव! ... क्या केहेने!
तिकडचे फ्यांसी शॉट्स आणि वन पंप ऑफ धिस आणि टू ऑफ ... चालू केलं आणि..खाणं कैच्याकै महाग असतं.
स्टारबक्सला नावं ठेवणाऱ्यांना टोटल तूक!
वडापाव गाडी बिडी नाही हो.. ते मॅकडोनाल्ड, ए अँड डब्लू, वेंडीज, इन अँड आऊट ई... स्टारबक्स नटोरियसली लवकर बंद होतात.
वडापाव गाडी बिडी नाही हो.>>
वडापाव गाडी बिडी नाही हो.>> तेच म्हणायचे होते. अनुमोदन. सोनाराने कान टोचले. इथे आपल्या सर्वांच्या लाडक्या टाउन मध्ये एक स्टार बक्स रिझर्व पण आहे. लव्हली प्लेस.
इकडे स्टार बक्स म्हणजे वडा
इकडे स्टार बक्स म्हणजे वडा पाव गाडी सदृश... ओळखीचं, मेन्यू ओळखीचा त्यामुळे कुठल्याही अनोळखी ठिकाणी गेलं की तो safest aani quickest ऑप्शन
सोनाराने कान टोचले. >>> हा
.
या धाग्यावर तरी न भांडण्याचा
या धाग्यावर तरी न भांडण्याचा संकल्प करा.
अमित, वडापावची गाडी नाही पण चहाची टपरी म्हणू शकतो.
ओळखीचं, मेन्यू ओळखीचा
ओळखीचं, मेन्यू ओळखीचा त्यामुळे कुठल्याही अनोळखी ठिकाणी गेलं की तो safest aani quickest ऑप्शन => a go-to place.
छंदीफन्दी बरोबर आहे
छंदीफन्दी बरोबर आहे नाक्यानाक्यावरती स्टारबक्स असतात. कधीही जावं आणि शांत वातावरणात कॉफी घेउन यावं.
यू सेड इट सामो.
यू सेड इट सामो.
मीपण स्टारबक्स फ्यान क्लबात. (धागा हाय जॅक होतोय का, कॉफीपानगृहांवर एखादा धागा आहे का?)
स्टारबक्सचे कप इ. मर्च (डिस्पेझेबल नव्हेत) घेऊन त्यातून(च) कॉफी पिण्याचा संकल्प करावा म्हणते. मस्त असतात त्यांची डिझाईन्स
सामो, आता कॉस्टको ने पण
सामो, आता कॉस्टको ने पण त्यांच्या मेन्यू मध्ये double चॉकलेट कुकी सुरू केलीय. 2.49 ला एका मोठी family कुकी..
होय गं पाहीली मी. मला चिकन
होय गं पाहीली मी. मला चिकन बेक आवडतो तिथला. कुकी अजुन खाल्ली नाहीये. स्टारबक्स मध्ये $३ ला असते कुकी. मी चुकून $२ म्हणाले.
काही कारणाने आधी ठरवलेले बेत
काही कारणाने आधी ठरवलेले बेत बाजूला ठेवून गाडी पूर्णपणे वेगळ्याच रुळांवर न्यावी लागली.
त्यातही संकल्प ते सिद्धी हा प्रवास आहेच.
चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी मेंदूला कसं ट्रेन करायचं हे या पॉडकास्टमध्ये दीड तासापासून पुढली २० मिनिटे सांगितलं आहे.
तसा सगळाच पॉडकास्ट दोनतीनदा नीट सावकाश पाहून समजून घ्यावा असा आहे.
@भरत चालू केली आणि
@भरत चालू केली आणि पहिल्यांदाच 'रँटींग इन अ वे फॉर युअर ब्रेन टू गेट कंट्रोल ओव्हर केऑटिक इमोशन्स!' एकदम पटलं. मी मायबोली आणि वाहते धागे केवळ आणि केवळ याच साठी वापरतो. तिकडे फार विचार करुन लिहितो असं नाही, पण लिहिलं की डोक्यातल्या इमोशन्सना शब्द मिळून शांत नक्की वाटतं, आणि इतरांचं रँट ऐकून आपल्यात बदल घडवले जातात.
धन्यवाद. खूप मोठी दिसते आहे. वेळ काढून ऐकतो.
ही त्या मुकवा वर पण द्या.
कागदपत्रांची कामे खूप आहेत
कागदपत्रांची कामे खूप आहेत असं मी वरती लिहिलं होतं.
त्यापैकी २ महत्वाच्या कामांना नौकेपार केले आहे.
माझ्याकडून process झालीये.
आज.
अजूनही बरीच बाकी आहेत.
ऑफिस मध्ये health checkup
ऑफिस मध्ये health checkup झालं तेव्हा त्यांनी वजन कमी करा सांगितलं आहे.
मी म्हटलं known issue, low priority वर गेलेला.
पण डॉ म्हणाले high priority करा.
त्याने तुमचे वरवर दिसणारे प्रॉब्लेम solve होतील.
.
