Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आठवा सामना जिंकलो तेव्हा एक
आठवा सामना जिंकलो तेव्हा एक पोस्ट वाचलेली की दादा आणि शर्मा हे दोन भारतीय कर्णधार विश्वचषकात सलग आठ सामने जिंकले आहेत. त्यावर मी हाच रिप्लाय दिला होता की शर्मा सलग अकरा जिंकणार
ऋ
ऋ
तुम्ही म्हणताय तसंच होऊ देत.
छोडो कलकी बातें, कलकी बात
छोडो कलकी बातें, कलकी बात पुरानी

नई उमंगे, नई जिंदगी....हम हिंदुस्तानी !!.
ह्या स्पर्धेत भारताचा प्रत्येक खेळाडू आपली वैयक्तिक व सांघिक कामगिरी इतक्या उत्तम रीतीने व सातत्याने
पार पाडतो आहे, ' फॉर्म ' देखील संघाबरोबर हंसतमुखाने वावरतोय. त्यामुळे, मागचा विचार न करतां, पुढचे दोन ,
होय दोन, सामने जिंकण्यासाठी आपण मुख्य दावेदार आहोत ह्या भावनेनेच त्या सामन्यांवर मी तरी लक्ष केंद्रित करणार आहे. आकडेवारीत हे सामने कसे बसतील, हे सामने झाल्यावर बघू !
शुभेच्छा, भारत. !!!!!
घ्या! आता बॉलिंग पण केली आणि
घ्या! आता बॉलिंग पण केली आणि विकेट्स पण काढल्या...
>>
वास्तविक ते गृहस्थ मावशीच्या शेजारी राहणारे वगैरे आजिबात दिसत नव्हते. पण पत्ता विचारायचा म्हणून नाही या तत्वाला मुरड घालायची होती
शुभेच्छा, भारत. !!!!! >> +७८६
शुभेच्छा, भारत. !!!!!
>>
+७८६
*Records of Rohit Sharma
*Records of Rohit Sharma today:*
- First player to score 500+ runs in back to back World Cups
- Most sixes in a calendar year in ODIs
- Most sixes in a World Cup edition as a captain
- Most fours in a World Cup edition as a captain
- Most runs as an Indian captain in single World Cup edition
- First Indian captain to score 500 runs in a single World Cup edition
- Most sixes in a single venue in ODI
धन्य धन्य तो रोहित शर्मा.
धन्य धन्य तो रोहित शर्मा. एव्हढे पराक्रम केले म्हणजे तो नक्कीच ४ मीटर उंच नि ३०० किलो वजनाचा असावा.
येवढ्या सगळ्या मॅचेस अगदी
येवढ्या सगळ्या मॅचेस अगदी दमदारपणे जिंकल्या. फॉर्म टॉप आहे आपला. पण शेवटी अजून दोन जिंकाव्याच लागतील. After all, it's a new day and a new match. मी आशा करतो की आपले बॅट्समन आणि बोलर्स त्याच जोमानी खेळतील आणि कुठल्याही कारणानी धीर सोडणार नाहीत. प्रत्येक क्षण प्रयत्न करत राहणे हेच महत्वाचे. ऐय्यर आणि राहुल अगदी मौक्याच्या वेळी रेडी झालेत असं वाटतय पण शेवटी बॉलिंग अटॅक नेदरलंड्सचा होता.
अजून एक मुद्दा म्हणजे वानखेडेचं पीच. फार बेभरवशी वाटलं मला. रोहित फसला त्या दिवशी पण गिल, कोहली आणि नंतर ऐय्यर नी सॉलिड बिल्ड केली इनिंग. पीच बेकार असलं तरी शेवटी प्लेयर लोकांच्या स्कील, प्रसंगानुरुप शॉट सिलेक्शन आणि नंतर बॉलर लोकांनी केलेले वेगवेगळे प्रयत्न (वरायटी) ह्या गोष्टींनी सगळ्यावर मात केली आणि आपण जिंकलो.
*..... सगळ्यावर मात केली आणि
*..... सगळ्यावर मात केली आणि आपण जिंकलो.* - गेल्या 9 सामन्यात थोड्या फार फरकाने असंच झालं व पुढच्या दोन सामन्यात तसंच होईल, ही शक्यताच अधिक -- क्रिकेटमध्ये 100% खात्री कशाचीच नसते, याचं भान असूनही. !!!
मुंबईत मॅचच्या तिकिटांचे बाजार भाव भलतेच वर जाताहेत, असं म्हणतात !
आधीच्या मॅचेसच्या रिझल्ट्स
आधीच्या मॅचेसच्या रिझल्ट्स आता अर्थ नसून पुढच्या दोन मॅचेस चे निकाल मह्त्वाचे आहेत. चुकूनही मे बेस्ट टीम विन वगैरे बोलायचा धीर नाहि. उगाच मांजरेकर व्हायला नको
आधीच्या मॅचेसच्या रिझल्ट्स
आधीच्या मॅचेसच्या रिझल्ट्स आता अर्थ नसून...
