बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा एपि आत्त्ता पाहिला. कुठेतरी वाचले होते आज प्रियांकाने सुंबुल साठी स्टँड घेतला म्हणून Lol प्रियांका आणि अर्चनाचा प्लान होता की टास्क रद्द झाले म्हणजे निम्रित ला आणि कुणालाच मिळणार नाही कॅप्टनशिप. दोघींच्या टार्गेट वर ऑबव्हियसली निम्रित च होती. नाहीतर कसला आलाय पुळका सुंबुल चा Happy एनीवेज पण फुल पचका झाला. कारण फॉर अ चेन्ज अर्चनाने म्हटलेले बरोबर होते. बिबॉ ला बाय हूक ऑर क्रूक निम्रित लाच द्यायचे होते ते.
आणि शिव आंघोळीला टास्क सोडून गेला असेही वाचले पण टास्क सोडून कुठे गेला तो ?! त्याचे काहीच काम नव्हते त्यावेळी. तो स्वतः आउट होता आणि समोर अर्चना प्रियांकाच्या हातात होते आता कोणी जायचे ते मग तिथे तसेही काही करण्यासारखे कुठे होते?!
मला आज प्रियांकाचे एक आवडले म्हणजे त्या रोटीच्या स्टुपिड भांडणात पडली नाही ती. बहुतेक क्लू बरोबर घेतला तिने काल बिबॉ ने दिलेला.

प्रियांकाला (actually सर्वांनाच... घरातल्या आणि बाहेरच्या प्रेक्षकांनाही ) पहिल्यापासूनच माहित होते की टास्क निमरीतच्या फेव्हरमध्येच आहे. मजा तर तेव्हा आली असती जर प्रियंकाला किंवा अर्चनाला निमरीतची बॅटरी दिली असती. तिला नक्कीच सुमबुलचा पुळका नव्हता, निमरीत जिंकणार हे उघड होते पण तिला फक्त मंडलीला आणि बिग बॉसलाही उघडे करायचे होते आणि तिचे अर्ग्युमेण्ट खूप मस्त होते की सुमबुलला फिनाले वीक मध्ये पोचवून नॉमिनेशन मध्ये वाचवण्यासाठी हे करत आहे. शिवाय टास्क उघड उघड आपल्या विरोधात आणि बायस्ड असूनही शेवटपर्यंत प्रयत्न करणे विनर ची ओळख असते.
स्टॅन ला शिव जायला सांगतोय म्हटल्याबरोबर बिगबॉसने घाईघाईने टास्क रद्द केले.व प्रियंकाला टोमणे दिले . स्टॅन तितकाच जबाबदार असून त्याला नाही. कारण हे लाडके बाळ आहे ना.

आणि शिव टास्क सोडून गेला (टास्कमधला सहभाग संपला तरी कोणीही तिथून निघून जाणे expected नाही) पण तीच वेळ होती जेव्हा बिग बॉसला दाखवायची की काय बरोबर आहे. पण हिम्मत झाली नाही त्याची. निमरीतला काढण्याची. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. व लोकही पाहतात. चूका खूप होत आहेत त्याच्या. एवढा हुशार, एक शो जिंकलेला पण मागे पडतो.

प्रियांका, शिव, शालीन आणि अर्चना हेच deserving आहेत. अर्चना मंडळींच्या विरोधात आहे म्हणून म्हणत नाही, तिने प्रत्येक दिवशी कन्टेन्ट दिलाय व शोमध्ये तिचा खूप मोठा हिस्सा आहे. तिला पुढे काम मिळू देत. स्टॅन व शिव फिनालेत आले तर मात्र शिवच जिंकू दे असे म्हणेन. कारण स्टॅन डिझर्व करत नाही.

प्रियांका वोट्सनुसार विनर असली तरी बिग बॉस तिची हिना खान करतील अशी मला दाट शंका आहे.

