Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शमी दुसरी विकेट..
शमी दुसरी विकेट..
या शमीला वेगळा बॉल देतात वाटतं
430-440 आरामात झाले असते.
430-440 आरामात झाले असते. कोहलीने वाट लावली हळू खेळून.>>>>>
आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही राव>>>> माझे सगळे अंदाज बरोबर असतात प्लस मी सत्य काय तेच बोलतो त्यामुळे लोकांना ते कडू लागतं. त्यामुळे माझ्या कमेंटवर शक्यतो कोणी काय बोलत नाही पण माझ्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असतात.
न्यूझिलंडने ८ एक्स्ट्राज
न्यूझिलंडने ८ एक्स्ट्राज दिल्या. भारताने पहिल्या १५ ओव्हर्समधे च २१!!
विकेट्स हव्या आहेत. हे दोघं, लॅथम, चॅपमन, फिलिप्स, सँटनर - न्युझिलंडच्या बॅटिंगला डेप्थ आहे.
दोन तीन फोटो फार मस्त आहेत.
दोन तीन फोटो फार मस्त आहेत. सचिन शेवटच्या गेम मधे तो जिना चढतानाचा फोटो आणि आता विराट तेथूनच वर जातानाचा फोटो. शतक झाल्यावर सचिनकडे केलेली Bow ची अॅक्शन. २०११ च्या फायनल मधे सचिन आउट झाल्यावर परतताना विराट बॅटिंगला चालला होता तेव्हाचा एकत्र फोटो देउन "बॅटन पास" करण्याबद्दलची कॉमेन्ट ई.
काय उगाच ओवर थ्रो केला
काय उगाच ओवर थ्रो केला जडेजाने..
फालतू रन वाटप चालू आहे.
* न्युझिलंडच्या बॅटिंगला
* न्युझिलंडच्या बॅटिंगला डेप्थ आहे.* - 100% सहमत. मला वाटतं रोहित अँड कं. सुद्धा हे जाणून आहे व खेळात जराही शिथिलता येवू देणार नाहीं. पण, किविजने खरंच जर एवढा मोठा स्कोअर, एवढ्या दडपणाखाली व एवढ्या चांगल्या बहरात असलेल्या आपल्या गोलंदाजी विरुद्ध पार केला, तर निश्चितपणे फायनलला जाण्यासाठी ते लायक ठरतात !
सेमी ला जिंकणारी प्रत्येक टीम
सेमी ला जिंकणारी प्रत्येक टीम फायनलला जाण्यासाठी लायक आहे.
फुरोगामीजी बघताय ना मॅच.
फुरोगामीजी बघताय ना मॅच.
शामीने कप टाकला.
शामीने कप टाकला.
"खेळात जराही शिथिलता येवू
"खेळात जराही शिथिलता येवू देणार नाहीं. " - इंडिया प्रेशरखाली खेळतीय. कितीतरी मिसफिल्ड्स, आत्ताचा ड्रॉप्प्ड कॅच, जडेजाचा ओव्हथ्रो - ही लक्षणं चांगली नाहीयेत.
फुरोगामीजी बघताय ना मॅच.>>>>>
फुरोगामीजी बघताय ना मॅच.>>>>>>>
आज शिव्यांचा धनी विराट होण्याची शक्यता आहे ....
शमीने कप टाकला
शमीने कप टाकला
>>>>
आमच्या ग्रुपवर सुद्धा लगेच दोघांनी सेम कॉमेंट टाकलेली.
त्यावर मी म्हटले होते अजून बराच सामना बाकी आहे. इतक्यातच का हा डायलॉग..
बाई दवे.
हर्षल गिब्स मुळे हा डायलॉग फार फेमस झाला आहे
५१ बॉल मध्ये १११ रन पाहिजेत.
५१ बॉल मध्ये १११ रन पाहिजेत न्यूझीलंडला. जिंकणार आपण सहज.
फिल्डिंग ढिल्ली होती आपली आज.
