बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवचा विडिओ भन्नाट होता. सगळ्यात मस्त. वरती बिबॉचे डायलॉग. भारी.
स्टॅनचा छान होता. अर्चनाला बिबॉने जोकर म्हणुनच डिक्लेअर केलं तसाच तिचा av होता.

वोटस प्लस, content, plus production teamचे मत असं सर्व असतं ना.

Votes तर स्टॅनला तुफान मिळतात पण त्याला जिंकवतील असं वाटत नाही.

तो जिंकला तर इतिहास घडेल, दोघांच्या फॅन्स भांडणात तिसऱ्याचा लाभ.

काल प्रियांका उगाच भांडत होती शालीन ने मस्त टशन दिली तिला...
तो हाकलून लावत होता, तरी मुद्दाम येऊन कोणतेही मुद्दे उकरून उकरून काढत होती.....
सिरियसली हिला जिंकवल तर नेक्स्ट टाईम पासून सगळे असेच फालतुगिरी करून च जिंकायला बघतील.... hahahah

कारण डोक्याने खेळण्यापेक्षा असे मुद्दे काढून , आवाज मोठा करून, उगाच ची भांडण करून जिंकणं सोपं असेल प्रियांका सारखं तर मग झालं....टास्क तिने कधी ही खेळला नाही , ना कालही पूर्ण करू शकली......

संपला आता बिबॉ...पण शालीन टिनाच्या भानगडीत पडला नसता ना, त्याचा गेम वेगळा असता. एकट्या त्यानेच बिबॉला उलट उत्तरं देत झापलंय. आणि सलमानला पण.शिवाय सगळी सोंगं घेतली त्याने. आता 4 का 5 नंबरवर जातोय तेच बघायचं.

वोटस प्लस, content, plus production teamचे मत असं सर्व असतं ना.
>>>नाही.. फक्त वोट्स .. नाहीतर हिना खान जिंकली असती शिल्पा शिंदे ऐवजी... बानी जिंकली असती मनवीर गुज्जर ऐवजी...

आणि वोट्स देणारी बरीच जनता सोमी वर नसते... माझ्या सासूबाई नि रुबिना ला वोट केले होते- कित्येक.. त्या कुठल्याही सोमी वर नाही...

शालीन रॉक्ड , किती अ‍ॅथलॅटिक आहे !
त्यानी खतरोंके खिलाडी नाकारले, बहुतेक सिझन १० केला आहे शालीनने ऑलरेडी !
बाकी शिवला KKK शो करायचा असेल तर स्विमिंग यायला हवे!

मला खरंच स्टॅन जिंकला तरी आवडेल.... >>> अगदी अगदी. वोटींगने तरी हाच जिंकेल. तुफान वोटींग आहे त्याला, शिव आणि प्रियंका जवळपासही नाहीत त्याच्या. अर्थात वुट वोटींग सांगत नाहीत म्हणा. वुटवर त्याचे फॅन्स जाऊन वोटींग करणार नाहीत असं वाटत नाही. तिथेही तोच एक नं असेल. ही दोघे फार दुर असतील त्याच्यापेक्षा.

सुरु झाली आहे फिनाले. ५ तास खेचणार आहेत त्यामुळे मी पूर्ण बघणार नाही, अधून मधुन बघते आहे. एका प्रोमोत स्टॅन तौकिर ची नक्कल करताना समोरून खरा तौकीर आला तो सीन फार फनी होता Happy घरात सगळे कन्टेस्टन्ट आलेले दिसले. तिथे पण स्टॅन रॉक्स, त्याला विचारले अपनी शादी मे इनमेसे किसे नही बुलाना चाहोगे आप उसका नाम बताइये, तर तो म्हणे इदर राइट साइड मे बैठे किसीकोभी नाही बुलाऊंगा . ( म्हणजे कोणत्याच नॉन मंडली ला) Lol
सोमिवरचे अपडॅट खरे असतील तर आतापर्यन्त आधी शालीन आणि मग अर्चना एविक्ट झाली आहे.

मग शिव जिंकेल.

तो जिंकला तर काल मी लिहीलेलं खरं होईल, शिव प्रियंका स्टॅन.

परी vs शिव टॉप 2 >>> असे असेल तर शिवची av बघता शिव जिंकेल असे वाटतंय. शिव, स्टॅन पैकी कोणीही जिंकले तरी चालेल पण बहू नको.
जय भानुशाली चा interveiw पहिला त्यात त्याला पत्रकारांनी bb विनर कोण होईल विचारले असता तो विचारतो कलर्स फेस कोण आहे, प्रियांका का? तर ती जिंकेल, ती नाही तर मग endomol चा शिव असेल.

ती गौहर खान जिंकण्यासाठी जे नाव घेते ते रनर अप होतात म्हणे, तिने कोणाचं नाव घेतलं आठवा बघु.

मी यावेळी फॉलो केलं नव्हतं, हिंदी करत नाही मी, पण सपोर्ट शिवला. ह्या दोन दिवसांत स्टॅनचं जास्त कौतुक वाटलं, सो मि बघून पण तो तिसरा असेल असंच वाटलं. आत्ताही बघत नाहीये टीव्ही. इथेच लक्ष ठेऊन आहे.

तो अंकित काय दगड आहे खरंच. शो मधे पण आणि मधे मधे ती नवी सीरीज येतेय त्याचे प्रोमो आदळताय्त सारखे त्यात पण एकसारखाच, अगदी रेष पण न हलणारा दगड चेहरा कोणाला आवडत असतील असले लोक. Uhoh
मला ते नाच वगैरे फार बोर होतायत एकंदरीत. आणि त्या कृष्णाचे जोक्स पण.
बायदवे, प्रियांकाचा ड्रेस केशरी भगवा होता आणि तिच्या डान्स पैकी एक बेशरम रंग गाणे होते पण हुषारीने त्या गाण्याला ब्लॅक अँड व्हाइट केले होते Happy

च्रप्सनी टॉप २ लिहिले ना. >>> चॅनेलवर अजून 3 जण राहिलेत. कॉमेडी, डान्स टाईमपास सुरू आहे.
च्रप्स, तुम्ही कुठे बघत आहात?

सोर्री टॉप 2 mc आणि शिव

प्रियांका आउट अशी न्यूज आली आहे... गौहर ची पनौती लागली...

ओ माय !! खरंच शॉक बसला मला प्रियांका ३री म्हटल्यावर!!
पण सो हॅप्पी !! हक से मंडली !! ट्रॉफी गोइंग टु मंडली !! लाइट बंद करायला देत नाहीत का हिंदित?!

Pages