वर्ष २०२४: संकल्प आणि plans

Submitted by किल्ली on 25 December, 2023 - 01:54

नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील. Happy

ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.

मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.

२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.

३. Health आणि व्यायाम :

A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.

४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.

५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.

६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांनी माझ्या गेल्या वर्षीच्या संकल्पास प्रोत्साहन दिले त्यांची मी आभारी आहे. तो संकल्प तर पूर्ण झाला पण फळ मिळाले नाही.
यावर्षी ओव्हरव्हेल्म्ड आहे. इतका वाव आहे सुधारणेस की सुरुवात कुठुन करु, हा पसारा कसा आवरु - असे झालेले आहे.

Pages