चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण काय ते फेंदरं नाक.>>>
दुसऱ्याच्या नाकावर अशी कमेंट करणे is so mean.

>>>>>>>>दुसऱ्याच्या नाकावर अशी कमेंट करणे is so mean.
मीन तर मीन. दिसण्याबद्दल, प्रसिद्धी हवी असेल तर टीकाही येणारच.

लिओ हा एक तामिळ सिनेमा आहे आणि LCU चा भाग आहे. जसा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे तसा लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स नावाने Lokesh Kanagaraj या दिग्दर्शकाने केला आहे . यात कमल हसन चा विक्रम पण आहे . इकडची पात्र तिकडे आणि कथानकं जोडून नवीन नवीन सिनेमा येतात . माझा भाऊ साऊथ इंडस्ट्री ला खूप follow करतो ..त्यानेच मला हे सांगितलं . खूप चालतात हे सिनेमे तिकडे.

आपल्याकडे देखील टायगर पठाण सुरू झाले आहे.
तिथल्या तिथल्या कलाकारांची क्रेझ असते त्यामुळे चालतात हे पिक्चर.. इतर लोकांना नाही झेपणार..

@नेटफ्लिक्स-
डाऊनसाईझिंग
Matt Damon, Hong Chow
पृथ्वीवरील रिसोर्सेस कमी पडायला आले आहेत म्हणून एक नॉर्वेजियन सायंटिस्टने मनुष्याला पाच सेंटिमीटर एवढ्या आकाराचे करायचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही वाट बऱ्याच जणांनी निवडली आहे व ते त्यांच्या स्मॉल वसाहतीत जगत आहेत. मॅट डेमन व त्याची बायको हे करायचं ठरवतात. मग तो वसाहतीत येतो तिकडेही त्याला जी सोशल लॅडर बघायला मिळते, तिथे एक आर्थिक स्थिती वाईट असणारी अपंग मेड भेटते. तिचं सोशल वर्क बघून तो तिच्या प्रेमात पडतो व नॉर्वेला जातो. दोघांनीही सुरेख काम केले आहे. ती तिच्या उच्चारांमुळे व एकंदरीत इंग्रजीमुळे फारच धमाल बोलते. एकदा बघण्यासारखा आहे. जुना आहे पण आता आला आहे नेटफ्लिक्सवर.‌

The Guernsey Literary and Potato Peel Pie Society
Lili James, Mathew Goode, Michiel Huesman
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे ब्रिटिश आयलन्ड नाझींच्या ताब्यात गेले होते तेथील लोकांचे जनजीवन कठीण असताना ते कसे मन रमवायचे याची गोष्ट आहे. रोमॅन्टिक सिनेमा आहे. नाझींनी शेतीचे सगळे धान्य व डुकरं पकडून नेल्याने त्या गावातील लोकांना फक्त बटाटेच खायला उरतात. आपल्याला जशी पुरणपोळीची आठवण येऊन आपण उसासे टाकू तसं हे डुकराचे पदार्थ आठवून उसासे टाकतात. मग खाण्यात वैविध्य राखण्यासाठी तेथील पोस्टमास्तर बटाट्याच्या सालीचा pie तयार करतो व त्यांचा एक ग्रुप चोरून बुक क्लब लपतछपत बनवून तेथे भेटत असतात व हा pie चवीला किती वाईट आहे हे बोलत हसत असतात. वल्नरेबल काळात हे आपापली 'ऊब' कशी शोधतात हे छान दाखवले आहे. अशाच एका लेखिकेला तिचं पुस्तक वाचून पत्र पाठवतात, मग ती चक्क यांना भेटायला येते. तिचं उच्चभ्रू आयुष्य व ह्याची सांगड कशी घातल्या जाते, तिचं लग्न ठरलेलं असतं वगैरे. पुढे काय काय घडते ते हिंदी सिनेमा बघणाऱ्यांसाठी थोडे प्रेडिक्टेबल आहे. तरी बरा आहे सिनेमा. पिरिअड ड्रामा आहे.

------
या बायका/पोरी कधीही, कुठल्याही काळात, कुठलेही मरायटल स्टेटस असून युरोपातल्या कोणत्याही छोट्या- रमणीय गावात गेल्या तरी त्यांच्यासाठी ध्रूवताऱ्यासारखा एक पर्फेक्ट सिंगल -कष्टाळू- साधा -प्रेमळ - लागलंच तर सिंगल डॅड व मुख्य म्हणजे अतिशय देखणा तरुण तयारच असतो. Proud
दरवेळी 'तनु वेड्स मनु-२' मधला 'हम कंधा है तनुजीका' आठवतं.

