Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Fair Play मलाही आवडला .
Fair Play मलाही आवडला .
पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहीली होती. पहिल्यांन्दा वाटलं टिपिकल फिमिनेझम च्या मार्गाने जाईल , नंतर वाटलं काहीतरी वेगळ्या वाटेवरून जाईल , मग वाटलं he will fight back .
सुरवातीला त्याचा राग येत नाही , त्याच वागणं justfied वाटतं , काही वेळेला त्याच बोलणं योग्य वाटतं - dress like cupcake .
everybody is grey here . शेवटी अर्थात एमिली चा उद्रेक योग्य आहे . background music is haunting .
'जाने जा' चे सादरीकरण आवडले.
'जाने जा' चे सादरीकरण आवडले. मूळ कादंबरी 'डिव्होशन ऑफ सुस्पेक्ट x ' भन्नाट आहे. त्या कथानकाचे हे भारतीय adaptation आवडले. लेखक Keigo Higashino च्या इतर कादंबऱ्या देखील अफलातून आहेत. त्या निव्वळ क्राईम थ्रिलर लिहायचे म्हणून 'घडवलेल्या' घटना न वाटता कथानकाचा अंगभूत भाग वाटतात.
'Arrival' सिनेमा ज्या कथेवर
'Arrival' सिनेमा ज्या कथेवर आधारित आहे ती 'Story of your life ' आणि तो कथासंग्रह अतिशय वाचनीय आहे. सिनेमा संथ असल्यामुळे इतकी पकड घेत नाही पण कथेतील concepts सायन्स फिक्शन असले तरी विश्वसनीय वाटतात.
फेअर प्ले मला आवडला.
फेअर प्ले मला आवडला. इन्वेस्टमेन्ट बँकिंग मधले टेन्स , कॉम्पिटिटिव वर्क एन्वायर्न्मेन्ट आणि कलिगशी सीक्रेट रीलेशनशिपमुळे झालेला स्ट्रेस. यात बरेच सेक्स सीन्स असले तरी ते जसे घेतले आहेत ते त्यांच्या रीएलेशनशिपच्या प्रत्येक वळणाबद्दल बरेच काही सांगून जातात त्यामुळे फार इम्पॅक्टफुल होतात. मला एन्डिंग आवडले. गुड फॉर हर, पण इथे सगळेच ग्रे आहेत. एकूण त्या सिचुएशन मधे तिच्याऐवजी तो असता तरी थोड्या फार फरकाने हेच झाले असते असेही वाटले. असो फार लिहीत नाही.
फेअर प्ले बघायचा आहे.
फेअर प्ले बघायचा आहे.
बघितला... फेयर प्ले.. का
बघितला... फेयर प्ले.. का बघितला असे झाले.. अचानक संपतो.....हॉलिवूड अभिमान आहे... टाईम वेस्ट... सेक्स सीन्स भरपूर आहेत...
माझी डिसपोइन्टमेन्ट झाली कारण मी थ्रिलर एक्सपेक्ट करत होतो.. हा drama निघाला...
ड्रामा आणि इरॉटिक थ्रिलर
ड्रामा आणि इरॉटिक थ्रिलर म्हटलंय.
नीलावेलिचम पाहिला. एकदम सपाट
नीलावेलिचम पाहिला. एकदम सपाट चित्रपट.
बरोबर आहे र आ..काहीच नाही
बरोबर आहे र आ..काहीच नाही नीलवेलीचममधे..आता हिंदी डब्ड दिसतोय..मी मल्याळम मधे पाहिलेला..
मी पाच मिनटं बघितला फेयर प्ले मग बंद केला..
Revenge बघितला नेटफ्लिक्सवर.. खतरनाक वायोलंस, क्राईम थ्रीलर आहे.
Omg2 बघितला..ठिक आहे..पंकज त्रिपाठी मस्त.. यमी गौतमी क्रुत्रिम अभिनय.. पहिला पार्ट जास्त चांगला आहे.
फेअर प्ले आवडला !
फेअर प्ले आवडला !
कोण कुठे चूक कुठे बरोबर यापेक्षा सादरीकरण आणि टिपिकल ‘सो कॉल्ड प्रोग्रेसिव’अमेरिकन मेन मेन्टॅलिटी ज्या प्रकारे बदलत जाते ते मस्तं दाखवलय , ब्रिजरटनच्या ड्युकच्या नाजुक फेमिनिन बाहुलीला इथे मस्तं पॉवरफुल रोल मिळालाय !