फिल्डिंग ढिल्ली होती आपली आज. आजिबात चालणार नाही.
सिराज ला कंट्रोल जमला पहिजे. स्कोअर मोठा होता म्हणून आणि शमी मुळे वाचलो.
फायनली! बुम्राह स्ट्राईक्स! स्लोअर वाईड यॉर्कर.
हो ओवर कॉन्फिडन्स मधे गेले
हो ओवर कॉन्फिडन्स मधे गेले काय की. असली फिल्डिंग फायनल ला फार फार महागत जाईल. चला, पण अल्मोस्ट देअर!!
फुल्ल टेन्शन !
फुल्ल टेन्शन !
काय होतंय कोणास ठाऊक ?
उद्या तुम्हाला वाटेल सामना
उद्या तुम्हाला वाटेल सामना हारलो पण एक खेळाडू असा काय खेळेल की सामना सिंगल handed आपल्या बाजूला फिरेल.
Submitted by बोकलत on 14 November, 2023 - 23:14>>>> याला म्हणतात प्रेडिक्षन. चीते की चाल, बाझ की नजर आणि बोकलत का क्रिकेट ज्ञान
चांगलीच खेळतेय nz
चांगलीच खेळतेय nz
मोठा score आहे म्हणून जिंकतोय.
आज मॉम शमी!
आज मॉम शमी!
जिंकलो एकदाचे. आता अजून एकदा
जिंकलो एकदाचे. आता अजून एकदा जिंकलो की झाले.
बोकलत, तुमचे क्रिकेट ज्ञान आणि mind reading अफलातून आहे.
हो आता पुढची match रविवारी,
हो आता पुढची match रविवारी, ऑस्ट्रेलिया सोबत
कप इथेच राहणार आहे.
सीमा पार नाही जाणार.
Yaaaay ! जिंकलो. लय भारी मॅच!
Yaaaay ! जिंकलो. लय भारी मॅच!
शामी ७ विकेट्स. शमी आणि कोहलीला विभागून man ऑफ द मॅच द्यायला पाहिजे.
<< आता पुढची match रविवारी,
<< आता पुढची match रविवारी, ऑस्ट्रेलिया सोबत >>
रेसिस्ट ऑस्ट्रेलिया उद्याच हरावे अशी इच्छा आहे. पाकिस्तान, मग इंग्लंड आणि मग ऑस्ट्रेलिया हरले की फार फार आनंद होतो मला.
उद्या तुम्हाला वाटेल सामना
उद्या तुम्हाला वाटेल सामना हारलो पण एक खेळाडू असा काय खेळेल की सामना सिंगल handed आपल्या बाजूला फिरेल.
Submitted by बोकलत on 14 November, 2023 - 23:14>>>> याला म्हणतात प्रेडिक्षन. चीते की चाल, बाझ की नजर आणि बोकलत का क्रिकेट ज्ञान
Submitted by बोकलत on 15 November, 2023 - 11:41 >>>>>>>>
क्या बात है बोकलत साहेब !
काय प्रिडिक्शन केले होते .
हाता सरशी उद्या बँक निफ्टी मध्ये pe घेवू का ce ते पण सांगा ना
स्कोअरकार्ड बघून ३० व्या
स्कोअरकार्ड बघून ३० व्या ओव्हरपर्यंत मॅच किती क्लोज होती हे कधीच कळू शकणार नाही. शामीच्या डबल स्ट्राईकने मॅच फिरवली.
स्कोअरकार्ड बघून ३० व्या
स्कोअरकार्ड बघून ३० व्या ओव्हरपर्यंत मॅच किती क्लोज होती हे कधीच कळू शकणार नाही. शामीच्या डबल स्ट्राईकने मॅच फिरवली. >> +१. शमीच्या सात विकेट्स पेक्षाही ३३-३७ मधल्या त्याच्विकेट्स)+ दोन विकेट्स), सिराज ची एक नि जाडेजाच्या दोन ह्या स्पेल मधे आपण मॅच जिंकली. तिथे प्रेशर तयार झाले नि मोमेंटम बदलला. शर्माची जडेजाची प्लेसमेंट खतरनाक होती. लाँग ऑन नि डीप फाईन लेग वर टाकून क्रूशीयल विकेट्स उचलल्या.
