
नोव्हेंबर मधे मोठे लोक जन्म घेतात.
चाचा नेहरू नोव्हेंबरचे. इंदिराजी सुद्धा नोव्हेंबर मधल्या.
तसं तर ऑक्टोबर पण सेलेब्रिटींचाच.
स्टार ऑफ द मिलेनियम म्हणजे बिग बींचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. हे काहीच नाही पण हजबंड हंटर रेखाचा वाढदिवस सुद्धा १० ऑक्टोबरला असतो. वाढदिवस चिकटून यावेत आणि नेमके तेच दोघे बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल म्हणून चाहत्यांच्या हृदयात विराजमान व्हावेत हे सुद्धा आश्चर्यच ! कधी कधी अधून मधून अमिताभ आणि जया ही कायदेशीर जोडी आहे ही आठवण होते. म्हणजे माध्यमे करून देतात. म्हणजे जया बच्चन यांची चिडचिड झाली कि छापून येते कुठे तरी, मग आठवते, अरेच्चा ! ही तर बिग बीं ची बायको !!!
बिग बींचा विषय निघालाच आहे तर बघा एकाच घरात स्टार ऑफ द मिलेनियम आणि विश्वसुंदरी राहतात.
विश्वसुंदरीचा वाढदिवस एक नोव्हेंबरला असतो. तेव्हांच तिच्यावर लिहायचं होतं. हे असं दरवर्षी होतंं. पण इतक्या भावना दाटून येतात कि शब्द आकुंचन पावतात आणि मग काहीच लिहून होत नाही. अव्यक्ताचं व्यक्तीकरण कसं करायचं ? ते ज्यांना जमतं ते मग आपली होणारी बाब हिरावून नेतात. म्हणतात ना बोलनेवाली कि मिट्टी भी बिकती है...
ऐश्वर्या राय !!
बस नाम ही काफी है !
पण हे नाव घेतलं कि काही नावं आपसूकच आठवतात.
पहिलं म्हणजे सलमान खान. :रागः
हा सलमान खान माझ्या एका व्यवहारी जगातल्या क्रशला फार आवडायचा तेव्हांपासून मनातून उतरला. व्यवहारी जगत म्हणजे समजलंच असेल.
कारण विश्वसुंदरीने जो धक्का दिला त्याचा परिणाम अजूनही आहे. तर सलमान खान न आवडण्याची अनेक कारणे तेव्हांपासूनच्या युवकांकडे आहेत, तेव्हढीच कारणे तेव्हापासूनच्या युवा महिलांकडे सलमान खान आवडण्याची कारणे आहेत. फिमेल फॉलोईंगच्या जिवावर चित्रपट हिट्ट करणारा हिरो म्हटलं तरी चालेल. आणि फिमेल फॉलोईंग असले कि बाप्या लोकांची वरात आपोआपच निघते.
हम आपके है कौन बघताना एव्हढ्या काही वेदना झाल्या नव्हत्या. म्हटलं कर ना भाऊ काय रोमान्स करायचा तो माधुरी बरोबर. ते अनिल कपूर नाहीतर संजय दत्त म्हणून पाहून घेतील. आपल्याला काय त्याचं ?
अरे पण दगडी शरीराच्या ओंडक्या ! लाडातच आलास कि.
हम दिल दे चुके सनम मधे कुठलीही हिरॉईन असती तरी तो रोमान्स काळजाचा ठोका चुकवणारा होताच, इथे चक्क ऐश्वर्यासोबत दगड ! पिक्चरची स्टोरीच अशी होती कि कुठलीही हिरॉईन अशी दृश्ये देताना प्रेमात नाही पडली तरच नवल. यात तिची काहीच चूक नाही. चूक भन्साळ्याची आहे. मनिषा बिनिषा घ्यायच्या ना त्यात. तिला खामोशी द म्युझिकल मधे घेऊन सोडून दिली. बिचारी ना ना करते पाटा वरवंटा घेऊन फिरत बसली.
