चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हंगामा २ किती bore आहे.
अर्धाच पाहिलाय अजून तर कंटाळा आला

नाळ २ आयपी टिव्हीवर आला आहे पण साऊंड अजिबात चांगला नाही. पुन्हा मध्येच आचरट अ‍ॅड्स आहेत, स्क्रिनवर मध्येच वॉटरमार्क्/लोगो वगैरे आहे. त्यामुळे थेटरला आला तर बघता येईल. पुढच्या आठवड्यात आला तर सोने पे सुहागा.

Pain Hustlers @Netflix
Emily Blunt, Chris Evans
एक पोल डान्सर सिंगल मदर व एक फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारा महत्त्वाकांक्षी माणूस-दोघं मिळून एक औषध वेगवेगळ्या डॉक्टरांना प्रिस्क्राईब करण्यासाठी लाच-कमिशन पार्टी देऊन कुठल्याकुठे जातात. जे 'पेनकिलर' आधी कॅन्सर वर वापरण्यासाठी असते, ते डोकेदुखीसाठी प्रिस्क्राईब व्हायला लागते. त्याचे दुष्परिणाम बघून एमिलीला पस्तावा होतो, त्यांच्या मालकाचं डोकं फिरतं व क्रिसचा लोभ वाढतच जातो. चांगला आहे सिनेमा. पहिला अर्धा भाग वेगवान वाटतो, दुसरा अर्धा पहिल्या अर्ध्याचे लूप जोडतो.

एमिली जीव तोडून काम करते, क्रिस फक्त देखणा आहे. मला मख्ख मदनाचा पुतळा वाटतो. त्याला मार्व्हल्सचं 'कॅप्टन अमेरिका'च ठीक आहे. हे दिग्दर्शकालाही माहिती आहे म्हणून त्याने त्याला फार कामच दिलं नाही, एमिली एकटीच पुरेशी आहे. विचित्र आई, टीनेज मुलगी- तिचं अचानक आलेलं आजारपण, बहिणीशी दुरावा, एक्सने बिझनेस घेतल्याने अक्षरशः रस्त्यावर आलेलं आयुष्य, त्यात समाजात मान नसलेले काम, मग अचानक मिळालेला मान- कंफर्ट -स्थैर्य व नंतर झालेली नैतिक घालमेल तिनं छान दाखवली आहे. सिनेमा खूप उत्कृष्ट वगैरे नाही, एकदा बघण्यासारखा आहे.

'तीन अडकून सीताराम' आवडला नाही. फार विनोदी नव्हता, पंचेसही टुकार वाटले, मोजून तीनदा हसू आलं असेल तर कायकी. नंतरनंतर तर कंटाळा आला. मराठी चित्रपटाच्या धाग्यावर का नाही जातंय कुणी ? इथंच नावं ठेवूयात का. Happy

अपूर्वा पाहिला. जरा अचाट अतर्क्य आहे पण पाहून बरे वाटले.
परत एकदा अभिषेक बॅनर्जी आणि रघुवीर यादव रॉक्स. खूप जास्त हिंसा आहे.ज्यांना चालत नसेल त्यांनी पाहू नये.

१२ fail पहिला अतिशय चांगला सिनेमा आहे . upsc वास्तव , दिल्ली मधील गल्ली , नायकाचा संघर्ष अतिशय जवळून दाखवले आहे. कॅटेगरी मुले जास्त
अटेम्प्ट मिळतात हे वास्तव . ती भीड गर्दी अंगावर आले सर्व. पुण्यात पेठे मद्ये राहत असताना लाल दिव्यच्या गाड्याच्या आकर्षणापायी वर्ष च्या वर्ष वाया घालवणारे पण पहिले आहेत ( स्टडी circle , चाणक्य मंडळ , ध्यानप्रबोधिनी वगैरे... )त्यांचे प्रिलिम मेन्स interview चे किस्से फार जवळून पहिले आहे. एकदा पाहावा आणि मुलांना पण दाखवावा असा सिनेमा आहे . विक्रांत मेस्सी is brillent actor .

