चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मोस्टलीसेन चे फॅन असाल तर नक्की बघू नका... अत्यंत छोटासा रोल आहे....
Submitted by च्रप्स on 3 September, 2023
>>> सायो ... सेन

मेड इन हेवन मधला फोटोग्राफर. >>>>>>>>>>>> त्याचा काय वशिला आहे का? चांगले रोल मिळतात पण तो कुठे सुटच होत नाही त्या त्या रोलसाठी. काहींचे लुक्सच असे असतात की ते श्रीमंत, बडे बाप की औलाद दिसूच शकत नाहीत उदा. नवाजुद्दीन, हा फोटोग्राफर... कळकटच दिसतात आणि काही जण गरीब रोल मधे इमॅजिन नाही करता येत.... रणबीर कपूर, करीना खानदान वगैरे

उद्या जेलर प्राईम वर येतोय.

जेलर समजून चार पाच डब्ड मूवीज युट्यूबवर पाहून झाले. हे लोक टायटल्सची सबटायटल्स दाखवत नाहीत.
कालच्या पिक्चर मधे रजनी बरोबर नवाजुद्दीन पण होता. विजय सेतुपती होता. नवाजुद्दीनने रजनीला कच्चा खाऊन टाकलाय.

तो चांगला दिसतो शशांक अरोरा.त्याला रोल सगळीकडे एकदम सिनिक बेपर्वा तुसडे मिळतात.इन्स्टिट्यूट चा स्टुडंट असल्याने चांगल्या जागी रोल्स मिळत असतील.अभिनय चांगला आहे.एका मुलाखतीत दाढी काढलेला बरा दिसत होता.कपडे मात्र काकांचे किंवा मोठ्या भावाचे घातल्या सारखे ढगळ.

ईक्वलायजर ३ - छान >>> पहिले दोन अमेरिकेत कोठे आहेत का स्ट्रीमिंगवर? मी मधे शोधले होते. पहिला सापड्ला नाही. दुसरा आहे कोठेतरी. शोधून लिहीतो. पहिला आधी बघू म्हणून दुसराही पाहिलेला नाही.

"डोन्ट वरी डार्लिंग" नावाचा सिनेमा नेफ्लि वर बघायला घेतला आहे. एक ८०-९०ज मधे असावं असा क्युट घरांचा सेट अप असलेलं आयडियल , स्वयंपूर्ण सुखी कॉलनी वाटेल असं गाव, पण जगापासून लांब कुठेतरी. सगळे पुरुष लोक एकाच कंपनीत कामाला जी त्या गावाबहेर वाळवंटात आहे, तिथे नक्की काय काम चालतं ते फक्त तिथे कामाला असलेल्या बाप्या लोकांना अर्धे मुर्धेच माहित. पण समजूत अशी की काहीय्तरी ग्राउंड ब्रेकिंग सुपर मटेरियल्स शोधायचे काम सुरु आहे. कंपनीचा सी ईओ सिनिस्टर टाइप्स. गावात रेडिओ वर सतत त्याचाच प्रोपोगंडा, वी आर चेन्जिंग द वर्ल्ड , यू आर लकी टु बी पार्ट ऑफ धिस वगैरे. समस्त स्त्रिया सुंदर, तरुण, सुगृहिणी. नवर्‍याची काळजी घेणार्‍या, छान राहणार्‍या, घर टापटीप ठेवणार्‍या, फावल्या वेळात शॉपिंग, किटी पार्टीज, बॅले क्लास इ. करणार्‍या. सगळ्या बागा, घरं आखीव रेखीव सुंदर. सर्व जण गोड आणि फ्रेन्डली. वीकेन्ड ला उत्फुल्ल पार्टीज आणि मजा मजा. पण कुठे तरी काहीतरी चुकतंय. काहीतरी बरोबर नाहीये. सर्व दिसतेय तसे नाहीये , टू गुड टु बी ट्रू ? एका गृहिणीला अशी काहीतरी शंका येते आणि ती उत्तरं शोधायचा प्रयत्न करते, पण नवर्‍यासकट सगळे तिलाच गप्प रहायला सांगतात , तिलाच उलट मानसिक रोग असल्याचे निदान होते. इथपर्यन्त माझा पाहून झाला. इन्टरेस्टिंग वाटला सो फार.

शिंडलर्स लिस्ट सुरू केलाय. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट मुळे कन्फ्युज झालो.
नंतर आठवला संदर्भ.