तर या दगडी पहिलवानाने ऐश्वर्या पळवली आणि त्याला शिव्याशाप न लागता उलट तो एकामागोमाग एक हिट देणारा सुपरस्टार झाला. पहिला शंभर कोटीचा स्टार, दोनशे कोटीचा स्टार, लागोपाठ नऊ चित्रपट शंभर कोटी क्लबमधे गेलेला एकमेव सुपरस्टार यामुळे आमीर खान मागे पडला. आमीर खान सुद्धा मुलींना आवडायचा. पण त्याने कधी आवडत्या हिरॉईनसोबत अफेअर केले नाही हे एक आणि दुसरे म्हणजे तो दगड नव्हता.
सिनेमे पण चांगले करायचा. अभिनय पण उत्तम असायचा. परफेक्शनिस्ट असल्याने येडपट खानापेक्षा तो नेहमीच आवडला. पण हे म्हणजे ज्यांच्याशी घेणं देणं नाही त्यातल्या एका पेक्षा दुसरा आवडण्यासारखं.. अगदी जेव्हां भाजप पहिल्यांदा सत्तेत आली तेव्हां नाईलाजास्तव अडवाणींपेक्षा वाजपेयी आवडायचे तसं. दगडापेक्षा वीट मऊ ही म्हण शब्दशः खरी ठरायची इथे.
दुसर्या एका क्रशला सनी देओल आवडायचा. ती सनी देओल चं कौतुक ताल सोडून करायची. मग क्रश बदलली. पण तिला सलमान आवडत होता. या क्रशना एखादा हिरो आवडलाच पाहिजे का ? पिक्चर मधला असल्याने परपुरूषावर भाळली असे पण म्हणता येत नाही. सिनेमे येण्या आधी नाही का बायका कृष्णाची मूर्ती ठेवत ? त्याला सगळं सांगत. सखा मानत. तो देव आहे म्हणून पुरूष मुकाट्याने सहन करत. म्हणजे मेंदू असा ट्रेन झालेला असे कि जिवंत पण सामान्य माणसाकडे बायकोने हसून पाहिलं कि अंगाचा जो तीळपापड होईल तो देवादिकाच्या बाबतीत होत नव्हता. आधुनिक काळात तेच स्थान चित्रपटातल्या स्टार्सना मिळालं. आपली क्रश, गफ्रे, बायको यांना स्टार आवडणे ही सामान्य बाब झाली.
पण नवर्याला एखादी हिरॉईन आवडते हे बायकांना चालत नाही.
त्यामुळे ही आवड बोलून दाखवता येत नाही. म्हणून अव्यक्त. तरी सुद्धा देहबोली म्हणा, डोळे म्हणा चुगली करतातच. त्यामुळे बायकांना बरोब्बर समजतं कि नवरोबाला ही हिरॉईन जास्तच आवडते.
नायिका आवडणे तशी सामान्य बाब आहे. म्हणूनच तिचा वाढदिवस लक्षात ठेवणे हे सुद्धा नॉर्मल आहे. काहींना हिरो आवडतात. त्यात आपला फायदा काय ? नायिका आवडत असली आणि ही आवड तिला समजलीच तर यदाकदाचित फायदा होईल. पण एखाद्या एखादा हिरो आवडतो ही आवड त्याला समजल्याने कोणते फायदे होत असतील ? सरळमार्गी लोकांना हा प्रश्न पडतो.
म्हणूनच ही आवड लपवण्यात अर्थ नाही. ती आवडते तर तिचा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे म्हणून एक नोव्हेंबरला तयारी केलीच होती. पण हाय रे रामा ! दुसर्या दिवशी लिहायचं तर मग या दिवशी कुणाचा वाढदिवस आहे का हे पण बघायला लागणार. मग त्याच्या विषयी एखादा शब्द लिहावा लागणार. असं कुणा कुणाबद्दल लिहीणार ? ते पण मनात नसताना ?
आपलं कसं फोकस्ड असतंय. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या आणि प्लान बी म्हणून सोनाली बेंद्रे. उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण हे प्लान सी , डी , ई, एफ तयार असणे हे असते. तसे मग इलियाना डिक्रूज, अनुष्का शेट्टी, अमृता राव, नेहा असे प्लान ठेवले होते. पण इतक्या वेळा अव्यक्त राहणं सोपं नाही.