हाहाहा , मलाही आजचा एपिसोड आणि इथली कालची आरतीची पोस्ट याचा काही संबंध लागेना Biggrin
आणि शिवने कशाला स्टँड घ्यायचा सुम्बुल साठी ? काय संबंध त्याचा ? Proud
त्याच्याकडे अर्चानाची बॅटरी होती , इन फॅक्ट तो मधे बोलला तेंव्हा बिबॉने त्याला त्याची टर्न नसताना बोलला ,मदत करु नको म्हणून गप्प केले !
प्रियंका अडून राहिली हे त्यावर बिबीने सार्कॅझमने मारले तिला, तिच्या पेक्षा मग अर्चनाला समजले होते टास्क, तिकिट टु फिनाले निम्रीत साठीच होते , मजा आली असती तर निम्रीत कडे शिवची बॅटरी असती, अजुन मसाला मिळाला असता आणि टास्क इन्टरेस्टिंग झालं असतं !
एनीवेज शालीन आणि अर्चना दोघांना माहितेय ते जिंकणार नाहीत पण भरभरके कन्टेन्ट देतायेत अजुन !
आता निम्रीत फिनालेत गेल्यामुळे ती + प्रियंका, शिव, स्टॅन आणि अर्चना हेच असणार असं वाटतय टॉप ५ !

दिपंजली एकदम करेक्ट आहे तुझं.....
पण मला खरंच कळत नाही की बाकी लोकांना इकडे अगदी सर्व गोष्टी पर्सनल असल्यासारख्या का खटकत राहतात??? मी मागे पण लिहिलेलं की प्रत्येकाचे वेगळे व्यु आहेत...
कशाला एखाद्या बद्दल इतकं विखारी लिहायचं????

शालीन काल नुसता सुम्बुल ला मस्का मारत होता, ती पण शाणी बरोबर उडवून लावत होती...
काल अर्चना चा ड्रेस मस्त होता पण उगाच उंगली करत होती.... जे इरिटेटिंग वाटलं... उलट तिने हवं तिकडे च भांडून , मस्करी कॉमेडी करून इथपर्यंत आली असती तर तीच विनर बनवायच्या लायकीची होती... पण तिला डॉली बिंद्रा च बनायला आवडलं...
इतकी छान दिसते , अनिल कपूर वाल्या एपी मध्ये ब्राऊन साडी मध्ये मस्त दिसली. पण हरकते ही ऐसे करती है.... की सर्व निघून जातं मग...

प्रियांका तर सोयीनुसार खरेपणा बदलते..

निमरीत कलर ची बहू आहे हे माहीत नव्हतं. कुठल्या तरी ब्युटी स्पर्धेत होती इतकंच माहीत होतं... पण ती अक्षरशः काहीच करत नाही तरी मस्त वाचते सर्वकडे....

शिव ला गेम माहीत आहे आणि तो त्यानुसार च वागतो ....

स्टॅन ला आता सूर गवसला असं वाटलं.. आधी नुसतं घरी जायचंय इतकं बोलायचा... आता बरोबर बोलून फुटेज घ्यायला शिकलाय... फुटेज काय फक्त शालीन , प्रियांका आणि अरचु च घेणार??

सुम्बुल ने आता जे ही काही करतेय ते आधी केलं असतं तर पुढे गेली असती... नाचते मस्त ती...

टॉर्चर टास्क उशीरा आला, पहिली सहन करायला येणारी टिम युज्वली सिंपथी घेते आणि सिझन भर ते तसेच वाटतात पण आता सगळ्या ऑडियन्सला सगळ्यांचे रंग चांगलेच माहित आहेत Happy

आ हा! ये हुई ना बात. आला सगळ्या टास्क्स चा बाप टॉर्चर टास्क Happy आता तर फुल्ल खुन्नस निघणार दोन्ही कडून. मंडली ने सुंबुल ला न खेळू देता शिव स्टॅन आणि निम्रित ने खेळण्याचे ठरवलेय. देखते है कौन कितना झेल सकता है. शालीन -प्रियांका -अर्चना टीम जास्त स्ट्रॉंग वाटते आहे मला. विशेषतः अर्चना कोणतेही घटिया आयडीया घेऊन येऊ शकते. शालीन कॅन सरप्राइज ऑल. निम्रित आणि इवन स्टॅन बद्दल मला शंका वाटते आहे किती तग धरू शकतील.

शिव एकटा टास्क किंग आहे मन्डली मधे , स्टॅन टास्क मधे काही कामाचा नाही , ‘कन्टाला आता है‘ म्हणू शकतो , त्याचे केस कापले तर हलेल लगेच Proud सुम्बुल-निम्मो मधेही पोटेन्शिअल दिसत नाही .
आजचा एपिसोड पाहिला नाही पण टाइम काउन्टिंग मधे अख्या घरात तोच सर्वात क्लोझ होता, तरी सुम्बुल मुळे टिम हरली.