तीन अडकून सीताराम चा डिटेल मध्ये रिव्ह्यू लिही की अस्मिता! पहावा की नाही ठरवता येईल Happy

इथे कोणी Downsizing नावाचा पिक्चर पाहिलाय का? पहावा का शेवटपर्यंत? मी अर्धवट पाहिला पण मग जरा जरा कंटाळवाणा वाटायला लागला. Attention span ची कंप्लीट वाट लागलेली आहे असं वाटायला लागलंय.

वरचे प्रतिसाद वाचून लक्षात आलं.
मराठी चित्रपट इथेही येऊ द्या. मराठी वेबसाईट आहे. मराठी चित्रपटांचा धागा वेगळा असला तरी हा मराठी बोलणार्‍या लोकांसाठी पूर्वीपासून चित्रपटांचा धागा आहे. त्यामुळे इथे पाहिल्या जाणार्‍या इंग्रजी /हिंदी / मराठी चित्रपटांचा उल्लेख स्वाभाविक आहे. पूर्वीच्या धाग्यात असेच होते ना ?

इतर प्रादेशिक भाषांमधले चित्रपट अधून मधून आले तर त्यांचे स्वागतच आहे. पण त्यांची संख्या लक्षणीय असेल तर वेगळा धागा सोयीचा ठरतो. मुद्दामून इतर प्रादेशिक सिनेमे पाहिले जात नाहीत. ज्या वेळी पहायचा मूड असेल तेव्हां या धाग्यातून शोधणे हे कर्मकठीण काम आहे. म्हणून तो वेगळा धागा सोय म्हणून उपयोगी पडेल. हे माझे मत.

उलट मराठी धागा वेगळा स्पेशल राहु दे. तिथे लगेच शोधता येतात. या सरमिसळीत शोधायला फार अवघड होईल.

सुनिधी +१
इथं आलं तरी प्रॉब्लेम नाही पण तिथे दमाने वाचून-निवांत बघून चवीनं लिहिता येतं. या धाग्याची फ्रिक्वेन्सी अफाट आहे, त्याने मराठी चित्रपटाची चर्चा अर्धवट सोडून द्यावी लागेल. कारण नवीन येणारे हिंदी -इंग्रजी सिनेमे संख्येने खूप जास्त आहेत, त्यामानाने मराठी चित्रपट अगदीच कमी आहेत. फ्रिक्वेन्सी जुळत नाही, दुसरं काही कारण नाही.‌

मराठी / हिंदी / इंग्रजी सिनेमे या धाग्यावर किंवा मराठीच्या धाग्यावर जाऊन शोधून कुणी पाहत असेल असं वाटलं नव्हतं. चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबतीत या तिन्ही भाषेतले कलाकार, दिग्दर्शक माहिती असतात. नावं वाचली तरी सिनेमा कसा असेल याचा अंदाज येतो. पहायचा कि नाही ठरवता येतो. इथे इराणी सिनेमांबद्दल जास्त माहिती नाही. पण त्यावाचून अडत नाही कारण इतरत्र त्याबाबद्दल भरभरून वाचलेले असल्याने समोर आला कि बघितला जातो.

अन्य प्रादेशिक चित्रपटांच्या बाबतीत सन्माननीय अपवाद वगळता पाटी कोरी असते. बघायच्या आधी थोडीफार माहिती मिळवायचा प्रयत्न केला जातो. दक्षिणेच्या सिनेमांसाठी असलेला वेगळा धागा अशा वेळी उपयोगी पडतो.

हिंदी सिनेमा बघताना मागचे भाग किती जणांनी वाचलेत ? ताज्या सिनेमांची चर्चा चालू असताना त्याचा उपयोग होतो इतकंच.

पिप्पा - नेफ्ली

सिनेमा १९७१ च्या बांग्ला युद्धात भारतीय सैन्याने वापरलेल्या अँक्फिबियन रणगाड्याविषयी आहे... (अशी शंकाही प्रेक्षकांच्या मनात येउ नये ही पूर्ण खबरदारी सर्व संबंधीतांनी घेतली आहे)..