खरं तर हे व्यक्तीकरण तसं पाणचटच. अर्थात या पांचटत्वाला काही कारण आहे. ज्याला पाणचट वाटतंय त्याने थांबलं तरी हरकत नाही, पण मग शेवटी नुकसान झालं तर सांगू नका.
दगडी सलमानचा एक काळ होता. त्या आधी सनी, जॅकीचा होता. अनिल कपूरचा होता.
नानाचा होता, पण अमिताभने जो काळ गाजवला त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तसा तो दुसरा सुपरस्टार !
पहिल्या सुपरस्टारची क्रेझ मात्र अमिताभपेक्षा जास्त. कदाचित फिमेल फॉलोईंग मधे राजेश खन्ना हा नंतर सुद्धा सलमान खान येईपर्यंत विक्रमादित्यच राहिला. मध्यंतरी आमीर खान नेक्स्ट डोअर बॉय बनला होता. पण अभिनयामधे हे सगळे अमिताभच्या आसपास सुद्धा नाहीत.
अमिताभची तुलना फक्त दिलीप कुमारशी होऊ शकते.
काय स्टायलिश लोक होते. स्टाईल मधे काका पण कमी नव्हता. त्याचा काळ असताना त्याचे मॅनेरिजम्स भुरळ पाडत. उगाच नाही आराधना सारखा सामान्य कथा असलेला सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला.
बघा, ऐश्वर्या रायच्या आठवणीने किती गोष्टींना उजाळा मिळाला.
ती होतीच विश्वसुंदरी आणि तिने राजघराण्यातच जायला हवं म्हणून गप्प बसलो.
आता राजघराण्याच्या जागी औद्योगिक आणि सेलेब्रिटी घराणी आली.
आजचे राजे म्हणजे अंबानी, अदानी किंवा बच्चन्स, कपूर्स , खान्स इत्यादी.
त्यातल्या अंबानीच्या घरात मुनीमांची टीना दत्त म्हणून गेली. मग ऐश्वर्याने बच्चन्स निवडले. नवरा काय नावाला कुणीही ठोंब्या असला तरी चालला असता. घराण्याचं नाव पाहिजे.
आपल्यासाठी या पर्याच. तिच्या सोबत रोमान्स करायचा तर मग कुणाच्यात तरी स्वतःला पहावं लागतं. तिथे पडद्यावर आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याला कोण चाललं असतं ?
जसं बिग बी म्हटलं कि रेखाच आठवतं तसंच ऐश्वर्या म्हटलं कि लोकांना ऋत्विकच आठवायचा. पूर्ण जगभरात हे दोघेही आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. खरे तर हिंदी सिनेमाला हृत्विक, ऐश्वर्या, आमीर आणि सलमान मुळेच इतर देशातले प्रेक्षक सुद्धा गांभीर्याने घेऊ लागलेत.
ऋत्विक मुळे रोशन्स हे घराणे सुद्धा एक नंबरला आले. जे जे अमिताभच्या काळात दहा , अकरा, बारा ते पुढच्या क्रमांकावरचे स्टार्स होते ते आपापल्या मुलांमुळे नावारूपाला आले.
जितेंद्राचा बोलबाला अमिताभच्या काळात राहिला आणि विनोद खन्नाचा पण. हे समांतर लोक. तसाच समांतर धरम पाजी. धरम पाजींचा नंबर कोणत्याही सुपरस्टारमुळे बिघडला नाही. उलट काकाचं सुपरस्टार पद एकाच वर्षी धर्मेंद्राचे नऊ सिनेमे हिट झाल्याने डळमळीत झालं. त्यातल्या चार पिक्चर मधे धरम पाजी चोर होते.
