क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मी त्या दिवशी स्वतःच तर म्हणालो.
माझा पहिला पानावरचा अंदाजच चुकला.
इंग्लंड वन ऑफ द फेवरेट वाटत होती ती तळाला राहिली.
म्हणून तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
हेच तर तुम्हाला इतके दिवस समजवत आहे की माझे अंदाज बरोबर आले म्हणून दुखी येऊ नका. किंवा चुकले म्हणून खुश होऊ नका. मला दोन्हीt मजा येते. अंदाज मांडायचे आणि चूक की बरोबर येताना बघायचे Happy

बाई दवे,
एक अंदाज मी कोहली कर्णधार असल्यापासून मांडत आहे
आणि तो म्हणजे शर्माला कर्णधार करा, वर्ल्ड कप तोच आणणार
तो अंदाज बरोबर आल्यावर मात्र जरूर खुश व्हा Happy

हेच तर तुम्हाला इतके दिवस समजवत आहे की माझे अंदाज बरोबर आले म्हणून दुखी येऊ नका. किंवा चुकले म्हणून खुश होऊ नका. मला दोन्हीt मजा येते. अंदाज मांडायचे आणि चूक की बरोबर येताना बघायचे>>>>>> भौ, तू आम्हाला काही समजवू नकोस. आम्ही किंवा मी, हा शुद्धा यंटमपणा आहे हे दाखवत आहोत. आनंदी किंवा दुखी आजिबात होत नाहीये कोणीच, गैरसमज नसावा Proud
म्हणजे कन्सिस्टंटली अंदाज असे काही बरोबर येतच नाहीयेत कारण की बरेच स्टेटमेंट्स ओपन एंडेड असतात. पण तरीही हा पण अंदाज बरोबर, तो पण अंदाज बरोबर हे सारखं सारखं लिहित एक स्वयंभू स्वयंपीळ असं अस्तित्व इथे मेन्टेन करत राहाणे हा मेन मुडदा... सॉरी.. मुद्दा आहे हे स्पष्ट आहे.

वर्ल्ड कप तोच आणणार
तो अंदाज बरोबर आल्यावर मात्र जरूर खुश व्हा Happy
>>
वर्ल्डकप आल्यावर नक्की खूश होऊ
पण वर्ल्डकप कुणा एकट्या मुळे येत नाही, पूर्ण टीम (सपोर्ट स्टाफ सकट) च्या प्रयत्नांमुळे येतो हे सत्य तू किती दिवस नाकारणार???

फक्त कॅप्टन मुळे वर्ल्डकप आणता येत असता तर ८३ चा लॉईड नी / ८७ चा कपिल नी / ९२ चा बॉर्डर नी / ९९ चा रणतुंगा नी / ११ चा पाँटिंग नी / १५ चा धोनी नी जिंकून आणला असता...
A captain is only as good as the team...

मी कुठे म्हणालो की कप्तानच एकटा जिंकवून देतो.
पण एखाद्या चांगल्या टीमकडे कप्तान किंवा लीडर जर त्यात तोडीचा नसेल तर ते देखील जिंकायला कमी पडतात.

A captain is only as good as the team...
हे सुद्धा त्याच न्यायाने एकतर्फी वाक्य झाले.
कप्तान कोणीही असला तर चालतो असे म्हणायचे आहे का तुम्हाला? क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण नसते. डावपेच त्याहून जास्त महत्वाचे असतात.

आणि ही, विश्वचषक जिंकणारे कप्तान केवळ कप्तान नसतात तर लीडर असतात हा आजवरचा इतिहास आहे.
वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया यांचे वर्ल्डकप जिंकलेले कर्णधार लॉईड, स्टीव्ह वॉ, पाँटिंग वगैरे बलाढ्य संघ घेऊन होते ते सोडा हवे तर.., पण भारत, पाक, लंका यांनाही फेवरेट नसताना विश्वचषक मिळवून देणारे कपिल, इम्रान, रणतुंगा, धोनी यांच्या सारखे लीडर होते.

हार जीत खेळाचा भाग आहे.
पण कप्तान काही कामाचा नसतो असे तरी म्हणू नका.

आपल्याकडे लोकं एखाद्या केन विल्यमसनच्या कप्तानीचे कौतुक करतील. पण तेच आपल्या शर्मा धोनीचे करणे अवघड..

त्यामुळे शर्माने एका गोष्ट कायम लक्षात ठेवावी, केवळ एक वाईट गेम आणि लोकं तो कसा वाईट कर्णधार आहे हे दाखवायला धडपडतील...
इथले कोणी धडपडतील असे म्हणायचे नाहीये. पण ईन जनरल सोशल मीडिया पेटून उठेल.

