Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ इंग्लंड नाही ......
भाऊ इंग्लंड नाही .......Australia
*भाऊ इंग्लंड नाही ....* हो,
*भाऊ इंग्लंड नाही ....* हो, चूक सुधारलीय. ( वयम मोठ्ठं खोट्टम , चालायचंच माझं असं! )
रशीद खान फुलं पैसा वसूल आहे..
रशीद खान फुलं पैसा वसूल आहे...
झादरान कमालीची खेळी..
293 टारगेट..
शेवटचा वाईड दिला असता तर 300 टारगेट असते..
भाऊ व्यंगचित्र मस्तच !!
भाऊ व्यंगचित्र मस्तच !!
हेड गेला शून्यावर...
हेड गेला शून्यावर...
ऑस्ट्रेलिया ४-१
ऑस्ट्रेलिया ५० च्या आत ४
ऑस्ट्रेलिया ५० च्या आत ४

मी बोललेलो बॉल स्विंग होणार... मजा येणार.. चार स्पिनर आहेत. पण पहिल्या चार विकेट स्विंगवर... अजून एक अंदाज बरोबर
भाऊ चित्र मस्त आहे
भाऊ
चित्र मस्त आहे
ओसीज 69-5 !!
ओसीज 69-5 !!
मॅक्सवेलला बरेच जीवदान मिळत
मॅक्सवेलला बरेच जीवदान मिळत आहेत.
अफगाणकडे रनरेट सुधारायची संधी आहे..
*मॅक्सवेलला बरेच जीवदान मिळत
*मॅक्सवेलला बरेच जीवदान मिळत आहेत.* Fortune favours the brave !
मॅक्सवेल 50+ माझा खूप आवडता खेळाडू : ओसिज 145-7 !
मॅक्सवेल 100 ते सुद्धा 76
मॅक्सवेल 100 ते सुद्धा 76 चेंडूत
ऑस्ट्रेलियाला 106 हवेत.. तितक्याच चेंडूत
ड्रॉप कॅच भोवणार
ड्रॉप कॅच भोवणार अफगाणिस्तानला असं दिसतंय. जे पाँटिंगच्या वादळात भारताचं २००३ साली झालं होतं तेच आज मॅक्सवेलच्या वादळात अफगाणिस्तानचं व्हायची लक्षणं आहेत. ह्यातून सावरायला वेळ लागू शकतो.
मॅक्सी ला शॉर्ट बॉल बॅरॅज का
मॅक्सी ला शॉर्ट बॉल बॅरॅज का ट्राय करत नाहियेत ? मधे एखादा वेल डिरेक्टेड बाउएखादाधमाल उडवू शकतो. पण काय इनिंग खेळतोय राव ! टेक अ बाऊ !
मॅक्सवेल आज खेळतोय..
मॅक्सवेल आज खेळतोय..
पण कमी जास्त काही झाले तर स्पर्धेतून बाहेर जाईल
असे नको व्हायला
अपसेट्स चा हा वर्ल्ड कप आहे
अपसेट्स चा हा वर्ल्ड कप आहे
मॅक्सवेलला टीव्हीसमोर झोपून
मॅक्सवेलला टीव्हीसमोर झोपून नमस्कार केला आज !!!!
अफगाणचा अनुभव खूपच तोकडा पडला
अफगाणचा अनुभव खूपच तोकडा पडला हे मान्य करूनही मॅक्सवेलने आज जी फलंदाजी केली त्याला तोड नाही ! एका जागेवर, एका पायावर भार देत चौकार, षटकारांची आतषबाजी करणं व तेही एवढ्या दबावाखाली, केवळ चमत्कारच ! आणि समोर कॅप्टन त्याच्या कर्तबगारीवर पूर्ण भरवसा ठेवून स्वतः फक्त चेंडू अडवत ठामपणे उभा ! ग्रेट !!!
