Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर जडेजा परत एकदा मदतीला
सर जडेजा परत एकदा मदतीला धावले!!
टॉप ऑफ द टेबल
कोहली शेवटी शर्मा सारखा
कोहली शेवटी शर्मा सारखा बेजबाबदार खेळला… सेंचुरी मिस…
मॅन ऑफ द मॅच - कोहली की शामी⁷
मॅन ऑफ द मॅच - कोहली की शामी⁷
कोहली शतकाच्या हव्यासापोटी
कोहली शतकाच्या हव्यासापोटी महत्वाची मॅच घालवायचा
शमीला दिले.. योग्य केले..
शमीला दिले.. योग्य केले..
राहुल.. शर्मा.. बुमराह.. कोहली.. शमी..
पाच विजय.. पाच सामनावीर
बाई दवे,
बाई दवे,
आज कोहलीने अखेरच्या बॉलवर जडेजाला ईशारा केला तो पाहिला का इथे कोणी? त्याच्या दुर्दैवाने म्हणा ते केमरा मध्ये टिपले गेले..
त्यानंतर जडेजाने शेवटच्या बॉलला सिंगल घेतला नाही. इज्जत मध्ये खेळून काढला.
क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. मागे गोलंदाज शिल्लक होते. 4 ओवर 19 धावा हव्या असताना कोहलीला शतकाला 18 धावा हव्या होत्या. तिथे बोल्टला सिक्स फोर मारून कोहलीने शतकाला जायचा प्रयत्न सुरू केला.
जर कोहली त्या प्रयत्नात सुरुवातीलाच सिक्स मारताना बाद झाला असता तर त्या 23 बॉल 19 धावा शंभर टक्के झाल्याच असत्या असे किती जण इथे खात्रीने सांगू शकतात?
आपल्याच खेळाडूंचे विक्रम कोणालाही सुखावतात. पण ते विचार डोक्यात असणे कधी धोकादायक सुद्धा ठरू शकते. तसे होऊ नये ईतकीच इच्छा.
आजही कोणाला कोहलीचे वैयक्तिक शतकाला जाण्याचे समर्थन करायचे असेल तर माझी हरकत नाही.
पण माझ्यासाठी खेळापेक्षा कोणताही खेळाडू मोठा नाही. आणि संघाहितापेक्षा कोणाचाही विक्रम महत्त्वाचा नाही.
बाकी आज कोणाला हे पटणार नाही. कारण तसे काही झाले नाहीये.. जिंकलो की चुका लपतात. असो!
बाकी कोहलीला जी धावांची चटक लागली आहे ती मात्र सुखावणारी आहे. कारण त्याचा संघालाच मोठा फायदा होणार आहे..
सूर्यकुमार धावचित झाला हे
सूर्यकुमार धावचित झाला हे पाहून वाईट वाटले.
मला वाटते त्याचा क्रिकेट नि बेसबॉल मधे गोंधळ झाला. बेसबॉलमधे असेच बॅटीला चेंडू लागला,नि मारलेल्या चेंडूजवळ क्षेत्ररक्षक असला तरी धावणे भाग असते. इथे दुसर्या खेळाडूने पण धावायचे असते हे तो विसरला.
मैदानात आल्या आल्या कोहलीने त्याला जरा काही शिकवले असते की बाबा घाई नाहीये, उगाच टी २० सारखे धावत सुटू नको, तर बरे झाले असते.
आता त्याला परत घेतील का पुढच्या सामन्यात?
कोहलीला वाटले आपण धोनीच आहोत, षट्कार मारून सामना जिंकवायचा नि स्वता:चे शतकहि करायचे. पण जमले नाही.
नशीब जडेजा नीट खेळत होता.
आता दक्षिण अफ्रिकेला पण हरवा,
सगळ्यांना हारवत सुटले तर सगळे
सगळ्यांना हारवत सुटले तर सगळे बदले ग्रुप स्टेजलाच पूर्ण करतील. सेमी फायनल, फायनलला पण राखून ठेवा कायतरी.
