क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शामीच्या डबल स्ट्राईकने मॅच फिरवली. >> +१. विशेषत: , विल्यमसनची विकेट हा ' टर्निंग पॉइंट ' म्हणावा लागेल . नंतर, चौकार, षटकार मारत न्युझी पुन्हा त्यांचा आवश्यक रनरेट आवाक्यात आणत होते, तेंव्हा रोहितने चलाखीने कुलदीपला 42 व 44 वं षटक दिलं . त्यात फक्त 2 व 3 धावा देवून व 1 विकेट घेवून त्याने न्यूझीला बचावात्मक पवित्रा घ्यायला लावला. रोहितने त्याला पुढे गोलंदाजी न देता, लगेच पुन्हा तेज गोलंदाजी दोन्ही बाजूंनी सुरू केली ! ब्रिलीयंट !!!!!
वेल प्लेड, न्यूझी!
अभिनंदन व शुभेच्छा, भारत !
एका रंजक सामन्याबद्दल दोन्ही संघांना धन्यवाद !!

फेफ आणि असामी, सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन.
आज सिराजचा कंट्रोल नव्हता आणि समहाऊ बुमराह ला ब्रेक्थ्रु नाही मिळाला पण लाईन लेंत टाईट ठेवली त्यानी. मग शमीनी त्यावर कळस करत विकेट्स काढल्या! काही विचारायलाच नको! स्पर्धेच्या बाहेर असणारा खेळाडू आत मध्ये आला आणि काय सोनं केलं संधीचं! लाजवाब!

दव पडलं नाही खुप हेही एक फार मोठी गोष्ट झाली. शमीच्या पहिल्या स्पेल मध्ये आणि बुमराह ला सुद्धा स्विंग मिळत होता थोडाफार. त्यात २ विकेट गेल्या. पुढे खुप दव पडलं असतं तर अवघड काम झालं असतं.

आज अगदी मौक्याच्या गेम ला प्रेशर टेस्ट झाली असं झालं. स्कोअर मोठा होता त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट थोडं प्रेशर बिल्ड केलं की पण लगेच वाढत होता. वर असामीनी लिहिलय तसं काही ओवर विकेट न जातात फक्त टाईट गेल्या त्यामुळे प्रेशर बिल्ड झालं. पण शेवटी सरवात जास्त क्रेडिट शमीलाच.
जडेजाच्या प्लेसमेंट बद्दल पण अनुमोदन असामी. बर्‍याच वेळा असं झालय, मुद्दाम केलय रोहितनी.

कुलदीप आणि जडेजाला पण मानलं पाहिजे, येवढे रन होत असताना दोघांनी आजिबात खुप रन दिले नाही, कमाल आहे.

बस सिराजला बॉलिंग कंट्रोल बद्दल आणि सगळ्यांना नीट फिल्डिंग करण्याबद्दल काहीतरी कानमंत्र द्या म्हणा फायनल करता आणि दॅट्स इट. जीव ओतलेला दिसला पाहिजे फिल्डिंग करताना, नो मॅटर आपला स्कोअर काय आहे. आज अगदी स्पष्ट दिसत होतं पब्लिक लाईटली घेतय स्कोअर मोठा असल्यामुळे. नंत विलियमसन आणि मिचेल नी पुंग्या टाईट केल्या आपल्या.

असामी, भाऊ - अनुमोदन! आणखी एका माणसाविषयी लिहायला हवं. कुलदिपने ह्या सगळ्या गदारोळात मस्त बॉलिंग केली. जेव्हा न्युझिलंड ‘प्रत्येक ओव्हरमधे एक बाउंड्री’ ह्या रेट ने खेळत होते तेव्हा त्याने ओळीत २-३ ओव्हर्स बाऊंड्री-लेस टाकल्या.

आज बुमराह आणि सिराजचा पहिला स्पेल चालू असताना, त्यांचा २००३ च्या फायनलमधला झहिर खान होतोय की काय असं वाटलं!! नशिब ती भिती खरी ठरली नाही.

"त्यांचा २००३ च्या फायनलमधला झहिर खान होतोय की काय असं वाटलं!!" - नको रे त्या भयाण आठवणी!! त्या मॅच नंतर अक्षरशः सुतक पाळलं होतं.

त्यावेळी मला वाटतं पहिल्या ओवर पासूनच नो बॉलचं सत्र सुरु झालं होतं. खरं आहे, सुतक परफेक्ट शब्द आहे. किती दिवस त्यातून बाहेर पडता येत नव्हतं.

पण मग २००७ मध्ये टि २० वर्ल्ड कप मध्ये नवीन जोम आणि अ‍ॅटिट्युड नी एंट्री घेतली. फार फार एंजॉय केला! फायनलच्या दिवशी मला न्यु यॉर्क हून अ‍ॅम्ट्रॅक पकडायची होती, इतका उशिर झाला मला, ऑल्मोस्ट सुटलीच होती ट्रेन! Happy

“ त्यावेळी मला वाटतं पहिल्या ओवर पासूनच नो बॉलचं सत्र सुरु झालं होतं.” - हो बुवा, पहिलाच बॉल वाईड (डाऊन द लेग) होता, जी बाऊंड्री गेली (५ वाईड्स) आणि पहिल्या ओव्हर अखेरीस १५ रन्स झाले होते ऑस्ट्रेलियाचे - प्री-टी२० काळात फार मोठा आकडा होता तो. तिथून ती मॅच हातातून निसटतच गेली. Sad

<<<फिल्डिंग ढिल्ली होती आपली आज. आजिबात चालणार नाही.
सिराज ला कंट्रोल जमला पहिजे. स्कोअर मोठा होता म्हणून आणि शमी मुळे वाचलो.>>>
अनुमोदन.