चेस करताना पहिलेच द्विशतक आहे
चेस करताना पहिलेच द्विशतक आहे का?
चेस करताना पहिलेच द्विशतक आहे
चेस करताना पहिलेच द्विशतक आहे का? >> हो !. नॉन ओपनरचे पण पहिलेच आहे. सहाव्या क्रमाकांखाली येऊन केलेले पण पहिलेच आहे. एका पायावर केलेले पण पहिलेच असावे
बापरे!
बापरे!
ती एक इनिंग आणि नंतर मला वाटतं इंडीजच्या रिकार्डो पॉवेलनी अशीच एक हाती हाण हाण हाणून मॅच जिंकली होती ती एक. फार जिव्हारी लागायचे तेव्हा अशा डिफिट्स. 
मला एकदम सईद अन्वर नी ९७ मध्ये आपल्या विरुद्ध १९२ ठोकले होते ते आठवले. किती दिवस आपण देश म्हणून, माणूस म्हणून किरकोळ आहोत असं फिलिंग येत होतं.
पण हे ७ विकेट नंतर म्हणजे कैच्या कै आहे. मला वाटतं आपल्या विरुद्ध नाही करु शकणार सध्या तरी असं कोणी. एस्पेशली हे त्रिकूट सॉलिड फायर होत असताना. ते सतत काहीतरी प्रयत्न करताना दिसतात आणि मुख्य म्हणजे लाईन लेंत एकदम टाईट असते. ढिसाळ बॉलिंग अजून तरी आढळली नाही मला.
ऑस्ट्रेलिया ५० च्या आत ४ Lol
ऑस्ट्रेलिया ५० च्या आत ४ Lol
मी बोललेलो बॉल स्विंग होणार... मजा येणार.. चार स्पिनर आहेत. पण पहिल्या चार विकेट स्विंगवर... अजून एक अंदाज बरोबर>>>>>> ओपन एंडेड स्टेटमेंट्स हा अंदाज नसतो. And you just stop short of actually predicting anything, which is a safe play. सो चुकायचा प्रश्न येत नाही पण... चालू द्या अंदाजाचं गुर्हाळ.
अहो, वैद्यबुवा
अहो, वैद्यबुवा
माझे अंदाज बरोबर आल्याने इथे इतर कोणाचे क्रिकेटचे ज्ञान कमी होत नाही. मी अंदाज करणार आणि ते बहुतांश वेळा बरोबर येणार. हे पूर्ण वर्ल्डकप चालू राहणार. नका घेऊ इतके लोड त्याचे. मला मजा येते अंदाज व्यक्त करायला आणि ते करू द्या. शुभ रात्री
Maxwell रात्री पुष्पा बघून
Maxwell रात्री पुष्पा बघून झोपलेला की काय.
मै झुकेगा नही....
अशक्य इनिंग
मॅक्सवेल ची तब्येत कशी आहे
मॅक्सवेल ची तब्येत कशी आहे आता बघायला हवे. आजच्या खेळीचा काही त्रास झाला तरी पुढचा सामना आराम करून सेमी पर्यंत फीट व्हायला हवा. आपल्याला फायनलला समोर ऑस्ट्रेलिया आली तर त्यात तो हवा. वर्ल्डकप जिंकल्यावर कोणी असे म्हणायला नको की आमचा मेन फोर्मातला प्लेअर नव्हता
आजच्या विजयानंतर बरेचजण म्हणू लागले आहेत की ऑस्ट्रेलिया फायटर आहे. आपल्याला भारी पडणार वगैरे. काही दिवसापूर्वी हेच लोकं साऊथआफ्रिका बद्दल असेच बोलत होते. पण आपल्यासमोर आले आणि हिशोब झाला.
आजही जरी मॅक्सवेल खेळला असला तरी त्यांचे पहिले 7 फलंदाज अफगाण ने 91 धावांत आता पाठवले होते आणि त्याही आधी त्यांना 290+ धावा चोपल्या होत्या हे देखील आहेच.
