क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fakhar Zaman third to slam a hundred inside first 20 overs in ODI World Cups since 1999:

17.2 - Rohit Sharma, AFG 2023
18.6 - John Davidson, WI 2003
19.2 - Fakhar Zaman, NZ 2023

पाऊस आला
DLS par score after 21.3 overs is 150 so Pakistan are 10 runs ahead

३५० झाले तर पाकला अवघड.. सध्या त्यांची कॉन्फिडस लेव्हल डाऊन आहे...
की हीच ती वेळ आहे जिथे मोठा स्कोअर चेस करत कॉन्फिडन्स ऊंचवायचा..
>>>
दोन्ही बाजूनी बोलून ठेवण्याचा एक फायदा असतो, काहीही झालं तरी 'मी हे आधीच म्हणून ठेवलं होतं' असं म्हणता येतं
(एक तरफा प्यार की ताकत च्या टोन मधे वाचा)

अरे तुम्ही लोक लोड का घेत आहात माझे अंदाज खरे खोटे ठरण्याचा Happy
पहिल्या पानावर पहिल्या चार मध्ये मी इंग्लंड म्हटलेले. ती जागा आता आफ्रिकेने घेतली आहे. तर इंग्लंड तळाला..
असे अंदाज कोणाचेही चूक किंवा बरोबर येऊ शकतात..
इंग्लंड ने तर सर्वानाच फसवले..

मला या अंदाज बरोबर आल्याचे काही कौतुक नसते. आले तर मजा करायची. नाही आले तर गेले उडत..
कारण क्रिकेटची समज आणि मागे म्हटलेले ते माईंड रीडिंग.. या गोष्टी अश्या अंदाजपेक्षा वरच्या दर्ज्याला आणि पर्मनंट आहेत .

बाई दवे
ते वर कोट केलेत ते अंदाज नव्हता. त्यात दोन्ही शक्यता वर्तवल्या होत्या. आणि आज काय होते बघूया असे ते स्टेटमेंट होते. पण तुम्ही लोकं माझ्या प्रत्येक पोस्ट मध्ये आता अंदाज शोधू लागले आहात Happy

क्रिकेटची समज आणि मागे म्हटलेले ते माईंड रीडिंग..
>>
अर्रर्र..
मला वाटायचं याच दोन्हीच्या जोरावर तू अंदाज लावतोस...
नुसतेच तुक्के असतात हे (इंडायारेक्टली) सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे...

मला वाटायचं याच दोन्हीच्या जोरावर तू अंदाज लावतोस...
>>>

माईंड रीडींगवर अंदाज नाही लावले जात, ते खेळात वापरले जाते. मी स्वताही खेळताना बरेच वापरायचो हे. त्यावर कधीतरी स्वतंत्र धागा काढून किस्से लिहूया. आमच्या गल्ली क्रिकेटमध्ये मी बरेच फेमस होतो यासाठी.. आता हे कोणाला पटो न पटो Happy

आणि क्रिकेटची समज अंदाजात कमी जास्त प्रमाणात वापरली जाते. पण क्रिकेट हा अनिश्तिततेचा खेळ असताना शंभर टक्के अंदाज कोणाचे बरोबर नाही येऊ शकत पण शक्यता वाढते.
उदाहरणार्थ परवा अय्यरबाबत शॉर्ट बॉलचा प्रॉब्लेम आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. पण त्यासाठी तसेच पेस बॅटरी पाहिजे जी लंकेकडे नव्हती. त्यामुळे अजूनपर्यंत स्पर्धेत काही विशेष करू न शकलेला अय्यर हीच संधी आहे म्हणत तुटून पडणार हे मला वाटलेलेच. आता त्यात तो बाद झाला असता तर तो अंदाज चुकला असता, पण क्रिकेटची समज खोटी ठरली नसती.

अफगाणबाबत पाकच्या सामन्यात त्यांना शतकी सलामी हवी असे ब्रेकमध्ये म्हटलेले आणि त्यांनी ती दिली. हा देखील हवेतला अंदाज नव्हता. त्यांचे क्रिकेट गेले काही काळ पुरेसे फॉलो केले त्यातून त्यांचे टॉपचे फलंदाज कसे आहेत हे लक्षात आलेले. ते जबाबदारीने खेळले तरच त्यांचा स्कोअर पडतो. आणि तेच पुढच्या सामन्यातही सातत्याने दिसत आलेय.

हार्दिक पंड्या च्या जागी प्रसिद्ध कृष्णा ला घेण्यात काहीच अर्थ नाही. तो batting पण करत नाही आणि आपले तिन्ही फास्ट गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी टाकत आहेत, त्याऐवजी तिलक वर्मा सारख्या खेळाडूला घ्यायला हवे होते, जो 3-4 ओव्हर्स टाकू शकतो आणि चांगला फलंदाज आहे, कृष्णा waste आहे.

