नमस्कार,
येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.
वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती: रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.
जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.
चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात
अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे
Photo 1:
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत
मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत
Photo 2
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.
आज कित्तीतरी दिवसांनी/
आज कित्तीतरी दिवसांनी/ महिन्याने आले माबोवर, आधी आले असते तर तुम्हाला भेटता आले असते
मस्त गटग, मस्त वृतांत
पियू, मला यायला आवडेल तळजाईला
>> पुन्हा असं गटग झालं
>> पुन्हा असं गटग झालं (तळजाईलाच), येत्या एक दोन रविवार मध्ये.. तर
कल्पना चांगली आहे. अधूनमधून गटग करायला हरकत नाही. या भागातल्या प्रत्येक गटग साठी प्रत्येक वेळी वेगळा धागा काढण्यापेक्षा, हाच धागा continue करता येईल. सध्या माझे काही विकांत अनिश्चित आहेत. कदाचित यायला जमेल कदाचित नाही. पण नंतर जमेल.
जो/जी विकांताला उपलब्ध आहे गटग त्यांनी करायचे असल्यास या धाग्यावर दोन तीन दिवस आधी इथे मेसेज केला व त्यास प्रतिसाद आले तर वेळ/ठिकाण ठरवून त्यानुसार सर्वाना भेटता येईल'.
उद्यानाची वेळ पाहता मुंबईतील
उद्यानाची वेळ पाहता मुंबईतील लोकांना पुण्यात कुणाकडे राहूनच ती जागा पाहता येईल. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वेळ ठेवायला हवी.
मंडळी
मंडळी
आज आणि उद्या गोखले इन्स्टिटयूट , बी एम सि सि कॉलेज जवळ , मटा आयोजित कलासंगम हा कार्यक्रम आहे . कार्यक्रम सर्वांसाठी आणि विनामूल्य आहे . त्यामध्ये अनेक वर्क शॉप्स आहेत , आणि इतरही अनेक कार्यक्रम आहेत .
त्याचे वेळापत्रक मटा वर कृपया पहा
मी तिथे जाणार आहे दोन्ही दिवस
जर आपण आलात तर भेट होईल
कार्यक्रम पाहता येईल किंवा स्वतंत्र गप्पाही मारता येतील
वेळ - २ ते ८
त्वरा करा, नोंदणीची अखेरची
त्वरा करा, नोंदणीची अखेरची तारीख उद्याच संपतेय. अधिक माहितीसाठी हा धागा पहा:
https://www.maayboli.com/node/85290
दिनांक 30 नोव्हेंबर 2024
दिनांक 30 नोव्हेंबर 2024 सकाळी 9 वाजता वाडेश्वर (डेक्कन) इथे मायबोली करांचे (परदेशी पाहुण्यांची विशेष उपस्थिती) गटग होणार आहे. भेटूया नक्की
पुन्हा कधी??
पुन्हा कधी??
उद्याचा मुहुर्त भारीच आहे की.
उद्याचा मुहुर्त भारीच आहे की.
>>>>दिनांक 30 नोव्हेंबर 2024
>>>>दिनांक 30 नोव्हेंबर 2024 सकाळी 9 वाजता वाडेश्वर (डेक्कन) इथे मायबोली करांचे (परदेशी पाहुण्यांची विशेष उपस्थिती) गटग होणार आहे. भेटूया नक्की
वृत्तांत?
वृत्तांत? >>> अगं सामो, वाडा
वृत्तांत? >>> अगं सामो, वाडा निवडक वर पहा.
ओके रमड
ओके रमड
आज सहकारनगर गटग चा वर्षपूर्ती
आज सहकारनगर गटग चा वर्षपूर्ती वाढदिवस !! अचानक झालेल्या कुमार सरांच्या भेटीने आणि गटग च्या आठवणी ने साजरा झाला. पियू पुढील गटग साठी पुढाकार घेणार आहे असे कळले . पुढील गटग ची तारीख आणि भेटीच्या प्रतीक्षेत !!!
अश्विनी११
अश्विनी११
अरे वा, तुम्ही इथे लिहिले पण ! खरंच खूप छान वाटलं अचानक झालेल्या भेटीमुळे आणि तेही आपल्या गटगच्या वाढदिवशी.
