नमस्कार,
येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.
वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती: रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.
जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.
चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात
अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे
Photo 1:
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत
मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत
Photo 2
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.
प्रयत्न करतो नक्की
प्रयत्न करतो नक्की
शुभेच्छा !
मी लेकीला क्लासात सोडून येईन,
मी लेकीला क्लासात सोडून येईन, तिला घ्यायच्या वेळी परत निघेन. पण तिची क्लासची वेळ अजून कळायची आहे. कळली की माझी वेळ मी इथे अपडेट करीन. (१६ ला बहुतेक संकष्टी आहे, "उपाशी" लोकांसाठी जनहितार्थ जारी )
Pages