शाऊटआऊट टू रमड -डाऊनसाईझिंग Happy
पिप्पा व लिओ वरचे सगळे प्रतिसाद वाचले. 'पिप्पा'वरून मला डचेसची लहान बहिण पिप्पा मिडलटनच आठवते आहे. ती आणि तिचे झगे फारच फेमस होते ताईडीच्या लग्नात..!

>>>>>>>नाकावर कॉमेंट करू नये. Mean असतं ते. जातीवरून हिणवावं. Progressive असतं ते Happy
हाहाहा

मिशन राणीगंज Netflix वर आला
लगेच बघितला. छान आहे. तुम्हीही बघून घ्या.
खाणीत कामगार अडकल्याने काला पत्थर आठवला. पण तो वेगळ्या शैलीचा पिक्चर होता. त्यात बचावकार्याचे डिटेल कमी आणि बच्चनगिरी जास्त होती.
हा थायलंड caves rescue डॉक्युमेंटरीची आठवण देणारा होता. पंधरा मिनिटात विषयावर येतों. उगाच फाफट पसारा नाही. पण पुरेसा ड्रामा सुद्धा आहे. आवडला.

या बायका/पोरी कधीही, कुठल्याही काळात, कुठलेही मरायटल स्टेटस असून युरोपातल्या कोणत्याही छोट्या- रमणीय गावात गेल्या तरी त्यांच्यासाठी ध्रूवताऱ्यासारखा एक पर्फेक्ट सिंगल -कष्टाळू- साधा -प्रेमळ - लागलंच तर सिंगल डॅड व मुख्य म्हणजे अतिशय देखणा तरुण तयारच असतो.
>>>>
अगदी अगदी….…सिंगल/सिंगल डॅड (आणि त्याचं अजिबात आगाऊ नसलेलं गोंडस पोरगं ॲज अ बोनस)/लास्ट रिलेशनशिपमधे धोका मिळाल्यामुळे दुःखी/बाईसाठी सदैव सेवेसी तत्पर समजूतदार वगैरे वगैरे

असल्या मुव्हीज/सिरीजवर बंदीच घातली पाहिजे.

दरवेळी 'तनु वेड्स मनु-२' मधला 'हम कंधा है तनुजीका' आठवतं.
>>>> तो ‘तनुजी का कंधा’ वाला इब्लिस आहे.

पिप्पा'वरून मला डचेसची लहान बहिण पिप्पा मिडलटनच आठवते आहे.>>> मलाही…. उगीचच लोकांनी तिचं नी हॅरीचं सूत जुळलं किंवा तो तिच्याकडे पहात होता वगैरे उडवलेल्या वावड्याही आठवतात.

उगीचच लोकांनी तिचं नी हॅरीचं सूत जुळलं किंवा तो तिच्याकडे पहात होता वगैरे उडवलेल्या वावड्याही आठवतात.
>>> 'हम आपके है कौन' सुरू केला होता, पण वेळीच बंद पडला. Happy

तो ‘तनुजी का कंधा’ वाला इब्लिस आहे.>>> तनुजीला सेवेस तत्पर अनेक 'कंधे' आहेत.
अजिबात आगाऊ नसलेलं गोंडस पोरगं >>> Lol बाबांचं बाशिंग घेऊन तयार असतं.

To All the Boys (franchise) - Netflix
To All the Boys I've Loved Before (2018)
To All the Boys: P.S. I Still Love You (2020)
To All the Boys: Always and Forever (2021)

लारा जीन कोवे तिला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आवडलेल्या 5 मुलांना पत्र लिहिते (प्रत्येकाला एक), पण त्यांना पत्र कधीच पाठवत नाही.
तिची छोटी बहीण किट्टी एके दिवशी लाराच्या नकळत ती 5 letters त्या 5 मुलांना परस्पर पाठवून देते आणि मग त्यातून होणारे confusions आणि गमती जमती. Teen drama आहे. जर RomComs बघायला आवडत असतील तर नक्की बघा.

Read review of the movie Animal. Some of the language is so dirty in that movie and they have objectified women to n'th degree. Horrible.