शालीन पाय टॅप करून आणि बोटं मोजून टाईम कौंट करत होता.. जी सवय मला पण आहे त्यामुळे गंमत वाटली..
माहीन कसे लाड करवून घेत होती बरोबर....
शालीन ला बरोबर कळतं की acting कुठे करायची , लक्ष कुठे वेधून घ्यायचं... पण टिना मुळे मागे राहिला आणि स्वतःचं माकड करून घेतलं.

पण मी अर्धवट अर्धवट पहिला एपी... आता पुढे काय होणार???

मला कळलं नाही की अर्चना निमरीत ला भुखी औरत वगैरे बोलत कडकडून भांडत होती काल आणि आज अचानक तिला पकोडे बनवले... मग निमरीत फिनाले मध्ये गेली तर तिला हलवा बनवला... म्हणजे नक्की कशी आहे ही...
आधी वाटलं मनापासून केलं पण नंतर अस ही वाटलं की ही फिनाले ला गेली तर हिच्याशी गोड राहूया टाईप्स काही बिहेव करत असेल.....

अर्चना मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलत होती , माझ्या मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये घालणार ते ऐकून कसं तरी झालं... म्हणजे ती अफोर्ड करू शकतेच पण तिला इंग्लिश न येण्यामुळे तिची मस्करी केली गेली हे तिला वाईट वाटलं च असणार....

काल परत एकदा शिव ने तो मराठी बिग बॉस विनर का झाला हे दाखवून दिलं.. पण बाकी लोक शून्य.... नेहमी टास्क तो , सौंदर्या आणि शालीन च करायचे.. बाकी लोक एक तर उभे असायचे नुसते नाहीतर त्या घोड्याच्या इथे लोळत पडलेले असायचे....

कळलं नाही की अर्चना निमरीत ला भुखी औरत वगैरे बोलत कडकडून भांडत होती काल आणि आज अचानक तिला पकोडे बनवले... मग निमरीत फिनाले मध्ये गेली तर तिला हलवा बनवला... म्हणजे नक्की कशी आहे ही...
<<<
Loked like a fake fight to me for footage !

फेक??? च्यायला... निमरीत किती हायपर झालेली आणि ओरडत होती... वेड्यासारखी... जर तिला खरंच ते डिप्रेशन चा इशू होता मग ती का आली बिगबॉस मध्ये....

कालचे पकोडे वगैरे बघून मला ही असे वाटले की म्हणजे आधीचे भांडण फेक असावे. म्हणूनच प्रियांकाने त्यात उडी मारली नसावी Happy ती निर्विकारपणे जिम करत होती तेव्हा.
या सीझन चे लोक एक्सपर्ट आहेत खोटे भांडण करण्यात. उगीच नाही जात आहेत फिनालेला Happy
थोडक्यात काय सब माया है, प्रेक्षकच येडे, साजिद, शिव नेहमी अर्चनाला म्हणायचे तू दिल की अच्छी है तेव्हा मला आश्चर्य वाटायचं की कसं तिचं दिल यांना एवढं आवडतंय Lol

लोल

मला तरी अस वाटलं कि ज्या मुली भांडतात, स्टॅन्ड घेतात त्या लोकांना आवडत नाहीत. प्रियांका च्या बाबतीत पण हेच झालय. तो शिव किती मुळमुळीत, लहान मुलासारखा लाडे लाडे बोलतो. एकदा अर्चना म्हणाली होती कि शिव हा प्रियांका मुळे मोठा झालाय. प्रियांका आरडा ओरडा करते म्हणून काही जणांना आवडत नाही आणि मी नेहमी बघितलं आहे कि असे लोक ज्यांच्याशी भांडतात ते लोक काही प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळेच शिव फेमस झालाय. तो मराठी 'बिग बॉस मध्ये पण सगळ्यांना ताई दादा करत पुढे आला आणि इकडे मंडळी च्या शिडी चा वापर करून आणि प्रियांका च्या विरोधात जाऊन. खूप वाईट वाटत प्रियांका बद्दल. बिचारी आवाज मोठा आहे आणि मुद्दे मांडते म्हणून आवडत नाही काही जणांना, पण खर तर ती रिअल खेळतेय त्यामुळेच सगळीकडे वोटिंग मध्ये पुढे असते. 'बिग बॉस पण नेहमी आधी साजिद मुळे आणि आता निम्रत मुळे मंडळी ला फेवर करतात. शिव आला तर दुसरा येईल किंवा तिसरा. प्रियांका बरोबर स्टॅन पण असू शकेल. पण जिंकणार तर आपली धाकडं गर्ल प्रियांका च !!!!

