Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे वा हा आला का!
अरे वा हा आला का!
मला ही बघायचा आहे हा.
साडे तीन तासांचा आहे म्हणुन
साडे तीन तासांचा आहे म्हणुन जाऊ की नको वाटत आहे.
शिल्पा शेट्टीचा “सुखी” बाळबोध असुनही तिला बर्याच दिवसांनी पाहिले म्हणुन पाहिला. तिला अभिनय येत नाही, विचित्र दिसलीये, सिनेमात दम नाही. पण ती मला का कोणास ठाऊक आवडते, तिचे कपडे आवडतात. अप्रतिम फिगर राखलीये म्हणुनही आवडते. तिचा एक पांढरा व एक फिका अमसुली रंगाचा असे २ अनारकली प्रचंड आवडले.
सिनेमा पाहिला नाही तरी चालेल.
हो. हम दिल दे चुके सनम चा
हो. हम दिल दे चुके सनम चा ओरिजिनल.
Submitted by रघू आचार्य on 12 November, 2023 - 08:01
तो घरोन्दा नावाचा आहे ,नसिरुद्धिन. शाह
https://youtu.be/kjiPEk6ORZo
https://youtu.be/kjiPEk6ORZo?t=6830
आदित्य सिंग - पिप्पाच्या
आदित्य सिंग - पिप्पाच्या रिव्ह्यू साठी + 1000
खरोखरच चेष्टा केलीय या लोकांनी हा सिनेमा काढून
गॅदरिंग वाला पॉईंट तर अगदीच
भारी लिहिलंय
नेटफ्लिक्स वर हॉटेल फॉर डॉग्ज
नेटफ्लिक्स वर हॉटेल फॉर डॉग्ज नावाचा २००९ साली प्रदर्शित झालेला सिनेमा पहिला. IMDB रेटिंग ५.५ आहे पण मला फार आवडला. मी प्राणीप्रेमी असल्याने असेल.
एक भावा बहिणीची जोडी भटक्या कुत्र्यांसाठी एका बंद पडलेल्या हॉटेलात निवाऱ्याची सोय कशी करतात ते दाखवलं आहे. इतकीच कथा. मला खूप गोड वाटला.
आजच झी५ वर घुमर पाहिला. अतिशय
आजच झी५ वर घुमर पाहिला. अतिशय आवडला. सैयामी खेर ने उत्तम काम केले आहे. आणि दसवी, ब्रिथ यानंतर अभिषेक बच्चनचं आवडलेला तिसरा मूव्ही. तसा मला अभिषेक नाही आवडत पण चांगलं काम केलंय त्याने. आणि शबाना आझमी चं पण काम मस्त, छान रोल आहे यात तिचा.
नेपोलियन बघितला. खास नाही
नेपोलियन बघितला. खास नाही आवडला. ढिसाळ पटकथा आहे. फारसे तपशील नाहीयेत. आज इंग्लंडविरुद्ध लढाई जिंकली अचानक पुढच्या सिनमध्ये इजिप्त. वाकिन फिनिक्स रोलमध्ये अजिबात शोभत नाही. जोकर फिलिंग येत राहते. नेपोलियन आणि त्याच्या राणीची गोष्ट मात्र छान रंगवली आहे.
अनेक छान दृश्य आहेत पण चित्रपटाचे कलर ग्रेडिंग खूप नीरस आणि भकास आहे.
Thanks for Napolean review. I
Thanks for Napolean review. I have to cancel my plan today to watch. आता नाही बघत. Animal बघायचा plan आहे 2 तारखेला ट्रेलर तरी बरा वाटतोय
काल नेफिवर विजय चा लिओ बघितला
काल नेफिवर विजय चा लिओ बघितला !
सुरवातीला बरा वाटला पण नंतर ढिसाळ कथानक होते तरी १.२५ स्पीड ने शेवटपर्यंत बघितला .
संजयदत्त, त्याचा मुलगा विजय दाखवला आहे .
अंधश्रद्धाळू संजय दत्त अवैध धंद्याच्या प्रगतीसाठी विजयचा नरबळी द्यायचे ठरवतो , त्या हाणामारीत विजय निसटतो आणि पुढील कथा ..............
समजण्यासाठी बघितला नाही तरी चालेल...
आम्ही लिओ काल बघितला
आम्ही पण लिओ काल बघितला नेटफ्लिक्स वर हिंदीत..
लेकाला पाहायचा होता, फार दिवसापासून चाललं होतं त्याचं माझ्या या मित्रानं थिएटरमध्ये पाहिला..त्याने पण पाहिला...मग आम्ही काल बघितला आणि पूर्ण सिनेमा भर त्याला काय रे रेहान, हा सिनेमा पाहायचा होता तुला?काय आहे यात ?नुसती मारधाड?लहान मुलांसाठी च सिनेमा तरी आहे का तो वगैरे वगैरे.. असं विचारून भंडावून सोडलं..सिनेमा संपला आणि लेक शांत
नाही बघितला तरी चालेल...
