क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत जाणाऱ्या भारतीय संघाला नावे कशी ठेवता येईल ?
ते दहा सामने भारतीयांनी एन्जॉय केलेत ना ?
अंतिम सामन्यात कोणत्यातरी एका संघाचा पराभव ठरलेला असतोच मग त्यात आपला संघ पराभूत झाला म्हणून त्यांना नावे ठेवण्यात काही अर्थ नाही .
ऑस्ट्रेलिया हा खूप चिवट संघ आहे , त्यांच्या विरोधात जिंकलो असतो तर मजा आली असती , पण हरलो म्हणून वाईट वाटून घेण्यात काहीही अर्थ नाही .

>>Rohit Sharma revealed that he would have batted first expecting spin to play a part."<<
नॉट श्योर, तुमचा सोर्स काय आहे कदाचित रोहित तसं बोलला हि असेल. पण तो मॅच संपल्यावर रवि शास्त्रीने विचारल्यावर हे देखील बोलला -

द विकेट गॉट स्लाय्टली बेटर टु बॅट अंडर द लाइट्स...

द्या सोडून आता. ज्या मॅच जिंकलो त्या बघायला खुपच मजा आली.

ऋन्मेष, टि२० सिरिज सुरु होतेय त्याचा बाफं उघडणार का?

नॉट श्योर, तुमचा सोर्स काय आहे कदाचित रोहित तसं बोलला हि असेल. >>>>> तो टॉस झाल्या झाल्या लगेचच म्हणाला होता की मी टॉस जिंकलो असतो तरी बॅटींगच घेतली असती "इट्स अ गूड पिच". हे बघा. https://www.youtube.com/watch?v=pOWtEKz52jc

मग आता काय?
गल्ली क्रिकेटबद्दल बोलू या!!!

आज ऑस्ट्रेलियाने इंडियाला outplay केलं. कन्डीशन्स सुद्धा त्यांना फेव्हरेबल ठरल्या आणि त्यांनी त्याचा चांगला फायदा करून घेतला >> फे फ, रोहित च्या बोलण्यात तशीही पहिली बॅटींग घेण्याबद्दल उल्लेख होता (का ते देव जाणे) त्यामूळे कंडीशन्स तशाही आपल्याला सूट होणार्‍या नसणार हे उघड आहे. आपण ऑसीज्च्या डीसिप्लिन्ड अ‍ॅटॅक नि फिल्डींग पुढे कमी पडलो. हेड नि लाबू शाने सेटल झाल्यावर आपल्याकडे बॅकप प्लॅन नसल्यासारखे मोशन मधे गेलो असे वाटत राहिले. "ज्या मॅच जिंकलो त्या बघायला खुपच मजा आली. " हे म्हणायचे नि पुढे सरकायचे.

ऋन्मेष, टि२० सिरिज सुरु होतेय त्याचा बाफं उघडणार का?
>>>

त्यासाठी आपला नेहमीचा क्रिकेट धागा आहे ना..
https://www.maayboli.com/node/83589

बाकी ती सिरीज बघायचा आणि चर्चा करायला मूडच गेलाय. मी तर आमचा क्रिकेट व्हॉटसप ग्रूप वरून सुद्धा ब्रेक घेतलाय काही काळ..

मॅच हरलो त्यानंतर काही लोकांचे स्टेटस बघून तर मन आणखी विषन्न झाले. ते सो कॉल्ड धोनी अंधभक्त होते आणि धोनी नाही तर वर्ल्डकप नाही याचा त्यांना अ‍ॅक्चुअली आनंद होत होता.. तश्या आशयाचे स्टेटस फिरवत होते Sad

मध्ये आयपीएल असेल ना आता?? >> आता ऑसी टी २० आहेत नि मग साउठ आफ्रिका दौरा नि मग इंग्लंड येतेय ! जबरदस्त टेस्ट मॅचेस पाहायला मिळतील.