प्रियांका अन्यायाविरुद्ध लढते हा एक तिच्या पीआर ने अन तिने हॅमर केलेला अजेन्डा भोळ्या प्रेक्षकांना ऐकून ऐकून खरा वाटू लागला आहे! प्रेक्षकांना अशाच स्टोरीज आवडतात त्यामुळे ती तेच सेल करते आहे. हुषार आहे, बाकी अ‍ॅज अ पर्सन ती कशी आहे हे दिसलेले नाही, नो इमोशन्स, कायम एक मुखवटा. एक अदृष्य भिंत असल्यासारखे वाटते.
शिव ला प्रियांका फॅन म्हणतात की त्याने मंडली ची शिडी वापरली पण खरे तर मंडली त्याला लटकून पुढे आलेत ही फॅक्ट आहे. कोणीही स्वतः
गेम समजून पुढे जाण्याच्या क्षमतेचा नाही. टास्क मधे अनेकदा दिसते ते. स्टॅन साजिद कधी काही टास्क खेळायचे नाहीत, सुंबुल डिप्रेस्ड होती कित्येक वीक्स, निम्रित पण फुल कन्फ्युज्ड. शिव ने त्यांना धरून ठेवुन पुढे आणले.
असो. प्रियांका जिंकेल हेही मोस्टली माहित आहे.

अगदी अगदी डेली सोप करून ठेवलंय बिबॉला. यापेक्षा ट्विटरवर अजून उजेड आहे. कलर्सच्या कमेन्ट मध्ये मी एक कमेन्ट वाचली, priyanka is bringing revolution. कुठलं कसचं काय डोंबल्याचं revolution. किती हास्यास्पद लिहितात लोकं. शिव आवडत नाही पण त्याच्याकडून अपेक्षा किती, त्याने सुंबुलला वाचवावं, वाचवलं की मंडळी म्हणुन चिडवणार, नाही वाचवलं तर ही कसली मैत्री म्हणुन चिडवणार. 2 दिवस पहायला वेळ नाही मिळाला ,पण आजचा टॉर्चर टास्क बघेल.

कशाला एखाद्या बद्दल इतकं विखारी लिहायचं????>>>> अनिश्का तुम्ही माझ्याबद्दल बोलत असला तर पर्सनल कंमेंट्स करू नका. इथे प्रियांकाबद्दल कोण किती विखारी लिहीत आहे ते मागच्या पोस्ट्स पाहून घ्या.
तुम्हांला माझी पोस्ट्स आवडत नसेल तर , काउंटर करा , पण पर्सनल जाऊ नका केवळ एका शो साठी
.

ओह प्लिज.... लास्ट टाईम मीच तुम्हाला म्हटलेलं लिहिणं थांबवू नका.... कारण तुम्हीच रुसून चाललेलात... कोणी ही इथे वाचणारे सांगेल विखारी कोण लिहितेय ते... माझ्या पुरता विषय इथे सम्पला आहे... तुमचं चालू द्या.....

आणि केवळ एका शो साठी मागच्या पाना पर्यंत तुम्ही च चिडचिड करत होतात... त्यात तुम्ही स्वतः च कबूल केलं आहे... चिल करा थोडं....

मी कोणते विखारी शब्द वापरले आहेत ? शिव, स्टॅन वर टीका केली तर ती विखारी आहे हे मला माहित नव्हते.
anyways you also chill . I wish you best.

आजचे टॉर्चर टास्क अगदीच सपक झाले. उद्याही बहुतेक मंडळीपण जिंकेल आणि ५० लाख परत येतील. कदाचित सर्वानीच मिळून फारसे टास्कमध्ये टॉर्चर करायचे नाही असे ठरवले असावे. कारण नुकसान सर्वांचेच होते.

