चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे हो की! तो बिल बार आहे हे पाह्ताना जाम स्ट्राइक होत नसे Happy

त्याचा आणि त्या ह्युएलचा सेल्फ स्टोरेज मधे ते दोघे वॉल्टरच्या कामाकरता आलेले असतात तेव्हाचा "All's I'm saying" संवाद महा-धमाल आहे Happy

चंद्रमुखी २ काहीतरीच आहे. सगळ्या गोष्टी उगाच घडत राहतात. या पिक्चरमध्ये भूत असूनही भूलभुलैया याच्यापेक्षा जास्त हॉरर वाटला होता. मुळात भूत वगैरे जे काही आहे ते शेवटच्या अर्ध्या तासात येतं. तेव्हाच कंगना आणि बॅकस्टोरी पण येते. उरलेल्या पिक्चरभर फेक रजनीकांतला सहन करत राहावं लागतं ( कारण कंगना आल्यावर तिलाही सहन करावं लागतं Proud ) त्यातल्या त्यात वडिवेलू चांगला आहे.

स्टोरी अशी काही खास नाही. एक फॅमिली आहे. त्यांच्यावर संकटं येतायत त्यामुळे त्यांना कुलदेवीची पूजा करायची आहे. हे देऊळ त्याच जुलमी राजाच्या कुलदेवीचे देऊळ आहे. ही फॅमिली एक मोठ्ठं घर भाड्याने घेते. हे घर तेच चंद्रमुखीच्या बंद कमऱ्यावालं आहे. या फॅमिलीने वाळीत टाकलेल्या मुलीच्या मुलांना घेऊन हिरो येतो इतकाच त्याचा संबंध (असायला हवा). पण मग तो त्या परिवारतला एक कसा होतो, मग कोण झपाटलं जातं इ इ गोष्टी येत राहतात. हिरो आणि त्याची हिरवीण घरघुशे आणि गळेपडू आहेत. मग पुढे सगळी सेम ओल्ड सेम ओल्ड स्टोरी. भूलभुलैयाच्या राजाच्या स्टोरीला अजून १-२ शेपट्या लावल्या आहेत.

चंद्रमुखी २ महा बेकार आहे असे १-२ घीं कडनं ऐकलं. वाटेला जाणार नाही.
समहाऊ मला तिचा राणी लक्ष्मीबाई पण ओव्हर अक्टींग प्रचूर वाटला.. अर्ध्या तासात सोडला.
मला कंगना साध्या साध्या रोल्स मधे आवडलिये..तनू मनू, सिमरन, क्वीन वगैरे

ओह चंद्रमुखी2 पण बघण्यात अर्थ नाही म्हणजे.
ड्रीमगर्ल2 खरंच भयानक आहे.आयुष्यमान ने बहुतेक त्याच्या करियर ला काळी तीट म्हणून पिक्चर केला असावा.
अनु कपूर, तेरा क्या होगा आलिया मधली नायिका,नेहमीचे ड्रीम गर्ल1 मधले कलाकार यांनी अतिशय शी स्क्रिप्ट मध्ये पण चांगला अभिनय करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
मला अक्षरशः वाईट स्वप्ने पडली 1 तास हा पिक्चर बघून.

काल टीपी म्हणून साथिया बघितला. विवेक ओबेरॉय फ्रेश व छान दिसतो. गाणी छान आहेत पण मूळ तमीळ जास्त छान आहेत. बाकी फॉरवर्ड केला घाइ त लग्न करतात व मग भांडण समेट इतकेच. राणी मेली असती तर जरा ड्रामाटिक झाले असते. गेले सांगायचे राहून टाइप. पण ती
शेवटी हास्पिटलात विनोदी झ टके देते व एक प्लास्टिक जखम चिकटव ली आहे. ती संभाळत विवेक ला आय लव्ह यू म्हणून टाकते. दुपटी शिवायला घ्यावी झाले तनुजाने.

आऊटफीट - नेटफ्लिक्स

पूर्णपणे शिंप्याच्या दोन खणी दुकानात चित्रीत झालेला सिनेमा. ड्रामापटाचे उत्तम उदाहरण आहे हा सिनेमा. सिनेमाची हाताळणी बरीचशी नाटकासारखीच आहे, नेपथ्यही नाटकाला साजेसे असेच आहे, पात्रे ही मोजकीच.

सुरुवातीला संथ वाटणारा सिनेमा नंतर चांगलीच पकड घेतो. टेलरच्या दुकानात येणारा जखमी माफिया गुंड आणि त्यानंतर घडणार्‍या घटना इतकाच जीव आहे कथानकाचा. थरार आणि रहस्य बेताचेच आहे. पुढे काय होणार याचे जे आराखडे आपण मनात बांधतो त्यातल्याच एका वाटेने सिनेमा जातो, धक्का असा कुठे बसत नाही. पण थरार आणि रहस्य यांच्या मसाल्यांनी जी नाट्यमयता उभी केली आहे ती अफलातून आहे.

