दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त अमिताभवर कसकाय फोकस करता बायकांनो?
>>>>> Happy कारण स्वेटर नव्हते व मानलेला नवरा होता. मी यालाच धरून बसले, आणि नटवरलालची सगळी गाणी बघितली.

फा, अस्वल Lol स्वित्झर्लंड मधेही अस्वले असू शकतात.
नीट लपवायला हवं होतं, चेहऱ्यावर मोठं 'जॅक ओ लॅन्टर्न' चिकटवते पुढच्या वेळी. Wink

नुसतंच झाडाचं चित्र दिलं तरी गाणं ओळखेल श्रद्धा. Happy

श्र नेहमीप्रमाणेच पसरली. <<<<< Lol

कारण स्वेटर नव्हते <<<<
बघ केव्हढे बेमालूम वेषांतर केलेय ऋषी कपूरने! Proud

फा, त्याची 'क्लिव्हेज' झाकलीच आहे cravat ने पण नेमका रंग काळाच निवडला.
'अंदाज अपना अपना' मोड ऑन-
'बाल भी छुपे है और पता भी नही चल रहा है..'

मी ऋषी कपूर कन्सिडर केला होता
पण हा लाल माणूस स्लिम आणि उंच वाटला त्यामुळे ऋषी कपूर बाद केला.
श्रद्धा साष्टांग नमस्कार!

IMG_20231214_221833.jpg
या गाण्यातल्या तुम्हाला न दिसणाऱ्या सर्व किंवा काही बायका या त्यांच्या नवऱ्यांच्या पहिल्या बायका असतील किंवा नसतील.

कारण स्वेटर नव्हते
बघ केव्हढे बेमालूम वेषांतर केलेय ऋषी कपूरने! >>> Lol

हे आदिवासी बॉलीवूड भागातील दिसतात. तरी चेहऱ्यावर काळे पट्टे ओढलेले नाहीत. कबिल्याचे नियम पाळत नाहीत का?

ड्रेस वरून ही नॉर्मल हवाईयन जनता असावी.त्यांच्यात नाही ओढत पट्टे Happy
अजून क्लू:
1. या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री ला 3 मानलेले मुलगे आणि 1 मानलेली मुलगी आहे.
2. या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री ने एका दिग्दर्शकाचे स्थळ नाकारले.
3. या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री च्या मानलेल्या मुलाचा मेव्हणा पण अभिनेता आहे.
4. या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री ला एकूण 6 अपत्ये: 2 खरी आणि 4 मानलेली.
5. या दृश्यात न दिसणाऱ्या सर्व स्त्रियांनी आंतरधर्मिय लग्ने केली आहेत.
6. या दृश्यात न दिसणाऱ्या एका स्त्री च्या नवऱ्याच्या मुलांच्या सावत्र आईच्या जन्मगावी जायला आपल्याला व्हिसा लागत नाही.(अय्यो हे चुकलं.लागतो बरं का.)

अनु, चित्र जरा ओळखीचे वाटले होते पण clue ने गोंधळ वाढवला आणि हे आपले काम नाही हे जाणवले Lol
फारच कठीण काम आहे हे, मला नाही येत आहे उत्तर, धागा follow करते आहे, तुम्ही सर्व मंडळी जबरदस्त आहात राव

हेलन चं वर्णन वाटतंय. नाचणारे पुरुष कमी कपड्यात असतील तर नाचणारी स्त्री त्याहूनही कमी कपड्यात असते हा नियम आहे.

व्हाइसे वर्सा असेलच असं नाही.

मामी Lol
बरोबर.स्त्री अगदी सगळीकडे वर्तुळाकृती भगदाडे असलेला गाऊन किंवा संथाली साडी नेसून असेल तरी नायक भारतीय हवेत 3 पीस सूट किंवा टर्टल नेक किंवा गळ्याभोवती मफलर गुंडाळून असू शकतो.

मी केव्हा लिहू ते सांगा. Proud

अनु, हे कोविड इनअप्रोप्रिएट बिहेवीयरचं गाणं आहे. बरोबर की नै? Lol

मी बिल्वा, अनुने मल्टिपल बायकांबद्दल क्लु दिले आहेत. ती बाई/त्या बायका शोधा आणि मी लिहिलेलं उत्तर पण लक्षात घ्या. सापडेल गाणं.

Pages