बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज निमरीत आउट !
यावेळच्या वीकएंड वार नंतर आता पिक्चर क्लिअर आहे. शिव-प्रियांका दोघे चुकीचे. मैत्री केली तरी चुकीचे, नाही केली तरी चुकीचे ! नॅरेटिव्ह सेट झाले आहे.

स्टॅन विनर होणार हे पक्के ! Congratulations in advance.

काल सुम्बुल गेली. आता मिड वीक मधे घरात फॅन्सना पाठवून वोट घेतले आणि निम्रित एविक्ट झाल्याच्या बातम्या येत आहेत. सर्वांनी एकूण दिलेले कन्टेन्ट पहाता बरोबरच आहे मग.
प्रोमो मधे दिसतोय तो प्रियांकाचा बलून सारखा फ्रॉ़क काहीतरीच दिसतोय्, ( चुकून सुंबुल ची बॅग तिला दिली का?! Happy )तिच्या प्रौढ पर्सनॅलिटी ला शोभत नाहीये.
आरती, चिंता नका करू, प्रियांकाच जिंकेल बघा.

मैत्रेयी नाही, मी चिंता करत नाही, प्रियंकाला माझा सपोर्ट असला तरी ती काही माझी नात्यात नाही की जिंकली/नाही जिंकली की माझ्या आयुष्यात काही फरक पडेल, मी तर व्होट पण करत नाही कधीच. कोण एवढे कष्ट घेईल.
पण असय ना शेवटच्या आठवड्यात येऊन टॉप २ चे कॉन्टेस्टंट्सच्या स्ट्रॅटेजि चूकीच्या नाही दाखवत. स्टॅन ला काही दिवसांपासून ज्याप्रकारे फुटेज मिळत आहे त्यावरून तरी असेच वाटत आहे की यावेळी बीबी काहीतरी वेगळे करणार आहे. वोटिंग तर स्टॅन ला आहे कदाचित प्रियांका एवढे नसेल पण आहे. पण शिव त्याच्यापेक्षा नक्की जास्त डिझर्विंग आहे.

शिवाय प्रियांकाला माय ग्लॅम मिळाले आहे, सलमान पण कदाचित काहीतरी रोल देणार आहे. मग ट्रॉफी पण नाही देणार, सगळेच एका व्यक्तीला नाही देणार. सगळ्यांना काही ना काही काम मिळेल याची सोय केली आहे बीबीने

Stan and his Fandom in full swing!
I'm ok if he wins but don't want Priyanka to shut the lights with him.

यावेळी सगळीकडे म्हणजे कलर्सच्या सगळ्या रियालीटी शोजमधे कलर्सवाले ट्वीस्टस आणि टर्नस आणतायेत जास्त. त्यामुळे प्रेक्षक अंदाज बांधू शकत नाहीयेत.

अनिश्का +1
मला तर वाटतय तिला फिनालेला 5 व्या, 4 थ्या नंबरवर जरी बाहेर काढलं तिथेही ती टांग अडवून बसेल, एवढं कौतुक केलं, आता पहिलाच नंबर द्या.
बाकी निम्रित ttfw नसते तर आधीच गेली असती.

मला काल शालीन चं एक बरं वाटलं.... मेजोरीटी मध्ये नाव आलं, राशन हवं , मी जो नंबर मिळाला त्यावर जाऊन उभा राहतो...इथले नंबर महत्वाचे नाहीत बाहेर चे आहे...
निमरीत ने पण तेच केलं...
अर्चना ला काय गरज होती इतकं अडून बसायची.. एरवी तर लोकांना बोलते, फुकट खायला आलेत वगेरे...
हिने कुठला ही टास्क कधी केला नाही ना काल केला, पण आयतं खायला बरोबर बसली... भुखी औरत...

आधी मजा करायची तेव्हा बरी वाटली पण आता फार खालच्या पातळीवर चालली....