चांगला केलाय तिने एमिलीचा ऱोल !
डेथ इन वेनिस पहायला सुरू केला
डेथ इन वेनिस पहायला सुरू केला. नॉट माय टाईप म्हणून बंद केला.
कॅमेरा मस्त आहे. दूरदर्शनवर इंग्लीश मालिका लागायच्या तेव्हां त्यातल्या केबिन्स, रूम्स बघून चक चक चक करायचो ते आठवलं.
बाहेरून आल्यावर ओव्हरकोट, टोपी टांगायचं स्टँड आपल्याकडे असायला पाहीजे असं वाटायचं.
आपल्याकडे आराधना हिट होत असताना असे विषय युरोपात हाताळले जात होते.
म्रु , पहिल्या 5 min. मध्ये
म्रु , पहिल्या 5 min. मध्ये सगळ गुडी गुडी आहे. जरा नेटाने बघ पुढे
.
Once upon a Star पाहिला, थाई
Once upon a Star पाहिला, थाई आहे (नेफ्ली). टुरिंग थेटर आणि डबिंग आर्टिस्ट ह्यावर आहे, १९७० चा काळ दाखवला आहे. Mitr Chaibancha ला tribute आहे. आवडला. उत्तम अभिनय सर्व कलाकारांचा. पण खूपच मोठा आहे, अजून अर्धा तास कमी चालला असता.
Lucid dream कोरीयन सबटायटल्स
Lucid dream कोरीयन सबटायटल्स नेटफ्लिक्सवर.
एक छोटा मुलगा अम्युझमेन्ट पार्क मधून वडिलांच्या डोळ्यासमोरून बघता बघता गायब होतो (किडनैप होतो) ..कोण कुठुन आलं? कसा किडनैप झाला काहीच क्लू लागत नसतो... नायकाला lucid dream चा शोध लागतो ज्याच्या द्वारे स्वप्नात पुन्हा त्या क्षणात जाऊन क्लू मिळवता येतील मुलाला शोधायला...दहा मिनटाच्या वर स्वप्नात राहता येणार नाही.. सारखं सारखं स्वप्नात जाता येणार नाही.. साईड इफेक्ट्स आहेत त्याचे... तर नायक मुलाला कसा शोधणार पहा सिनेमात.. इन्सेप्शन ची आठवण येऊ शकते..याची स्वप्ने त्याची स्वप्नं.. नक्की कुणाच्या स्वप्नात कोण असतं...गोंधळ होऊ शकतो म्हणून एकाग्रतेने हा सिनेमा पाहावा..चांगला आहे..आवडला..
सोर्स कोड सारखा वाटतोय…
सोर्स कोड सारखा वाटतोय…
ने फी वर jemini man बघितला !
ने फी वर jemini man बघितला !
स्नायपर मूव्ही मला जरा जास्तच आवडतात , विल स्मिथ हा अमेरिकन डि आय ए साठी काम करणारा कॉन्ट्रॅक्ट किलर दाखवला आहे , त्याला वाटत असते हे काम करून तो देशसेवाच करत आहे . पण एका केस मध्ये त्याला कळते डी आय ए जगभरातील निरपराध उद्योगपतींना मारण्याचे काम त्याच्याकडून करुन घेत आहे .
मग तो रिटायर्ड मेंट च्या नावाखाली काम बंद करतो तर विल स्मिथ ला मारण्यासाठी डी आय ए दुसऱ्या एजंटला पाठवते!
कथेचा मुख्य सार असा छोटासा आणि मूव्ही पण इतका खास नाही वाटला तरी नेफी वर ट्रेडिंग ला आहे .
नेफिवरील reptile मूव्ही छान
नेफिवरील reptile मूव्ही छान आहे !
तरुण इस्टेट एजंट चा खून होतो , त्याचा तपास करणाऱ्या वयस्कर ऑफिसर चे मस्त काम झाले आहे .
अगदी हॅरिसन फोर्ड ची आठवण यावी .
सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.....
लोकेशचा म्हणून leo बघून आलो.
लोकेशचा म्हणून leo बघून आलो. त्यातल्या तरसाने मुख्य hero म्हणजे विजय पेक्षा सरस acting केली आहे.
Vijay is like the South
Vijay is like the South Indian version of Salman Khan. Dont expect any Oscar-worthy acting. It's mostly his hardcore fans who turn his movies into blockbusters.
