Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फलंदाज स्वतःच कसब वापरून व
फलंदाज स्वतःच कसब वापरून व धोका पत्करून शतक करण्याचा प्रयत्न करतो तसंच...
>>>>
करेक्ट!
शतकं व्हायला चौकार हवा असताना गोलंदाजाने कसब वापरून चौकार न देता सिंगलच मिळेल असा बॉल टाकला. पण फलंदाजाने सिंगल घेतलाच नाही. कसब वाया गेले गोलंदाजचे
“ जसे फलंदाज शतकाचा विचार
“ जसे फलंदाज शतकाचा विचार करतो तसे गोलंदाजाने आमच्या विरुद्ध तुझे शतक होऊ देणार नाही हा विचार केला. त्याला रडके बोलण्यात अर्थ नाही. ” - हे लॉजिक नाही जमलं. एखाद्या बॅट्समनने सेंच्युरी करून दाखवण्याला बॉलिंग मधलं पॅरलल पाच/दहा विकेट्स घेऊन दाखवण्याचा पराक्रम गाजवणे किंवा शतकाच्या उंबरठ्यावर त्याची विकेट घेणं (जशी शोएब ने २००३ च्या वर्ल्डकपमधे सचिनची ९८ रन्सवर घेतली होती) असू शकतं.
कुंबळेच्या दहा विकेट्सच्या वेळी वासिम अक्रमने वकारला दुसर्या बॉलरला जाणून-बुजून विकेट देण्याला नकार दिला होता. मुरलीधरनच्या ८०० व्या विकेटच्या वेळी प्रग्यान ओझा स्ट्राईकवर असताना धोनीने इनिंग डिक्लेअर करायला नकार दिला होता. एखाद्याच्या कर्तृत्वावर पाणी ओतण्यासाठी निगेटीव्ह टॅक्टिक्स वापरणं खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे.
आता तुला बांग्लादेशी बोलर्स
आता तुला बांग्लादेशी बोलर्स आवडतात हे मला काय माहित ? (असतात काही जणांच्या आवडी निवडी विचित्र )
>>>>
पुन्हा तेच. कोणाच्या बाजूने लिहिले की तो आवडता. अमुक तमुक नावडता हे निष्कर्ष काढण्याची घाई का?
आणि बांगलादेशचा कोणता खेळाडू आवडतं असेल तर त्यात विचित्र काय? हा भेदभाव का? मला अफगाणचे सुद्धा बरेच प्लेअर आवडतात.
कुंबळेच्या दहा विकेट्सच्या
कुंबळेच्या दहा विकेट्सच्या वेळी वासिम अक्रमने वकारला दुसर्या बॉलरला जाणून-बुजून विकेट देण्याला नकार दिला होता.
>>>>>
ते योग्यच केले.
खरे तर तेव्हाही दहावी विकेट कुंबळेलाच मिळेल याचे प्रयत्न आधीच्या ओवरला केले गेले होते. पण तरी त्यात कुंबळेचा सहभाग असेलच असे नाही. ते प्रयत्न इतरांनी केले. त्यामुळे अक्रमने केले ते छान वाटले.
मुद्दा हा आहे की तुमच्या आधीच्या action वर मग जर reaction येतं असेल तर ते चूक नाही.
पण खेळाडू विक्रम करण्यासाठी धडपडत नसेल तरीही समोरच्याने पोटदुखीने तो होऊ दिला नाही तर ते चूक आहे.
पण खेळाडू विक्रम करण्यासाठी
पण खेळाडू विक्रम करण्यासाठी धडपडत नसेल तरीही समोरच्याने पोटदुखीने तो होऊ दिला नाही तर ते चूक आहे. >>> सिरीयसली?
कोहलीचे शतक झाले काय किंवा न झाले काय, प्रतिस्पर्धी बोलरला किंवा संघाला काहीच फरक पडत नसताना, त्यातही वाइड बॉल हा स्वतःच्या टीमला जास्त नुकसान देत असताना बोलरने मुद्दाम तो टाकणे - याची तुलना कोहली किंवा कोणीही स्वतःच्या शतकाचा विचार करण्यापेक्षा खूप वेगळे आहे. जस्ट फॉर द रेकॉर्ड, कोहलीने काहीही चुकीचे केले नाही. खेळाडू कसा खेळतो हे पॅकेज डील असते. त्याने स्वतःच्या विक्रमांचा जराही विचार करू नये हे प्रॅक्टिकल नाही. तसे संत महात्मे फार क्वचित जन्माला येतात आणि इथपर्यंत पोहोचतात.
असामी, फेफ, भाऊंशी सहमत. भाऊंनी फार छान समराइज केले आहे.
बुवा - कोहलीबद्दल जे लिहीले आहे ते भारी आहे. टोटल +१. काल बर्याच दिवसांनी जुना कोहली दिसला.