काल प्रियांका चक्क आवडली मला. हेच वागणं आधी ठेवलं असतं तर शिव आणि तिला कॉम्पिटीशन च नव्हती बाकी घरात...

पण ते व्हायचं नव्हतं. मूर्खासारखी वाटेल तिथे घुसून भांडत बसायची. काल राशन गेलं तर अर्चना ला बोलली ते बरं झालं.

निमरीत माणूस म्हणून उजवी आहे. जेव्हा शालीन ला कुत्रं विचारत नव्हतं , तो डिप्रेस झालेला तेव्हा निमरीत ने च त्याला सहारा दिलेला...

चुडेल चौकडी आता बोलतेय की आम्हाला माहीत नव्हतं वगैरे पण प्रियांका टीना खूप मस्करी करत होत्या त्याची....

शिव स्टॅन ने पण मनाविरुद्ध का होईना, पण निमरीत साठी त्याला एंटरटेन केलं.

मला शिव किंवा स्टॅन झाला तर आवडेल... प्रियांका झाली तरी चालेल पण शालीन आणि अर्चना नको...

त्यांना ठेवणार ही नाही कदाचित, आधीच काढतील.. तिकडे पण अर्चना ड्रामे करेल....

अर्चना - प्रियंका मधे कोण त्यातल्यस त्यात बरे म्हणजे दगड कि विट मऊ असे आहे !
पण मला अर्चानापेक्षा अनॉयिंग आणि लिस्ट डिझर्विंग प्रियंका वाटते.
तिची पर्सनॅलिटी अजिबात प्लेझंट नाहीये, मोअर टॉक्सिक दॅन अर्चना.
एकही टास्क जमले नाहीये कि कन्टेन्ट देता येत नाही, एन्टरटेन्मेन्ट शून्य !
आवाजही अर्चानापेक्षा वाइट आहे तिचा, हसणे तर खरोखर शालीन म्हणतो तसे राक्षसी Proud
मेकप इतका वाइट करते कि मायग्लॅम तिला देणे जोक आहे , निम्रित चांगला करते मेकप

शिव ब्रो हा शब्द नवीन शिकल्यासारखा वापरत सुटलाय का? मुलींना सुद्धा ब्रो म्हणत होता. आणि ब्रो मित्राला म्हणतात ना? हा भांडताना ब्रो म्हणत होता.
ट्विटरवर शालीन, सुंबुल, अर्चना, प्रियांका , स्टॅन यांच्यासाठी ट्रेंड दिसल्या. शिवसाठी नाही.

प्रियांका बद्दल अगदी दिपानजली पण काल त्यातल्यात्यात मला ती अर्चना पेक्षा बरी वाटली...

पण मेकप बद्दल एकदम... फार विचित्र मेकप असतो तिचा. ड्रेस चांगले असतात पण मेकप ने मजा जाते.
बळच दीपिका बनवली तिला घराची....

अर्चना चा शरारा मस्त होता, पण मेकप अगदीच बकवास....

काल चं निमरीत च झबलं पण बरोबर नव्हतं... ती बारीक झाली ना बरीच??? की मला च वाटतेय????

मला स्टॅन ची पॅन्ट आवडली अर्धी काळी अर्धी हिरवी hahahahah.....

भरत,
आजकाल ब्रो हा जेन्ड्रल न्युट्रल शब्द झालाय, मुलीही एकमेकींना ब्रो म्हणतात Happy
‘वीरे दी वेडिंग’ पण ४ मैत्रीणींचा सिनेमा आहे ‘वीरे’ अ‍ॅज इन ब्रो !
शिवच्या असंख्य ट्रेंड्स झालायेत, प्रियंकापेक्षाही जास्त !
फास्टेस्ट वन मिलियन ट्रेंड्स पण आहेत .