अमिताभ, जितूजी आणि विनोद खन्नाची मुलं त्यांना शोभेल अशी झाली नाहीत. उलट फ्लॉप स्टार्स म्हणून शिक्का बसला. पण जितूजींच्या मुलीने टिव्ही इंडस्ट्रीवर एकहाती राज्य केलं. धरम पाजींच्या मुलाने पुढचे सुपरस्टारपद पटकावले. पुढचा अँग्री यंग मॅन म्हणून सनी उदयाला आला. बिचार्याने काकी सोडून अफेअर्स नाही केली. नाहीतर अमिताभ रेखा सारखं त्याचंही नाव कुणासोबत जोडलं जायला हवं होतं. त्यामुळे त्याचं सुपरस्टार पद अपूर्ण राहिलं. याबाबतीत त्याने दक्षिणेच्या रजनीकांतचा आदर्श घेतला.
जे जे सुपरस्टार झाले त्यांनी सौंदर्याचा पराक्रम गाजवलेल्या कन्या पटकावल्या. रेखा जितूजी, निश्चलजी, विनोद मेहराजी करत करत बिग बीं कडे स्थिरावली. हेमा जितूजी, संजीवजी, गिरीशजी करत करत धरम पाजी़कडे स्थिरावली. पण हेमाच्या मुलींनी पण नाही काढलं. रेखाला तर मूलबाळच नाही. बिग बींचं सरकार फारच काळजीवाहू निघालं.
लॉटरी लागली राकेश रोशनला. बिचारा विनोद मेहराच्या ही नंतर नंबर लागेलसा हिरो. त्याच्या पेक्षा अभिनय न करणारा फ्रोजन खान जास्त हिट राहिला. त्याचाही मुलगा फारच दीनवाणा निघाला. आताशा वजन कमी झाल्याचे फोटो बघायला मिळाले. प्रति विनोद खन्ना म्हणून उदयास आलेल्या तंदुरूस्त ओबेरॉयचा पण विवेक काही काळ जागृत झाला. तो ही न आवडण्याचे कारण सलमानप्रमाणेच. आता बिचारा चरित्रपट करतोय. तो असाधारण कधीच वाटला नाही. एकदाच वाटला जेव्हां विश्वसुंदरीचं त्याच्या बरोबर अफेअर असल्याच्या बातम्या आल्या.
याच्या बरोबर ?
या झिपर्या बरोबर ?
शोभलं का गं तुला ऐश ?
अभिषेकचं एक ठीक आहे. त्याच्या सारखा भाग्यवान कुणी नाही. बायको आणि बाप प्रसिद्ध आणि कमावते असण्याचं भाग्य फार कमी लोकांच्या वाटेला येतं. त्यामुळे आपलं काम चाललं काय न चाललं काय, सगळं चालतंय.
हे असं होतं..
ऐश्वर्या राय आहे ती. सम्राज्ञी आहे. करोडो लोकांच्या हृदयावर तिचं साम्राज्य आहे. मग शुभेच्छा देताना पण एव्हढा आढावा आपोआप घेतला जाणारच ना ?
उशिराने का होईना विश्वसुंदरीस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
तिचं वय नसतं विचारायचं. ते तालच्या वेळीच लॉक झालंय.
आज कुणाचा वाढदिवस आहे ते माहिती नाही..
पन काल हा धागा न लिहीण्याचे कारण म्हणजे....
बरं जाऊ द्या
आवरतो आता हा पांचट लेख. पांचटच म्हणायचं. कारण धागा सेलेब्रिटींना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी काढला होता हे सांगायचंच राहिलं लांबण लावायच्या नादात.
सेलेब्रिटी म्हणजे महत्वाचे स्टार्स.
जसे रणवीर शौरी, रणवीर सिंग, रणवीर कपूर, अजय देवगण, अक्षय कुमार, अनिल कपूर, संजय कपूर, उदय चोप्रा, संजय दत्त, सनी लिओनी, सनी देओल, बॉबी देओल, धर्मेंद्र, हेमा मालिनी, फैजलखान, सैफ अली खान, के आर के, मिका सिंग, राखी सावंत झालंच तर फरीदा जलाल, जावेद जाफ्री, नावेद जाफ्री...
आणि हो !