पुन्हा तेच. कोणाच्या बाजूने
पुन्हा तेच. कोणाच्या बाजूने लिहिले की तो आवडता. अमुक तमुक नावडता हे निष्कर्ष काढण्याची घाई का? >> फे फ , फा तुम्हालाही 'नाही म्हटले तरी इंग्लिशचा घाव आरडरली सायबांना जरा लागलाच' हे आठवले का ?
माझ्या मित्राने हे टाकलेले " It was abs mesmerizing to see how Kohli strategized and executed to reach his ton as well as victory for India. While it is a team game, team games' success is built upon individual achievements. The last 20 or so runs were scored by Kohli at a very good pace. And two dots+six combination is any day better than two singles for a win. When anyone highlights not taking a single, they should also highlight the six that was hit. Even Kohli's biggest opponents will hesitate calling him selfish. "
“ 'नाही म्हटले तरी इंग्लिशचा
“ 'नाही म्हटले तरी इंग्लिशचा घाव आरडरली सायबांना जरा लागलाच' हे आठवले का ?” -
हा जबरी होता.
'नाही म्हटले तरी इंग्लिशचा
'नाही म्हटले तरी इंग्लिशचा घाव आरडरली सायबांना जरा लागलाच' हे आठवले का ?” >>>
एक दुसरा अँगल सुद्धा. त्याने सिंगल काढली असती तर आपले जितके रन्स गणले गेले त्यापेक्षा सिक्स मुळे पाच रन्स जास्त धरले जातील. रन रेट मधे जे काय कमीजास्त झाले असेल ते त्यामुळे एनीवे भरून निघेल.
कोहली थंड डोक्याने खेळतो..
कोहली थंड डोक्याने खेळतो..
कोहलीचा क्लास असा आहे की
कोहलीचा क्लास असा आहे की त्याला धावा जमवायला मोठे किबहुणा रिस्की फटके खेळावे लागत नाही.
पहिल्या सामन्यालाच मी म्हटलेले की कोहली हा आता आऊट होणार नाही सहजी अश्या फॉर्मला आहे.. टॉप स्कोअरर असेल तो या विश्वचषकाचा..
असामी, फेफ, भाऊंशी सहमत.
असामी, फेफ, भाऊंशी सहमत. भाऊंनी फार छान समराइज केले आहे.>>>> +१ नेमकं लिहिलय भाऊंनी अगदी.
त्याने स्वतःच्या विक्रमांचा जराही विचार करू नये हे प्रॅक्टिकल नाही. तसे संत महात्मे फार क्वचित जन्माला येतात आणि इथपर्यंत पोहोचतात.>>>> अॅक्चुअली फा, जर विडियो परत बघितला तर लक्षात येइल की कोहली स्वतः म्हणत होता की २ करता ये परत. राहूलनी मुद्दाम नकार दिला. You can totally read between the lines here, की कोहली बेसिकली म्हणत होता की माझ्या शतकाचं राहू दे. पण राहूलनी नकार दिला. भन्नाट फिनिश होती! मॅच पण जिंकलो आणि त्याचे शंभर पण झाले!
अरे अजुन तेच दळण चालू आहे का?
अरे अजुन तेच दळण चालू आहे का?
एक दुसरा अँगल सुद्धा. त्याने
एक दुसरा अँगल सुद्धा. त्याने सिंगल काढली असती तर आपले जितके रन्स गणले गेले त्यापेक्षा सिक्स मुळे पाच रन्स जास्त धरले जातील.
>>>>>>
हाच विचार एक धाव असताना गोलंदाजाने केला तर. फलंदाज आता मला सिक्स मारणार. त्यापेक्षा मी वाईड टाकून सामना क्लोज केला तर रनरेट कमी खराब होईल.
मुळात कोहलीने किंवा कुठल्याही फलंदाजाने आपल्या शतकाचा विचार करण्यात गैर नाहीयेच. फक्त ज्या न्यायाने याला योग्य ठरवले जाते तोच न्याय जर प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज करत असेल तर त्याला नावे ठेऊ नये.
बाई दवे,
अंपायरच्या वाईडचा नियम कोणी द्याल का? सोमिवर लोकं उगाच काहीही आणून त्याचा बचाव करत आहेत. अंपायर चुकला हे स्वीकारणे का जड जातेय...
भन्नाट आहे हे
भन्नाट आहे हे
या माणसाला आता जास्त धावून धावा काढायच्या नाहीयेत. हा असाच तुटून पडणार आहे..
अंपायरच्या वाईडचा नियम कोणी
अंपायरच्या वाईडचा नियम कोणी द्याल का? सोमिवर लोकं उगाच काहीही आणून त्याचा बचाव करत आहेत. अंपायर चुकला हे स्वीकारणे का जड जातेय...
सगळ्या सोमिवर अंपायर चुकला हेच म्हणत आहेत. निदान मी जिथे आहे तिथे तरी. कोणीही अंपयारचा बचाव करताना दिसले नाही. मायबोलीवर कोणी बचाव केला असेल तर कदाचित कमेंट वाचनातून निसटली असेल.
