बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या प्रियांकाला काही गिफ्ट मिळालं का, काही पोस्ट्स वाचल्या की शिवलाच काही मिळालं नाही बक्षीस. खरं आहे का हे.

स्टॅन voting मध्ये अति म्हणजे अतिच पुढे असेल, शिव प्रियांका आसपासही नसतील त्यामुळे तो जिंकला असावा, थोड्याच वोटस नी हे दोघे मागे असते तर स्टॅनला विनर केलं नसतं.

हो, बिअगबॉसमधली स्पॉन्सर्ड स्पर्धा होती, फिमेल कॉन्टेस्टन्ट्स साठी, मेकप स्किल्स वरून आवडत्या फिमेल कॉन्टेस्टन्ट्स्ना पब्लिक वोटिंग ठेवले होते, चर्चा नाही झाली समहाऊ त्याची बिबॉ मधे !
अनाउन्समनेटही नाही केली.
प्रियंकाला मुव्ही मिळाल्याचीही चर्चा आहे पण तिनेच स्वतः इंटरव्ह्यु मधे क्लिअर केलं कि अशी कुठलीच ऑफर नाहीये सध्या तरी !

शिवला पण जिंकवायचं की असल्या कुठल्या स्पर्धेत, त्याला एकट्याला काही नाही मिळालं वाचून जरा वाईट वाटलं.

मराठीत निदान रनर अपला पिअर्स का कुठल्या contest चं प्राईझ तरी मिळालं.

स्टॅन मराठी जास्त बोलतो बहुतेक, काय विषय मस्त बोलतो. मजा आली त्याचं बघताना. प्रियंकाबद्दल एकदम स्ट्रेट फॉरवर्ड मत व्यक्त केलं त्याने.

शिव प्रियंका बघतानाही मजा आली. शालीनचं नाही बघितलं.

कृष्णा मस्त म्हणाला स्टॅनला की तुला तीन महीने गेम अजिबात समजला नाही आणि चौथ्या महिन्यात तू ट्रॉफी घेऊन बाहेर आलास, भारी होतं ते. मेहबूबा बुबा मस्त होतं.

स्टॅन च नाव अल्ताफ दळवी आहे
कोकणी मुस्लिम असतात तेच आहे तो बहुदा.... दळवी आहे म्हणून मराठी बोलत असेल ...
नॉर्मली हिंदी बोलताना ही तो मराठी शब्द घुसडवतो....

स्टॅनची मातृभाषा मराठी नक्कीच नाही पण पुण्यातल्या झोपडपट्टीत वाढलाय, बस्ती का हस्ती.. लोकल भाषा मिक्स झालेला टपोरी अ‍ॅक्सेन्ट आहे त्यामुळे , त्याची आई व्यवस्थित आणि सभ्य हिन्दी बोलते .
हिन्दी मातृभाषा त्याची टॅगलाइन आहे , हिन्दी लिहिलेले डायमन्ड नेकलेस घालतो पण त्याचं हिन्दी एकदम फनी आहे, समजतच नाही नॉन मराठी लोकांना !
कन्टाला आया, आपला/आपली , शेमडी, विषय, वरती, किरकिर, घाण , रावस,उसने मेरे साथ फोटो काढा इ. शब्दं वाक्यावाक्यात Proud
पण बिन्दास बोलतो एकदम, हीच भाषा त्याची युसपी !
स्टॅनची काय जादू आहे माहित नाही, काल त्यानी नवे इन्स्टाग्रॅम रेकॉर्ड केले, त्याच्या इन्स्टालाइव्ह ला 573K व्ह्युवर्स होते , इंडियन सेलिब्रीटीज मधले हे रेकॉर्ड आहे, आधी विराट कोहलीचे होते स्टॅनने मोडले !
जगातल्या टॉप १०मोस्ट व्ह्युड मधेही आहे आले आहे त्याचे इन्स्टालाइव्ह सेशन रेकॉर्ड.