Sorry marathi keyboard app has some issue.
https://youtu.be/1KpR3lzd9p4
https://youtu.be/1KpR3lzd9p4?si=jHWbXvQZIumq6UgA
Dasvidaniya यू ट्यूबवर suggestion मध्ये दिसला म्हणून पाहिला , खूप दिवसानंतर इतका हलकाफुलका सिनेमा पाहायला मिळाला !
विनय पाठक , सौरभ शुक्ला सारखे रथी महारथी मुळे स्पीड वाढवयाची इच्छा झाली नाही .
विनय ला पोटाचा कॅन्सर , कमी दिवस शिल्लक राहिलेले , मग आयुष्यभरात करायच्या राहिलेल्या गोष्टी त्या दोन तीन महिन्यात करतो.
सहकुटुंब पाहण्यासारखा उत्तम सिनेमा !
डिअर गुल्लू सुरू केलाय.
डिअर गुल्लू सुरू केलाय.
पूर्ण बघून होईल असे वाटते.
काल एक धमाल चित्रपट पाहिला…
काल एक धमाल चित्रपट पाहिला… ओळखा कोणता-
त्यातले हे गाणे-
You see the whole country of this system
Is just a position by the hemoglobin in the atmosphere
Because you are a sophisticated rhetorician
Intoxicated by the exuberance of your own verbosity
अमर,अकबर, ॲन्थनी
अमर,अकबर, ॲन्थनी
क्या बात… लाइक ऑप्शन असता -
क्या बात… लाइक ऑप्शन असता - लगेच लाईक टाकला असता…
तुम्हीच घ्या मनावर
तुम्हीच घ्या मनावर
खूपच कठीण प्रश्न !
खूपच कठीण प्रश्न !
Submitted by अजिंक्यराव पाटील
Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 October, 2023 - 11:02 >> +1
एक करोड द्या आता च्रप्स,
एक करोड द्या आता च्रप्स, व्हेन्मो, पेपॅल, ईमेल कसं पाठवता कळवा.
----------
ड्रीम गर्ल २ नेटफ्लिक्स
आयुष्मान खुराणा, अन्नु कपूर ,परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, अनन्या पांडे, असरानी, मनोज जोशी, राजपाल यादव, सीमा पहावा, विजय राज.
जमला नाही, फार कंटाळवाणा कधीमधी सवंग व ओढून ताणून वाटतो. ड्रीम गर्ल १ उथळपणाला 'खो' देऊन परत आला होता पण धमाल होता. मला आवडला होता, आयुष्मानला मध्यमवर्गीय पात्राचा विनोद सही सही पकडता येतो. जो उच्छृंखल असला तरी चलाख असल्याने उथळ वाटत नाही. इथे ती पकड सगळ्यांचीच सुटली आहे. परेश रावल किती दिवसांनी दिसला, बरं वाटलं पण भूमिका गुळमुळीत आहे. अन्नु कपूर अतिशय उत्तम काम करतो पण इथं लक्षात रहात नाही. तसं सगळ्यांनाच अनन्या पांडे चावली असावी, त्यामुळे एवढी तगडी स्टारकास्ट असूनही सर्वांचीच कामं विस्मरणीय झालीत. आक्षेपार्ह नोंद म्हणजे अन्नु कपूरचे पात्र कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मुलाला मुलगी करून बार गर्ल व्हायची गळ घालतो, नंतर हे प्रकरण उगाचच वाढवत नेले. बरं चीप तर चीप करकचून विनोद तरी करावेत तेही नाही, गाणी तर फारच बंडल. शेवटचं आयुष्मानचं 'प्यार तो प्यार होता है' हे सगळ्यांना दिलेलं प्रवचन तर काय होतं देव जाणे, सगळे माता का जाग्रण टाईप मान डोलावू लागले. एकता कपूरची निर्मिती असल्याने तिचा 'चीप मिडास टच' लागून बट्ट्याबोळ झालेला आहे. बघू नका/बघा.
'चीप मिडास टच' >>>
'चीप मिडास टच' >>>
काल ऑल्मोस्ट बघणार होतो पण पहिलाच पाहिलेला नाही त्यामुळे "पहिला आधी पाहू" या कारणाने अजून न पाहिलेल्या सिक्वेल्सच्या शेल्फवर ठेवला आहे. इक्वलायझर-२ ई सारखा.
ओह्ह.. हा शांतपणे झोप येत
ओह्ह.. हा शांतपणे झोप येत नसताना बघू म्हणून ठेऊन दिलेला की!
Pages