आज आपण गोलंदाजी करत असतो तर ऑस्ट्रेलिया 91 ला 7 नसते तर सर्वबाद असते. जे पंधरा-वीस ओवर गोलंदाजांना मदत मिळाली असती त्यातच आपण सामना संपवून टाकला असता असे क्रिकेट आपण सध्या खेळत आहोत.
आणि आपला चेस असता तर शर्माने दोन-चार फटके असे उचलून मारले असते की गोलंदाज विसरून गेले असते की त्यांना काही मदत मिळतेय
कॅची किती सोडल्या त्याच्या.
कॅची किती सोडल्या त्याच्या. मला काय एव्हढी भारी नाही वाटली इनिंग. शेवटी एका पायावर उभा राहून मारत होता ते बघून तर अफगाणी प्लेअर गल्लीतले पोरं वाटत होते आणि खरोखरच गल्लीतले पोरं आहेत ते.
असामी - मॅक्सवेल जखमी होता का
असामी - मॅक्सवेल जखमी होता का? मला फारसा संदर्भ माहीत नाही.
बुवा - १९९७ बद्दल सहमत. तो काळ पाक फार भारी आहे असेच वाटण्याचा होता. कोणीतरी सामाजिक अभ्यास वगैरे करायला हवा
क्रिकेटमधेच नव्हे तर इन जनरल, आणि केवळ पाक नव्हे. अगदी शारजा वगैरे मुळे दुबई-पाक वगैरे एक मोठा नेक्सस असल्यासारखी त्यांची एक एकत्रित फार इन्फ्लेटेड इमेज होती.
पाकचे आपल्याविरूद्धचे बहुतांश सामने वाघ विरूद्ध शेळी असेच वाटत, आणि शारजामधले तर जास्तच. प्रेशर दोघांनाही असे. पण प्रेशरखाली खेळताना आपल्याविरूद्ध ते खेळ उंचावत, तर आपला ढेपाळत असे. गेल्या दोन दशकात ते बदलले. अजूनही अधूनमधून चांगले खेळतात ते आपल्याविरूद्ध पण आता ते पूर्वीचे बॅगेज झुगारून दिले आहे. आता तेच उलटे बिचकून असतील.
माझे अंदाज बरोबर आल्याने इथे
माझे अंदाज बरोबर आल्याने इथे इतर कोणाचे क्रिकेटचे ज्ञान कमी होत नाही. मी अंदाज करणार आणि ते बहुतांश वेळा बरोबर येणार.>>>>>
कोणाचं ज्ञान नाही कमी होत पण मेंदुतले न्युरॉन्स थोडे कमी होत असतील.
एकदम क्रेक्ट फा. अॅग्जॅक्टली माय फिलींग्स. सगळ्या पोस्टीला अगदी अगदी!

खरं तर अन्वर नी १९२ करुन सुद्धा आपण पुढे ३५ रनांनीच हारलो हे मी आत्ता स्कोअरबोर्ड बघितला क्रिकइन्फो वर तेव्हा कळलं. द्रविडनी सॉलिड बॅटिंग केलेली आहे. १०० रन ११२ बॉल मध्ये. म्हणजे आपण जबरी टफ दिली फाईट पण ते रेजिस्टर सुद्धा झालं नाही म्हणजे तू म्हणतो तसं आपली कचखाऊ म्हणून इमेज किती मनात पक्की बसली होती बघ.
मॅक्सवेलला काहीतरी गोल्फ रिलेटेड इंजुरी झाली होती आणि म्हणून मागच्या मॅचला नव्हता तो. त्यात हीट मुळे क्रँप्सपण येत होते त्याला.
