बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वोटिंग मॅटर्स ... बोललो होतो... >>> खरंच का, तसं असेल तर इतिहास घडेल.

लाईव्ह वोटींगही घेतलं का शेवटी आज टॉप २ मधे.

Stan winner

Woho........ दिल गार्डन गार्डन हो गया....
शिव जरा अपसेट वाटला... पण मला मनापासून वाटत होतं या दोघांपैकी एक यावा....
सोमी वर ही इतका बवाल झाला प्रियांका जिंकणार म्हणून ही चॅनेल ने स्टॅन ला विनर बनवलं असेल....

0न वोट स्टॅन ला च जास्त होते... स्टॅन इंस्टा वर ही धुमाकूळ घालतोय....

वॉव!! स्टॅन विनर!! बिबॉ ने सरप्राइजच केले आज! हॅप्पी फॉर हिम, खरोखर रियल आणि जेन्युइन , त्याचा स्वॅग , गेले काही वीक्स सुप्पर एन्टरेटेन पण केले, पण... पण शिवसाठी हळहळ वाटली! कन्सिटन्टली परफॉर्म केले होते, आणि त्यानेच लिटरली स्टॅन ला टॉप मधे आणले. ठीके पण !
चला भारी सीझनचा एन्ड पण भारी झाला!!

खरंच का. अभिनंदन स्टॅन. वोटींगमधे त्याच्यापासून कोसो दूर असतील शिव आणि प्रियंका. तरी मला वाटत नव्हतं तो जिंकेल. शिवच वाटत होता.

कलर्स बहु आणि कलर्स मराठी विनर हरले का खरंच.

टीव्हीवर नाही अजून दाखवलं.

तुम्ही कुठे बघताय, आमच्या टीव्हीवर कृष्णा भारती सुरु आहे.

Voting matters.... खरंय. शिल्पा शिंदे, मनवीर गुज्जर, सिद्धार्थ शुक्ला, गौतम गुलाटी, प्रिन्स सगळे voting ने जिंकले आहेत. स्टॅन साठी खूश आहे पण शिव जिंकला असता तर जास्त आनंद झाला असता.

ग्रेट, झोपडपट्टीतून आलेला, फार फेमस नसलेला (म्हणजे फेमस होता पण माझ्यासारख्यां कित्येक जणांना माहीती नसलेला) , इतके फॅन्स त्याचे आणि त्यांच्यामुळे आज विनर झाला. कौतुकास्पद आहे हे. त्याच्या फॅन्सची कमाल.

फाल्तु आहे बिग्बॉस. फक्त वोटिंग वर विनर असेल तर काही अर्थ नाही . कितिहि पर्फोम करा सगळे वाया.

युट्युबवर बघितला लास्ट विनिंग सीन, स्टॅन जिंकला. त्याचाच विश्वास बसत नव्हता बहुतेक. आता त्याची एवि बघेन. मी कोणाचीच बघितली नव्हती.

iशिव ने जरा मॅन्युपिलेशन्स कमी आणि साजिद ची चाटली नसती मी पण वोट दिले असते त्याला.. असे बरेच असतील...

कसली सुंदर ट्रॉफी आहे.

सलमानने स्टेजवरून असं का बाजूला केलं शिवला. काहीही म्हणा शेवटी दुसरे होणं हे जास्त त्रासदायक असेल.

वीणा फार लकी होती शिवसाठी, मागे एकदा मी लिहिलंही होतं ते. तिला गेस्ट म्हणून तरी आणायला हवं होतं. सुरुवातीला मला तिने येऊ नये ह्या शोत असंच वाटत होतं पण नंतर ह्या गोष्टीसाठी तिने यावं असं वाटलेलं.

आता मी stan चे भविष्य काय सांगितलेलं आणि एवि कशी होती ते जाऊन बघेन. मी विनर जो होईल त्याचं जाऊन बघायचं ठरवलेले.

मी हिंदी bigg boss पाहिला नाही पण मला शिव जिंकावा असे मनापासून वाटत होते...Stan खरंच deserving winner आहे का ? तो तर अधून मधून मला जायचंय मला नाही रहायचंय असं म्हणत रहायचा न?भलेही त्याने entertain केलं असेल पण तो खरंच individual game खेळला का?

फाल्तु आहे बिग्बॉस. फक्त वोटिंग वर विनर असेल तर काही अर्थ नाही . कितिहि पर्फोम करा सगळे वाया.>>
तर काय असं करुन विनर होत असेल कुणी मग इतरांची सगळी धडपड वाया... एक गेम कधी धड खेळला नाहि, बिबॉच्या गाण्याला नुसता उभा असायचा .. नुसतं भाईगिरी अन दागिने चमकविले मग झाला विनर.. लोक पण काय चढवतात एकेकाला.. नाहि पटला हा बिगबॉस अगदिच.

