Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१६ ऑगस्ट १९४७ प्राईमवरचा ३५
१६ ऑगस्ट १९४७ प्राईमवरचा ३५ मिनिटे पाहिला. चांगला वाटतोय. वेगळी हाताळणी, एंगेजिंग. स्वातंत्र्य मिळणार आहे हे माहिती नसलेल्या मेनलँडपासून कट ऑफ असलेल्या एका कापूस क्षेत्र असलेल्या बेटावरच्या ब्रिटीशांचे जुलूम सहन करणार्या गावाची कहाणी.
Heart of stone -- का पाहिला
Heart of stone -- का पाहिला असं झालं. कदाचित केवळ आलियासाठी. एका shortfilm च content आहे. उगाचच MI style ने काहीतरी भव्य दिव्य करायचा प्रयत्नकेलायं .
Gal Gadot चांगली दिसते पण प्रचंड bore आहे यात. आलिया ने 22 वर्षीय भारतीय मुलीची भूमिका प्रामाणिकपणे केलीयं. खर्चे आडनाव वापरायच कुठुन सुचलं असेल त्यांना . रया गेलेला Christian Grey बघवत नाही. त्याचा रोल आलियाच्या रोल पेक्षा लहान असावा.
इतकं आधुनिक तंत्रज्ञान वापरणारी लोक इतक्या ढोबळ चुका करतात की विचारू नका. "आखिर कहना क्या चाहते हो असं झालं शेवटी.
अगदी, स्वस्ति.
अगदी, स्वस्ति.
मी अर्धवट सोडून दिला.
मी पण अर्धवट सोडलाय.. बघावा
मी पण अर्धवट सोडलाय.. बघावा वाटेना परत
सुनील ग्रोवरचा जवान पाहिला
सुनील ग्रोवरचा जवान पाहिला.संजय दत्त, एजाज खान ने धमाल केली आहे. बॉक्सर धीना आणि अश्विन कौशलने पण मजा आणली.
नायिकांमधे गिरीजा ओक, ऋतुजा शिंदे यांनी सिनेमा उचलून धरला आहे. सान्या मल्होत्रा, प्र्रियमणी आणि संजीता भट्टाचार्य यांच्यामुळे पडद्याला झळाळी येते. योगी बाबूच्या एण्ट्रीला शिट्ट्या वाजत राहतात, त्यामुळे संवाद ऐकू आले नाहीत. एक चेहरा ओळखीचा वाटला.
गाणी मस्तच. विशेषतः मैने तेरा दूध पिया है, मै बिल्कुल तेरे जैसा हू ,मुझमे है खून तेरा, मै बिल्कुल तेरे जैसा हूं या गाण्याला डोळ्यातून पाणी आलं.
लोकंहो
लोकंहो
जवानचा स्वतंत्र धागा आहे. तो वापरा...
अन्यथा सगळी मायबोली शाहरूखमय होईल
नीयत -- seriously ?????
नीयत -- seriously ?????
१६ ऑगस्ट १९४७ अपेक्षा न ठेवता
१६ ऑगस्ट १९४७ अपेक्षा न ठेवता पाहिल्यामुळे (शेवटची दहा पंधरा मिनिटे शिल्लक आहे) पाहून झाला. एकदा का मुख्य भूमीपासून कट ऑफ असलेलं नदीच्या पात्रातलं दर्याखोर्यातलं बेट असलेलं गाव ही संकल्पना मान्य झाली कि मग अडचण येत नाही. कंतारा सारखं गाव आहे. तिथला ब्रिटीश अधिकारी क्रूरकर्मा रॉबर्ट आणि त्याचा वासनांध मुलगा यांच्या जुलमाखाली भीत भीत जगत असलेलं गाव. रॉबर्टच्या मुलाची नजर आपल्या मुलीवर पडू नये म्हणून जमीनदाराने लहानपणीच ती मेली अशी आवई उठवून तिला लपवून ठेवलेले असते. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या तीन दिवस आधीपासून ती मुलगी जिवंत असल्याची बातमी फुटते आणि नेमकी रॉबर्टच्या मुलापर्यंत पोहोचते..... स्वातंत्र्य मिळणार आहे ही बातमी रॉबर्ट गावाला मिळू देत नाही.... असा प्लॉट एंगेजिंग वाटत असेल तर बघा.
