सहकारनगर, पुणे गटग

Submitted by अतुल. on 30 January, 2024 - 11:19
ठिकाण/पत्ता: 
तळजाई मंदिर.

नमस्कार,

येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.

वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती:
रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.

PXL_20240201_120638638.jpg

जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.

चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात Happy

अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे

Photo 1:

Screenshot_20240204-110232.png
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत

मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत

Photo 2
Screenshot_20240204-105253.png
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 3, 2024 - 21:00 to 23:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिने पर्समधून कोथिंबीरीच्या छान कुरकुरीत वड्यांचा डबा काढून हातात दिला >>>> बहुधा त्यांचे मूळ नागरिकत्व पुणे हे नसावे.
पुण्याच्या पासपोर्टवर प्रत्येकाने आपापल्या घरून डबा आणावा हे ब्रेल लिपीत कोरलेले असते.

अतरंगी तुमचा एकही मिस्सड कॉल नाही हो आलेला सकाळी. चुकून दुसऱ्याच कोणाच्या नंबरवर गेला असेल कदाचित? कारण मी सुद्धा सकाळी पियू यांना दोन मिस्स कॉल दिले होते. नंतर कळले दुसऱ्याच नंबरवर गेले होते Lol (रिया यांचा असेल बहुतेक)

अतरंगी छान वृत्त्तांत आणि वृत्तांत लिहिलात हे छान केले Happy
कारण पुणेकर असले तरी माबोकर आहेत आणि आपण उपस्थित नसलो तरी गटगची उत्सुकता असतेच.
तसे सर्वांनाच भेटायला आवडले असते पण कुमार सर (हे खरेखुरे सर Happy ) सुद्धा आलेले हे बघून त्यांना भेटायला आणि त्यांनी लिहिलेल्या लेखांबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला आवडले असते असे वाटले.

हर्पेन दादा पळत पळत क्रॅास झाला. हायला हा ईकडे कुठे म्हणून गाडी थांबवे पर्यंत तो पुढे निघून पण गेला.
>>>>>>
आधी माझ्या डोळ्यासमोर आले की हर्पेन तुमच्या गाडीच्या शेजारून तुम्हाला टाटा बाय बाय करत तुम्हाला हरवून पुढे गेले Lol
वोह आर्यन मॅन है, वो कुछ भी कर सकता है Wink

(विशेषतः रूनमेष ची आठवण. माबो चे गटग आणि रूनमेष ची आठवण निघाली नाही हे होऊच कसे शकेल ना?)
>>>>>
माझ्या ववि वृत्तांतात तुमचे कौतुक केलेले त्याची परतफेड केलीत हे लिहून Proud

ऋन्मेऽऽष
वरील आपुलकीयुक्त प्रतिसादातून धन्यवाद पोचले ! माझेही धन्यवाद !!
पुन्हा कधी जरूर येणे.
प्रतिक्षेत ..

हो अतुलदा, मला आले आहेत तुमचे मिस कॉल.
मला इतका आनंद झाला की या लोकांनी आपली आठवण काढून फोन केला पण मी त्या वेळेला दवाखान्यात असल्याने फोन उचलू शकले नाही याची हुरहूर वाटत होती. तो चुकून आलेला फोन होता हे कळल्यावर जरा दुःख झालं Proud
मजा केलेली दिसते आहे तुम्ही सगळ्यांनी. मला अशी गप्पा गटग आवडतात. ती वारंवार होत रहावीत अशा शुभेच्छा!

ता. क - पियू, म्हणून लोकना kaahee घेऊन जायचं असतं म्हणजे लक्षात राहातो आपण Lol

मग नंतर कोणी चर्चेनुसार ब्रेफा करायला गेलाच नाहीत का ? किमान गव्हाचा चिक तरी खायचा.