स्टॅन चे नाव दळवी नाही अल्ताफ तडवी आहे. मला पण फार आश्चर्य वाटते त्याची आई बस्तीमधे राहून पण बरेच डीसेन्ट हिंदी बोलते अन याचे हे असे काय कडबोळे म्हणून Lol बहुधा सतत टपोरी कंपनी हे कारण असावे. तो काहीही बोलताना ऐकून हसूच येते मला , अनोळखी लोकांपुढे बोलतोय म्हणुन कसलेच रिजर्वेशन्स नाहीत, काही पॉलिश/ शुगरकोटिंग नाही की काही हातचे राखून ठेवणे नाही , जे मनात आले ते त्याच शब्दात बोलतो. म्हणूनच स्पॉन्टॅनियस जोक्स होतात Happy त्याच्या गाण्या(?)तले मात्र काही झेपत नाही बाबा मला!
प्रियांका आता इन्टरव्ह्यूज मधे बोलताना बरीच रियल आणि चांगली वाटतेय. घरात असताना सतत एक मुखवटा, एक भिंत वाटायची. पण एकूण तिचे फ्यूचर चांगले दिसते , मूव्हीज माहित नाही पण सिरियल्स वगैरे भरपूर मिळतील तिला. शालीन ला पण मिळतील कामे. अर्चनाला मात्र सोमि ने , मीडियाने फार भाव दिलेला दिसत नाही. शिवला आत्ता खूप प्रसिद्धी मिळतेय पण त्याचे स्वप्न हिरो बनण्याचे आहे असे म्हणतो नेहमी. ते अवघडच आहे असे वाटते !अ‍ॅक्टिंग उसके बस की बात नही! सिनेमा काय, सिरियल चा हिरो बनण्याइतकी पण नाही Happy रिएलिटी शोज सोडून पुढे काय जमेल शंकाच आहे.

प्रियांका आता इन्टरव्ह्यूज मधे बोलताना बरीच रियल आणि चांगली वाटतेय. >>> हो कुल आहे. तिला हरल्याचं दु:ख नाही वाटत, शिव मात्र गृहीत धरून बसलेला की तोच जिंकणार. त्याच्या आईचाही चेहेरा पडलेला. बाबांनी मात्र stan जिंकला तेव्हा हात उंचावून कौतुक केलं.

शिवला म मां मुवित घेणार होते ते बारगळले बहुतेक. त्याच्या नंतरच्या बऱ्याच जणांना घेतलं.

शिवला फक्त रियालिटी शोज मिळत राहतील बहुतेक. मुवी मिळाली तरी अॅक्टिंग करेल की नाही शंका आहे. मैत्रेयीला पुर्ण अनुमोदन याबाबत.

शिव रिअ‍ॅलिटी शोज साठीच आहे.
कलर्सचे झलक, KKK वगैरे वाट पहातच आहेत !
अ‍ॅक्टिंग मिळेलही पण त्यासाठी ट्रेनिंग घ्यायची गरज आहे त्याला, स्टन्ट्स साठीही !
प्रियंका बिबॉ मधे इतकी फेक होती, एव्हिक्ट होता क्षणी बाहेर आल्यावर ती वेगळी व्यक्ती वाटत होती, मच बेटर अ‍ॅन्ड रिअल आउअटसाइड !
बाकी स्टॅनवर अजुनही भरपूर टिका होतेय, वर्स्ट विनर म्हणून पण तो रेकॉर्ड्स करतोय, शोज करतोय्य पैसा मिळवतोय !
शिव प्रि अर्चना फॅन्डम्स अजुनही ट्विटरवर भांडत आहेत पण कॉन्टेस्टन्ट्सना एकत्र काम करायचय, ते लोकं सगळं विसरून मुव्ह ऑन करत आहेत !
शिव - अर्चना पण आता फ्रेन्ड्स झालेत Proud

काल स्टॅनची एक दोन गाणी "हस्ती की बस्ती" वगैरे वगैरे ऐकण्याचा प्रयत्न केला. अजिबात झेपली नाहीत. अतिशय घाणेरडी भाषा... याला सपोर्ट कोणत्या लेवलची लोकं करतात कोण जाणे. बरेचसे बॉलिवुडचे ह्याला सपोर्ट करतात ते केवळ ह्याच्या सपोर्टर्सनी त्यांना सपोर्ट करावे म्हणून असेल.. आधी लिहील्याप्रमाणे प्रियंकाकडून शिव हरला असता तर तितके वाईट नसते वाटले.