कालच्या वाढदिवसाबद्दल.... एक कुणीतरी शाहरूख खान म्हणून माजी टिव्ही स्टार आहे तयास देखील शुभेच्छा !
काल शाहरूखचा वाढदिवस...
काल शाहरूखचा वाढदिवस... दिवसभर त्या बातम्या आणि आज हा धागा
वाचतो सावकाश...
नोव्हेंबर महिन्यात ऋन्मेष चा देखील वाढदिवस आहे हा एक योगायोग .. nothing planned
धमाल लेख झिपर्या बरोबर ?>>>
धमाल लेख
झिपर्या बरोबर ?>>>
कालच्या वाढदिवसाबद्दल एक
कालच्या वाढदिवसाबद्दल एक कुणीतरी शाहरूख खान म्हणून माजी टिव्ही स्टार आहे तयास देखील शुभेच्छा !
>>>
हे आवडले
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
(No subject)
शाळेत असताना ऐश्वर्या राय चा
शाळेत असताना ऐश्वर्या राय चा फोटो असणाऱ्या वह्या मिळायच्या - त्याला कवर घालून घेऊन जायचो - ते आठवले…
अक्टिंग कधी जमलीच नाही.. कदाचित हीच कॉमन गोष्ट असावी ज्यामुळे सलमान ऐश एकत्र आले…
ऐश मुळे विवेक चे करिअर संपले हे मात्र सत्य आहे…
हे बेस्ट आहे
हे बेस्ट आहे
हेमा जितूजी, संजीवजी, गिरीशजी करत >> गिरीशजी कोण? कर्नाड?
btw आमिताभ ११ ऑक्टो आणि रेखा
btw अमिताभ ११ ऑक्टो आणि रेखा १० ऑक्टो
यावरून आठवले,
यावरून आठवले,
July 7th - Birthday of MS Dhoni.
July 8th - Birthday of Sourav Ganguly.
July 10th - Birthday of Sunil Gavaskar.
९ July तारखेला कोणाचा जन्म झाल्यास एक कप्तान मिळू शकतो.
बॉम्बे टाइम्स ची पुरवणी
बॉम्बे टाइम्स ची पुरवणी वाचल्याचा भास झाला हा लेख वाचून .कलाकारांना शुभेच्छा देणं खूळ आहे असं मला वाटतं.
बाकी ऐश्वर्या सुदैवी समजली पाहिजे तो दगडधोंडा गळ्यात पडण्यापेक्षा अभिषेक लाख गुणांचा आहे. अब्युजीव रिलेशनशिप नाकारून तिने अभिषेकशी लग्न हा सर्वात चांगला निर्णय घेतला.त्यासाठी शुभेच्छा देईन .
मृणाली, वावे, झकासराव धन्यवाद
मृणाली, वावे, झकासराव धन्यवाद.
मंदार डी - बरोबर
ऋन्मेषजी आणि सहकारी - आभारी आहे.
कल्की
कल्की
आता आठवले सर. तीन महिन्यांपूर्वी विपू केलेली. अद्याप पाहिलेली नाही बहुतेक. असो.
प्रतिसाद दिला यासाठी आभार.
हजबंड हंटर रेखा>>
हजबंड हंटर रेखा>>
आपलं कसं फोकस्ड असतंय. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या आणि प्लान बी म्हणून सोनाली बेंद्रे. उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण हे प्लान सी , डी , ई, एफ तयार असणे हे असते. >>

पन काल हा धागा न लिहीण्याचे
पन काल हा धागा न लिहीण्याचे कारण म्हणजे....
बरं जाऊ द्या >>
रघु आचार्य आता पाहिली विपु, आयडी जिवंत असे पर्यंत मस्तच आहे म्हणायचं.
धमाल लिहीले आहे
धमाल लिहीले आहे

पुलंच्या "अघळपघळ" पुस्तकाचे कव्हर आठवले. तसेच एका विषयावरून दुसर्यावर असे अघळपघळ झाले आहे. पण मस्त आहे.
फक्त अभिषेकबद्दलच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध!