बाकी ती सिरीज बघायचा आणि चर्चा करायला मूडच गेलाय. मी तर आमचा क्रिकेट व्हॉटसप ग्रूप वरून सुद्धा ब्रेक घेतलाय काही काळ.. >> fool me once, shame on you. fool me twice shame on me Lol

कळलं नाही असामी, यात काय फूल?
मी शेवटचे ६०-७० धावा असताना सरळ झोपी गेलो.. मध्यरात्री उठल्यावर फक्त किती विकेटने जिंकले, हेडने किती केले आणि मालिकावीर कोणाला दिले हे चेक केले... लोकांचे स्टेटस पोस्ट बघितले. आणि व्हॉटसप ग्रूप आर्काईव्ह करून फोन बाजूला ठेवला. त्यानंतर रात्रभर जागाच होतो. उतारा म्हणून नेटफ्लिक्स रेलवे मेन सिरीज चार भाग बघून संपवली. पहाटे सातला पुन्हा झोपलो

काही नाही तू मागे पण असेच सांगितले होतेस ते आठवले नि आपली उगाचच ही म्हण आठवली रे. आता पण ग्रेस चे भोग इथले संपत नाही हे आठवले उगाच.

2015 च्या वर्ल्डकपला हरलो, तेंव्हा सुतक पाळायला घेतला होतात ना हो हा शर्ट ! बरा टिकला पण खूप झालं, टाका आतां !!! 20190918_204446_0.jpg

*पराजित होऊनही जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपची गोष्ट.*
दिनांक : १९ नोव्हेंबर २०२३

डोवालसाहेब सकाळ पासून बेचैन होते. संपूर्ण देश वर्ल्डकप फिव्हरमध्ये होता. स्वतः प्रधानमंत्री स्वतःच्या १८ तास कामाच्या स्केड्यूल्डमधून टाइम काढून वर्ल्डकप फायनल पाहायला जाणार होते. पण डोवाल साहिब का बेचैन होते ते कळत नव्हतं. ते कोणाच्या तरी निरोपाची वाट पाहत होते. त्यांच्या हातात साधं चावी मारायचं जुन्या स्टाइलच एचएमटी घड्याळ होतं. सारख सारख घड्याळात टाइम पाहत होते डोवाल साहेब . आणि अचानक त्या घड्याळात वेगवेगळ्या लाईट्स चमकू लागल्या. डोवाल सायबांनी चष्मा काढला आणि खिश्यातला गॉगल डोळ्यावर चढवला आणि पुन्हा हातातल्या घड्याळाकडे नीट पहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं हसू उमटलं. ते साधसुधं एचएमटीच घड्याळ साधंसुधं नव्हतंच मुळी. ते होतं इंटलिजन्स वॉच. आणि त्यावर अचानक चमकरणाऱ्या लाईट्स म्हणजे एक संदेश होता जो फक्त विशेष गॉगल/काचा डोळ्यसमोर लावूनच वाचता येऊ शकतो. असा गॉगल डोवाल सायबांकडे कायम असतो.

त्यांनी लगेच गाडी काढली आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून गुजरातला गेले. ऑन द फ्लायच त्यांनी ऑन द एयर ऑनलाईन मिटिंग घेतली आणि सगळ्या सूचना त्यांच्या टीमला दिल्या . अचानक हेलिकॉप्टरच स्टेरिंग वळवायला लावून डोवाल साहेब स्टॅचू ऑफ युनिटीकडे गेले आणि तिथे उतरले. तेंव्हा ते खूप रिलॅक्स आणि खुश दिसत होते. कसा वेळ घालवावा म्हणून मग ते तिथेच बागेत वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं मोजत बसले. यथावकाश काही अधिकारी आले आणि त्यांनी डोवाल सायबांना निरोप दिला. "सर! इंडिया म्हणजे आपंण वर्ल्डकप फायनक मॅच हरलो" . डोवाल साहेब कायच्या काय खुश झाले. त्यांचा आनंद स्टॅचू ऑफ लिबर्टी पेक्षा मोठा दिसत होता. अक्षरशः गगनात मावेना झाला त्यांचा आनंद. मग एका नुकत्याच जॉईन झालेल्या अधिकाऱ्याने विचारलं "पण सर ! आपण हरलो मग तुम्ही येवढे खुश कसे ?" त्याच्याकडे बघून सगळेच अधिकारी आणि स्वतः डोवाल साहे अक्षरशः लोटपोट होऊन हसले. आणि मग त्याला खरी हकीकत सांगितली.