यंदाच्या विभागीय गटगची ओढ लागलेली आहे हे वे सा न ल . तरणीबांड मंडळी लवकरच घोषणा करतील ही अपेक्षा
मी करणारच आहे.
मी करणारच आहे.
How about १६ फेब्रुवारी सकाळ किंवा संध्याकाळ ४ किंवा २३ फेब्रुवारी सकाळ किंवा संध्याकाळ ४?
रविवार अशासाठी की सगळ्यांनाच शनिवारी सुट्टी नसते.
संध्याकाळी भेटायचे ठरले तर साधारण ४ अशासाठी की रविवारी संध्याकाळी त्यानंतर सगळीकडे गर्दी असते.
शक्यतो आधी वाळवेकर बागेत (सहकारनगर) भेटू आणि मग खादाडी करण्यासाठी ट्रेजर पार्क गाठू असे डॉक्टर कुमार यांनी सुचविले आहे.
सगळ्यांनी आपापली मते सांगा.
दुपारी बाग 4 वाजता उघडते.
दुपारी बाग 4 वाजता उघडते. बागेमध्ये दोन पॅगोडा आहेत. त्यातल्या एकात समोरासमोर बसणे हे गटगसाठी अतिशय उत्तम ठरेल. त्या दृष्टीने दुपारी सव्वाचार पर्यन्त जर सगळे जमले तर आपण पॅगोडा आपल्यासाठीच पकडू शकतो (उद्यान सार्वजनिक असल्याने जो आधी बसेल तो कितीही वेळ बसू शकतो).
तसेच दुपारच्या वेळेचा अजून एक फायदा म्हणजे तेव्हा बाहेर 7-8 कार पार्क करण्याची आपल्याला मुभा राहील. कारण तेव्हा इतर लोक आलेले नसतात.
बघा विचार करून.
(बागेत खाण्यास बंदी आहे. म्हणून गप्पा मारून झाल्या की खादाडी बाहेर जाऊन करायची
हे वाचून आताच फोमो होउ लागलाय
हे वाचून आताच फोमो होउ लागलाय
23 फेब्रुवारी la भारत विरुद्ध
23 फेब्रुवारी la भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे
हे वाचून आताच फोमो होउ लागलाय
हे वाचून आताच फोमो होउ लागलाय >>> मलाही. आणि मी तर पुण्यात पण नाहीये
RMD
RMD
मी पण फोमो मुळे तो भायखळा गटग
मी पण फोमो मुळे तो भायखळा गटग धागा अजिबातच वाचत नाही.. वाचला नाही.
डॉ. कुमार यांच्या थेट भेटीची संधी हुकणे फार त्रासदायक आहे.
अरे काय सगळे गटग मी नसतानाच
अरे काय सगळे गटग मी नसतानाच का ठरवताय?
जरा मार्च च्या पहिल्या आठवड्यात तरी ठेवा….
मी प्रयत्न करेन 16 फेब साठी,
मी प्रयत्न करेन 16 फेब साठी, पण आत्ताच नक्की नाही सांगता येणार.
मार्च मध्ये परत ठेवूयात का?
मार्च मध्ये परत ठेवूयात का?
१६ फेब्रुवारीला निश्चित जमेल
१६ फेब्रुवारीला निश्चित जमेल .
२३ फेब्रुवारीला मी पुण्यात नाही.
मार्चमध्ये परत सुद्धा करायला
मार्चमध्ये परत सुद्धा करायला हरकत नाही
16, 23 feb वाळवेकर ला जमेल,
16, 23 feb वाळवेकर ला जमेल,
१६ का सकाळी जमू शकेल असे
१६ का सकाळी जमू शकेल असे वाटतेय.
१६ , २३ दोन्ही तारखांना जमेल
१६ , २३ दोन्ही तारखांना जमेल.
(No subject)
१६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी
१६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता डॉक्टर कुमार यांना भेटण्यासाठीचे गटग वाळवेकर गार्डन, सहकारनगर येथे करायचे ठरवले आहे.
तरी सर्वांनी आपली हजेरी लावावी होsss.
Pages