क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा विचार केल्यास त्याच्या एकट्याच्या स्पिरीटलाच नावे ठेवण्यात अर्थ नाही >> त्या दोन्ही गोष्टींमधे अखिलाडू पणा नि खिलाडूपणा हा जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि तू अजूनही नेट रन रेट कसा घसरला ह्याचे उत्तर दिले नाहियेस. परत एकदा "Kohli played normally till the end of Over 38. He was 73 off 77 and KL 33 off 33. Then onwards, Kohli faced 20 of the 21 balls bowled and scored 30 runs. How was this slowing down the NRR ?

अंपायर मात्र चुकलाच ! >> अर्थात तुला नवा क्रिकेट रुल माहित नाही हे उघड आहे. शोधा म्हणजे सापडेल.

आधीचे बॉल आणि रन का मोजत आहात.
जिथे सिंगल मिळत होते ते सोडले इतके पुरेसे आहे ना. आधीही त्याने मारले ते स्वतःचे शतक व्हावे म्हणूनच मारले. त्याशिवाय ते झाले नसते. जर भारताला विजयाला जास्त धावांची गरज असती तर त्याने रिस्क उचलली नसती. साधा हिशोब आहे. बघताना कोणालाही कळते हे.

जर कोहली स्वताच्या वैयक्तिक शताकासाठी धडपडत होता तर बांगलादेश बॉलर ने ते आपल्या देशाविरुद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न केला यात त्याचे काय चुकले हे तुम्हीही बोलत नाही आहात? दोष एकालाच का?

बाकी वाईडचा कसला नवा नियम.. फिरत आहे तशी एक पोस्ट सुद्धा कोहली आणि अंपायरच्या बचावासाठी... कोहली जरी जागेवरून हलला असला तरी तो बॉल बराच लेग साईडलाच होता.

बॉलरला एव्हढेच पडले होते स्वताच्या देशाविरुद्ध शतक होऊ नये याचे तर उडवायचा दांडका!! कुणी अडवले होते? Wink

कधी नव्हे तो इतका सातत्याने चांगला खेळतोय आपला संघ तर कशाला उगाच खुसपटे काढत बसायची..... करा एंजॉय Happy

“इतका सातत्याने चांगला खेळतोय आपला संघ तर कशाला उगाच खुसपटे काढत बसायची..... करा एंजॉय” - +१

मस्त फॉर्ममधे आहे इंडियन टीम आत्ता. बॅटिग,, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही जबरदस्त.

एखाद्या खेळाडूने ५ विकेट्स साठी किंवा शतकासाठी प्रयत्न करणं ह्यात मला तरी काही गैर वाटत नाही. त्या विकेट्स/रन्स टीम टोटलमधेच काऊंट होतात, वेगळा हिशोब नाही मांडत त्याचा. हे ‘स्वतःसाठी खेळला‘ वगैरे ‘धट्टीकट्टी गरिबी‘ टाईप्स लॉजिकला काही अर्थ नाहीये.

सध्या निस्वार्थी खेळ फक्त रोहित शर्मा खेळतोय. बाकी सगळे आपले रन कसे होतील हे बघताहेत. मोठ्या सामन्यात यांचा स्वार्थीपणा घातक ठरेल.

“पाटा विकेट का?” - एकदम पाटा. त्यातून ग्राऊंड लहान आहे. स्पिनर्सना डिमॉरलाईज करण्यासाठी सिम्युलेशन लॅब आहे गहुंजे. पण अश्या ठिकाणी आज कुलदीप आणि जडेजाने कमाल बॉलिंग केली.

कधी नव्हे तो इतका सातत्याने चांगला खेळतोय आपला संघ तर कशाला उगाच खुसपटे काढत बसायची.....
>>>>

कधी नव्हे तो कशाला... शर्माच्या कप्तानीत भारतात खेळताना हे मला अपेक्षितच होते. तोच त्याचा आजवरचा रेकॉर्ड आहे. . भारताबाबत बोलायचे झाल्यास मी तर सरळ सेमीबाबत विचार करतो. विश्वचषक येतो की नाही हे सेमी आणि फायनल चे दोन सामने ठरवणार आहेत Happy

बोकलत अरे किती ब्राउन नोसिंग शर्मा चे… शर्मा घातक प्लेयर आहे पण ४९ ला असताना त्याने मारलेला फटका गरज नसताना मारलेला चुकीचा फटका होता की.. थोडा जबाबदारीने खेळला असता तर त्याचीच सेंचुरी झाली असती… टारगेट ३५० वगैरे नव्हते की इतका केयरलेस मारायची गरज होती…

पाकने आज लौकिकाला साजेसे क्षेत्ररक्षण करत ३ सोपे झेल सोडले. त्यातील २ आधीच महाग पडले आहेत आता स्मिथ चा सोडलेला किती महाग पडतो बघायचे.