प्रियंका व शिव यांच्यात शेवटची लढत होऊन प्रियंका जिंकली असती तर इतके वाईट नसते वाटले. एका टफ व चांगल्या खेळाडू कडून शिव हरला असता... असे शिव-स्टॅन यांच्यात स्टॅन जिंकल्यावर वाटले.

iशिव ने जरा मॅन्युपिलेशन्स कमी आणि साजिद ची चाटली नसती मी पण वोट दिले असते त्याला.. असे बरेच असतील... >>>> खरंतर शिव तसाच आहे. रोडीज चे काही भाग पाहिले, मराठी बिग बॉस मध्ये ही तो असाच होता. मोठ्यांसमोर पटकन झुकणारा. आठवा किशोरी शहाणेला पण ताई ताई करायचा सारखा. कोणीही मोठी सेलेब्रिटी आल्यावर त्याला होणारा आनंद त्याच्या चेहर्‍यावर लगेच दिसतो. इवन तो माझ्या जावेकडे आला होता एका function ला सेलेब्रिटी म्हणून तेव्हाही तो असाच down to earth होता. वयस्कर लोकांच्या पाया पडला, लहान मुलांना मांडीवर घेऊन फोटो काढले. सगळ्यांशी अगदी न कंटाळता बोलत होता. इथे तर त्याला कोणी movie ऑफर नव्हते करणार ना. आपल्याकडे बरीच लोक अशा वागण्याला चाटूगिरी म्हणतात. पण एखाद्याचा स्वभाव समजतो की एवढ्या दिवसात. सध्यातरी तो मला सच्चा वाटतो.

ढकलत ढकलत पाहिला एपिसोड. अंकितला काय झालेलं नक्की? एकदम सॉल्टी वाटला, चेहरा पण सुजलेला दिसला. फिनाले एन्जॉय करू द्यायचा ना जे पोहोचलेत तिथपर्यंत त्यांना. प्रियंका बाहेर आल्यावर मात्रं त्याचं तोंड बघण्यासारखं झालेलं. असो. स्टॅनला करोडोमध्ये मतं होती असं वाचलं. तो मात्रं शोसाठी म्हणुन बदलला नाही, कोणाच्या अधेमधे नाही, कोणाची भांडणं नाही लावली, उगाच आवाज नाही चढवला. त्याच्यावर आलं तेव्हाच भांडलाय. पण टास्कपण केली नाहीत, डोकं लावलं नाही, ते सगळं शिवने केलं. तो जिंकला चांगलं वाटलं, शिव जिंकला असता तर अजून आनंद झाला असता.

हो अंकित च तोंड सुजलेलं वाटत होतं... आणि प्रियांका निघाली तेव्हा तर सुन्न झालेला....
अर्चना ला इतकं तोडून बोलायची गरज नव्हती त्याने. आणि शो मध्ये असताना जितका बरा वाटलेला काल तो तितकाच निगेटिव्ह वाटला.....
गोरी नागोरी चा ड्रेस भयंकर च होता. जरा चांगला घालू शकली असती...
प्रियांका चा इव्हन ड्रेस...उलट आधीचे ड्रेस बरे होते....

स्टॅन आतापर्यन्त च्या विजेत्यांपेक्षा एकदमच वेगळं व्यक्तिमत्त्व! टास्क, स्ट्रॅटेजी वगैरे काहीही त्याच्या समजण्यापलिकडेच होते सुरुवातीला. नंतर शेवटचे ६- आठवडे मस्त एन्टरटेन केले मात्र. चॅनल च्या दृष्टीने पण इटस अ ग्रेट स्टोरी! बस्ती का हस्ती, ती रोडसाइड टपोरी भाषा, स्वॅग, रीलेशन्स, इमोशन्स चे अनेक शेड्स, शिवाय त्यांना मस्त ट्विस्टही देता आला, टिपिकल कलर्स बहू किंवा रिएलिटी शोज आधी जिंकलेला विनर होण्याऐवजी हा तिसराच विनर, ज्याला जास्तीत जास्त वोट्स पण होतीच अर्थात.
बाय द वे , साजिद ला नक्कीच माहित होता निकाल. फिनालेपूर्वी बोलताना म्हणे शिव सर्वात डिजर्विंग आहे वगैरे , आणि वर हेही लावून दिले की जरी जिंकला नाहीस तरी मनाला लावून घेऊ नकोस शिव. इ.