टू गुड टु बी ट्रू ? एका गृहिणीला अशी काहीतरी शंका येते आणि ती उत्तरं शोधायचा प्रयत्न करते >>> अरे कालच मी बघणार होतो. वाळवायला टाकलेल्या कपड्यांकडे ती एक बाई बघत काहीतरी विचार करत असते आणि तिला काहीतरी दिसते - अशी क्लिप नेफि दाखवत होती. तोच दिसतोय.

एक रॉकफोर्ड वाइव्ह्ज म्हणून पाहिला होता. त्यात आणि यात साम्य दिसते निदान वरकरणी.

स्टेपफर्ड
स्टेपफर्ड वाईव्ज पाहीलेला पूर्वी पण कथानक आठवत नाही.

स्टेपफर्ड वाइव्ज. करे़क्ट फा, मलाही त्याची आठवण आली बघाताना. पुढचे बघितले नसल्यामुळे माहित नाही किती साधर्म्य आहे ते.
आशूचँप - २ -३ भागात बर्‍याचदा सिनेमे बघणे होते माझे Happy अगदी फार कंपेलिंग नसेल तर.
झोप येण्याआधी थोडा वेळ टिव्ही बघणे हे मुख्य शास्त्र Happy

झोप येण्याआधी थोडा वेळ टिव्ही बघणे हे मुख्य शास्त्र>> शिंडलर्स लिस्ट हा असा बघण्याचा सिनेमा नव्हे, भयंकर त्रासदायक आणि अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे
ते म्हणतात ना मनावर ओरखडा उमटवला तसं काहीसं
हा आणि बॉय इन स्राईप पजामा

ओह ते तुम्ही रघू आचार्य ना म्हणालात होय. मग ठीके , मी उगीच मधे उत्तर दिलं . बरोबर या कॅटेगरीत शिंडलर्स लिस्ट नाही बसणार.

"शिंडलर्स लिस्ट हा असा बघण्याचा सिनेमा नव्हे, भयंकर त्रासदायक आणि अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे" - खूप दिवस ज्याचा इफेक्ट रहातो असा सिनेमा आहे तो.

“डोन्ट वरी डार्लिंग” पाहुन मला समाधान मिळाले नव्हते इतके आठवते. पोकळ वासा वाटला होता. (याचा अर्थ मला खरा अर्थ समजला नाही असाही होऊ शकतो).

मैत्रेयो- मला डार्क मिरर चा एपिसोड वाटतोय तुमच्या वर्णनावरून... वर्चुअल रियालिटी वगैरे...

झाला बघून "डोन्ट वरी डार्लिंग". डिड नॉट डिसापॉइन्ट. मला आवडला. थ्रिलर्स आवडणार्‍यांनी नक्की बघा असे म्हणेन! बाकी नंतर बोलू आत्ता स्पॉयलर्स नाही लिहीत.
च्रप्स - अगदी बरोबर आहे. ब्लॅक मिरर मधे सूट होईल असाच आहे.

शिंडलर्स लिस्ट हा असा बघण्याचा सिनेमा नव्हे, भयंकर त्रासदायक आणि अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे" - >>>> + ११

शिंडलर्स लिस्ट हा असा बघण्याचा सिनेमा नव्हे, भयंकर त्रासदायक आणि अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे" >> +१
काल हे वाचून बंद केला. नंतर मुद्दाम वेळ काढून बघेन.
सध्या डुलक्या खात, इकडे तिकडे फिरत बुडला तरी चालेले असे बघितलेले बरे वाटतात. रजनी, साऊथ आणि पिसाळलेला बच्चन बघतोय.

Furie व्हिऐतनाम, सबटायटल्स, नेटफ्लिक्सवर.
एका माजी गैंगस्टर सिंगल मदरची मुलगी गावातून किडनैप होते..तीला शोधायला नायिका शहरात येते..
खतरनाक ऐक्शन थ्रीलर सिनेमा.

पाहिला बुवा एकदाचा जेलर.
महादेवाने अवतार घ्यावा आणि त्याला इतर ( खालच्या पदावर असलेल्या ) शक्तिमान देवांनी साथ देऊन महाबली शत्रूचा नायनाट करावा असं आधुनिक पुराण आहे. पिसं काढण्यात तरबेज असलेल्या पिसाट प्रेक्षकांसाठी मस्ट वॉच आहे.

जवानची चर्चा त्याच्याच धाग्यावर करा.. नाहीतर समस्त मायबोली शाहरूखमय आणि जवान होईल Happy

जेलर धमाल आहे. काल रात्री ऑफिसातुन आल्यावर बघीतला. माझे सगळे ऑफिसचे टेन्शन विसरलो. काही वेळा बिनडोकपणा बरा वाटतो.

Pages