फकर ठोकतो आहे...
तीन छक्के लावले सोधी ला एकाच ओव्हर मधे
पावसानी परत हजेरी लावण्यापूर्वी 4 ओव्हर मधे पाक नी 50 मारले...
DLS नुसार 21 धावांनी पुढे आहे पाक

अरे ये क्या हुई? Uhoh ४०० करून पण हरले म्हणजे न्यूझीलन्ड चे बॅड लक फारच खराब आहे! म्हणजे आता पाकडे बॅक इन बिन्नेस?!!

हा स्टोक्स एक वेगळेच रसायन आहे
बरेचदा इतका साधारण खेळतो की ओव्हर हाईप खेळाडू वाटतो..
तर कधी जिकडे सगळे फेल जातात तिकडे काहीतरी भन्नाट खेळी खेळून जातो आणि नाव कमावतो...
आजही अशीच स्टेज आहे.. आणि त्याची भन्नाट खेळी खेळायच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे

*न्यूझीलन्ड चे बॅड लक फारच खराब आहे! * - +१. पाऊस ! आले देवाजीच्या मना, तेथे कुणाचे चालेना ! Wink
*...समोर इंग्लंड 111/4, 26 ओव्हर मधे* - इंग्लंडला फॉर्मने पाठ दाखवली व नामुष्कीची वाट दाखवली ! न्युझीलंडचं बॅड लक परवडलं, म्हणत असतील इंग्रज !!

*इंग्रज स्पर्धेबाहेर.* - तें तर होणारच होतं: आता, पुढच्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र न होण्याची नामुष्कीहीं आली आहे त्यांच्या नशिबी. !

दोन जबरदस्त व बहरात असलेल्या संघांमधला आजचा सामना स्पर्धेचं 'पॉइंट्स टेबल ' बंद करूनही पहाण्याजोगा व्हावा, अशी रास्त अपेक्षा !

“ दोन जबरदस्त व बहरात असलेल्या संघांमधला आजचा सामना” - आजच्या मॅचचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही टीम्ससमोर एकच दुविधा आहे. आपल्या स्ट्रेंथला खेळायचं कि प्रतिस्पर्ध्याचा वीकनेस एक्स्प्लॉइट करायचा.

आपल्या स्ट्रेंथला खेळायचं कि प्रतिस्पर्ध्याचा वीकनेस एक्स्प्लॉइट करायचा
>>
माझा अंदाज -
Strength vs Strength : close game
Strength vs Exploitation : mostly one sided
Exploitation vs Strength : mostly one sided
Exploitation vs Exploitation : close game

तुम्हाला काय बघायला आवडेल?
मला दोन्ही टीम ना आपापल्या strengths वर खेळताना बघायला आवडेल

आजच्या सामन्याला सारे फायनलची रंगीत तालीम म्हणून बघत आहेत.
तरी पहिला दुसरा नंबर देखील आज ठरू शकतो.
आणि आफ्रिका दुसरी आल्यास तिला ऑस्ट्रेलियाशी सेमीला खेळावे लागून ते तिथेच चोक करू शकतात. फायनलला आपल्या समोर येणारच नाहीत.

आफ्रीकेने फक्त दोनदा चेस केले आहे. आणि एकदा नेदरशी हरलेत. तर एकदा पाकिस्तानच्या या स्पर्धेत एवरेज कामगिरी करता असलेल्या गोलंदाजांनी सुद्धा जवळपास हरवलेले. त्यामुळे सेमीला ऑस्ट्रेलिया समोर चेस करताना चोक ऑन आहे..

चला आज आफ्रिकेला चेस करायची संधी..
जर केला तर त्यांना आत्मविश्वास मिळेल..
आज सुद्धा नाही केला तर मग ते चेस कसे करायचे हा प्रश्न अनुत्तरीत ठेऊन बाद फेरीत जाणार...

दोन्ही संघ यानंतर पुन्हा एकदा बाद फेरीत भेटणार हे जवळ जवळ निश्चित आहे व त्यावेळी सर्व सामर्थ्य वापरून खेळणंही अपरिहार्यच असणार आहे. दोन्ही संघाना एव्हाना एकमेकांच्या शक्ति व मर्मस्थळांची माहिती झाली आहे. त्यासाठीचे डावपेंच पडताळून पाहण्यासाठी दोन्ही संघ या सामन्याचा उपयोग करून घेतील, ही शक्यता जास्त.

अय्यर 35 बॉल 12 वर खेळत आहे.
स्पिनरने जखडून ठेवले आहे. पीच स्लो झाला आहे.
सुरुवात वेगात केली हे बरे झाले इथे.

Pages