आज शिवने शालीनला खरच पार बडवलं त्या फाटक्या ढोल सारखं Happy
शालीननेही चान्स सोडला नाही फुटेज घ्यायचा, त्यालाही माहीतेय शिवला खुन्नस देऊन तो पुढे जाईल फायनल बॅटल मधे , स्टॅन पण मस्तं टिंगल करत मज्जा बघतो शालीनची !
शिव -स्टॅन हक से टॉप २.. फार मज्जा येईल असं झालं तर , मग कोणीका जिंकेना !
आता जे टॉप ५ उरलेत तेच अपेक्षित होते.. आता मनी बॅग अर्चनाची !

स्टॅन काय विटी आहे , मस्त बोलला आजच्या टास्क मध्ये . त्याला खरंच बोलायला चान्सच नाही मिळाला आरडाओरड्यामध्ये . शिवला , स्टॅनला फुल्ल सपोर्ट होता पब्लिकचा. अर्चनाचा पचका... दुसऱ्यांदा ती शालीन पडले तेव्हा तिने गाणं परत वाजवायला लावलं आणि दुसऱ्या स्टेप्स केल्या , तिला वाटलं पडणं एडिट करतील . बीबॉ काय कमी नाहीये , ते पण दाखवलं . शालीनने त्याची सॉब स्टोरी ऐकवली , पण किती ऍक्टिंग ! प्रियंका उगाच बडे बडे डायलॉग मारते , त्या मानाने निमरीत बरी होती . अर्चना मात्र बोलताना पण शिव वर खार खाऊन असते असं वाटलं .

प्रियांकाचा ड्रेस किती अनफ्लॅटरिंग होता Uhoh तिचे बोलणे, ते हातवारे सिरियल मधे डायलॉग बोलावे तसे खोटे खोटे वाटत होते. ती आणि अर्चना उगीच शालीन ला घेऊनफार धमाल करतो आहोत असे बळेच दाखवत होत्या. डिड नॉट वर्क.
अर्चनाचा पब्लिक ने पोपट केला बर्‍यापैकी. शिव जेन्युइन वाटला पण स्टॅन सगळ्यात उस्फूर्त आणि एन्टरटेनिंग!!

मला ते बघायला बोर झालं म्हणून मी पुढे घालवलं. निमरीत गेली तेवढं च पाहिलं. शालीन ला रडायला वगैरे आलं टॉप 5 मध्ये गेल्यावर...
अर्चना डोक्यात गेली खूप...
प्रियांका चा ड्रेस मला पण नाही आवडला. खूप जास्त तोकडा होता आणि अनकम्फर्टेबल पण. तिच्यावर खरं तर व्हाईट पर्ल कलर छान दिसतो. फक्त तो खालचा बलून वियर्ड होता.
कोणाला लक्षात आलं का, काल निमरीत ने गळ्यात तेच सिल्वर स्नेक घातलेले , जे टिना दत्ताचे होते आणि तीने ते स्टॅन ला दिलेले.
काल शिव आणि स्टॅन दोघे च राहिले तर अर्चना मंडळी मधला अजून एक गेला म्हणून खुश होती...
प्रियांका आणि शालीन ने आनंद व्यक्त न करता समझदारी दाखवत शांत राहणं आणि जरा सेन्सेटिव्ह वागणं पसंत केलं.
प्रियांका ने पण ग्रजेस सोडून निमरीत शी चांगलं बिहेव केलं....
अर्चना बोलते, आता आठवडा राहिला, चांगलं वागा पण ती स्वतः च बोलते त्याच्या उलट करते....