गेला स्मिथ.. तसेही त्याची या फॉर्म आणि या सिच्युएशन ला भीती कमीच होती...
सेट झालेला वॉर्नर आणि मागे तो एक स्टोईनिस.. किती मारतात बघायला हवे

गेला वॉर्नर.. १६३..
२०० चान्स होता..
चुम्मा सारखा एक हात सोडून सिक्स मारायला गेला

पंत

३६८ टारगेट
वॉर्नर बाद झाल्यावर ७.४ ओवर मध्ये फक्त ४२ धावा आल्या

आफ्रिदी ५ विकेट

सामना मात्र ऑस्ट्रेलिया जिंकणार सहज..

ऑसीजने पूर्वीही क्रूशल सिच्युएशन्स ना कॅचेस सोडलेले आहेत (मॅग्राथ ने १९९९ च्या टाय मॅच मधे सोडला होता असे आठवते) पण या वेळेस जास्तच होत आहे Happy

परवाच्या गेम मधे सॅण्टनर ने घेतलेला आणि कालच्या गेम मधे जडेजा ने घेतलेला - दोन्ही कॅच भनाट होते.

पीच फारच साधं आहे असं दिसतय. पाकिस्तान पण जोरात आहे. आला बाबर आता. आज फॉर्म गवसला तर चुरशीची होऊ शकते. हे येवढाले रन म्हणजे चलवाढी सारखं आहे. म्हणजे पैसे खुप मोजले तरी वस्तु तेवढ्याच मिळतात. तसच बदाबदा रन केले तरी शेवटी मॅच चुरशीची होऊ शकते.

भारत बांगला देश विरुद्ध लिहायचं होतं पण आता उशिर झाला त्यामुळे फक्त अनुमोदन देतो.
फेफ, सगळ्या पोस्टींना अनुमोदन.

फा, हो, जडेजानी घेतलेला कॅच फार भारी होता!

बाकी कोहलीची इनिंग्स बघायला फार मस्त वाटलं! काय शॉट्स!
अजून एक म्हणजे पब्लिक बिन्धास्त शतक पुर्ण करायला बघतं आणि लपवत नाही. मागच्या मॅच मध्ये के एल नी पण स्पष्ट सांगितलं की हो मी प्रयत्न करत होतो. ते मला विशेष आणि बोल्ड वाटतं. काहीच वावगं नाही त्यात. आता तुम्ही २-३ ओवर घालवल्या तर ते वेगळं आहे.
कोहलीच्या १०० च्या वेळेस स्पष्टपणे दिसतं की कोहली राहुलला म्हणाला की अजून एक रन मिळाला असता पण राहुल मुद्दाम नाही म्हणाला.
फ्लो मध्ये असला कोहली की He makes the whole country's day!! काय नजर असेल त्याची बॉल वर? साईड अँगलनी बघितल्यावर अंदाज येतो की किती फास्ट येतो बॉल. कोहली, रोहित, राहुल सुद्धा (कुठलेही टॉप बॅट्समन) हे लोकं बर्‍याच वेळा इंट्युशन वर खेळतात. १३५-१४० kmph ला येणार्‍या बॉलला तुम्ही बघून, विचार करुन नाही मारु शकत. त्यांचा अनुभवानी आणि अंगभुत स्किलनी मेंटल इंट्युशन इतका शार्प झालेला असतो की ते आधीच बरोबर पोजिशन मध्ये आलेले असतात आणि वेल टाईम्ड तुफान शॉट बसतो! Such a treat to watch! Happy

अंपायरला कदाचित हे स्पिरिट ऑफ गेमच्या विरुद्ध वाटले असेल , म्हणून त्याने तो निर्णय घेतला असेल.यापूर्वी काही देशांनी असा रडी डाव खेळाला होता. म्हणून अंपायरच्या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा. MCC.png

के एल नी पण स्पष्ट सांगितलं की हो मी प्रयत्न करत होतो. ते मला विशेष आणि बोल्ड वाटतं.
>>>

एकझेक्तली हाच माझा मुद्दा आहे.
जसे फलंदाज शतकाचा विचार करतो तसे गोलंदाजाने आमच्या विरुद्ध तुझे शतक होऊ देणार नाही हा विचार केला. त्याला रडके बोलण्यात अर्थ नाही. न्याय दोघांना.सेम हवा. बाकी जे स्पष्ट डोळ्यांना दिसते त्यात आणखी स्पष्ट बोलून दाखवण्याचे काय कौतुक Happy

आधीचे बॉल आणि रन का मोजत आहात. > >सर नेट रनरेट बद्दल तुम्ही सुरूवात केली तेंव्हा तुम्हाला दाखवत होतो की त्यावर परीणाम झाला नाहिये. मूळात आहे तो रन रेट बघता तिथून पहिल्या चारांच्या बाहेर निघायला असे सपाटून हरावे लागेल कि कोहली ने अजून ४-५ ओव्हर्स मेडन काढल्या असल्या तरी काडीमात्र फरक पडणार नव्हता. हे झाड सोडा.