आपला अजूनही फेवरिट आहे तो. सोमिवरच्या पोस्ट्स मस्त असतात त्याच्या. विरासत मधे मिळालेला अँग्री यंग मॅन रोल कसा असतो ते एका "युवा" मधे त्याने दाखवून दिले होते.
बाकी "फ्रोझन" खान, "काकी वगळता" वगैरे सुपरलोल आहे. "काकी" चा क्लू लागायला एक मिनिट लागला पण तो लागल्यावर टोटल फुटलो
काका व (*) बच्चनची स्टाइल ही खरी स्टाइल. त्यांच्या नैसर्गिक हालचालीतून प्रसिद्ध झालेली. आजकाल स्टाइल म्हणजे सप्तरंगी गॉगल व झक्कीपक्की कपडे घालून हीरो के माफिक पोज देणे. असले काहीही न करता निव्वळ बिडी पीत चालण्याची सुद्धा स्टाइल होउ शकली, तरच तो खरा हीरो. मात्र काका व देव आनंद पहिल्या इनिंग नंतर त्याच पोजेस व स्टाइली कृत्रिमरीत्या करत राहिले, हास्यास्पद होईपर्यंत. उलट अमिताभने ती स्टाइल ठेवायला हवी होती, पण उगाचच बदलली.
(*) वरती "काका व " लिहील्यानंतर आपोआपच "पुतण्या" ही अक्षरे आधी उमटली. मग लक्षात आले की हा बाफ राजकीय (अजूनतरी) नाही.
बिचार्याने काकी सोडून
बिचार्याने काकी सोडून अफेअर्स नाही केली. >> अरे.. हा तर सिक्सरच आहे.

याच्या बरोबर ?
या झिपर्या बरोबर ?
शोभलं का गं तुला ऐश ?>> अगदी मनातलं बोललात तुम्ही
अँग्री यंग मॅन रोल कसा असतो
अँग्री यंग मॅन रोल कसा असतो ते एका "युवा" मधे त्याने दाखवून दिले होते.>>अगदी अगदी, अभिषेकचा गुरू, ब्लफमास्टर, पहिला धूम आणि रन विसरून कसं चालेल.इंटेन्स भूमिका चांगल्या केल्यात त्याने एवढा काही फ्लॉप ऍक्टर नाही एकदम फरदीन वगैरे च्या पंगतीत बसवू नका.
लक्षात आलं नाही म्हणजे
काकी
मस्त. ऐश्वर्याचे फोटो छान
मस्त.
ऐश्वर्याचे फोटो छान आहेत. ती कधी कधी आवडते. रेनकोट, हम दिल दे चुके सनम मध्ये आवडली. तिला हॅप्पी बड्डे.
अभिषेक चांगला आहे, अमिताभ इतका आवडत नसला तरी आवडतो.
बाकी ऐश्वर्या सुदैवी समजली पाहिजे तो दगडधोंडा गळ्यात पडण्यापेक्षा अभिषेक लाख गुणांचा आहे. अब्युजीव रिलेशनशिप नाकारून तिने अभिषेकशी लग्न हा सर्वात चांगला निर्णय घेतला.त्यासाठी शुभेच्छा देईन . >>> अगदी अगदी. एकदम सभ्य, गुड बॉय वाटतो मला तो.
बिचार्याने काकी सोडून अफेअर्स नाही केली. >>> चूक, साराची आई अ सिंगशी त्याचं अफेअर होतं, एकाच वेळी दोघी होत्या काकी आणि ती. त्यावेळी मायापुरीत वगैरे काही किस्से वाचलेले. काकीबरोबर पुढे टिकले. सिंग ताई मात्र नंतर विनोद , रवी करत साराच्या बाबांशी विवाहबद्ध झाल्या.
लईच भारी जमून रैलं बरं का
लईच भारी जमून रैलं बरं का आचार्य. दंड्वत घ्याच तुम्ही!!
“ अ सिंगशी त्याचं अफेअर होतं” - सांभाच्या भाचीला पण विसरू नका.