आज एम्सी स्टॅन छा गया, काय बोलतो बिन्धास्त .. एकदम रिअल , युनिक आणि खूप मनापासून..मानलं !
शिव छान बोललाच आणि आज चक्कं निम्रीतही छान बोलली, हकसे मन्डली Happy
ऑडियन्सने अर्चनाला , प्रियंका आणि शालीनला ट्रोल केले , शिव स्टॅनला तुफान सपोर्ट होता!
तिथे ऑडियन्स म्हणून गेलेल्या पब्लिकने ट्विटर, युट्युबवर एक्स्पिरिअन्स सांगितले आहेत म्हणे, नॉन मन्डलीचा मुड ऑफ् झाला होता स्टॅन आणि शिवचा सपोर्ट् पाहून !
आज प्रियंकाचा ड्रेस हॉरिबल होता, टम्म फुगलेला शेपलेस बलून ड्रेस आणि त्यातून तिचे काडी सारखे पाय Uhoh
ट्विटर वर लोक लसुण ड्रेस म्हणत होते त्या ड्रेसला Biggrin

ट्विटर वर लोक लसुण ड्रेस म्हणत होते त्या ड्रेसला >>> अरे मीपण तेच म्हणाले लेकीला की शाळेत fancy ड्रेस मध्ये आंबा वैगेरे ड्रेस मिळायचे तसे हिने लसूण ड्रेस घातला आहे वाटतं.

कालच्या एपिसोड मध्ये मज्जा आली. स्टॅनला आता सूर गवसला आहे. आणी मुख्य म्हणजे तो हे मान्य करतोय त्यामुळे त्याचे फॅन्स वाढत आहेत.
बिग बॉसने शिवला indirectly तो विनर नसणार आहे सांगितले.
अर्चना किती जळकेपणा करते.

स्टॅन - शिव दोघांना खूप सपोर्ट आहे , शिव साठी रोडीजच्या सगळ्या मोठ्या नावांनी, मांजरेकर, काही मराठी सेलेब्जनेयी सपोर्ट केले आहे, मेघा तर खूपच जबरदस्तं सपोर्ट करतेय !
अर्थात कशाने काही होत नाही, मेकर्स ठरवतील कोण जिंकणार !
आय होप शिवस्टॅन पॉप्युलॅरीटी पाहून तरी काही योग्य डिसिजन घेतील , नाही तर आहेच कलर्सची प्रेडिक्टेबल बहु .

शिव जिंकला तर स्क्रिप्टेड असेल... साजिद गॅंग ला कोणाचा सपोर्ट नाहीय.. आणि शिव साजिद चा डावा हात... ब्राऊन नोजींग करून जिंकला म्हणावे लागेल...

च्रप्स कुठले बिबॉ पहाताय नक्की : Wink
सपोर्ट ऑल ओव्हर फक्त शिव आणि स्टॅनला आहे, बाकी उरलेत चॅनलचे फेवरेट्स .

आजचा एपिसोड स्किप केला. कृष्णा येणार आणि काहीतरी टाइमपास करणार कालचा प्रोमो बघूनच ठरवलं. आता कॉन्फरन्स मात्र बघणार.

कचरा एपिसोड होता, कशाला असल्या फालतु लोकांना फिनाले जवळ आली असताना आत सोडतात Uhoh
फॉरवर्ड करायला लागले तर संपलाच एपिसोड Proud

तिकडे सोमि वर अफवांना ऊत आलेला दिसतोय Happy प्रियांका फॅन ग्रुप्स "प्रियांकाला रेकॉर्डब्रेक वोट असतानाही पोलिटिकल लीडर्स चॅनल वर प्रेशर आणून मराठी स्टॅन किंवा शिव ला जिंकवणार " अशी कॉन्स्पिरसी थिअरी पिकवत आहेत तर शिव फॅन ग्रुप वर "शिव ला साइडलाइन केले जाते आहे. स्टॅन आणि प्रियांकाच टॉप २ असणार, विनर प्रियांकालाच करण्याचे ठरले आहे, चॅनल ने मुद्दाम प्रियांकाला सपोर्ट करणारेच पत्रकार मिडिया डे मधे आणले. " अशी ओरड करत आहेत.
काय खरे काय खोटे काय माहित. सगळेच विथ पिंच ऑफ सॉल्ट घ्यावे एवढे खरे Happy

Pages