सतत डोकं दुखतं. ह्याचं कारण screentime अति आहे असं म्हणले. बाकी इतर supplements ही सांगितल्या आहेत.
Vitamin deficinecy वगैरे.
.
पोटापाण्याचं काम screen वर असल्यामुळे इलाज नाही. विकांताला फोन चा वापर कमी करणे एवढं करु शकते. आणखी काही टिप्स द्या प्लीज
स्क्रीन्शिल्ड का काय असतं
स्क्रीन्शिल्ड का काय असतं ग्लेअर कमी करणारं ते लाव ना.
पोटापाण्याचं काम screen वर
पोटापाण्याचं काम screen वर असल्यामुळे इलाज नाही. ..... 20-२०-२० नियम पाळ.दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फुटावरील वस्तू/object पहायचा.
Blinking माहीत असेलच.
माझी ट्रेन मेट गाडीत चढल्यावर झोपून द्यायची.म्हणजे पाहिले काही दिवस तसेच वाटले.म्हटले तिला लहान मूल आहे आणि लवकर घरून निघते तेव्हा खिडकीकडे बसायला द्यायचो.नंतर बोलताना कळले की ती झोपत नाही तर डोळे मिटून रहाते.डॉक्टरांनी तिला ज्यावेळी काम नसेल त्यावेळी डोळे बंद करून रहायला सांगितले होते.तिचे डोळे आतून कडेने लालभडक झाले होते.
चष्मा anti glare, blue light,
चष्मा anti glare, blue light, अजून काय anti असतं ते सगळं आहे. तरी बघते स्क्रीन ला काही लावता येतं का
डोळेबंद करायची idea आवडली.
आणखी काही टिप्स द्या प्लीज>>
आणखी काही टिप्स द्या प्लीज>>
स्क्रीन brightness adjust करायचं. फॉण्ट वाढवणे. त्यामुळे थोडा ताण कमी होतो.
डोळे बंद करून घट्ट मिटयचे, प्रेशर जाणवलं पाहिजे, मग डोळे उघडायचे आणि लंबवरच्या एखाद्या गोष्टीवर केंद्रित करायचे. असा ३-४ वेळेला करायचं.. ताण कमी झालेला जाणवेल.
दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे, आणि डोळ्यावर ठेवायचे , अर्थात डोळे बंद करून, हलकेच दाब द्यायचा. थकलेल्या डोळ्यांसाठी.
डोळ्यांची बुब्बुळ (एकच वेळी दोन्ही एकत्र) वरती, उजवी, खाली , दवी आणि वर अस एक वर्तुळ. अस ३-४ वेळेला clockwise asni anticlockwise करावे.
वरील उपाय जमतील तसे kinva ग रजे प्रमाणे ऑफिस मध्ये बसल्या बसल्या करता येतात .
याव्यतिरिक्त गुलाब पाण्याच्या, दुधाच्या किंवा नुसत्या थंड पाण्याच्या घड्या रात्री/ वेळ मिळेल तसे थोडा वेळ डोळ्यावर ठेवणे. जेल च्या पट्ट्या ही मिळतात त्याही वापरू शकतो. .
सकाळी, संधयाकाळी पाण्याचे खूप हापके चेहऱ्यावर/ डोळ्यावर मारायचे.
सतत डोकं दुखण्याची अक्षरशः
सतत डोकं दुखण्याची अक्षरशः शेकडो कारणं असू शकतात - एकदा डेन्टिस्टकडेही जाऊन या असं सुचवेन.
टीथ ग्राइंडिंगची सवय असली - किंवा स्ट्रेसमुळे लागली - तरी त्यामुळेही डोकं दुखू शकतं.
अदरवाइजही स्ट्रेस, झोपेची कमतरता, बद्धकोष्ठ यापैकी शक्यता डॉक्टरांशी बोलून रूल आऊट करा.
काही कारणाने आहारात आमूलाग्र
काही कारणाने आहारात आमूलाग्र बदल करावा लागला. पॅक्ड फूड , मैदा , तळलेले. , मसालेदार पदार्थ संपूर्ण बंद.
आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतला. सकाळच्या चहासोबतची बिस्किटे, टोस्ट बंद. रात्री भिजत घातलेले बदाम आणि अक्रोड. त्यात मनुका आणि खजुराची भर घातली.
रोज एक कोशिंबीर किण्वा फळ . जेवणात भर म्हणून गाजर बीट उकडून.
आधी हे काय जेवण आहे की औषध म्हणून वैताग यायचा. पण त्याचा सुपरिणाम होऊन सुपरमॅनसारखं वाटायला लागलं. आपण खातोय ते आपल्यासाठी चांगलं आहे हे उमगल्याने ते आवडू लागलं किंवा / आणि त्याची सवय झाली.
आता बक्षीस म्हणून दिवसाला रोज दोन चकल्या खातो.
महिनाभरात व्यायाम - चालणे, स्ट्रेचिंग, स्ट्रेंग्थ आणि ब्रह्मविद्या चुकलेलं नाही.
Pages