फक्त कॅप्टन मुळे वर्ल्डकप आणता येत असता तर ८३ चा लॉईड नी / ८७ चा कपिल नी / ९२ चा बॉर्डर नी / ९९ चा रणतुंगा नी / ११ चा पाँटिंग नी / १५ चा धोनी नी जिंकून आणला असता..
>>>>>

या सर्वांनी वर्ल्डकप मिळवला आहे. दरवेळी यांनीच मिळवायचा तर ते कसे शक्य आहे? वर्ल्डकप एकच असतो ना.. यातले एकापेक्षा जास्त कर्णधार एकाच वेळी खेळत असताना दोघे कसे मिळवणार Happy

मुळात कर्णधार चांगला असणे किती महत्त्वाचा असतो हा मुद्दा आहे.
तो सिद्ध करायला त्याने वर्ल्डकप दर वेळी शंभर टक्के मिळवायलाच पाहिजे हा हट्ट कशाला Happy

“ त्यामुळे शर्माने एका गोष्ट कायम लक्षात ठेवावी” - कळवून टाक त्याला. उगाच त्याला माहित नसल्यामुळे बिचार्याचं नुकसान व्हायचं Happy

“ आपल्याकडे लोकं एखाद्या केन विल्यमसनच्या कप्तानीचे कौतुक करतील. पण तेच आपल्या शर्मा धोनीचे करणे अवघड..” - ट्च्क ट्च्क!! काय ही दळभद्री मानसिकता!! आज अलम दुनियेत, धोनी-शर्माला एकमेव खंबीर आधार उरलेला आहे. रोज मायबोलीवर येऊन ह्या आधारवडाची चार फळं खाऊन तगलेत बिचारे कसेबसे. नाहीतर आत्तापर्यंत नैराश्याच्या गर्तेत कोसळले असते. Happy Happy

अरे बाळा, कोण जिंकणार/हरणार हे तुझं भाकीत जितकं खरं ठरतं, तितकंच तुला क्रिकेट कळतच नाहीं असं ठरतं ! कारण, मुळातच Cricket is a game of glorious uncetainties !!20190124_232828_0.jpg

भाऊ लई भारी...

या सर्वांनी वर्ल्डकप मिळवला आहे. दरवेळी यांनीच मिळवायचा तर ते कसे शक्य आहे? वर्ल्डकप एकच असतो ना..
>>
तुला खरंच मुद्दा काळाला नाहीये का कळून पेडगावला जातो आहेस?
तुझ्या म्हणण्या नुसार फक्त कप्तान कोण यावर वर्ल्डकप विजेता ठरत असता (कारण तू टीम ला श्रेय कुठेच दिल नाही आहेस, केवळ शर्मा कप्तान झाला की वर्ल्डकप येणार असं तुझ म्हणणं आहे) तर वरच्या लिस्ट मधल्या प्रत्येकानी किमान एकदा वर्ल्डकप जिंकला असल्याने काप्तानीत पुढचा वर्ल्डकप जिंकायला काही हरकत नव्हती. पण टीम वेगळी असल्याने पुढचा वर्ल्डकप नाही जिंकता आला. त्यामुळे मी म्हणालो की a captain is only as good as the team. कारण शेवटी कप्तानही संघाचाच भाग आहे.
त्यामुळे वर्ल्डकप आला तर संघामुळे येईल, कुणा एकट्या दुकट्या मुळे नाही.
पण तुझ्यातला कट्टर व्यक्तीपूजक तुला हे मान्य करू देणार नाही. त्यामुळे तू व्यक्तिगत स्पेस मधे तुझ शर्मा पंत धोनी शाहरुख स्वप्नील सई यांची गाणी जपणं चालू ठेव. तुझी दुनिया त्यामुळेच चालू आहे हा समाज ठाम असूदे.

तुझ्या म्हणण्या नुसार फक्त कप्तान कोण यावर वर्ल्डकप विजेता ठरत असता
>>>>

पुढची पोस्ट वाचलीच नाही
यातला फक्त हा जबरदस्ती माझ्या तोंडात टाकाल तर कसे होईल
Happy

तुझ्या म्हणण्या नुसार फक्त कप्तान कोण यावर वर्ल्डकप विजेता ठरत असता
>>>>

पुढची पोस्ट वाचलीच नाही
यातला फक्त हा जबरदस्ती माझ्या तोंडात टाकाल तर कसे होईल
Happy

picture speaks a thousand words
जे चार दिवस इथे सांगतोय ते भाऊंचे चित्र बघून समजेल आणि लोक माझ्या अंदाजांच्या पोस्टचे लोड घेणार नाही अशी आशा करतो Happy

Breaking News
Sri Lanka Cricket's (SLC) membership of the International Cricket Council (ICC) has been suspended with immediate effect for government interference

माझे मायबोलीवर शर्मा, धोनी, पंत, सचिन आणि कोहली या पाच क्रिकेटरवर कौतुकाचे फॅन क्लब टाईप धागे आहेत.
पंतवरचा धागा त्याच्या गाब्बा इनिंगच्या सुद्धा आधी होता. त्यानंतर तो चमकला.
तसेच शर्मावरचा धागा त्याच्या कसोटी पदार्पणाच्या दिवशी होता.
त्यानंतर पंत ने काही अजरामर इनिंग खेळल्या आहेत आणि शर्मा तर आज लिजेंड झाला आहे.
जेव्हा कोणाचा फारसा विश्वास नव्हता तेव्हा पासून मी यांच्यातील स्पेशल टॅलेंटचा चाहता आहे आणि त्यांनी त्याला पुरेपूर न्याय दिला हे विशेष सुखावते.