थँक्यू थँक्यू अस्मिता! मी वाटच पाहत होते की कोणीतरी या पिक्चर बद्दल काहीतरी सांगेल. Happy मी अर्धा पिक्चर पाहिलाय. तुझा रिव्ह्यू वाचून तो पूर्ण करावासा वाटतोय. बाकी ती मेड खरंच भारी आहे Proud

animal: झकास आहे. फेक फेमिनिस्ट लोकांना काही गोष्टी खटकल्यात पण एवढं विशेष काही वाटलं नाही. दिमरीऐवजी बॉबीला जरा जास्त स्क्रीनटाईम द्यायला हवा होता. चित्रपट बराच मोठा आहे, पण कंटाळा फक्त दिमरी एपिसोडमध्ये येतो जरा. सेक्स सीन आहे. मुके पण भरपूर आहेत. अडरेनलिन रश भरपूर.

अ‍ॅनिमल चं परीक्षण पाहिलं. ज्या कारणांसाठी बघा म्हणून सांगितलंय त्यातल्या गँग्स ऑफ वासेपूरला लाजवेल असा हिंसाचार, स्त्री पात्राला बूट चाटायला लावणारे आक्षेपार्ह सीन्स आणि काहीच्या काही सेक्स सीन्स मुळेच न बघायचं ठरवलंय. फॅमिली सोबत बघण्यासारखा नसून तीन दिवसात २०० कोटी रूपये कमावले हे नवल आहे. बाकि प्रथमेश फाळकेची वेगळी शैली आहे.

हिंसाचार आवडत नसेल तर माहेरची साडी किंवा माझा छकुला बघा असा रिव्ह्यू मायबोलीवर लिहीला असता तर पिसं काढली गेली असती.
https://www.youtube.com/watch?v=FiQVKuSslBc

या वयातले तरूण ज्यांच्या घरात टीन एजर मुलं आहेत त्यांची मानसिकता लक्षात घेऊ शकत नाहीत. गँग्ज ऑफ वासेपूरचा हिंसाचार हा त्या कथेत चालून गेला.कबीर सिंग किंवा अ‍ॅनिमल सारखे सिनेमे टीन एजर्स वर परिणाम करू शकतात असे वाटते.

ओह.अजिबात बघणार नाही.आमचा एक ऑफिस इंटर्न आहे तेलुगू त्याने खूप स्तुती केली होती.म्हणजे अजून त्याने पाहिला नव्हता, पण 'बाप मुलाच्या नात्याचे उत्कृष्ट चित्रण','माझ्या आवडत्या उत्कृष्ट दिग्दर्शकाचा चित्रपट' असे वर्णन केले होते, रात्री पाहणार होता.
एकंदर आता हिंसाचार, डिझास्टर मधून सुटका, आणि रॉकी रानी टाईप प्रेमकथा या सगळ्याचा वैताग आला आहे.आता एक नवा znmd टाईप डोक्याला ताप नाही पिक्चर बनावा चांगला.ह्रितिक हवाच.पण त्याने विमानातून जीप, समुद्रातून विमानात उडी, 50 माणसे मारणे यापैकी कोणतेही उद्योग करू नयेत.

एकंदर आता हिंसाचार, डिझास्टर मधून सुटका, आणि रॉकी रानी टाईप प्रेमकथा या सगळ्याचा वैताग आला आहे. >>+१

Why Are Women Used As S*x Objects? | RAAAZ Hindi Video ft. @AyushiMathur
https://youtu.be/LKiOak46ywo?si=IGTlzG72MInCp4Er
सर्वांनी जरुर बघा, मला फारच चपखल वाटलं. कबीर सिंग वरून आठवलं.

सुचारिता त्यागी म्हणून रिव्ह्युवर आहे. तिचा rivhyu- कबीर सिंघ
https://youtu.be/C-lRyevxevA?si=TfEImc4Eymfv57kj

Animal
https://youtu.be/5pKYDVIPwh0?si=tORHgPQ_1xLjqFNQ

अनीमल काय आणि कबीर सिंह काय. त्या सिनेमांत स्त्रियांबद्दल संवाद अगदी म्हणा, हिंसा म्हणा अगदी स्पष्ट दाखवली आहे. तरीही फेक फेमिनिस्ट वैगरे शब्द फेकणे म्हणजे कांगावा आहे. हे काही फेमिनिस्ट थियरी लाऊन खूप किस पडून हा सिनेमा स्त्रिद्वेश्टा आहे असे लावलेले लेबल नाहीये. सिनेमा आपला स्त्रिद्वेश लपविण्याचा किंचितही प्रयत्न करत नाही. अशा वेळेस फेक फेमिनिस्ट वैगेरे म्हणणे शुद्ध gaslighting आहे.