शिकागोत जन्मलेल्या आणि वाढलेल्या लोकांचे अ‍ॅक्सेंट आणि इंग्लंड्मधून येउन शिकागोत स्थायीक झालेल्या टेलरचा अ‍ॅक्सेंट यातला फरक खूप मस्त दाखवलाय. खास करून त्या टेलरचा अ‍ॅक्सेंट - थोडासा ब्रीटीश थोडासा अमेरीकन. सिनेमाभर थकलेली देहबोली उत्तम दाखवणार्‍या टेलरचे शेवटच्या एका प्रसंगात होणारे ट्रान्सफॉर्मेशन अफाट आहे. टेलर आणि त्याची रिसेप्शनीस्ट यांच्यातल्या बाप-मुलीसारख्या नात्याभोवती जे प्रसंग बेतले आहेत ते नितांत सुंदर आहेत. संवाद तर सुंदर आहेतच पण ते नसते तरी दोघांनी चेहर्‍यावर आणि डोळ्यातून जे दाखवलंय ते खूप बोलकं आहे.

माधव मला पण फार आवडला. मी पण मागच्या कुठल्यातरी पानावर हीच कमेंट केली आहे की ह्यावर छान दोन अंकी नाटक होईल. ....... माईंड्स थिंक अलाईक Wink संवाद तर बेस्ट आहेत एक एक. I am not a tailor, I am a cutter.

I am not a tailor, I am a cutter. >>> हो आधी ते एक फारसे अर्थ नसलेले वाक्य वाटले होते, शेवटी जेंव्हा तो ते म्हणतो तेंव्हा शहारा येतो अंगावर.

आऊटफीट - नेफ्लिवर नाही पण स्टार्टप शोवर बघितला हा काल.
थँक्यू माधव फॉर रेको.
खूप आवडला. तुम्ही म्हणताय तसं नाटकासारखा सेटप वाटत राहिला. पिरिअड ड्रामा टाईप्स, पण जे काही उभं केलंय त्याला तोड नाही. तेव्हाचे कपडे, सुट, लाकडी सामान सगळं इतकं खरं खरं वाटत राहिलं. काय मस्त काळ उभा केलाय.
फक्त त्या माफिया गुंडाच्या तोंडी सतत फ चा भडिमार त्या काळाशी विसंगत वाटला. फ्रान्सिसचं काम पण मला फार आवडलं. टेलर सॉरी कटर तर अफलातून माणूस निघाला आणि त्याची रिसेप्शनिस्ट पण. त्या टेलर शॉपच्या बाहेरचा एकही सिन नाही पण बोर नाही झाला अजिबात आणि शेवटचं वाक्य तर फारच मस्त.
हो आधी ते एक फारसे अर्थ नसलेले वाक्य वाटले होते, शेवटी जेंव्हा तो ते म्हणतो तेंव्हा शहारा येतो अंगावर.>++=११११

काल 12थ फेल बघून आले. फार आवडला चित्रपट. रिअल लाईफ स्टोरी आहे अन ती तितकीच इमान ठेवून सादर केली आहे.
आय पी एस मनोजकुमार शर्मा यांच्या बारावी नापास ते आय पी एस हा प्रवास खरतर समाज, परिस्थितीशी झगडणं उलगडलं आहे यात. विक्रांत मेस्सी याने अप्रतिम उभा केलाय मनोजकुमार शर्मा. बाकी सर्व कलाकारांचेही उत्तम काम. विनोद चोप्रा यांनी अगदी न्याय दिला आहे विषयाला. चंबळ, तिथली अजून टिकून असलेली मनोवृत्ती, एखादा सत्यप्रिय बाप अन तसाच एखादा अधिकारी कसं एखाद्याचे आयुष्य घडवू शकतो, फार छान मांडलय.
अगदी चुकवू नये असा चित्रपट. मुलांसह जरूर बघा. सेफ तर आहेच आणि इन्स्पायरिंग आहे.

धन्यवाद अवल...12थ फेल साठी +१
मलाही फीड मध्ये ट्रेलर का पुस्तक आलं होतं पण काहीच कल्पना नव्हती.

जवानच्या धाग्यावर जवानची पोस्ट लिहिली आहे.

Netflix -
No hard feelings
Jennifer Lawrence आणि तिचं काम दोन्ही आवडतं. एका लाजाळू व भिडस्त मुलांची भीड चेपावी व तो कॉलेजमध्ये रमावा म्हणून सेक्शुअली ओपन अप करण्यासाठी आईवडील एका गरजू मुलीला Buick गाडीच्या बदल्यात hire करतात. पण ती अतिशय लहरी, विचित्र आणि विक्षिप्त असते, नंतर तिची त्या मुलाशी कशी मैत्री होत जाते हे दाखवलं आहे. पूर्णपणे विनोदी आहे. फार उत्तम नाही आणि टाकाऊही नाही. थोडा चावट व आचरट आहे. टाईमपास म्हणून बरा आहे.