तळजाई मंदिरात झालेल्या मायबोलीकरांच्या स्नेह भेटीमुळे आजच्या दिवसाची अतिशय सुंदर सुरुवात झाली! भेटलेल्या सगळ्यांशी खूप छान गप्पा झाल्या. चहा आणि कांदे-पोह्यांच्या न्याहारीबरोबर गप्पांची लज्जत आणखीनच वाढली यात शंका नाही .
अशाच भेटी वरचेवर घडायला हव्यात ..
निश्चितच अशा प्रत्येक संमेलनाला यायला आवडेल.

मस्तच! छान वाटलं वाचून.
कोण कुठलं हे फोटो आणि रिप्लाय वर खाली करत शोधून बघितलं चार वेळा आणि सोडून दिलं. कोड्यात न लिहिता, नीट लिहितील तर ते माबोकर कसले! पण कोड्याचे बादशहा कुमार पण होते म्हटल्यावर आता एक कोडंच लिहा बरं! Happy

अरे वा, खूप दिवसांनी टिपिकल माबो गटग आणि वृत्तान्त वाचायला मिळाले! ओडिन आणि आशूचँप नव्हते आले का? Happy सेलिब्रिटि गटग् च झालं असतं मग!

अमितव हे पहा ,
पहिल्या फोटोमध्ये पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल आणि पशुपत
मागील रांग डावीकडून उजवीकडे
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत

अतुल तुम्ही कृपया हे कॉपी करून घ्या आणि तुमच्या मूळ धाग्यात फोटो खाली पेस्ट करा!

आजच्या सहकारनगर-११ या लेखक वाचक संघामधील बिपिन सांगळे आणि कुमार१ हे दोनच खेळाडू माबो व मिपा या दोन्ही संघांमध्ये लेखक आहेत.
( बाकीचे ९ कट्टर माबोकर Happy चु भू दे घे

पूर्वी बिपिन यांची मिपा कट्ट्यावर भेट झाली होती. आजच्या भेटीने तो आनंद द्विगुणित झाला !

दणक्यात झालंय गटग. यातले नेहमी या डोंगरावर सकाळी जाणारे आहेत का?
काही वर्षांपूर्वी मी पुण्यातल्या 'झाला कॉम्प्लेक्स' स्टॉप जवळच्या नातेवाईकांकडे गेल्यावर गंगाधाम टेकडीवर सकाळी फिरायला जात असे. किती पक्षी दिसत तेव्हा. आता रूपच बदलले. नवीन मार्केट होत आहे. टेकडी संपली. आता एकदा ही तळजाई जागा पाहीन. मोरांसाठी.

छान झाला गटग.
एक महिना आधी झाला असता तर नक्की येता आले असते.

मी "तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा" असा धागा काढला आहे.

त्याची रिक्षा -
https://www.maayboli.com/node/84623

कोण कुठलं हे फोटो आणि रिप्लाय वर खाली करत शोधून बघितलं चार वेळा >>> अगदी.

मस्तच गटग, वृत्तांत, फोटो आणि प्रतिक्रिया ही Happy

आज गटगला उपस्थित राहू शकलो . मस्त वाटलं . अर्थात याचे श्रेय अतुल आणि हर्पेन यांना.

अतुल - तुम्ही पुढाकार घेतला म्हणून हे गटग झालं . ववि सोडता खूप वर्षांनी झालं असावं . यासाठी तुम्हाला खूपच धन्यवाद.

हर्पेन - आयर्न मॅन - सुपरहिरो ? हो सुपरहिरोच . खूप दिवस झाले भेटायचं होतं . मस्त वाटलं. तुला भरपूर पळण्याचं बळ लाभो या शुभेच्छा !

कुमार - डॉक्टरांना भेटण्याची ही दुसरी वेळ . ते लिहितात, खूप लिहितात . त्याबद्दल सगळं काय सांगावं ? खूप गोष्टींची माहिती तुम्ही अगदी सोप्या भाषेत देता याचा सगळ्या वाचकांना खूप उपयोग होतो . एक अनुभवी व्यक्तिमत्व . तुमच्या लेखांचं पुस्तक करावं अशी नम्र सूचना.

