दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

:o हा मूवी आणि गाणी काहीच माहित नाही. लोकप्रिय असून माहित नाही. म्हणजे हा प पू रेशमिया सरजी यांचा अपमान च केला मी म्हणावं लागेल.

@ फा -
हिरवी बाईक >>> श्र म्हणाली तसं ती बाईक मिस करणं शक्यच नाही. मी ही त्यावरूनच ओळखलं गाणं. Happy

दिल दिवाना बद्दलचा पॅरा क्लासिक आहे Lol

सकाळी लवकर लवकर गोष्टी आवरायच्या असतील, कुठे लांब प्रवासाला जायचं असेल ड्राईव्ह करताना झोप येईल अश्या रस्त्यावर,भांडी घासायची असतील तर हिमेश च्या गाण्याना पर्याय नाही.अश्या वेळी मग जगजीत सिंग किंवा अरिजित चालत नाही.स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, आयुष्याच्या साराबद्दल बरेच प्रश्न यायला लागतात.
पण ही कामं करून शांत वाटायला लागलं, विश्रांती घ्यायची वेळ आली आणि तरीही 'झलक दिखलाँ जॉ' किंवा ' कितणे अरमाण माण माण माण.. जगे तेरे वासदे सोणीये' कानात आदळत असेल तर मग चक्कर यायला लागते Happy

धाग्यावरील सर्व साँगजीपीटाचार्यांना नमन करून एक सोपा खेळ देतो.
या गाण्यात संगीत नाही. गाणे ज्या गायकाने गायले आहे त्याचे जन्मशताब्दी वर्ष अवघ्या तीन चार दिवसात सुरू होfunction at() { [native code] }अ आहे. गाण्यात एक आणखी अभिनेता आहे पण तो या दृश्यात दिसत नाही. नायिका दिसत नाही. या खेळात गाणे ओळखायचे नसूनयाfunction at() { [native code] }अले कलाकार ओळखले असतील तर चित्रपटाचे नाव सांगायचे आहे. जमल्यास गाणे ओळखायचे आहे.
Picture1.png

मी ओळखलं आहे.
एक तासानंतर जर उत्तर आलं नसेल तर लिहिते

क्या जाने कमी किस चीज़ की मैं
हर चीज़ मे पाता रहता हुँ

शशी कपूर/पद्मा खन्ना
मोहोम्मद रफ़ी
चित्रपट : नैना (१९७३)

झिलमिल --- हे गाणं ओळखल्याबद्दल बनारसी शालू (सोबत श्रीफळ देतात का ?)
कारण हे गाणं सिनेमात घेतलेले नाही. कट केलं होतं.
ही हाईट आहे ओळखण्याची !!!!!!
इथे अमानवीय अस्तित्वं आहेत.

मांजरावरून गाणं ओळखणे - याबद्दल साष्टांग दंडवत!!!

ता . क. अर्र, मी बऱ्याच जुन्या पानावर होतो.

Pages