The Mummy-
(Tom cruise )
बरा आहे पण आधीचे ममी सिनेमे जसे adrenaline rush देतात तसं काही वाटलं नाही. डार्क आहे पण आधीच्या तुलनेत हिरोईनचा इजिप्शियन अभ्यास वरवरचा वाटला. ममी नेहमीप्रमाणे पाच हजार वर्षे पेटीत बंद -बाहेर येऊन दोन-चार जणांना सोलून खाते व मादकपणे हालचाल करते. काहीबाही मंत्र पुटपुटते व अचानक अमेरिकन इंग्रजीत बोलायला लागते. ममी ईवॉल्व झाल्या रे बाबो.. ! ओके टाईप सिनेमा.

>>काल 12थ फेल बघून आले. फार आवडला चित्रपट.>>> १० वर्शाच्या मुलाला दाखवता येईल का?हल्लि प्रत्येक चित्रपटात किसिन्ग, सेम सेक्स अफेअर वगैरे विनाकारण घुसडतात. म्हणून विचरले. थिअ‍ॅटर मध्ये फॉर्वड करायची सुध्दा सोय नसते.

शेफाली छाया, जयदीप अहलावत आणि स्वानंद किरकिरे चा मुव्ही आलाय नवीन - थ्री ऑफ अस.
खूप चांगले रिव्ह्युज येत आहेत.

फक्त भारतातल्या थेटरात दिसतोय. इथे पण नाही आलाय . बहुतेक छोट्या बजेटचा असल्यामुळे.
ओटीटी वरच येईल कदाचित नंतर.

प्राईम वर पिप्पा बघायचा प्रयत्न केला
निव्वळ असह्य
मी ट्रेलर च्या वेळीच म्हणलं होत की ईशान खट्टर कुठूनही आर्मी मधला वाटत नाही ते त्याने चित्रपटात सतत सिद्ध केलं आहे
पहिलाच शॉट त्याची धडाडी वगैरे दाखवणारा असावा असा दिग्दर्शक लोकांनाच वाटलं असावं पण प्रत्यक्षात तो अत्यंत फुसका आहे
त्यांतनर रशीयन आर्मी च्या दुभाषिकेसोबत डान्स आणि रोमँटिक सोंग बघून तर डोळे निवले

नंतरही कथा अत्यंत अपेक्षित आणि सुमार मार्गाने पुढं सरकत जाते, कुठेही युद्ध आणि त्याचा आवाका दिसून येत नाही यापेक्षा वासेपुर मधले गॅंगवॉर खूप सरस होते.
एक तासभर बघून झाल्यावर शेवटी भयानक कंटाळा आला आणि बंद केला

नाळ २ पाहिला. एकदम आवडला, अगदीच साधा सुधा आहे, निरागस. तिन्ही मुलांनी खूपच छान काम केलय. खासकरून धोट्या चीमिने. शेवटी तर अगदी रडवले चिमणीने. फार सुंदर छायाचित्रण आहे. गाणी फक्त अजून छान हवी होती. अजिबात गर्दी नव्हती, बहुदा फ्लॉप होईल.

आत्मपानफ्लॅट बघायला गेलो होतो तेव्हा नाळ चा ट्रेलर पाहिला होता.
पहिलाच निसर्गरम्य हिरव्या हिरव्या घाटातून पावसात निघालेल्या बसचा लॉंग शॉट बघून डोळे निवले होते..

एव्हढे सिनेमे, मालिका असून काहीही बघणे होत नाही. जणू काही दिवाळीनंतर गोडाची मिठी बसावी तसं झालंय.
आज शाम रंग रंगा रे गाणं ऐकता ऐकता बाजूलाच अपने पराए चित्रपट दिसला. क्लिक केलं आणि वेळ सार्थकी लागला..

हरीश्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारीत चित्रपट आहे. बासू चटर्जी यांची माध्यमांतर कथा आणि दिग्दर्शन. उत्तम स्टारकास्ट आणि सर्वांचेच दमदार अभिनय. आशालता वाबगावकर, भारती आचरेकर, अमोल पालेकर आणि नीला म्हणून एक बालकलाकार ( ही बहुतेक मराठीत होती नंतर) एव्हढे मराठी कलाकार महत्वाच्या भूमिकेत. उत्पल दत्त,गिरीश कर्नाड आणि शबाना आजमी...

शबाना आणि आशालता यांच्यातले प्रसंग खू इमोशनल आहेत आणि ते खटकत नाहीत. अनेकदा डोळे पाणावतात. सहज सुंदर चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=eUTMFGSNZ2c

Pages