स्वस्ती… लोल… नीयत पाहुन खरंच
स्वस्ती… लोल… नीयत पाहुन खरंच शब्द आटतात, मनातले पण.
राम कपूर चा बिलोनियर मुलगा
राम कपूर चा बिलोनियर मुलगा गिरणी कामगार वाटतो... --- ,:D
नियत - विद्या बालन आता या टाईप भूमिकेत किती वेळा दिसणार आहे. ..अगदीच बाळबोध आहे picture.
सुनिधी
सुनिधी
राम कपूर चा बिलोनियर मुलगा गिरणी कामगार वाटतो. >>>> + 10000 . मुंगीत हवा भरून डोंगळा बनवण्याचा प्रयत्न .
राम कपूर पण विजय मल्ल्या वाटण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो, सरोजिनी मार्केट मधून खरेदी केलेले कपडे घातलेला middle class पंजाबी ग्रुहस्थ.
राहूल बोस अशा भूमिका का करतो ?
निक्की वालिया बरेच दिवसांनी दिसली , आवडली.
बाकी सगळा आनंदच आहे.
मुख्य म्हणजे कथेचा आनंद आहे
मुख्य म्हणजे कथेचा आनंद आहे
१.Forgotten korien
१.Forgotten korien नेटफ्लिक्सवर सबटायटल्स.
दोन तरूण मुलं आणि आईवडील एका नवीन घरात शिफ्ट होतात..एके रात्री मुसळधार पावसात दोघे भाऊ छत्री घेऊन वॉकला जातात तिथून मोठ्या भावाला किडनैप केलं जातं..19 दिवसानंतर भाऊ परत सापडतो..त्यानंतर लहान भावाला त्याचं वागणं स्ट्रेंज वाटायला लागतं..खिळवून ठेवणारा सिनेमा.. सेकंड हाफ धक्क्यामागून धक्के आहेत.. चित्रपट सुरू कुठे झाला आणि कुठे संपला याचा काहीच ताळमेळ नाही. सस्पेन्स, थ्रीलर, मर्डर मिस्ट्री...चांगला आहे..
२.Pandora कोरियन सबटायटल्स नेटफ्लिक्सवर.
एका गावाजवळच्या न्युक्लीअर पावर प्लांट असते..तीथं गावातील तरुण मुलं काम करत असतात.. एके दिवशी त्या गावाला भुकंपाचा धक्का बसतो त्यामुळे पावर प्लांट चा स्फोट होणार त्याआधी रेडिएशन मार्यापासून रहिवाशांना वाचवायचे असते..वेळ खूप कमी असतो आणि अपघाताच्या परिघात येणारी गावं खाली करायची असतात..थ्रीलर, सर्वायवल सिनेमा..सिनेमाटिक आहे पण चांगला आहे.
३.The chase कोरियन सबटायटल्स नेटफ्लिक्सवर.
एका गावात आधी व्रुध्दांचा खून मग तरूणांचा, तरूण मुली गायब असे प्रकार व्हायला लागतात..तीस वर्षापूर्वी असे प्रकार होऊन थांबले होते पण किलर पकडला गेला नव्हता..एक व्रुध्द घरमालक आहे ज्याच्या भाडेकरूंचा पण खून झालाय तो या प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करतो..चांगला आहे थ्रीलींग सिनेमा.
बार्बी पाहिला. आवडला. छान
बार्बी पाहिला. आवडला. छान सटायर आहे. गाणी, नाच वैगरे आवडले. गोसलींग अण्णांनी कहर केला आहे. मार्गो रॉबीच्या पुन्हा प्रेमात पडलो.
जाने जां : करीना , जयदीप आणि
जाने जां : करीना , जयदीप आणि विजय वर्मा.
नीयत नंतर फार काही अपेक्षा नव्हत्या , त्या मानाने नक्कीच आवडला. पहिली 15 मिनिटे जामच स्लो आहे , नंतर वेग पकडतो.
सगळ्याचा अभिनय एक नंबर.
विजय वर्माचा screen presence आवडला.
कलिम्पांग चा परीसर , नैऋत्येकडची लोकं जरा वेगळं वातावरण आहे. एकदा बघण्यासारखा
ड्रीमगर्ल 2पाहिलाय का कुणी?