तर हकीकत अशी !

डोवाल सायबांना कळालं. भारताचा ह्या वर्ल्डकपचा परफॉर्मन्स एकदम लाजवाब आहे. आधीच्या दहाच्या दहा मॅचेस एकहाती भारताने जिंकल्या आहेत. फायनल सुद्धा भारत सहज जिंकू शकतो. पण भारताच्या वाईटावर खूप शत्रूराष्ट्र वाईट नजर ठेऊन असतात. त्यातला एक नंबरचा नासका कांदा म्हणजे आपला शेजारी "पाकिस्तान". पाकिस्तान मधून खूप मोठ्या प्रमाणात अक्षरशः फॉरेन फ़ंडिंग घेऊन आंतरराष्ट्रीय बाजरातुन कर्जाने पैसे घेऊन जगातल्या सगळ्याच सट्टेबाजरात भारताच्या बाजूने पैसे लावले होते. भारत जेंव्हा फायनल जिंकेल तेंव्हा आपोआप हे शत्रू राष्ट्र श्रीमंत होईल आणि हाच पैसा भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करायला सुद्धा वापरला जाईल. झालं तर मग . जशी हि गोष्ट डोवाल सायबांना कळाली त्यांनी त्यांचे पत्ते हलवले. मोदी-शहाना कळवले. त्यांनी जय शहाला कळवले. जय शहांनी टीमला सांगितले की आपल्याला हरायचंय कारण हरल्यावरच आपण खऱ्या अर्थाने जिंकणार आहोत. झालं तर जसे ठरले तसेच झाले. अमित शहांनी उगाच त्यांच्या मुलाला बीसीसीआयच्या खुर्चीत बसवलेले नाही. अश्या ठिकाणी भरवश्याचीच माणस लागतात. आता हेच जय शहा आणि कंपनी ह्या पराभूत टीमला भरपूर मालामाल करेल बघाच तुम्ही.

भिकारी झालेला पाकिस्तान आता सट्ट्यात बुडालेल्या पैश्यामुळे अजून भिकारी आणि कर्जबाजारी होईलं. दहशतवाद्यांचं तर कम्बरडच मोडलंय. पुढील काही वर्ष कुणीच आता डोकं वर काढणार नाही. जनतेला ह्या मॅचमुळे भावनिक त्रास झालाय खरतर पण ह्या पराजया मागचं खरं कारण भविष्यात समोर येईल तेंव्हा आपसूकच सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य येणार याची मला खात्री आहे. ते म्हणजे " वाह मोदीजी ! वाह !! "

आता तुम्ही सगळ्यांनी हा पराभव सिलिब्रेट करायला हरकत नाही !!

भिकारी झालेला पाकिस्तान आता सट्ट्यात बुडालेल्या पैश्यामुळे अजून भिकारी आणि कर्जबाजारी होईलं. दहशतवाद्यांचं तर कम्बरडच मोडलंय. पुढील काही वर्ष कुणीच आता डोकं वर काढणार नाही. जनतेला ह्या मॅचमुळे भावनिक त्रास झालाय खरतर पण ह्या पराजया मागचं खरं कारण भविष्यात समोर येईल तेंव्हा आपसूकच सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य येणार याची मला खात्री आहे. ते म्हणजे " वाह मोदीजी ! वाह !! >>>>>>>
मस्त Happy

गेल्या दशकात वन डे चॅम्पयनशिप चे तिरंगी / चौरंगी / पंचरंगी मुकाबले बंद झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या संघाला 'डिसायडर' खेळायचा मानसिक अन् स्ट्रॅटेजिक अनुभव नाही.
५-७ सामन्याच्या दुरंगी लढतीत बरेचदा निकाल आधीच लागलेला असतो, त्यामुळे 'फायनल' मॅच ला फारसं महत्त्व उरत नाही.