कॉमी , सुचरिताचा व्हिडिओ आवडला. Thanks for sharing !
अशा वेळेस फेक फेमिनिस्ट वैगेरे म्हणणे शुद्ध gaslighting आहे.>> Happy

Why Are Women Used As S*x Objects? | RAAAZ Hindi Video ft. @AyushiMathu >>> चांगला व्हिडीओ आहे. सुरूवातीचे स्क्रीन टाईम स्टॅटिस्टिक्स आधी पटले नाही. पण नंतर त्याचा रिलेव्हन्स लक्षात आला. चित्रपटाचा समाजमनावर परिणाम होत नाही हे पटत नाही. परिणाम होतोच.

Animal is one time watch. First half is very good but second half drags a bit. But overall ok movie. Much better than Jawan. Violence is too much so if you don't like it don't watch. Ranbir Anil, bobby acted superbly. Bobby should have given more screen time.

कबीर सिंग चांगला होता.
कथेच्या नायकात बरेच दुर्गुण दाखवले होते. पण त्यामुळे त्याची कशी वाताहत होते हेच दाखवले होते.
म्हणजेच दुर्गुणांचे उदात्तीकरण नव्हते.
अन्यथा चित्रपटात हिरो स्टाईल म्हणून ऐटीत दारू सिगारेट पिताना दाखवतात ते मला उदात्तीकरण वाटते. त्याने पब्लिक इंप्रेस होत अनुकरण करते.

मी सुद्धा कबीरसिंग बद्दल वाईट साईट ऐकून बराच लेट पाहिला.
पण जेव्हा बघितला तेव्हा त्यावर धागा काढलेला.
म्हणजे मला तरी तो चित्रपट बघितल्यावर आयुष्यात, किंवा नात्यात कसे वागू नये हे समजले होते. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

Animal मात्र ट्रेलर बघूनच बघायची इच्छा होत नाही. मला पठाण, जवान सारखी action आवडते पण हिंसाचार नकोसा वाटतो. झिम्मा सारखा हलकाफुलका मनोरंजक असेल तर डोळे झाकून जातो.

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2023 - 00:40

हा जो आयडी आहे तो नेहमी मायबोली वरच्या सेन्सीबल मतांना वेड्यात काढतो. इथे काळजी घेतली तरी मागचा इतिहास पाहिला तर कळते. कबीर सिंग पाहून काय करू नये हे कळत असेल तर या आयडीने आपल्या मुलांना पॉर्न फिल्म्स आतापासूनच दाखवाव्यात. कबीर सिंग सारखे विकृत सिनेमे नियमित दाखवावेत म्हणजे काय करू नये हे त्यांनाही समजेल. माफ करा कुणाच्या मुलांबद्दल असे लिहू नये. पण नाईलाज झाला.

आयडीने आपल्या मुलांना पॉर्न फिल्म्स आतापासूनच दाखवाव्यात. कबीर सिंग सारखे विकृत सिनेमे नियमित दाखवावेत म्हणजे काय करू नये हे त्यांनाही समजेल
>>
काहीही कमेंट आहे
वय आणि कंटेंट याची सांगड कधी घालणार? की गोष्टी फक्त लहान मुलांनाच समजावयाच्या असतात?
कबीर सिंग हा सेन्सॉर नी प्रौढांसाठी पास केला होता. पॉर्न पण १८+ च असतं. ते मुलांना दाखवा म्हणण्यात काय लॉजिक?
कार चा ब्रेक कसा लागतो हे मुलांना समजायला काय तुम्ही त्यांना लहान वयात कार चालवायला द्या म्हणणार का?
वयानुसार प्रगल्भता येते, आवड निवड तयार होते. त्यानुसार जो तो आपापल्या दृष्टीकोनातून आणि जवाबदारी वर निर्णय घेतो.

जनरली मला ऋ ची मतं पटत नाहीत, पण म्हणून त्याला मतं असूच शकत नाहीत / त्यानी व्याक्तंच होऊ नये असं मी म्हणणं जसं चूक आहे, तसंच मला कबीर सिंग विकृत वाटतो अन् आवडत नाही म्हणून सगळ्यांना तसंच वाटावं किंवा कबीर सिंग सारखा सिनेमाच बनवू नये म्हणणं ही चूक च.
तुम्हाला नको, नका बघू...

Pages