>>>>
हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा आयपीएल सारखे प्ले ऑफ असायला हवे असे वाटते
हो, भाऊ.
हो, भाऊ.
असामी
आपली धाकधूक, पाकपूक होणं सहाजिक आहे. पण शेवटी गेम आहे. काहीही झालं तरी इतके दिवस जे सातत्याने भारत जिंकत आला त्याचा सुद्धा आनंद आहेच. कप जिंकला तर मग काही विचारायलाच नको.
हा कप जिंकला की पुढचा दुसर्या देशात जाऊन जिंकायला पाहिजे. ते एक मोठं काम राहिलेलं आहे ८३ नंतर.
हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा
हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा आयपीएल सारखे प्ले ऑफ असायला हवे >> हो - कमीत कमी पहिल्या दोन संघांना त्याच्या आधीच्या फेरी मधल्या खेळीबद्दल काही तरी इंसेंटीव्ह मिळतो.
बुवा, बाद फेरी असली तरी एका वाईट दिवसावर कुठलाही संघ बाहेर जाणॅ अन फेअर वाटते. आयपील चा फॉर्मॅट पहिल्या दोन क्रमांकांवरील संघांना एक अधिक संधी देतो जो मस्त आहे.
अग्रीड असामी.
अग्रीड असामी.
"चुकूनही मे बेस्ट टीम विन
"चुकूनही मे बेस्ट टीम विन वगैरे बोलायचा धीर नाहि. उगाच मांजरेकर व्हायला नको" - 'मे द 'होस्ट' टीम विन' असं म्हणूया ह्या वेळी
'मे द 'होस्ट' टीम विन' >>
'मे द 'होस्ट' टीम विन' >> आमेन !
मे द 'होस्ट' टीम विन'
मे द 'होस्ट' टीम विन'
>>
2011. 2015, 2019 .. याचीच हॅट्रिक झाली आहे..
आता चौकार बसू दे..
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक चौकार आणि षटकार आपल्याच कर्णधाराचे असल्याने हे जमायला हरकत नाही
'मे द 'होस्ट' टीम विन' >>
'मे द 'होस्ट' टीम विन' >> आमेन ! >> +१
एक अवांतर. तसाही बुधवारपर्यंत वेळ काढायचाच आहे. पाकड्यांच्या मिसफिल्ड्स बघायला एक खत्रुट मजा येते. यूट्यूबने मला आशिया कपची क्लिप दाखवली. त्यात तो गिल चा दोन स्लिप्समधून निघून गेलेला कॅच होता
या कपमधेही त्यांचे अफलातून मिसफिल्ड्स आहेत. बाउण्ड्रीच्या आधी थांबवलेल्या बॉलवर नंतर बॅलन्स गेल्याने बाउण्ड्रीचा तो फोम पायाने लाथाडून येणे हे एक धमाल होते
व्हिलेज क्रिकेट म्हणून क्लिप्स असतात. त्यात हौशी खेळाडूंच्या मिसफिल्ड्स, विनोदी पध्दतीने आउट होणे वगैरे प्रकार असतात. म्हणजे बाउण्ड्रीला बॉल अडवल्यावर एक फिल्डर खाली पडतो. अजूनही तो आतच असतो. पण बॉल फेकताना त्याच्याच पायावर आपटून रिबाउण्ड होउन तो बॉल बाउण्ड्रीच्या बाहेर जातो - असले प्रकार (क्लिप सापडली
). पाकडे ऑल्मोस्ट त्या लेव्हला गेले आहेत.
“ पण बॉल फेकताना त्याच्याच
“ पण बॉल फेकताना त्याच्याच पायावर आपटून रिबाउण्ड होउन तो बॉल बाउण्ड्रीच्या बाहेर जातो” - क्लिप बघितली. तो टोटल प्रकारच सुपरलोल आहे.
*आयपील चा फॉर्मॅट पहिल्या दोन
*
*आयपील चा फॉर्मॅट पहिल्या दोन
*आयपील चा फॉर्मॅट पहिल्या दोन क्रमांकांवरील संघांना एक अधिक संधी देतो जो मस्त आहे.* +१ मस्त व रास्त !!!
वानखेडेवर जा, पण खांबाआडची सीट पकड ! माबोवरचं कौतुक वाचून तो रोहित आणखीनच वेड्यासारखा स्टेडियममध्ये सिक्सर मारत सुटणार आहे !!
भाऊ
भाऊ
वानखेडेवर आपण चेस करावे की डीफेंड?
अंडर लाईट नवीन बॉल जास्त स्विंग होतो. फलंदाजी अवघडं. पण नंतर दव पडले की गोलंदाजी अवघड.