७ सामन्याच्या दुरंगी लढती ऐवजी सिंगल राऊंड रॉबिन ची चौरंगी लढत किंवा डबल राऊंड रॉबिन ची तिरंगी लढत ठेवली तरी संयोजकांना ७ च सामने खेळवायला लागतील. (सिंगल राऊंड रॉबिन ची तिरंगी लढत तर ४ सामन्यात आटोपेल)

वर्ल्डकप ' झाल्यावर ' सांगते म्हटलं होतंस तू , ' जिंकल्यावर ' म्हटलं असतंस तर तेंव्हांच तुझा नकारच आहे हे समजलो असतो ना मी !!! 20181219_105812.jpg

भाऊ Lol

गेल्या दशकात वन डे चॅम्पयनशिप चे तिरंगी / चौरंगी / पंचरंगी मुकाबले बंद झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या संघाला 'डिसायडर' खेळायचा मानसिक अन् स्ट्रॅटेजिक अनुभव नाही. >>> गुड पॉइण्ट. हे वाढवायला हवे.

मल्टीनॅशनल टूर्नामेंट आर्थिकद्रुश्ट्या फायदेशीर ठरत नसाव्यात. तसेच एकाच वेळी चार देशांचे व्यस्त शेड्युल अ‍ॅडजस्ट करा हा मुद्दाही असावा सध्याच्या अतिक्रिकेट काळात.

तसेही सध्या दर वर्षाला एखादी आयसीसी स्पर्धा असतेच. चार वर्षात एक विश्वचषक, एक चॅम्पियन ट्रॉफी, दोन २० चे वर्ल्डकप असे चार वर्षात चार स्पर्धा होतात. त्यात दोन वर्षांनी येणारी कसोटी चॅम्पियनशिप मोजाल तर चार वर्षात सहा टायटल झाले. मिळेल काही ना काही आपल्याला लवकरच...
आणि जेव्हा एक जिंकू तेव्हा हा मेंटल ब्लॉक (काही असल्यास) तो सुद्धा जात दणादण अजून येतील.

आयपील विसरलास पण
>>
नाही रे, फक्त वन डे मालिकांवर फोकस होता.
कारण तिरंगी / चौरंगी लढती ना टेस्ट मधे होत्या ना टी20 मधे.

अरे आज लगेच..
थोडा तरी ब्रेक ठेवायचा...
ही टीम वेगळी आहे पण अजून क्रिकेटप्रेमिंचे सुतक सुटले नाही..
जिंकलो तरी च्यायला लोकं बोलणार की तुम्ही नुसते द्विपक्षीय मालिका जिंका...

तिरंगी चौरंगी स्पर्धा नसण्याचा तोटा फक्त भारतालाच झाला का? ऑस्ट्रेलियाला का नाही झाला?

गेल्या साताठ वर्षांत आपण अंतिम फेरीचे किती सामने हरलो आहोत? आणि किती जिंकलो आहोत? यात टेस्ट चँपियनशिपही धरा.

अरे आज लगेच..
थोडा तरी ब्रेक ठेवायचा...
ही टीम वेगळी आहे पण अजून क्रिकेटप्रेमिंचे सुतक सुटले नाही..
जिंकलो तरी च्यायला लोकं बोलणार की तुम्ही नुसते द्विपक्षीय मालिका जिंका...>>>>>>>>
भारतीय टीम ने वर्ल्ड कप मध्ये थर्ड क्लास खेळले असते तर सुतक पडले असते .
एक दोन नाही त्यांनी तब्बल दहा मॅच चुरसी ने जिंकून दिल्या ना राव !
फायनल मात्र निर्दयी ऑस्ट्रेलिया बरोबर झाल्यामुळे आपली वाट लागली .
फायनल हरल्या नंतर दोन दिवस थोडेसे वाईट वाटले , पण आज टी ट्वेण्टी साठी फुल्ल उत्साह ने बघणार ....

Pages