मला ते ट्रेलर आणि कलाकार
मला ते ट्रेलर आणि कलाकार बघूनच समजले की हे प्रकरण असलेच असणार... सरळ पुढे गेलो
आय बी ७१ बघीतला
आय बी ७१ बघीतला
विद्युत जाम्वाल पहिल्यान्द acting करताना दाखव्ला
थिक ठाक वाटला
सूखी बघते आहे. पण पूर्ण करवत
सूखी बघते आहे. पण पूर्ण करवत नाहीये. काय त्या शिल्पा शेट्टीचे अॅक्टिंग. म्हणजे ठिकठाकच आहे. पण मला तिचे नाक बघवत नाही.
मला तिचे नाक बघवत नाही.>>>
मला तिचे नाक बघवत नाही.>>>
) मुरडताय
अहो किती हजारो $$ लागलेत त्या एका नाका वर, काय तुम्ही नाक (
नेपोलियन, लिओ दोन्ही पाहणार
नेपोलियन, लिओ दोन्ही पाहणार होतो
लिओ लेकाबरोबर पाहायचा प्लॅन केलेला.
आता दोन्हीवर काट
प्राइम वर वुडी अॅलनचा मॅन
प्राइम वर वुडी अॅलनचा मॅन हॅटन नावाचा सिनेमा पाहिला. जबरद्स्त हह पुवा डायलॉग आहेत. साधीशीच कथा. पण लेखन व अॅक्टिन्ग ने फुलवली आहे. मारधाड, खून नाही. इंग्रजी भा षा प्रेमिकांना आव्डेल.
सुखी मध्ये तिला नक्की काय
सुखी मध्ये तिला नक्की काय त्रास असतो हेच मला कळलं नाही....आई वडील छान समजूतदार असताना पळून जाऊन लग्न का करते? आता लग्न केलच पाहिजे अशीही काही परिस्थिती नसते...ती साधारण दोन दिवसांसाठी बाहेर जाते..दोन दिवसांचे ५ दिवस होतात..त्यात तिचा नवरा आणि मुलगी आभाळ कोसळ्ल्यासारख का करतात तेही नाही झेपलं..तिच्या मैत्रिणी पण अजब....शिल्पा शेट्टी मात्र फारच विचित्र दिसते..फारच...
त्यात तिचा नवरा आणि मुलगी
त्यात तिचा नवरा आणि मुलगी आभाळ कोसळ्ल्यासारख का करतात तेही नाही झेपलं..>>>+ १ दोन वेळचा जेवणाचा डबा लावला तरी सगळे प्रश्न सुटतील.
आम्ही पण लिओ काल बघितला
आम्ही पण लिओ काल बघितला नेटफ्लिक्स वर पण animated वाला
लहान मुलान्बरोबर बघावा असा आहे.
मस्त आहे ..मुझिकल आहे थोडा.
लिओ नावाचे दोन मुव्ही आलेत का
लिओ नावाचे दोन मुव्ही आलेत का सेम टाईंम?
मी पण तो लहान मुलांचा अॅनिमेटेड पाहिला. फार आवडला.
.शिल्पा शेट्टी मात्र फारच विचित्र दिसते..फारच...>+++११
कॉलेज मधे दाखवायचं तर कसले ते टॅकी कपडे, पिवळे, हिरवे, केसांच्या रिबिनी काय. तिने स्वतःसाठी स्वतःच डायरेक्ट केलेला मुव्ही वाटतो तो.
आयपीटीव्हीवर थ्री ऑफ अस बघितला. फार सुंदर घेतलाय.
शेफाली छाया आणि जयदीप अहलावतचा शेवटचा जत्रेतल्या पाळण्यातला सीन हायलाईट आहे एकदम.
शिल्पा शेट्टी मात्र फारच
शिल्पा शेट्टी मात्र फारच विचित्र दिसते..फारच...>+++११
कॉलेज मधे दाखवायचं तर कसले ते टॅकी कपडे, पिवळे, हिरवे, केसांच्या रिबिनी काय. तिने स्वतःसाठी स्वतःच डायरेक्ट केलेला मुव्ही वाटतो तो.>>> तसेही असू शकते, नवरा प्रोड्युसर आहे तिचा.
फुक्रे३ - बघितला. ये क्या बवासिर बना दिये हो- ह्या डायलॉग ची आठवण आली. अली जफर हुशार असल्याने तो ह्यात नाहिये, सल्लु सारखा दिसणारा दुसरे काम नसल्याने ह्यात असावा. पं. त्रिपाठी ला वाया घालवलेय.