“ सिंग ताई मात्र नंतर विनोद , रवी करत साराच्या बाबांशी विवाहबद्ध झाल्या” - तसे सिनियर बच्चन पण ‘इंटरेस्टेड होना चाह रहें थें’
लुडो मध्ये सुद्धा मस्त काम
लुडो मध्ये सुद्धा मस्त काम केले आहे अभिषेकने.
लेख भारी
हे बरं नाही बरं का आचार्य ,
हे बरं नाही बरं का आचार्य , झिपऱ्या काय म्हणता विवेक ओबेरॉयला ..??
दम, युवा, साथिया चित्रपट बघून कोणे एके काळी माझा क्रश बनला होता तो...! गुणी, तडफदार अभिनेता वाटायचा त्यावेळी..!
युवा चित्रपट करताना करीना पण फिदा झाली होती त्याच्यावर असं वाचलं होतं पेपरात..!
अभिषेक बच्चन स्वभावाने शांत, संस्कारी वाटतो.. त्यामुळे ऐश्वर्याची निवड योग्य वाटते.
लेख मस्त आहे .. ! ऐश्वर्या आणि सोनाली वरच तुमचं जुनं प्रेम लेखात फारच उफाळून आलेलं दिसतेयं.
सेलिब्रिटी नाही पण माझा बर्थ डे पण आँक्टोबरचाच..!
वीरू - धन्यवाद तुमच्या
वीरू - धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल.
कल्की - पुन्हा एकदा
अंजू - अमृता सिंग बरोबर लग्न होणार होतं ते बहुतेक तिच्या आईमुळे मोडलं. खात्री नाही. गॉसिप वाचलेलं.
कॉमी - धन्यवाद तुमचे.
फेफ - सांभाची भाची हे नवीन आहे. अलिकडच्या बर्याच हिरविनी माहिती नाहीत ( म्हणजे वय झालं
किंवा शाळेत जायचं वय झालं
)
रवी म्हणजे तो नरसिंहा मधला हिरो का ? कराटे चँपियन ?
फारएण्ड - एरव्हीच्या धाग्यावर
फारएण्ड - एरव्हीच्या धाग्यावर पण प्रतिसाद वाचनीय असतात. अशा धाग्यावर दिलेले प्रोत्साहन मोलाचे असतेच. काळजी पूर्वक वाचून त्यातल्या जागा शोधणे,त्याला दाद देणे हे खूप ठिकाणी पाहिलेले आहे. अशी गुणग्राहकता कमावणे किंवा उपजत असणे हेवा करण्यासारखे आहे.
मात्र काका व देव आनंद पहिल्या इनिंग नंतर त्याच पोजेस व स्टाइली कृत्रिमरीत्या करत राहिले, हास्यास्पद होईपर्यंत. उलट अमिताभने ती स्टाइल ठेवायला हवी होती, पण उगाचच बदलली. >> अफलातून निरीक्षण आहे आणि टोटली सहमत आहे. मुकद्दर का सिकंदर मधे बच्चनने पहिल्यांदा मधून भांग पाडला होता. त्याच्या आधी साईडने कल्लेदार लूक होता. अजूनही बच्चनची हेअरस्टाईल म्हणून गावाकडे सलून मधे तोच फोटो असतो. मधून भांग पाडल्यावर बच्चन चिकणा दिसायला लागला , त्याच वेळी त्याला कॉमेडी कराविशी वाटली, अँग्री यंग मॅनपासून फारकत घ्याविशी वाटली. त्याचे भेदक डोळे प्रेमळ वाटू लागले. खूप लवकर बदल केले बच्चनने.
राजेश खन्ना वाढलेलं पोट आणि त्यावर घट्ट बसणारं टी शर्ट, विचित्र हेअर कट अशा अवतारात मकसद मधे कॉलेज मधे जाणारा युवक दाखवलाय जितेंद्र पुढे तो थोराड दिसतो. जितेंद्र या सर्वांना सीनिअर असून.