पशुपत आणि सौ - तुम्हाला भेटून छान वाटलं. मी उशिरा आल्याने आणि तुम्ही लवकर गेल्याने आपलं फार बोलणं झालं नाही.

अश्विनी आणि अश्विनी ११= आपलंही फार बोलणं झालं नाही. पण तुम्ही आवर्जून सांगितलं की मी चांगलं लिहितो , धन्यवाद . पुन्हा - पण कुठल्या अश्विनीने ? ते तुम्हालाच माहिती ( हा हा हा) .

अश्विनी ११ - तुम्ही मिपाची आठवण सांगितली ते लक्षात आहे. आभार .

अतरंगी -एक तरुण व वेगळे व्यक्तिमत्व . अर्थात, तिथे 'तरुण ' या शब्दाला महिला वर्गाने तातडीने आक्षेप नोंदवला ! समस्त तरुण महिला वर्गाची क्षमा.
त्यांची माहिती ऐकून भारी वाटलं . तुमचे कामाचे व गल्फमधले अनुभव यावर लिहाच.

तेजो - तुम्ही उपस्थित राहिलात हे उत्तम ! लिहीत चला . विजापूर बद्दल तुमच्या नजरेतून लिहा.
कृ ह घ्या - विजापुरी कोथिंबीरी बद्दल लिहा ज्यामुळे तुमची वडी एवढी छान झाली होती.

पियू - नीलला बरं नसताना तुम्ही आलात . पण आलात . तुमच्यामुळे नंतर बऱ्याच चर्चा रंगल्या.

दक्षिणा - सरप्राईज एलिमेंट!
कृ ह घ्या - तुमचा गटग क्रमांक 11 होता . 11 आणि दक्षिणा काय योगायोग !

शेवटी- बऱ्याच माबो करांची आठवण निघाली . विशेषता : ऋन्मेष आणि वावे.
एकूण छान झालं . पुन्हा साऱ्यांची आठवण अन आभार .

srd , बरेच वर्ष मी सकाळी तळजाई वनविहारात जायचो, पण नंतर नोकरी निमित्ताने सकाळी लवकर ऑफिसला जायला लागल्यानंतर वेळ बदलून मी संध्याकाळी जाणे सुरू केले. आता तर जवळजवळ दररोज संध्याकाळी तासभर वनविभारामध्ये फेरफटका असतो.
अधून मधून मोर दर्शन देतात, कधीतरी एखादाच ससा दिसतो . पावसाळ्यात सर्प नजरेस पडतात पण पक्षी नाहीत फार इथे. कदाचित परदेशी वनस्पती ने अरण्य भरले असल्याने असेल ! नाही म्हणायला एका तळ्यात बरीच बदके सोडलेली आहेत, तेच काय ते पक्षी !

मला यायला थोडा उशीरच झाला . त्यात आजच तळजाई पठारावर मॅरेथॉन स्पर्धा! ... बापरे ! इतक्या चार चाक्या ! सगळं ट्रॅफिक जॅम . मला वाटलं परतच जावं. माझ्या डोक्यातलं तळजाईचं जुनं चित्र हललंच .

पुढे आल्यानंतर गाडी लावायला जागा मिळेना. गाडी लावली एक जण भेटला . खूप दिवसांनी. तर तो बोलतच बसला. त्याची क्षमा मागून देवळापाशी पोहोचलो . अन हाय ! मंडळी देवळात थांबणार होती . वेळ निघून गेल्याने ते जर कुठे गेले असतील तर शोधणं अवघड होतं , एवढ्या गर्दीत. त्यात माझ्याकडे कोणाचा नंबरही नाही. हर्पेनचा होता, तोही गेलेला . असं वाटलं परतच जावं.

पण धीर करून देवळात शिरलो आणि कुमार दिसले . त्यांना ओळखत होतो मग हर्पेनला ओळखलं . अतुल नंतर माबोच्या टी शर्ट वरून .

सगळ्यांना भेटून छान वाटलं . तोंड गोड करायचं असं ठरवलं होतं . ते केलं . पियू ,नील ,दक्षिणा उशिरा आले. त्यांच्याशीही बोलणं झालं .

