चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हड्डी पाहिला मी. सिनेमा तसा एन्गेजिंग पण तरी टिपिकल आहे. ट्रेलर पाहिला असेल तर प्रेडिक्टेबल होतो सिनेमा. एका ट्रान्स जेन्डर चा बदला हा विषय. नवाजुद्दिन आणि अनुराग कश्यप दोघांची कामे छान, पण यात मेक अप आणि सीजिआय किंवा जे काय केलेय ते त्याची कमाल वाटते! नवाजुद्दिन ला ग्लॅम मुलगी हा लूक!! नवाजुद्दिन नेही मॅनरिजम्स व्यवस्थित केलेत! असे वाटले की त्याच्यासारखा केपेबल अ‍ॅक्टर असताना अजून मजबूत कथानक हवे होते. डायरेक्शन अनुराग कश्यप चे नाही , ते असते तरी कदाचित बेटर झाला असता सिनेमा.

हड्डी मी देखील पाहिला .. सो सो आहे.. बेपर्दा बेपर्दा गाणे मात्र तेव्हडे लक्षात राहते..

च्रप्स तुमचा जवान बद्दलचा प्रतिसाद खोटा आहे ते कळतंय. मायबोलीकर हुषार झालेत, फसणार नाहीत. Proud

पण तो सिनेमा खरा कसा आहे तो शारुकबद्दल बायस नसणार्‍या लोकांनी लिहा. चांगला असेल तर नक्की पहाणार.

च्रप्स तुमचा जवान बद्दलचा प्रतिसाद खोटा आहे ते कळतंय.
>> नाही हो... खरा आहे.. काय खोटे वाटले त्यात...

पण तो सिनेमा खरा कसा आहे तो शारुकबद्दल बायस नसणार्‍या लोकांनी लिहा. चांगला असेल तर नक्की पहाणार.
>>>>>>

यु कॅन लव शाहरुख
यु कॅन हेट शाहरूख
बट ... सांगायचा मुद्दा हा की अशी जनता मिळणे अवघडच Happy

येणी वेज,
साऊथ इंडियन मसाला मूवी किंवा शाहरुख आवडत असेल तर जा बिंदास्त.. पैसा वसूल आहे..
पण जर दोन्ही आवडत नसेल तर नका जाऊ.. कदाचित डोक्याला शॉट असेल..
कोणाला कसा वाटला विचारायच्या भानगडीत पडू नका, जो तो आपल्या आवडीनुसार सांगणार..
बाकी आतापर्यंत व्होटस्प मित्र आणि फेसबूक सिनेमा गल्ली ग्रूपवर ऐकलेले रिव्ह्यू ऐकून मी सुद्धा जायचा विचार करतोय पुढच्या आठवड्यात..
आणि मी कितीही कट्टर शाहरूख चाहता असलो तरी त्याचे काहीही बंडल सिनेमे थिएटरमध्ये बघत नाही..

चाहता आहे.. भक्त नाही Happy
छोट्या पडद्यावर मात्र बघतो सारेच

चाहता मात्र कट्टर आहे..
या जगात काही लोकांना मी इतक्यासाठीच आवडतं नाही की मला शाहरूख प्रचंड आवडतो.
पण याने माझ्या शाहरूख प्रेमावर काही फरक पडला नाही..

येणी वेज,
आताच मुलीशी बोलून परवाचा लेट नाईट शो प्लान बनवला आहे. Happy आता उद्याच ऑफिसचे दोन दिवसाचे काम उरकून टाकतो. आणि परवा वेळेवर घरी येऊन दोनचार तास आधीच माहोल बनवायला सुरू करतो.

पण तो सिनेमा खरा कसा आहे तो शारुकबद्दल बायस नसणार्‍या लोकांनी लिहा. चांगला असेल तर नक्की पहाणार. >>>

तामिळ / तेलगू मसाला सिनेमे खूप आवडत असतील तर थेटरात जाऊन पाहू शकता.
जर अजिबात आवडत नसतील तर वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातील.

पण तो सिनेमा खरा कसा आहे तो शारुकबद्दल बायस नसणार्‍या लोकांनी लिहा. चांगला असेल तर नक्की पहाणार. >>> मी शाहरुख फॅन नाही पण हेटरही नाही. मला स्वतःला अती action सिनेमे आवडत नाहीत, त्यामुळे तसल्या काही सीन्सना थोडा कंटाळा येऊ शकतो. पण ओव्हरऑल सिनेमा एन्टरटेनिंग आहे. साऊथचा टच असल्याने काही सीन्स अतर्क्य आहेतच. का व कसे हा विचार न करताच पाहण्याचाच सिनेमा आहे. पण शाहरुखने पूर्ण सिनेमा चांगला कॅरी केला आहे.