ह्या भागात फारसे काही वेगळेपण नाहिये.. तोच जुना फोर्म्युला आहे, भोली चे २ बॉडी गार्ड कधी कधी हसवतात. नाही बघितलात तरी चालेल. बराच इतर माल आहे ओटीटी वर. 
चुचा हसवतोच & सरदार जी पण हसवतो
फुक्रे आणि ड्रीमगर्ल या
फुक्रे आणि ड्रीमगर्ल या चित्रपटांचे ट्रेलर बघूनच समजले होते की यांचा नादाला लागायचं नाही... आतापर्यंत ज्यांच्याकडून या चित्रपटाबद्दल ऐकले आहे त्यानी हा अंदाज खाराच ठरवला आहे..
Princess Bride ३-४थ्या वेळेस
Princess Bride ३-४थ्या वेळेस पाहिला. एकदम भारी सिनेमा. बालिश आहे, टिपिकल गोष्ट, तरी एकदम भारी.
या वेळेस बघताना अचानक दचकून साक्षात्कार झाला की ह्यातली प्रिन्सेस म्हणजे हाऊस ऑफ कार्ड्स मधली क्लेअर अंडरवूड आहे !
>>>>>अहो किती हजारो $$ लागलेत
>>>>>अहो किती हजारो $$ लागलेत त्या एका नाका वर, काय तुम्ही नाक ( Lol ) मुरडताय
बाप रे असेलही. पण काय ते फेंदरं नाक.
Princess bride cult movie आहे
Princess bride cult movie आहे.
मला तो Montoya cha dialog लक्षात आहे -
Hello. My name is Inigo Montoya. You killed my father. Prepare to die.
शिवाय - you cannot kidnap something I have rightfully stolen.
Claire केवढी लहानगी वाटते या movie मध्ये.
Hey! Sinamika चित्रपट पाहिला.
Hey! Sinamika चित्रपट पाहिला. दुलकर सलमान होता. त्याचे बरेच चित्रपटात त्याचे कॅरेक्टर असे असते जे मला माझ्याशी रीलेट होते. त्यामुळे तो आवडतो मला. यातही तसेच झाल्याने पिक्चर आवडला. सुरुवातीला अर्धा पाऊण तास मात्र संयम बाळगावा लागेल. थोडा आचरटपणा सहन करावा लागेल.
ऋन्मेष कशा वर पाहिलास? मला ही
ऋन्मेष कशा वर पाहिलास? मला ही पहायचाय पण युट्युब वर असून सबटायटल्स नाहीत.
मला माझ्याशी रीलेट होते>>> सगळ्यात कसं स्वतःला पाहतोस रे?
आशु. नेटफ्लिक्स वर आहे हिंदी
आशु. नेटफ्लिक्स वर आहे हिंदी वर्जन चेक करा... सबटायटल कशाला हवेत.
सगळ्यात कसं स्वतःला पाहतोस रे?
>>>>>
अहो खरेच.
मी आताच माझ्या एका एक्स ग'फ्रेंडला खालील मेसेज टाकून हा पिक्चर सजेस्ट केला
--------------------
नेटफलिक्स वर Hey Sinamika नावाचा पिक्चर आहे. (चेक हिंदी वर्जन)
डूलकर सलमान आहे. त्याच्या बरेच चित्रपटात त्याचे जे character असते ते मला माझ्याशी रिलेट होते असे वाटते. त्यामुळे तो आवडतो. यातही असे वाटल्याने पिक्चर आवडला.
हाऊस हसबंड दाखवला आहे, न लाजता घरकाम करणारा, पैसे किंवा भौतिक सुखांची आवड नसणारा, करीअर ऐवजी रिलेशनला प्रायोरिटी देणारा, एका सीनमध्ये बिनधास्त बायकोचा ड्रेस घालून फिरणारा.. प्रेम करणारा पण खूप बोलणारा आणि त्यामुळे बायकोचे डोके आणि स्पेस खाणारा.. पण चूक लक्षात येताच ती सुधारून स्पेस देणारा.. भांडून देखील तिच्यावरच प्रेम करणारा.. वगैरे वगैरे..
काही गोष्टी इतक्या रीलेट झाल्या की शेअर करावे असे वाटले. वेळ काढून जरूर बघ.
अर्धा पाऊण तास जरा आचरट वाटेल. पण संयम बाळगून पूर्ण बघ. पुढे छान आहे. प्रेम असते तिथे नेहमी Happy ending होते
मस्त कॅरॅक्टर आहे दु.स. चे.
मस्त कॅरॅक्टर आहे दु.स. चे. तो दिसलाय ही भारी. नक्की बघणार.
Pages