वर कोणीतरी म्हटले की
वर कोणीतरी म्हटले की गोलंदाजाने आपले कसब दाखवून विकेट घ्यावी.
यातही दोन शक्यता आहेत.
कोहली सिक्स मारायला पुढे येणार म्हणून गोलंदाजाने बॉल लेगला टाकला..
किंवा आता हा आपल्या शातकासाठी कुठल्याही परिस्थितीत मोठा शॉट खेळणारच आहे तर का नाही वाईड टाकून याला रिस्क घ्यायला लावा आणि विकेट मिळवा..
Submitted by रात्रीचे चांदणे
Submitted by रात्रीचे चांदणे
>>>>>
असामी कुठला तरी नियम बदलला आहे आणि अंपायर चा निर्णय योग्य आहे म्हणत होते.
बाकी मी सोमि वर च्या लिंक आणि बचावासाठी आणलेले नियम युक्तीवाद देऊ शकतो. बरेच लोकं बचाव करत आहेत.
(No subject)
ऑस्ट्रेलिया सुद्धा फॉर्मात आहे....
आज नेडरलांड लंका..
आज नेडरलांड लंका..
सपोर्ट नेदारला.. एका धक्का दिलाय त्यांनी.. अजून सामने जिंकले तर मजा येईल..
लंका वरचढ
लंका वरचढ
NED v SL, 19th Match
NED 92-6 (22.1)
Logan van Beek*: 1 (2)
Sybrand Engelbrecht: 5 (7)
Chamika Karunaratne 4.1-1-15-0
Netherlands opt to bat
दुपारी इंग्लंड आफ्रिका.
दुपारी इंग्लंड आफ्रिका.
दोन्ही संघांना अनुक्रमे अफगाण नेदरकडून धक्का मिळाला आहे.
त्यातून बाहेर यायला दोघे जिंकायचा जास्तीचा प्रयत्न करणार.
नेहमी प्रमाणे सॉफ्ट कॉर्नर आफ्रिकाकडे..
NED 222-7 (45.1)
NED 222-7 (45.1)
पुन्हा मारले यांनी विकेट जाऊन
SL 52-2 (9.3)
SL 52-2 (9.3)
NED 262 (49.4)
Pathum Nissanka*: 30 (32)
Aryan Dutt 3.3-0-11-2
Sri Lanka need 211 runs
हा सामना जाईल का लास्ट ओवर थ्रिलर... अजून पर्यंत एकही क्लोज सामना झाला नाहीये
खेळाडूने संघाकरता खेळताना
खेळाडूने संघाकरता खेळताना आपल्या वैयक्तिक माइलस्टोनचा विचार करून खेळणे व तो माइलस्टोन मिळवायचा प्रयत्न करणे यात गैर नाही.
खेळाडूने केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूचा माइलस्टोन होऊ न देण्याकरता एरव्ही तो जे न करण्याचा प्रयत्न करतो तीच गोष्ट मुद्दाम करणे ही खिलाडूवृत्ती नाही.
एरव्ही तो जे न करण्याचा
एरव्ही तो जे न करण्याचा प्रयत्न करतो....
>>>
यात मिळत असलेला सिंगल न घेणे हे सुद्धा आलेच ना
प्रतिस्पर्धी खेळाडू जर एखादा माईलस्टोनचा विचार करून वेगळे खेळत असेल तर ते आपल्या विरुद्ध होऊ नये असा विचार मला तरी जश्यास तसा वाटतो.
तरीही असे न वागणेच योग्य. त्यात नक्कीच खिलाडू वृत्ती दिसेल.
पण कोणी विपरीत वागले तर त्याची खिलाडी वृत्ती गेली असेही म्हणायला नको.
अम्पायरने तो वाईड दिला असता तर कोहली नंतरचा चेंडू कसाही आला तरी फटकवायला गेला असता, आणि यात गोलंदाजसाठी विकेट मिळवायचा चान्स तयार झाला असता
चला सोडा तो विषय.. ज्याचे
चला सोडा तो विषय.. ज्याचे त्याचे खिलाडू वृत्तीचे निकष....
इथे आफ्रिका पुन्हा राडा घालत आहे..
पाहिली फलंदाजी करताना सलग ६ वेळा ३००+ धावा
त्यात २ वेळा ४००+
बरे ४ वेळा ऑस्ट्रेलियासमोर..
४० ओवर २५६-५ होते ४०० टारगेट
४० ओवर २५६-५ होते
४०० टारगेट
इंग्रजाकडे ४०० धावा करण्याची
इंग्रजाकडे ४०० धावा करण्याची क्षमता आहे आणि मैदान लहान आहे. अर्थात आफ्रिकन गोलंदाजी मजबूत आहे.
इंग्रजाकडे ४०० धावा करण्याची
.
इंग्लंड २४-३ डाऊन
इंग्लंड २४-३ डाऊन
प्रेशर बडी कुत्ती चीज होती है...
नवीन बॉल स्विंग होताना थांबून खेळणे गरजेचे होते. पण ४०० धावा डोक्यावर होत्या..
Pages