ड्रीमगर्ल 2पाहिलाय का कुणी? कसा आहे?
पार्ट 1 पाहिलेला नाही. 2बघावा का?
जाने जां बघितला, सारखी दृश्यम
जाने जां बघितला, सारखी दृश्यम ची आठवण येत राहते
छान आहे जाने जा
छान आहे जाने जा
आवडला
एकदा नक्की बघावा... चित्रपट बांधून ठेवतो.
बाकीचे दोन छानच कलाकार आहेत.. करीना सुद्धा मस्त वाटली
मला नाही आवडला जानेजा. एकतर
मला नाही आवडला जानेजा. एकतर आयडिया कुठूनतरी उचललेली वाटली, आणि कथा बरीच कन्व्हिनियन्ट वळणं घेत घेत गेली.
सगळे चांगले अॅक्टर्स असूनही पकड घेत नाही कथा.
मी पण पाहिला जाने जां. बघताना
मी पण पाहिला जाने जां. बघताना इन्टरेस्टिंग वाटला. असे वाटले की आता काहीतरी भारी ट्विस्ट्स येतील. पण त्या मानाने एन्ड ला लेट डाउन झाल्याचे फीलिंग आले. सगळ्यांची कामे छान आहेत मात्र. आणि कॅलिंपाँग चा वेगळाच बॅकड्रॉप. वेळ चांगला गेला
The Covenant - अॅमेझॉन
The Covenant - अॅमेझॉन प्राइम.
हा रिलीज झाला तेव्हापासून बघायचा होता. एक तर गाय रिचीचा पिक्चर आहे - त्याचे "लॉक, स्टॉक अॅण्ड टू स्मोकिंग बॅरल्स" वगैरे पिक्चर खूप आवडले होते. दुसरे म्हणजे याचा ट्रेलर पाहून फार कुतूहल निर्माण झाले होते.
आणि पिक्चर जबरदस्त आहे. बघाच. जेक जिलेनहाल आणि अफगाण "अहमद" चे काम केलेला - बहुतांश पिक्चर दोघांचा आहे आणि दोघांची कामे मस्त आहेत. अमेरिकन मिलिटरीतील ज्या सार्जंट बरोबर हा अहमद इंटरप्रिटर म्हणून काम करत असतो त्याला तो तालिबानपासून वाचवतो पण नंतर तो तालिबानच्या मोस्ट वाँटेड लिस्ट मधे टॉपला जातो. त्याला तेथून बाहेर काढण्यासाठी तो सार्जंट नंतर प्रयत्न करतो. ही कथा आहे. एकदम ग्रिपिंग आहे.
पिक्चरच्या शेवटी अफगाणिस्तानातून अमेरिकन मिलिटरी बाहेर पडल्यावर असे अनेक लोक तेथे अडकून पडले आहेत याबद्दल थोडीफार माहिती आहे.
"वेस्ट विंग" सिरीजमधल्या सर्वोत्कृष्ठ एपिसोड्सपैकी एक पहिल्या सीझन मधे "In Excelsis Deo" टायटलचा एपिसोड आहे. त्यात प्रेसिडेण्ट व त्याच्या स्टाफमधला टोबी झिगलर याचा एक संवाद आहे, तो आठवला:
"....Toby, if I start pulling strings like this, every homeless veteran will come out of the woodwork"
"I can only hope so Sir"
बघणार ! Snatch अत्यंत आवडता
बघणार ! Snatch अत्यंत आवडता सिनेमा आहे. लॉक स्टॉक... सुद्धा अजून बघायचा आहे.
The Covenant - दुसरे म्हणजे
The Covenant - दुसरे म्हणजे याचा ट्रेलर पाहून फार कुतूहल निर्माण झाले होते. >> +१ जेक जिलेनहाल आपला फेव आहे. पण सिनेमा अॅक्शन सीन बाबत अगदी अ.नि अ. मधे जातो रे.
जाने जां बघितला, सारखी दृश्यम
जाने जां बघितला, सारखी दृश्यम ची आठवण येत राहते >>> 2 october - 3 october मुळे
.
10 तारखेचे महत्व माझ्या तरी लक्षात आले नव्हते , बहुतेक सुरुवात झोपेत बघितली .सोनिया कुठेतरी फसणार असं वाटत होतं. मुख्य रहस्याचा अंदाज बांधला होता , पण शेवट थोडा वेगळा निघाला. टीचर चा लुक एकदम वेगळा आहे आणि तो तसा कथेची गरज म्हणून वापरलाय ते आवडलं.