वेगळा धागा आहे ना?
(असे विचारल्याने आयडी जाऊ शकतो ही कल्पना आहे).

कोरियन सिनेमे the witch part 1 आणि पार्ट 2 पाहिले..प्राईमवर..
खतरनाक ऐक्शन,थ्रीलर के साथ स्टोरी भी मिलेगा..
मस्त आहेत..पहिला पार्ट जास्त आवडला...

जब्बरदस्त जब्बरदस्त जब्बरदस्त
शाहरूख वुई लव्ह यू...
आताच जवान बघून आलो.. थोडे माझे मन शांत होऊ द्या...
उद्या लिहितो.. नवीन धाग्यात...

जवान पाहिला .एका वाक्यात सांगायचं तर पराकोटीचा आशावाद( Extreme optimism) याचं उत्तम उदाहरण म्हणजे जवान .तद्दन गल्लाभरू, मास अपील चित्रपट आहे. मागे अनिल कपूरचा नायक चित्रपट आलेला तो ही त्यातलाच असं रियालिटीत घडत नसतं सो चित्रपट डोकं बाजूला काढून एन्जॉय करा.
अश्या वेळी गँग ऑफ वासेपुर मध्ये एक डायलॉग आठवतो."हिंदुस्थान मे जब तक सिनेमा है लोग xxx बनते रहेंगे".
बाकी नयनतारा मस्त दिसते पिक्चरमध्ये.

स्लीपी हॉलो (१९९९) बघितला. १८व्या शतकात घडणारी गोष्ट आहे. इकाबोड क्रेन नावाचा तरुण पोलीस कॉन्स्टेबल तपास कामात वैज्ञानिक पद्धत वापरली जावी असा आग्रह करत असतो. पण त्याचे वरिष्ठ त्याला उडवून लावत असतात. स्लीपी हॉलो नावाच्या लहान गावात आठवड्याभरात तीन खून होतात, तेव्हा इकाबोडला स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या तपासावर पाठवले जाते. तिथे गेल्यावर त्याला समजते की हा साधासुधा तपास नाहीये. गावकऱ्यांचे म्हणणे असते की २० वर्षांपूर्वी मारलेला हेडलेस होर्समन पुन्हा येऊन खून करत आहे.

मनोरंजक सिनेमा. जुने गाव मस्त उभे केले आहे. जॉनी डेप एकेकाळी खूप देखणा होता हे पाहून बरे वाटते.

Project wolf hunting कोरियन
भयंकर वायोलंस, ऐक्शन थ्रीलर सिनेमा..

दोन खूप जुने गाजलेले पहायच्या यादीत असलेले पिक्चर पाहिले.
The Graduate- मध्यमवयीन लिंगपिसाट स्त्री अननुभवी तरुणाला त्याच्या इच्छेविरुद्ध manipulate करून, त्याला आपल्या घरी यायला भाग पाडून, त्याच्यासमोर नग्न होऊन त्याला फशी पाडते आणि आपल्याबरोबर महिनोन्महिने संभोग करायला लावते. पिक्चर ओंगळवाणा वाटला. हेच एखाद्या पुरुषाने तरुण स्त्रीबरोबर केलं अशी कल्पना करा. I guess sexual exploitation is cool if done by a woman to a man. यात काय ग्राउंडब्रेकिंग होतं कळलं नाही.
The apartment- हा मस्त होता. एका इन्शुरन्स कंपनीत काम करणारा नायक वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपलं अपार्टमेंट लफडी करायला उपलब्ध करून देत असतो. त्याबदल्यात त्याचा एकीकडे नोकरीत उत्कर्ष होत असतो तर दुसरीकडे त्याला आवडणारी ऑफिसातली मुलगी (शर्ली मॅकलेन- डाऊन्टन ॲबीमधली लॉर्ड ग्रॅंथमची खत्रुड सासू ) वरिष्ठांच्या जाळ्यात अडकत असते. जॅक लेमनचा रोल मस्त आहे.