उगाच टी २० सारखे धावत सुटू
उगाच टी २० सारखे धावत सुटू नको,
>>
सूर्या ला हे (अजून तरी) झेपत नाही...
आज अफगाण-पाक
आज अफगाण-पाक
ठस्सन वाला सामना
चेन्नईला अफगाण गोलंदाजाना मदत मिळाली तर मजा येईल..
वरची कोहलीची सेम पोस्ट मी
वरची कोहलीची सेम पोस्ट मी आमच्या व्हॉटसप ग्रूपवर टाकली. कोहली संघाचा विजय धोक्यात टाकून शतकाला गेला हे मान्य करूनही तसे झाले तर नाही ना आणि जर तर ला अर्थ नाही म्हणत सारे जाऊ दे म्हणत आहेत.
त्यातले काही लोकं सचिन वैयक्तिक शतकासाठी खेळायचा असे म्हणणारे आहेत, ते तर आताही उलट म्हणत आहेत की कोहली सचिनचा शतकांचा विक्रम मोडतोय म्हणून तुम्ही त्यावर जळत आहात.
हल्ली कोणत्या खेळाडूवर टिका केली तर त्याचा द्वेष्टा वा त्यावर जळणारा असे ऐकून घ्यायची मनाची तयारी करावी लागते
गेला बाबर..बरे झाले
गेला बाबर..बरे झाले
रमीज राजा खूप कान खात होता..
कोहलीवर जळणारे महाराष्ट्रीयन
कोहलीवर जळणारे महाराष्ट्रीयन आहेत मोस्टली… कारणे २
१. सचिन फॅन्स- जो वैयक्तिक शतकासाठी खेळायचा- एके काळचा बेस्ट बॅट्समॅन
२. रोहित फॅन्स- एके काळचा विराट पेक्षा भारी बैट्समैन- आजही आहे मात्र डोके थंड नाही ठेवत…
हेच म्हणायचे होते.
हेच म्हणायचे होते.
म्हणजे असे लोक असतात देखील
पण एकाचा फेन म्हणून दुसऱ्यावर जळणे हे कुठून आले.
बाकी कोहली हा फलंदाज म्हणून शर्मा पेक्षा सरस आहे.
पण शर्माची फलंदाजी बघणे एका वेगळेच नेत्रसुख आहे.
आता तो बाबर सुद्धा रन मशीन आहे. पण बिलकुल बघाविशी वाटत नाही त्याची फलंदाजी.. त्याचे चाहते फक्त पाकिस्तान मध्येच असतील.
२८३ टारगेट
२८३ टारगेट
अफगाणचे ओपनर खेळायला हवेत आज.. किमान शतकी सलामी
देवा पाकिस्तान दहा विकेट ने
देवा पाकिस्तान दहा विकेट ने हारू दे.
झाली शतकी सलामी...
झाली शतकी सलामी...
जुबान है भाई
अफगाणिस्तान -192-२ ( 33 षटक )
अफगाणिस्तान -192-२ ( 33 षटक ) !
थकलेला तो इब्राहीम.
थकलेला तो इब्राहीम.
गुरबाज जरा अजून खेळला असता तर सगळी मॅच खोलून गेला असता..
असो,
आता हाराकिरी करायला नको..
त्याने सिंगल घ्यायचा होता..
त्याने सिंगल घ्यायचा होता.. मग फोर ला जायचे होते.. थेट सिकसला गेला.. >>
You never fail to amaze. Whenever I think you have reached the bottom, you start to digging . This is out of the World skillset my friend.
अफगाणिस्तान कडे एव्हढे स्पिनर असताना शादाब खान ला एव्हढ्या आदराने खेळतात हे बघून कमाल वाटतेय. शादाब सध्या गल्लीत पण मार खाईल एव्हढी वाईट बॉलिंग करत होता. बॅक टू फॉर्म येतोय कि काय. आफ्रिदीच्या शेवटच्या ओव्हर्स मधे मॅच चा निकाल ठरेल.