फार पुर्वी बाबा सहगलची गाणी ऐकायचो. ती फार बरी म्हणायची.

मलाही स्टॅन एक एन्टरटेनर म्हणून , सर्वात रिअल कॅरॅक्टर म्हणून बिबॉ मधे आवडला पण त्याचे रॅप नाही झेपत !
स्टॅनचे फॉलॉअर्स ९ मिलियनच्यावर आहेत Uhoh
बाकी काही म्हणा इतर कॉन्टेस्टन्ट्स दररोज निरनिराळ्या मिडिया हाउसेसना इंटरव्ह्युज देत आहेत , स्टॅन मात्र लगेच कामाला लागला, इंडिया टुरही अनाउन्स केली !
फारच कमी इंटरव्ह्यु़ज दिले त्यानी, पहिल्या दिवशी दिले तेवढेच !
Btw , शिवने ऑफिशिअली खतरोंके खिलाडी मधे जाणार असल्याचे सांगितले.

स्टॅन खरंच कोण आहे अजिबात माहीती नव्हता, आणि जिंकलाही, हाहाहा. त्याचे फॅन्स म्हणे पार झोपडपट्टीपासून वरच्या लेवलपर्यंत आहेत. मी रॅपही अजून बघितला नाही त्याचा, पण रेकॉर्डतोड वोटस त्याला मिळायचे हे मात्र सगळे सांगायचे ते खरं होतं. शिव प्रियंका फॅन्स भांडणात स्टॅनला मस्त लाभ झाला.

बाय द वे तो सारखा रावस, रावस शब्द वापरतो त्याचा अर्थ काय. रावस नावाचा मासा असतो एवढं माहीतेय मला.

रावस = लय् भारी
मागच्या रविवारी शिव जिंकला नाही हळहळ वाटली होती, बरेच फॅन्स अजुन सॅड आहेत पण रिअ‍ॅलिटी चेक मिळतय स्टॅनच्या फॅन्सची पॉवर बघून.
शिवच्या इन्स्टा लाइव्ह ला लोक 71K होते , इतर बिबॉ कॉन्टेस्टन्ट्सच्या व्हिडिओजना २० ते २५ हजार व्ह्युज आणि स्टॅनचे रेकॉर्ड ब्रेक 573K , थोडक्यात काय शिव सर्वात डिझर्विंग असला तरी आसपासही कोणी नाही स्टॅनच्या सुनामी फॅन्सपुढे !

Kahich deserving skills nasatana fans aahet tyache.. gaani lyrics aawaj spontanity kahich nahi.. sagala so so

Bigboss season 17 suru aaj pasun, navin page aahe ka? Ithe vachla naahi tar maja naahi yet baghayla!!!

सुरुही झालं, फार जाहीरात केली नाही का यावेळी. यात गुम है किसिके मधले दोघे आहेत का, नील आणि ऐश्वर्या. तो नील आवडायचा मला. ऐश्वर्या एकसुरी अभिनय होता, हिच्यामुळे सोडली होती सिरीयल.

खतरोके खिलाडी संपलं का, कोण जिंकलं. शिव कितवा आला. तो जिंकला असं कानावर आलं नाही म्हणून विचारते.

मी पाहिलं नाही खतरोंके खिलाडी पण शिवने अगदीच हसं करून घेतलं म्हणे स्वतःचं, टॉप ३ मधेही नव्हता, बॅड परफॉर्मन्स !
बीबी १७ चा धागा काढला नाही अजुन, अन्किता लोखंडे, मुनव्वर फारुकी, जिग्ना व्होरा(पत्रकार जिच्या आयुष्यावर नेटफ्लिक्स सिरीज ‘स्कुप; बनवली आहे.) यांना बघायला उत्सुक आहे !

मी पाहिलं नाही खतरोंके खिलाडी पण शिवने अगदीच हसं करून घेतलं म्हणे स्वतःचं, टॉप ३ मधेही नव्हता, बॅड परफॉर्मन्स ! >>> ओहह. तो मराठी जिंकला तेवढंच, बाकी विनर होत नाही बहुतेक.

थँक यु भावना, तो सीन वुट वर असेल तर बघेन. या दोघांनाही मी ओळखत नाही पण उगाच उत्सुकता होती, कोण जिंकलं त्याची.

Pages