मुंबईत अशी घटना घडली आहे. त्यात ब्लॅकमेलिंग पण होतं. एका रिक्षावाल्याने आत्महत्या केल्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छडा लावला. क्राईम पॅट्रोल मधे एक एपिसोड आहे त्यावर

मात्र असे अपवाद म्हणजे नियम होत नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

इतका वाईट नाही बरं तो.शर्ट मोठ्या भावाचे किंवा काकांचे घालतो.अंगासरशी स्वतःचे शिवून घेतले, नीट भांग बिंग पाडला तर चांगला दिसेल Happy

लाईफ इन अ मेट्रो या सिनेमात शर्मन जोशीचं उपकथानक सुद्धा अपार्टमेंट सिनेमासारखं आहे.->+१

लाईफ इन अ मेट्रो या सिनेमात शर्मन जोशीचं उपकथानक सुद्धा अपार्टमेंट सिनेमासारखं आहे. >>>> तेच आठवायचा प्रयत्न करत होते मी. शर्मन, कंगना, केके

शर्ट मोठ्या भावाचे किंवा काकांचे घालतो.अंगासरशी स्वतःचे शिवून घेतले, नीट भांग बिंग पाडला तर चांगला दिसेल>>> Lol अनू आपण त्याला मधून भांग पाडून तीट पण लाऊ Wink

नीयत बद्दल वाचून वाईट वाटलं जरा. कशावर आहे?
एकतर विद्या बालन आवडती कलाकार आहे, इतका वेळ घेऊन काम करते.. आणि मग असा भ्रमनिरास झाला तर फॅन्स कशाला राहतील? Sad
आधीच फिल्म ईंडस्ट्री मधे लेट आली आहे ती..

'रामप्रसाद की तेरहवीं' पाहिला (जिओ सिनेमावर फ्री आहे)

सर्वांची कामं छान. पण प्रेडिक्टेबल वाटला. (तरी शेवट काय असेल याचा शेवटपर्यंत अंदाज आला नाही.)
सुप्रिया पाठक तिच्या सर्वात मोठ्या मुलापेक्षा लहान वाटते. नवर्‍याच्या अंतिम क्षणांबद्दल परत परत तेच बोलणं - हे 'व्हेन्टिलेटर' सिनेमातही होतं.
कोंकणा सेनच्या पात्रासाठी आधी उत्सुकता वाढवली आहे, पण नंतर ते फार काही करत नाही. तिच्यामुळे स्टोरीला एक वेगळी डायमेन्शन मिळते म्हणावं तर ते ही फार वाटलं नाही.
विक्रांत मेसी मिळालेल्या लहानमोठ्या संधीचं सोनं करतोय. मी फ्यान आहे त्याची.

जवान तुफान आवडला. बर्‍याच दिवसांनी भन्नाट काही तरी पहायला मिळाले. अ‍ॅटलीने एकदम वेगवान ठेवला आहे चित्रपट. बर्‍याच गोष्टी असतानासुद्धा एकसंध ठेवला आहे. गाणी ठीक आहेत पण बॅकग्राऊंड म्युझीक जरा लाऊड वाटले तरी अ‍ॅक्शन सीन्स ना समर्पक वाटते. शारूख ची मुलींची टीम, विजय आणि नयनतारा मस्त आहेतच वर लहान मुलगी पण भारी आहे. शारूख तर एक नंबर. लव्ह स्टोरींच्यामध्ये इतका चार्मिंग वाटणारा शारूख अ‍ॅक्शन करतना सुद्धा तितकाच मस्त दिसतो. पठाण मध्ये उगीचच त्याला ग्रंपी दाखवलेला वाटला. पण इथे तो त्याच्या मिस्कील शैलीत खेळकरपणे अ‍ॅक्शन मध्ये पण भारी पंचेस मारतो. अ‍ॅटली आपल्या हिरोला अजून मस्त कसे दाखवता येईल असा विचार करत असताना शारूख ने त्याला पूर्ण साथ दिलेली आहे.

पठाणमध्ये भाई आणि शारूख म्हणतात तेच खरे. इतके ग्लॅमर आणि स्टारडम आताचा कोणत्याही हिरोत पहायला मिळत नाहीत !

टोटल पोस्ट +७८६

बाई दवे,
जवानचा वेगळा धागा आहे.

https://youtu.be/4Cqc_HA37mc?si=QC0b6Ri_t9xK-5_o
असुरावधम सिनेमा उत्तम आहे !
कलाकारांची नावे माहित नाही , पण सिनेमा खिळवून ठेवतो .
मुलीच्या खुनाचा बदला एक सामान्य माणूस कसा घेतो ते दाखवले आहे .कोठेही कंटाळवाणा होत नाही

Pages