न्याय दोघांना.सेम हवा. बाकी जे स्पष्ट डोळ्यांना दिसते त्यात आणखी स्पष्ट बोलून दाखवण्याचे काय कौतुक > बरे ह्याच लॉजिक ने रोहित ने एक धाव काढली तरी पाच पोस्ट नि सतत दोन दिवस कुठल्या तरी 'अमक्या बॉलरविरुद्ध आठव्या बॉल मधे ऑफ ला मारून एक धाव घेणारा पहिला कर्णधार' असे पीळ आणणारे फॉरवर्ड पाडणे नि कोहली च्या शंभर धावांना दोन पोस्ट मधे गुंडाळणे ह्याला 'राधासूता तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म' ह्याशिवाय काय कप्पाळ म्हणायचे. Wink

हे ‘स्वतःसाठी खेळला‘ वगैरे ‘धट्टीकट्टी गरिबी‘ टाईप्स लॉजिकला काही अर्थ नाहीये.>> +१ उगाच खुसपटं काढत बसणे ह्यात आनंद मिळत असेल तर नाईलाज आहे.

फ्लो मध्ये असला कोहली की He makes the whole country's day!! >> + बुवा

आज झंपाने बर्‍याच दिवसांनी चांगली बॉलिंग केली. बंगलोर पिच वर चहल पण असाच सुटतो. पाटा विकेट असल्यामूळे व्हेरीएशन्स हाच उपाय उरतो म्हणून नाईलाज म्हणून की काय ? स्टार्क भलताच ऑफ कलर होता त्यामूळे काही खरे वाटले नव्हते. पाकिस्तान ने दुसर्‍या हाय स्कोरींग मॅच मधे दुसर्‍या भागात मॅच कंट्रोल मधे आणली.

बरे ह्याच लॉजिक ने रोहित ने एक धाव काढली तरी पाच पोस्ट
>>>

एका धाव?
सिक्स शिवाय बोलत नाही तो Happy

आणि तो . माझा आवडता आहे म्हणून त्याचे कौतुक
धोनी सुद्धा आवडता आहे
चुम्मा आवडता आहे
त्यामुळे हे खेळले की जास्त आनंद होतो..
याचा अर्थ बाकीचे नावडते आहेत असा होत नाही Happy
एकेकाळी दादा आवडता होता त्यामुळे सचिनच्या शतकं पेक्षा जास्त आनंद दादा खेळला की व्हायचा.. पण कोणी म्हटले दोघात सरस फलंदाज कोण तर तुलनाच नाही.. तो अर्थात सचिनच !

बाकी मी कोहलीला नाव ठेवतच नाहीये. मी स्वतः खेळत असतो तरी तेच केले असते..
फक्त मी गोलंदाजाला नावे ठेवू नका बोलत आहे. मी त्याची वकिली करत आहे Happy

असो, हे भारतीय क्रिकेट प्रेमी मनाला समजणे अवघड म्हणून थांबुया.. Happy

फलंदाज स्वतःच कसब वापरून व धोका पत्करून शतक करण्याचा प्रयत्न करतो तसंच गोलंदाजाने कसब वापरून व धोका पत्करून त्या फलंदाजाला बाद करायचा किंवा शतकापासून रोखण्याचा प्रयत्न करावा; माझ्या मते हे खरं spirit of the game असावं ! केवळ शतक न होवू देण्यासाठी नकारात्मक गोलंदाजी करणं याची बरोबरी शतक करण्याच्या प्रयत्नाशी व त्यामागच्या मानसिकतेशी करता येणार नाहीं अस मला वाटतं.

आणि तो . माझा आवडता आहे म्हणून त्याचे कौतुक
धोनी सुद्धा आवडता आहे
चुम्मा आवडता आहे >> आता तुला बांग्लादेशी बोलर्स आवडतात हे मला काय माहित ? (असतात काही जणांच्या आवडी निवडी विचित्र ). Lol आम्हाला नाही आवडत म्हणून नाही करत आम्ही वकिली त्यांची . हाय काय नि नाय काय !

केवळ शतक न होवू देण्यासाठी नकारात्मक गोलंदाजी करणं याची बरोबरी शतक करण्याच्या प्रयत्नाशी व त्यामागच्या मानसिकतेशी करता येणार नाहीं अस मला वाटतं. >>> भाऊ काल मी अगदी हेच लिहिले होते पण सर नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून गेले.

Pages