काहीच टॉर्चर केले नाही मंडलीने नॉन मन्डलीला, लाडात चालले होते सगळे, बाकी मराठी सिझन बोरींग असला तरी मराठीत जसे टॉर्चर टास्क असते त्याला तोड नाही, माने-विकासला कित्ती काय काय केलं !
आय होप उद्या टॉर्चर करतील, शिवला हवेच आहे अर्चनाने त्याला टॉर्चर केलेले Happy
काही म्हणा शेवटी आज नॉन मन्डलीला टॉर्चर झालं नाही त्यामुळे कोणालाच सिंपथी नाही मिळाली आणि कोणीच व्हिलन पण नाही दिसलं, कदाचित हीच् स्ट्रॅटेजी होती !
Btw तौकिर कि बेटी चे दिवस भरले आता, फार झाली रडारड, एक तर तिच्यामुळे हरले, वर तिचाच ड्रामा..पाठवा तिला घरीआता , बिबी सुद्धा वैतागलेत , शिव स्टॅनला खूप भडकवलय..पण ते दोघं काही भांडणार नाहीत.
बिबॉ वाटच पहातायेत सुम्बुलला काढायची पण लुक्स लाइक एम.जी मुळे ठेवले होते इतके दिवस !
मला एपिसोड्स मधे शिव शालीनच्या सतत फिरक्या घेत असतो ते पहायला फार मजा येते Biggrin
स्टॅन- शिव कित्ती धमाल करतात, सॉल्लिड एन्टरटेनिंग आहेत !

मला एपिसोड्स मधे शिव शालीनच्या सतत फिरक्या घेत असतो ते पहायला फार मजा येते Biggrin
स्टॅन- शिव कित्ती धमाल करतात, सॉल्लिड एन्टरटेनिंग आहेत ! >> हो ना हल्ली तेच बघण्यालायक आहे. मला पण खूप मज्जा येते ते बघायला. हल्ली शालीन खूप सुसह्य झालाय. शिव स्टॅन्च्या फिरकीला मस्त एक्सप्रेशन्स देत असतो.
अर्चनाला मंडळी शिवाय काय दिसतच नाही. स्वतः जिंकल्याचा आनंद कमी आणि ते हरल्याचा आनंद तिला जास्त होतो. प्रियांका त्यात पण लगेच ब्राऊनी पॉईंट कमावते अर्चना असं नको बोलू वगैरे करून.

मला तरी टॉप थ्री मध्ये शिव, स्टॅन आणि शालिन आलेला आवडेल आणि त्यात शिव विनर असलेला जास्त आवडेल.
पण टॉप थ्री अनुक्रमे प्रियांका, स्टॅन आणि शिव असतील असा माझा अंदाज आहे. प्रियांका आणि स्टॅनमध्ये, स्टॅन जिंकायचे पण भरपूर चान्सेस आहेत.
या नॉमिनेशन्समध्ये सुंबुल घरी जाईल बहुतेक. . पुढच्या आठवड्यात मिड नाईट एव्हिकशन मध्ये शालीन जाईल. टॉप फाय अनुक्रमे प्रियांका, स्टॅन, शिव, अर्चना आणि निम्रित.
हा माझा अंदाज. आता सगळ्यांनी आपापले अंदाज सांगून ठेवा. शेवटी मजा येईल बघायला कोणाचा अंदाज बरोबर आला आणि कोणाचा चुकला.

मला तरी टॉप थ्री मध्ये शिव, स्टॅन आणि शालिन आलेला आवडेल आणि त्यात शिव विनर असलेला जास्त आवडेल
<<<<<़
मलाही हेच टॉप ३ वाटतात.

सुम्बुल जाईल कारण निमरीत , प्रियांका, अर्चना आणि शालीन गेले ना लास्ट वीक मध्ये??? मग उरले स्टॅन आणि सुम्बुल....
तर मला पण सुम्बुल च घरी जाईल असं वाटतंय....

शिव जिंकला तर मला आवडेल पण तसं व्हायचं नाहीय बहुदा कारण तो कलर चा फेस नाही...
बहुतेक निमरीत प्रियांका पैकी कोणीतरी एक असेल.......
निमरीत फार इरिटेटिंग आहे. जरा काही बोललं की नुसता फुगा येतो नाकावर...

शिव आणि स्टॅन ची मजा च बघायला आवडते... काल शालीन ची पण फिरकी घेत होते, तो पण ," तुमको पता है ना तुम दोनो बोहोत मीन हो" असं म्हणत तिथेच बसून होता...

शिव आणि स्टॅन मध्ये मायक्रोवेव्ह वर बोलत होते ते मजेशीर वाटलं... त्या दोघांच्या ही घरात मायक्रोवेव्ह नाहीय.
"मस्त चीज है नही क्या? इधरसे जाने के बाद मै भी लायेंगा घर पे"
अर्चना प्रियांका कडे बोलण्यासारखं काही च नाही.
अर्चना खरंच मंडळी हरले की खुश होते आणि त्यातून च तिचा वेळ जातो...
शिव चलाख आहे आणि गेम ही चांगला खेळतोय, पण चॅनेल लाच जर त्याला जिंकवायचं नसेल तर काही उपयोग नाही....

Pages