अश्यात चेस करून सुरुवातीला मिळणाऱ्या स्विंगवर आपली टॉप ऑर्डर धोक्यात घालावी का? कोसळले तर आपली फलंदाजी डेप्थ जास्त नाही. नंतर फलंदाजी सोपी झाली तरी फायदा उचलायला मागे विकेट हातात हव्यात..
*वानखेडेवर आपण चेस करावे की
*वानखेडेवर आपण चेस करावे की डीफेंड?* - लाईट व दंव तर असणारच आणि त्याचे फायदे - तोटे फसवे , अनपेक्षित असू शकतात. सध्या फलंदाजी पूर्ण बहरात आहे म्हणून प्रथम फलंदाजी घेवून मोठ्ठा स्कोअर करणं व किविजवर कांहींसं दडपण आणण , याला रोहित प्राधान्य देईल असं वाटतं. पण, टॉसला जाताना मात्र तो बहूतेक " It's a good toss to lose" असं गुणगुणतच जाईल, ही दाट शक्यता आहेच !
It's a good toss to lose
It's a good toss to lose
>>>>>>
रोहितला किंवा आपल्या थिंकटॅंकला कदाचित अंदाज असेल जिंकल्यावर काय घ्यावे...
पण नसल्यास टॉस हरलेलोच बरे म्हणत असतील.
म्हणजे निदान टॉस जिंकून जे निवडले आहे ते सार्थ ठरवायचे दडपण तरी नाही
पण बॉल फेकताना त्याच्याच
पण बॉल फेकताना त्याच्याच पायावर आपटून रिबाउण्ड होउन तो बॉल बाउण्ड्रीच्या बाहेर जातो>>>>>
आपल्या सिराजला पण आवरा कोणीतरी, परवा नेदरलंड्सच्या मॅच मध्ये समोरच्या ताटातलं अळूचं फदफद्याची फदफद दोन्ही हातांनी कंट्रोल करायला बघत असल्या सारखा कॅच पकडायला चालला होता. बॉल अगदी दोन्ही हातांच्या (तळव्यांच्या नाही) मध्यभागी पडला आणि हा स्वतः पण पडला.
आपल्या सिराजला पण आवरा
आपल्या सिराजला पण आवरा कोणीतरी, परवा नेदरलंड्सच्या मॅच मध्ये समोरच्या ताटातलं अळूचं फदफद्याची फदफद दोन्ही हातांनी कंट्रोल करायला बघत असल्या सारखा कॅच पकडायला चालला होता. >>>>>>
वानखेडेवर आपण चेस करावे की
वानखेडेवर आपण चेस करावे की डीफेंड? >> जे जे होते ते स्वस्थपणे बघावे हे उत्तम !!!
किवीज दर वेळी मोक्याच्या मॅचेस मधे डावपेचांमधे आपल्यावर मात करून गेलेले आहेत. ह्या वेळी त्याचे उट्टे काढलेले बघायला आवडेल. वानखेडेवर मॅच लवकर सुरू करायला हवी.
जे जे होते ते स्वस्थपणे बघावे
जे जे होते ते स्वस्थपणे बघावे हे उत्तम !!!>>>>> मी म्हणेन जे जे होते त्याला सामोरं जाऊन खंबीरपणे लढणे हेच उत्तर आहे आपल्या टीम करता.
किवीज दर वेळी मोक्याच्या मॅचेस मधे डावपेचांमधे आपल्यावर मात करून गेलेले आहेत.>>>>>> असेल पण धर्मशाळेत आपण क्लिनिकली मात केली त्यांच्यावर. माझी आत्ता पर्यंतची सर्वात फेवरेट मॅच होती. मिचेल आणि रविंद्र खेळून सुद्धा स्कोअर २७३ वर अडवला आपल्या बॉलर लोकांनी आणि मग कोहली, गिल आणि ऐय्यर सुटले!
Wonderful display of how to really stand up to a tough situation.
मी म्हणेन जे जे होते त्याला
मी म्हणेन जे जे होते त्याला सामोरं जाऊन खंबीरपणे लढणे हेच उत्तर आहे आपल्या टीम करता. >> बुवा मी आपल्यासाठी म्हणत होतो, टीम साठी नाही
तुम्ही "मोक्याच्या" वेळी हा शब्द विसरता आहात - किवी चिवट असले तरी बाय लटेरल सिरीज मधे विशेषतः भारतामधल्या - आपण नेहमीच बाजी मारत आलो आहोत. पण मल्टी नॅशनल टूर्अनामेंट मधे बाद फेरींमधे ते नेहमीच आपल्याला नडत आले आहेत.
उद्या तुम्हाला वाटेल सामना
उद्या तुम्हाला वाटेल सामना हारलो पण एक खेळाडू असा काय खेळेल की सामना सिंगल handed आपल्या बाजूला फिरेल.
Pages