रोहितने त्याला पुढे गोलंदाजी न देता, लगेच पुन्हा तेज गोलंदाजी दोन्ही बाजूंनी सुरू केली>>
त्याच्या ओव्हर चा कोटा संपला ना...

सिराज ची आऊट साईड ऑफ लाईन आपल्याला बुडवणार असं वाटायला लागलं होतं. वाईड जात होते, मोठे शॉट्स इझिली बसत होते अन् सेट बॅटर ना काही विशेष ट्रबल होताना दिसत नव्हती.

पण कुलदीप अन् शमी आले धाऊन

चिंटू, माझा खूप आवडता !!!! Wink

उगीच आलास कसोटी मालिकेत; किती शोभून दिसला असतास चिंटूच्या व्यंगचित्र मालिकेत !!!!20190115_202451_0_0.jpg

द.आफ्रिका खूप लवकर दोन विकेट्स गमावून बसलेत, व त्यात एक आहे डि कॉकची. !!! ऑसीज वरचढ वाटताहेत !

ऑस्ट्रेलिया एक length पकडून गोलंदाजी टाकतेय. आणि ती बिघडवायला काही प्रयत्न आफ्रिका करत नाहीये.
पण ठिक आहे. त्यांचा गेम प्लान तसाच असतो. त्यांच्यात मारणारे नंतर आहेत. बघूया आज सक्सेस मिळते का. सध्या तरी दडपणात आहेत.

फायनलला आफ्रिका असो व ऑस्ट्रेलिया.. आपल्याला दोन्ही सारखे.. दोन्हीत आपणच जिंकणार.. तरी चिदक्या ऑस्ट्रेलियाला हरवण्याची मजा जास्त येते.. पण तरी आज मन आफ्रिकेसोबत राहील.. जसे न्यूट्रल सामन्यात नेहमीच राहते..

तर आज आफ्रिका जिंकली तर आफ्रिकेसाठी आनंद होईल.. ऑस्ट्रेलिया जिंकली तर फायनलला ऑस्ट्रेलियाला धूळ चारता येईल या विचाराने आनंद होईल..

आफ्रिका २४-४

सहा ओवर स्टार्कने टाकल्या
सहा हेजलवूड
दोघांनी २-२ विकेट काढत
१२ व्या ओवर मध्ये २४ ला ४ केले..
आणि आता स्टार्क सातवी टाकत आहे...

गेम आहे
कधीही पालटू शकतो
मिलर आणि कलासेन आहेत.
मिलर मेंटली टफ आहे. कलासेंन मारू शकतो. शेपूट खेळणारे आहे. सेमी आहे. मजा यायला हवी.. चिअर करा आफ्रिकेला.. इथून जिंकले तर जास्त मजा येईल

४४ -४ ! पाऊस !!
कम ऑन, द. आफ्रिका ! यू कॅन डू इट !! ' चोकर्स' ही अंधश्रद्धा आहे !!!

४४ -४ ! पाऊस !!
कम ऑन, द. आफ्रिका ! यू कॅन डू इट !! ' चोकर्स' ही अंधश्रद्धा आहे !!!

जसे ४ विकेट पडताच आपल्या डोक्यात त्यांची चोकर्सा इमेज येऊ लागली तशी ती खेळाडूंच्या डोक्यात सुद्धा आली असेलच..
मेंटल गेम आहे. हे अतिरिक्त प्रेशर झेलता यायला हवे.

५० ची पार्टनरशिप
स्कोअर झाला तर गेम बघायला मजा येईल..
आफ्रिका जर का इथून हा गेम जिंकून फायनलला आली तर मात्र ते मेंटली सुद्धा टफ असतील..

46.2 मधे 191/8

मिलर ची सेंच्युरी होऊ दे...
पूर्ण 50 ओव्हर खेळून काढूदेत...

झाली सेंच्युरी.
२१२ सर्व बाद (४९.४)
ऑस्ट्रेलिया जिंकणार सहज.

स्कोअर तर कमी आहे. पण निदान अगदीच बाद होताहेत की काय असे झाले नाही.
मार्को यांसंन आणि महाराजा यांनी जे फलंदाजीत केले नाही ते आता गोलंदाजीत करावे लागेल.
वरती विकेट काढूनच आता हा सामना जिंकला येईल. जायला हव्यात मजा येईल.

मॅक्सवेलची इनिंग यायच्या आधी अफगाणंने यांची ९१-७ अधी हालत केली होती.
आफ्रिकाने स्वतः देखील लीग सामन्यात यांच्या विकेट काढल्या होत्या. 70 ला ६ हालत केलेली..
फरक इतकाच की तेव्हा स्कोरबोर्ड प्रेशर होते. जे आज टारगेट कमी असताना नसेल.
पण त्या जागी सेमीचे प्रेशर असेल..

Pages