मला असं वाटतंय चॅनेललाही त्याची फॅन फॉलोविंग समजली असणार , चॅनेलने नंतर नंतर त्याला फुटेज द्यायला सुरुवात केली . टपोरी भाषा असली तरी ह्युमर होता बोलण्यात . टू द पॉईंट पोल खोल बोलायचा . सगळ्या रिऍलिटी शोचा फॉर्मॅटच त्याने सांगितला कशी फुटेजसाठी भांडणं ,नंतर गोड बोलणं वगैरे . नसती मिळाली ट्रॉफी तरी विले पार्ले मधून करून आणणार होताच Happy

स्टॅन अतरंगी व्यक्तिमत्त्व आहे , एकदम रॉ, फुल्ल ऑन टपोरी भाषा , अजिबात कृत्रिम नाही, त्याची सिग्नेचर ‘नै क्या‘ ‘शेमडी’ वगैरे बोलायची स्टाइल , उगीच फुटेज साठी भांडणं करायची नाहीत , स्वतःहून कोणाच्या वाटेला जायचं नाही पण कोणी त्याच्या वाटेला गेलं तर पार त्याला शाब्दीक आणि फिजिकल दोन्ही मार द्यायची तयारी !
अर्चनाला बाकी लोक किचन क्वीन वगैरे म्हणायचे पण हस म्हंटला होता तू किचन काम करतेस याचं उगाच तुणतुणं वाजवु नका, “सबके विकली पैसे चालु है यहांपे, काम सबको करना पडेगा“ Proud
आपल्याला त्याची पॉप्युलॅरीटी नंतर समजली पण आधीपासून मोठे सेलिब्रीटीज त्याला फॉलो करतात, रणवीर सिंगही !
रणवीरचं गल्ली बॉय मधलं ‘मुराद’ कॅरॅक्टर स्टॅन वरून इन्स्पायर्ड वाटतो किंवा उलटही असेल, स्टॅनला त्यापासून प्रेरणा मिळाली असेल , स्टॅनभाऊ नागराजच्या झुन्ड मधेही शोभला असता !

अर्चना एका interview मध्ये मस्त बोलली, आम्ही इतकी मेहनत उगाच घेतली, अपमान करून घेतला, स्टॅनने शेवटचे 2 आठवडे येऊन trophy घेऊन जायला हवं होतं!!!!

नाही गली बॉय चे कॅरेक्टर वेगळ्या रॅपर वरून घेतले आहे डिव्हाइन की काहीतरी.
तेव्हा स्टॅन प्रसिद्ध नव्हता. लहान १७-१८ वगैरे वर्षाचा असेल.
अर्चना इतकी रडत का होती एलिमिनेशन च्या वेळी. ४था म्हणाजे आताच्या लोकांत बेस्ट पॉसिबल नंबर मिळाला की तिला . टॉप २ मधे जायची पेक्षा होती का तिला Happy शिव- स्टॅन वर प्रचंड खुन्नस होती तिची.

अर्चना आता जळून खाक झाली आहे, तिच्या इंटर्स्व्ह्युज मधे दिसतय !
मेहनतीला काहीच अर्थ नाहीये जर ती लोकांना आवडलीच नसेल , निगेटिवच वाटली असेल तर !
तिला अजुन समजल नाहीये कि तिच्या सारख्या कॉन्टेस्टन्टला बेइज्जती करण्यासाठीच आणतात , कदाचित पुन्हापुन्हा आणतील राखी सारखे, पण क्वालिटी साठी नाही, उरली सुरली इज्जत घालवायला !
स्टॅन आणि शिव हिरोज आहेत , ती व्हिलन कम जोकर !

मला स्टॅन आधी माहीत नव्हता... आणि तसा तो काही करत पण नव्हता... पण एकदा ते जिम करताना , म्हणजे त्याने जिम करायला सुरू केलं तेव्हा शर्ट काढताना, तो समोर होते त्यांना म्हणाला, मेरा बॉडी देखके डर बिर मत जाओ हा तूम लोग... तेव्हा असलं हसायला आलेलं....... मग तो जरी शांत होता, काही करत नव्हता, घरी जायला रडत होता तरी काही मुद्दा असेल तर दोन चार शब्द असे बोलायचा की मजा यायची...

अर्चना फार जळक्या मनोवृत्ती ची आहे. चांगलं च बोलता नाही येत कोणा बद्दल....

Pages