बेदी बद्दल वाचले. सध्याच्या टी २० जगात बेदी ने काय धमाल उडवली असती हे त्याचा ईकॉनॉमी रेट बघून लक्षात येते. रशिद खान नि बुमरा पण जास्त वाटले असते. उगाचच बेदी ने कोहली च्या डोक्यात फिटनेस चे मह्त्व ठासले हे आठवले. अजून आश्चर्य वाटते त्याचे !
त्याने सिंगल घ्यायचा होता..
त्याने सिंगल घ्यायचा होता.. मग फोर ला जायचे होते.. थेट सिकसला गेला.. >> Lol
>>>>>
यात काय हसण्यासारखे कळले नाही असामी?
कोहलीला 5 हवे होते. जिंकायला 5 हवे होते. सिंगल घेत गेम पुढे नेला असता तर त्याला शातकाला फोर हवा असता आणि तो मारणे सोपे पडले असते. जडेजा तसेही मदत करत होताच. पण याने घाईत उचलला सिक्ससाठी आणि झाला झेलबाद..
तीन ओवर ११ धावा...
तीन ओवर ११ धावा...
चला जिंकल्यात जमा... बाबरच्या डोळ्यात पाणी
खरे तर बाबरच कुंथत खेळला.. नाहीतर ३०० पार झाले असते.
अरे तू इथे नेट रन रेट ने
अरे तू इथे नेट रन रेट ने शेवटी किती फरक पडणार ह्यबद्दल लिहिले ते वाचून तो गेला रे सिक्स मारायला . आधीच्या मॅच मधे त्याने ते दोन डॉट खेळलेले नि एकदा स्ट्राईक रोटेट केला नव्हता त्याचे प्रायश्चित्त घेत होता रे. आता ह्यामूळे भारत सेमी मिस करून गेला नाही मिळवले.
हरली
हरली
१ षटक आणि ८ गडी राखून जिंकले
१ षटक आणि ८ गडी राखून जिंकले अफगाण.
आज इंग्रज तक्त्यात १० व्या स्थानी.
जबरी मॅच! अपसेट्स मधे इतके
जबरी मॅच! अपसेट्स मधे इतके डॉमिनेटिंग विजय फार क्वचित बघायला मिळतात. सहसा अपसेट्स म्हणजे प्रबळ टीमला अचानक खिंडीत पकडून जिंकल्यासारखे असत. केनिया वि विंडीज - १९९६, बांगला देश वि भारत २००७ ई.
अपसेट्स मधे इतके डॉमिनेटिंग
अपसेट्स मधे इतके डॉमिनेटिंग विजय फार क्वचित बघायला मिळतात >> अपसेट् म्हणायला पटकन धजत नाहीये जीभ
पाकिस्तान बरोबर भारत ,
पाकिस्तान बरोबर भारत , अफगाणिस्तान आणि बांगलादेश च्या मॅचेस ना नेहमी युद्धाचे स्वरूप असते . अफगाणी फलंदाजांनी मॅच अक्षरशः ओढून आणली .
पाकिस्तानी प्लेअर्स ना वर्ल्डकप संपल्या नंतर डायरेक्ट पाकिस्तानला न जाता फिरत फिरत घरी जावे लागणार असे दिसतंय ....
त्या इब्राहिम चे नाव मी
त्या इब्राहिम चे नाव मी इब्राहिम जर्दा असेच वाचतोय
अपसेट वगैरे काही नाहीये. मी
अपसेट वगैरे काही नाहीये. मी तर चेन्नई म्हणून आशेवरच होतो या निकालाच्या.
त्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी घेण्याचा मुर्खपणा केला.
त्यामुळे अफगाण गोलंदाजी ईथे तुलनेत किंचित जास्त प्रभावी ठरणार होती.
तसेच स्लो पिच मुळे पाक गोलंदाजी तितकी घातक ठरणार नव्हती. अफगाणचे वरचे फलंदाज सुद्धा चांगले असल्याने शतकी सलामी सुद्धा लिहीले होते. तरी पाकचे नशीब चांगले तो गुरबाझ मध्यावर गेला. नाहीतर पाच ओवर शिल्लकने हरले असते. पण तरी पुर्ण चेसमध्ये एक क्षण असा आला नाही की पॅनिक झाले वा हाराकिरी केली.
Pages