नायक खरोखर शाळेतील गॅदरिंगमधे लहान मुले लष्करी गणवेष घातल्यावर दिसतात तसा दिसतो... पूर्ण चित्रपट नक्की युद्ध दाखवावे का नायकाच्या बहिणीची प्रेमकहाणी का माते (तिला पोरं असच संबोधतात चित्रपटात) ची तळमळ का नायकाची धडाडी हे नक्की लक्षातच न आल्यासारखा बनवला आहे...
युद्ध पण छान दाखवले आहे. बघताना आपल्याला जराही जोष येईल अथवा युद्धाच्या भीषणतेची जाणीव होणार नाही अन आपल्या कोमल मनाला त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे....

पाकिस्तानी सैनिकही समंजस दाखवले आहेत.. म्हणजे असे की हिंदुस्थानी फौजेचा (अन चित्रपटात थोडा महत्वाचा) ईसम धारातिर्थी पडला की आजुबाजुच्या ईतर चित्रपटातील लोकांना अश्रु गाळायला वगैरे पुरेसा वेळ द्यायला स्वतःहुन युद्धबंदी पाळतात...

एक भाग मला नीट कळला नाही किंवा तो तसाच आहे - एक कोणीतरी टींपाट गडी पाकीस्तानी एअरफॉर्सचा म्हणे पायलट असतो.. तो भारतीय जवानांच्या कळपात हातात एक मुक्ती बाहिनीचा झेंडा घेउन निवांत येतो अन अर्थात डायरेक्ट नायकासमोर उभा राहुन सांगतो की मी पाक विरोधी गटात आहे आता... मग नायक त्याचे म्हणणे (शाळेत ऑफ पिरियडला आपण वर्गमित्राची गोष्ट ऐकत असु तितक्या) तल्लीनतेने ऐकुन घेतो अन डायरेक्ट जाउन मोठ्या भावाला पाक सैनिकांच्या तावडीतुन सोडवुन आणतो...

एकुण सिनेमा बघुन आपल्या फौजेच्या १९७१ मधल्या पराक्रमाची क्रुर चेष्टा केलेली वाटते...

मराठी / हिंदी / इंग्रजी सिनेमे या धाग्यावर किंवा मराठीच्या धाग्यावर जाऊन शोधून कुणी पाहत असेल असं वाटलं नव्हतं. चांगली गोष्ट आहे
>>> मी इथे रेकोज वाचते आणि त्यातले ओटीटीवरचे मला जे बघावेसे वाटतात ते लगेच फोनच्या नोट्समध्ये लिहून ठेवते.

हिंदी सिनेमा बघताना मागचे भाग किती जणांनी वाचलेत ? ताज्या सिनेमांची चर्चा चालू असताना त्याचा उपयोग होतो इतकंच. >> हे वाक्य सुटलंय. पाठीमागे जाऊन वाचण्याबद्दल होती ती कमेंट.

शिल्पा शेट्टीचा सुखी बघितला आयपीटीव्हीवर.
आहे घिसिपीटी स्टोरीच. थोडक्यात होममेकर बाईचा मेकओव्हर! नाही बघितला तरी चालेल.

Killers of the flower moon थिएटरमध्ये पाहिला.
१९२०च्या दशकात ओक्लाहोमा मध्ये ओसेज नेशन ट्राइबचा तारणहार म्हणवणाऱ्या एका बिझिनेसमॅनने पैसा-इस्टेटीसाठी त्यांचे खून केले (करवले आपल्या लोकांकरवी). आणि स्थानिक प्रशासन त्याला सामील. त्यामुळे कुठल्याही खुनाची नीट तपासणी होत नाही. अशा सत्य घटनेवर आधारीत त्याच नावाच्या नॉन फिक्शन पुस्तकावर बनवलेला हा चित्रपट.
संथ आहे आणि बराच मोठा आहे साडे तीन तासांचा. पण जरा संयमाने पाहिला की खिळवून ठेवतो आणि बघण्या सारखा आहे. लिऑनार्दो डी कॅप्रिओ,रॉबर्ट डी निरो तसेच लिली ग्लाडस्टोन यांचा अभिनय उत्तम आहे. सगळ्यांचीच कामे चांगली झाली आहेत.

Pages