आज सहावा बॉलर हवा होता असे किती वेळा वाटून गेले
सँटनर चे आजचे आकडे बघितले कि 'अबब' होते. त्याने श्रेयस समोर पस्तीस ओव्हर्स नंतर मेडन टाकली आहे हे खतरनाक आहे. श्रेयस चे पण डोके थंड ठेवून खेळल्याबद्दल कौतुक करायला हवे. राहुल चे रीव्ह्यू घेणे न घेणे एकदम स्पॉट ऑन होते. एव्हढ्या गदारोळामधे त्याला नक्की काय निक झालेय हे ऐकायला येत होते ह्याची कमाल आहे. कोहलीच्या फिटनेस बद्दल काय अजून नवीन बोलणार. एव्हढी धावाधाव करून झाल्यावर दोन मुलांचा बाप असलेला कोहली फिल्डींगला हजर होता. ( गिल सारखा तरुण पोरगा क्रँप्ड झाला.) कोहली - गिल च्या पार्टनरशिप मधे गिल ने सुरूवातीला मस्त टेंपो पिकप केला होता - ज्याने कोहलीला ब्रीदर मिळाला. आज चुका झाल्या हे बरे झाले. जास्त परफेक्ट मॅचेस झाले कि उगाच टेंशन येते पुढच्या मॅचेस मधे
महत्त्वाचा सामना निघाला
महत्त्वाचा सामना निघाला मित्रांनो
आधी म्हटल्या प्रमाणे मला फायनल पेक्षा सेमी फायनलचीच जास्त भीती होती.
एक म्हणजे गेले दोन वर्ल्ड कप आपण सेमी मध्ये हरतोय.
दुसरे म्हणजे गेले काही आयसीसी स्पर्धात महत्त्वाच्या सामन्यात न्युझीलँड आपल्याला नडतेय.
नाही म्हटले तरी कुठेतरी हे खेळाडूंच्या सुद्धा डोक्यात येतेच, आणि त्याने एक्स्ट्रा प्रेशर येते ज्यात चोक होण्याची शक्यता राहते..
आता वर्ल्डकप आपलाच आहे !
आज दुसऱ्या डावात ज्या काही चुका झाल्या त्या वर उल्लेखलेल्या कारणामुळेच झाल्या. फायनलला या करत नाही आता आपण...
शर्माची जडेजाची प्लेसमेंट
शर्माची जडेजाची प्लेसमेंट खतरनाक होती. लाँग ऑन नि डीप फाईन लेग वर टाकून क्रूशीयल विकेट्स उचलल्या.
>>>>
+७८६
एकाने आमच्या ग्रूपवर अशी पोस्ट टाकली होती की
बॉल जडेजा आहे तिकडेच कसा जातोय
त्यालाही मी तेव्हा म्हटलेले
कारण तो आपला बेस्ट फिल्डर आहे. जो प्लान केला असतो विकेट घ्यायचा तिथे त्याला उभे केले असते.
दुसरा जो ड्रिंक ब्रेक होता
दुसरा जो ड्रिंक ब्रेक होता तिथे बहुधा शर्माने चक दे स्टाईल सर्वांना सांगितले असेल की मित्रांनो इथवर आपल्या टीममधील प्रत्येक प्लेअर आपल्या आयुष्यातील बेस्ट क्रिकेट खेळत आलाय. तर आता थोडक्यासाठी मोक्याच्या क्षणी चाहत्यांना धोका का देत आहोत..
तिथून जडेजाने एक टाईट ओवर टाकली आणि मग शमीला आणून डबल ब्रेक. त्यानंतर आपण गेममध्ये पुढेच राहिलो.
दुसरा जो ड्रिंक ब्रेक होता
Double post
नंतर इथे काहीतरी दुसरे टाकतो
Pages