माबो परिवार मोठा आहे ! मोठा होवो !

पुन्हा आभार . पुन्हा भेटू.

छान वृत्तान्त बिपिनजी..

अतरंगी -एक तरुण व वेगळे व्यक्तिमत्व . >>> यालाच अतरंगी बोलतात Proud

धन्यवाद पशुपत! धागा अपडेट केला आहे तुमच्या प्रतिसादाची मदत घेऊन.
---x---

रिया, पुढच्या वेळी नक्की भेटू. मला वाटतंय मध्ये कुठेतरी वाडेश्वर डेक्कन ला वगैरे लंच गटग करू एका विकांताला जेणेकरून पिंची+पुणे मिळून सर्वच माबोकर हजर राहू शकतील. काय म्हणता?
----x---

ऋन्मेऽऽषा, नाही रे असे हिसाब किताब थोडेच कोण ठेवते? तुलाही माहिती आहेच Happy
---x---

Srd, मी आजकाल रोजच जातो तळजाईला. गावात रस्त्यावर आजूबाजूला कोंबड्या फिरताना दिसाव्यात तसे इथे मोर फिरताना दिसतात. पण जरा आत जावे लागते इतकेच. मी पूर्ण जॉगिंग ट्रॅक फॉलो करतो अनेकदा, कधीतरी मोर चक्क समोरून उडत जाताना दिसतात. अतिशयोक्ती नाही करत.
---x---

सर्व मंडळी पुनःश्च धन्यवाद सर्वाना _/\_

<<पशुपत, बोलका चेहरा आहे.
मालिकांमधून कामे करायला लागा बघू.>>
फिबां, कॅम्पिमेंट बद्दल धन्यवाद!

पशुपत
तुम्ही इथले लेखक आहातच. मी माबो व मिपा अशा 'दोन्ही ठिकाणी' बद्दल म्हटलंय.

फोटू बिटू एकदम मस्त. मला या गटग ची अजिबात कल्पना नव्हती. मी माझ्या नेहमीच्या विकेंड प्लॅन नुसार सिंहगड रस्त्याच्या बाजूने तळजाई टेकडी चढून मंदिरात बसले होते. उठून निघायला लागणार तोच समोरच्या ग्रुप मधून एक मुलगी माझ्याशी जन्मोजन्मीची ओळख असल्यागत उठून हातवारे करू लागली. मला एक क्षण कळेना की ही मलाच हात दाखवतेय कि माझ्या मागे अजून कोणी आहे. तर ती दुरूनच दक्षिणा... म्हणून माझ्याकडे आली आणि ती नजरेच्या टप्प्यात आपल्यावर मला हर्षवायू झाला. ती पियू होती.. जिच्याशी मी मनातलं बरंच काही शेअर केलं होतं (एकदाही न भेटता) ती चक्क समोर होती. मी कधी नव्हे ते, व्यायामालाच जायचं आहे चष्मा कशाला म्हणून सिंगल डोळ्यांनी गेले होते त्यामुळे कोणालाही एका विशिष्ट अंतरावरूनच ओळखू शकले असते. (अगदी मोदींना सुद्धा) त्यामुळे तो थोडा प्राथमिक गोंधळ उडाला होता.

अगदीच शेजारच्या कट्ट्यावर मायबोलीची दिग्गज मंडळी बसली होती आणि मला त्याची गंधवार्ता असू नये ? पण हार्पेन दिसल्यावर एकदम आनंद झाला. अनपेक्षित भेटीची मजा निराळीच असते. मनोज, डॉक्टर कुमार, बिपीन, तेजो सगळ्यांना भेटून मला लगेच निघायचं होतं. त्यामुळे फार वेळ घालवता आला नाही. पुढच्या भेटीत मी नक्की जास्त वेळ थांबेन.

एक उगिचचा अपडेट - पियू काल मी व्यायामाच्या ड्रेस मध्येच ४ वाजेपर्यंत फिरत होते.

Pages