करण एवढा हुशार आहे म्हणतात पण लूपहोल्स आहेत. कथा आणखी थोडी घट्ट विणलेली हवी होती.
जानेजां
जानेजां
पण काळाप्रमाणे दृश्यम् नंतर आला.
टीचर मला ब्यूटी ॲन्ड द बीस्ट मधल्या बीस्ट वरून प्रेरित वाटला. तीच बॉडी लँग्वेज. सिनेमा बरा आहे. विजय वर्मा आणि अहलावत वर्गमित्र म्हटलं होतं पण वाटतावाटत नव्हतं. जयदीपचं कॅरेक्टर व्यवस्थित डेव्हलप झालं नाही, सुरवातीला सायको मग बरा पुन्हा सायको वाटला. अतिशय स्टिफ बॉडी लँग्वेज आणि एकदम ताय-ची सुरू झालं. तशी देहबोली तो सोशली ऑकवर्ड वगैरे दाखवण्यासाठी वापरली असेल तर तेही नीट एम्फसाईझ केलं नाही. कुठल्या तरी हॉलिवूड सिनेमा वरून उचलेला वाटला होता. काळाप्रमाणे मागे घडणारं कथानक होते, सेलफोन नव्हते व 'जरा जरा बहेकता है' हे गाणं ऐकत होते. खूप लूज एन्डस् सोडले आहेत, तिच्या एक्सची बॉडी कुठे गेली हे कळलंच नाही. दृश्यम मधे एक खून करून पुरावे तयार केले, इथं पुरावे मिसलीड करण्यासाठी दोन खून केले. दृश्यम त्यांनी बघितला असता तर बिचाऱ्या 5 '11" ही तंतोतंत व दुर्मिळ उंची असणाऱ्या बेघर भिकाऱ्याचा जीव वाचला असता.
-----
सगळे चांगले अॅक्टर्स असूनही पकड घेत नाही कथा.+१
करण एवढा हुशार आहे म्हणतात पण लूपहोल्स आहेत. कथा आणखी थोडी घट्ट विणलेली हवी होती.+१
जानेजां चांगला वाटला. अहलावत
जानेजां चांगला वाटला. अहलावत कसला पोकर फेस आहे! काहीही अंदाज लागत नाही त्याचा. विजय वर्मा फॉर अ चेंज चांगल्या रोलमधे आहे. बरं वाटलं. शेवटचा ट्विस्ट जबराटच. मला पूर्ण वेळ वाटत होतं की टीचर तिला अडकवणार की काय. पण तसं काही नाही झालं. तिच्याकडे तिकीटं वगैरे पुरावे कसे गोळा होतात हा विचार पूर्ण उलगडा होईपर्यंत छळत राहिला.
याचा मूळ पिक्चर जपानी आहे. Suspect X नावाचा. मूळ कादंबरीचं नाव The Devotion of Suspect X.
तिच्याकडे तिकीटं वगैरे पुरावे
तिच्याकडे तिकीटं वगैरे पुरावे कसे गोळा होतात हा विचार पूर्ण उलगडा होईपर्यंत छळत राहिला. > हो ना . म्हणूनच मला वाटत राहिलं आता ती कुठेतरी फसणार
. कराओके बार मध्ये अडकता अडकता राहिली
मला ती हाडकलेली करीना बघवेना.
मला ती हाडकलेली करीना बघवेना. बापे तिच्याहून लहान दिसत असतील.
तिच्याकडे तिकीटं वगैरे पुरावे
तिच्याकडे तिकीटं वगैरे पुरावे कसे गोळा होतात हा विचार पूर्ण उलगडा होईपर्यंत छळत राहिला.
>>>>>>
स्पॉईलर !
दुसर्या दिवशी पुर्ण तसेच जगतात ना ते..
म्हणून तर अजून एका भिकार्याला दुसर्या दिवशी मारून तो त्या दिवशीची बॉडी बनवतो जी त्यांच्या पुराव्याला मॅच होईल
ते नंतर शेवटी कळतं ना रे
ते नंतर शेवटी कळतं ना रे
Pages