ह्यावरुन वसिम अक्रमची मी एक मुलाखत बघितली त्यात तो सांगत होता की मी टीम कोच असताना आजिबात कुठल्याही प्लेयरला फुटबॉल वगैरे खेळू द्यायचो नाही. चुकून कुठे पाय मुरगळला, काही झालं तर क्रिकेट राहिल बाजूला. मॅक्सवेलच्या ह्या इंजुरीबद्दल एकलं तेव्हा हेच आठवलं मला. गोल्फ खरं खुप माईल्ड स्पोर्ट वाटत असेल पण त्यातही स्कोप असेलच इंजुरीचा.
१०० रन ११२ बॉल मध्ये. म्हणजे
१०० रन ११२ बॉल मध्ये. म्हणजे आपण जबरी टफ दिली फाईट पण ते रेजिस्टर सुद्धा झालं नाही म्हणजे....
>>>>>>
हा सामना लाईव्ह पाहिलेला. तेव्हा सगळेच लाईव्ह बघायचो. द्रविडने त्या सामन्यात शतक मारलेले देखील आठवत आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे आपण पूर्ण चेस गेमच्या मागेच होतो. कधीही जिंकू असे वाटले नव्हते. कदाचित रिकवायार्ड रन रेट इतका असेल की तो द्रविड मारू शकतो हा विश्वास त्याच्यावर नव्हता
द्रविडने डोनाल्डला मारलेला सिक्स बघून भारावून जायचा काळ होता तो यातच सारे आले..
बाकी पाकिस्तानशी शारजात शुक्रवारी खेळलो की त्यांचा अल्लाह मदत करतो. आपण तो सामना हरायचाच असतो या अंधश्रद्धेचा तेव्हा शिकार होतो. मीच नाही तर आमच्या इथले सगळेच. एकदा जिंकलो तेव्हा आपला सुद्धा एका मोहम्मद अझहर आहे त्यामुळे एक सामना आपल्या वाट्याला आला असे तेव्हाचे आमच्या इथले क्रिकेटचे जाणकार म्हणायचे आणि त्यावर विश्वास बसायचा
पाकचे आपल्याविरूद्धचे बहुतांश
पाकचे आपल्याविरूद्धचे बहुतांश सामने वाघ विरूद्ध शेळी असेच वाटत, >> खरय. विशेषतः चेतन शर्मा प्रकारानंतर नि सचिन ह्यायच्या आगोदर . पाकिस्तान होपलेस वाटणार्या मॅचेस - कधी मियांदाद, कधी सलीम इलाही (कलकत्ता मॅच आठवा) कधी इजाझ अहमद - कोणी तरी जिंकून देत असे. जाडेजा ने ९५ मधे चोपल्यावर थोडा धीर आला नि मग टोरँटो मधे दादा लो स्कोरैंङ मॅचेस मधे ३-४-५ विकेट्स घेऊन पाकिस्तानची भंबेरी उडवून गेला तेंव्हा पोटातले पाणी कमी होत गेले. पाकिस्तान सिरीज मधे राजेश चौहान ने साकलेन ला शेवटच्या ओव्हर मधे सिक्स मारला तेंव्हा मियांदादचे भूत पूर्ण उतरले होते (जरी आपण सिरीज हरलो होतो तरी). ढाक्क्याच्या तीनशे चेस नंतर पाकिस्तान अनबीटेबल आहे हे वलय गायब झाले होते. त्यांनी एक मारलि तर आपण दहा मारू हा विश्वास वाटायला लागला होता. त्या नंतरही हमखास आपल्याच राशीला लागणारे - जमाई राजा, प्रोफेसर हफिज, कामरान अकमल, मोहसीन खान , रिझवान असे होतेच म्हणा. पण आपल्याकडूनही सचिन, सेहवाग, कोहली असे ठणकावून द्यायला तयार असणारे असत.
भारी असामी. ग्रेट मेमरी!
भारी असामी. ग्रेट मेमरी!
एकदम सगळा प्रवास डोळ्यासमोरून गेला. हृषिकेश कानिटकरचा लास्ट बॉल चौका पण पाकिस्तान विरुद्दच होता ना?
Pages