आता माझ्या कोणी आवडीचे खेळाडू असतील तर मी न लाजता न संकोचता त्यांचे कौतुक करतो. आता ती कोणाला व्यक्तीपूजा वाटत असेल तर समजा खुशाल.
लोकांच्या भीतीने मला माझी आवड लपावायची गरज वाटत नाही Happy

*माझे मायबोलीवर शर्मा, धोनी, पंत, सचिन आणि कोहली या पाच क्रिकेटरवर कौतुकाचे फॅन क्लब टाईप धागे आहेत * -

अरे, क्रिकेटमध्ये मोठ्ठं व्हायला आता खेळाडूच्या पत्रिकेतला गुरू नाही, माबोतला 'ऋ ' बळकट असावा लागतो !!20210119_225628_4.jpg

इंग्लंड 289- 4 ( 45 षटक) !! अल बिदा, पाक !!

भाऊ Lol

एक अंदाज मी कोहली कर्णधार असल्यापासून मांडत आहे
आणि तो म्हणजे शर्माला कर्णधार करा, वर्ल्ड कप तोच आणणार
>>
फक्त हा शब्द वापरला नाहीस
पण वरच्या तुझ्या पोस्ट मधे इतर कुणाचा / संघाचा उल्लेख तरी आहे का? शिवाय तू म्हणतोस की तोच वर्ल्डकप आणणार म्हणजे संघातल्या बाकीच्यांचे महत्व 0 का? की शर्मा नसता तर त्यांना वर्ल्डकप आणायला जमणार नाही?? डायरेक्ट लिहिलं नाहियेस, पण अर्थ तोच निघतो ना...

नुकतेच एका ग्रूप वर ही पोस्ट टाकून आलों. तिथले मेंबर ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म बघून उगाच टेन्शन घेऊ लागलेले..
>>>>

आपण जे जवळपास प्रत्येक सामन्यात करत आहोत ते ऑस्ट्रेलिया आफ्रिका यांनी दोन चार सामन्यात केले तर लगेच इतके टेन्शन घ्यायची काय गरज?
त्या स्ट्राँग टीम आहेतच. त्यांच्या दिवसाला खेळणारच. पण आपण सुद्धा नेक्स्ट लेवल क्रिकेट खेळत आहोत. आपल्या संघावरचा विश्वास डळमळीत का करता?
उलट आता स्पर्धेत रंगत भरली आहे. आता त्यांना हरवायला मजा येईल Happy

तोच वर्ल्डकप आणणार म्हणजे संघातल्या बाकीच्यांचे महत्व 0 का?
>>>>
शर्माला कर्णधार करा, वर्ल्डकप तोच आणणार, याचा अर्थ कर्णधार म्हणून या अकरात तोच योग्य आहे. बाकीचे आपापली भूमिका बजावण्यात सरस आहेतच की. आणि ते बजावत सुद्धा आहेत. असो. मला वाटते माझ्यावतीने मी क्लिअर केले आहे.

दिवाळीचे काही फटाके खास फायनल साठी राखून ठेवले आहेत. ते तुळशीच्या लग्नाला वाजवायची वेळ येऊ नये Happy

भारत 360 - 3 (४७ षटक ). वि. नेदरलँड !
बहुतेक, एकंदर फॉर्म बघता, तुळशीच्या लग्नासाठी घरात व बाजारात फटकेच उरणार नाहीत; निदान, तशी प्रार्थना तर आहे !! Wink

भारताने वर्ल्ड कपमधेच नव्हे तर इन जनरल सुद्दा पहिल्यांदाच ९ सामने सलग जिंकले असावेत. वर्ल्ड कप मधे २००३ साली ८ जिंकले होते. आता आपण कप जिंकलो तर ११ सलग विजय होतील. ऑस्ट्रेलियाचे बहुधा दोन वेळा ११ चे रेकॉर्ड आहे. २००३ आणि २००७.

स्टॅट्स बघितली तर हे वरचे नंबर्स एकाच कप मधले आहेत. एकापेक्षा जास्त कपमधली धरली तर ऑस्ट्रेलियाने २७ सलग जिंकले आहेत सामने!
https://en.wikipedia.org/wiki/List_of_Cricket_World_Cup_records

आपले बॅट्समन अज्जिबातच बॉलिंग करत नाहीत अशी तक्रार होती ना आपल्या सगळ्यांची..... घ्या! आता बॉलिंग पण केली आणि विकेट्स पण काढल्या Happy

Pages