रूपाली - विशे पाटील,
रूपाली - विशे पाटील,
लेखात गंमत म्हणून झिपर्या म्हटलंय. बाकि लेखकाला प्रत्यक्षात कुणाला झिपर्या म्हणायचा काहीच अधिकार नाही, कारण त्याच्या पेक्षा जास्त झिपरा होतो. पहले उस आदमी के बाल काटके दिखाओ ही भानगड होईल.
कुणी कुणाशी लग्न करावं हा ज्याचा त्याचा चॉईस मान्यच आहे. पण फिल्मी कलाकारांच्या बाबत वर म्हटल्या प्रमाणे पब्लिकला वाटतं. आधुनिक देव आहेत ते. त्यांच्या बद्दलच गॉसिप हे गॉसिप नसून हक्क प्रकारात मोडतं. मग पोरींना सलमान खान आवडणे असेल किंवा ऐश्वर्याचं लग्न झालं तरी तिच्यावर (तिला माहिती नसताना) लाईन मारत राहणे हा पोरांचा हक्कच !
रवी म्हणजे तो नरसिंहा मधला
रवी म्हणजे तो नरसिंहा मधला हिरो का ? कराटे चँपियन ? >>
रवी शास्त्री
एवढे दोन शब्द लिहून मी माझा प्रतिसाद संपवतो.
अभिषेक बच्चनचे युवा आणि
अभिषेक बच्चनचे युवा आणि ब्लफमास्टर मलापण आवडतात. गुरूपण चांगला होता. बाकी कुठले नाही बघितलेले बहुतेक.
आम्हाला तेव्हा उगाचच अभिषेक आणि राणी मुखर्जीचं एकमेकांशी लग्न होणार असं वाटायचं.
फारएण्ड, प्रतिसाद मस्त!
अभिषेक आणि राणी मुखर्जीचं
अभिषेक आणि राणी मुखर्जीचं एकमेकांशी लग्न होणार असं वाटायचं.
>>
दोघांच्या बाजूनी होतं, पण फॅमिल्यांना पसंत नव्हतं म्हणे... त्यामुळे मुखर्जी फॅमिली ला लग्नाचं निमंत्रण नव्हतं. मजेची गोष्ट अशी की लग्नाच्या काळात अभिषेक राणी सोबत लागा चुनरी में दाग चं शूटिंग करत होता...
रवी म्हणजे तो नरसिंहा मधला
रवी म्हणजे तो नरसिंहा मधला हिरो का ? कराटे चँपियन ? >>> नाही हो. तो शास्त्री, माझा हायस्कूल आणि कॉलेजमधला क्रश, आता बघवत नाही हो त्याच्याकडे. तेव्हा कसं लपून छ्पून फोटो ठेवायला लागायचा, तो काळ होता, एखादा फारच आवडतो म्हटलं की मातोश्रीचं डोकं सटकायचं. बोलण्याचीही चोरी होती, जाऊद्या.
फेफ, सांभाची भाची आणि सिनियर बच्चन नवीन माहीती माझ्यासाठी. सीनियर बच्चन आणि रेखाताईंची वेगवेगळ्या बऱ्याच जणांशी होती अफेअर्स पण फक्त प्रकरण चघळले जातं ते ह्या दोघांच्या अफेअरचे. आपल्याला ब्वा अमिताभ जयाच जोडी आवड्ते.
मॅकमोहन भाची = रवीना टंडन ?
मॅकमोहन भाची = रवीना टंडन ?
राणीबरोबर झालंही असतं लग्न
राणीबरोबर झालंही असतं लग्न जया बच्चनला आवडत होती राणी(बंगाली कनेक्शन).बंटी और बबली नंतर वाटतही होत पण त्याच वेळी अभिषेक फिदा झाला ऐश वर तो आणि मोठे बच्चन ऐश्वर्या बरोबर कजरारे करून ऐश्वर्याने बाजी मारली.
राणी मात्र अजूनही जया बच्चन च्या गुड बुक्स मध्ये आहे
https://youtube.com/shorts/8SSVc75rNAo?si=wWV6GAxy7W4NFCSo
https://youtube.com/shorts/QC_dqJ5W9nc?si=nKb3ZIzshJEvxFj4
Pages