Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.pbs.org/pov/films
https://www.pbs.org/pov/films/whilewewatched/
डॉ॑क्युमेंट्री आहे ..
टॉमीच्या नवा ‘मिशन इं’ मधे
टॉमीच्या नवा ‘मिशन इं’ मधे सगळे उभे असताना अचानक पळु लागतात. त्यात ती सुंदर हिरॉईन आधी व तिच्यामागे टॉमी व त्याच्यामागे अजुन कोणीकोणी. असं सारखं सारखं करतात. मधेच जरासा जाडसर मिलिंद सोमण येऊन काहीतरी शुन्यात पाहुन बरळतो व निघून जातो. मग टॉमीचा प्रसिद्ध स्टंट केव्हातरी येतो. मग ट्रेनमधे ही लांबलचक अॅक्शन होते. मग अजुन २ सुंदर मुली अधुनमधुन दर्शन देतात. हे सर्व होताना त्यातली सर्वांची लाडकी किल्ली कधी याच्याकडे , कधी तिच्याकडे जात असते. व ती किल्ली कशाची असावी हे कळल्यावर तिकडे सगळे सेना निघते व ‘भाग दोन आला की पुढचे पहा’ असे डायरेक्टर म्हणतो व आपल्याला घरी जावे लागते.
(सिनेमातला वेगचवेग पाहुन टाईमपास झाला). पुढचा भाग पहाणार.
नन सिनेमात दम नाही.
The bambardment बघितला
The bambardment बघितला नेटफ्लिक्सवर.
दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांकडून डेन्मार्क मधील एका शाळेवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यावर आधारित..
चांगला आहे सिनेमा..छोट्या मुलांच्या गमतीजमती छान आहेत...
सेकंड हाफ थ्रीलींग....
छलेया गाणं मस्त ठेका
छलेया गाणं मस्त ठेका धरण्यासारखं आहे, बघायलाही छान. नयनतारा मस्त दिसतेय. शाखा नारिंगी शर्टात फार च म्हातारा दिसला, डोळे अगदी थकल्या सारखे. पण काळ्या शर्ट मधे पुन्हा चार्मींग दिसतोय.. कॅमेरा ची कमाल असावी.
त्याने बॉडी चांगली बनवलीय
त्याने बॉडी चांगली बनवलीय.चेहरा थोडा थकलेला दिसणार, 55 प्लस आहे म्हटल्यावर.पण एकंदर स्वतः मेहनतीने मिळवले असेल फिजिक तर कौतुक आहे.
पण काळ्या शर्ट मधे पुन्हा
पण काळ्या शर्ट मधे पुन्हा चार्मींग दिसतोय..
>>>
काळा रंग कपड्यांमध्ये शाहरूखचा फेवरेट आहे.
माझाही आहे. पण त्यामागे कारण शाहरूख नाही. हा बस योगायोग आहे.
बाई दवे,
त्या रेड शर्ट मध्ये खूप यंग आणि हॉट दिसला आहे..
गाणी श्रवणीय नसली फार तरी थिएटर मध्ये बघायला मस्त वाटतात
पण काळ्या शर्ट मधे पुन्हा
Duplicate
सर ऋन्मेऽऽष स,,
सर ऋन्मेऽऽष स,,
तिकडे जवानचा स्वतंत्र धागा आहे तिकडे लिहा.
Searching for Sheela -
Searching for Sheela - डॉक्युमेन्टरी फिल्म पाहीली नेफिवरती.
रजनिशांच्या जवळची त्यांच्या मठातली सन्यासिनी आहेत या मा आनंद शीला. बडोद्यातल्या आहेत. स्वकर्तुत्वाने यांनी ओरेगॉन ला रजनीश आश्रम उभारला. त्या त्यांच्या सेक्रेटरी होत्या, स्पोकस्पर्सन होत्या. पुढे त्यांचे रजनिशांबरोबर पॉवर स्ट्रगल्स झालेले दिसतात. त्यांच्यावरती पूर्ण आश्रमाला पॉय्झन करण्याचा आरोप आहे. त्यनंतर त्यांना अटकही झाली. पण २९ महीन्यात 'गुड बिहेव्हिअर' म्हणुन सोडून दिलेले आहे.
एकंदर काँट्रोव्हर्शिअल.
मला आवडली डॉक्युमेंटरी.
Searching for Sheela -
Searching for Sheela - डॉक्युमेन्टरी फिल्म पाहीली नेफिवरती.>> वाइल्ड वाइल्ड कंट्री बघा. शीला हॅड द पावर. अँड देन नॉट.
होय अमा पाहीलेली आहे - वाईल्ड
होय अमा पाहीलेली आहे - वाईल्ड वेस्ट.
तिचं फार प्रेम होतं रजनिशांवरती असे ती म्हणते. त्यांच्या सुंदर डॉळ्यात ती विरघळून गेलेली होती.
मात्र शेवटी रजनिश तिच्याबद्दल फार वाईट बोललेल आहेत. त्यांचा तोल गेला असेल का? ही सीम्ड इन्सेक्युअर टू मी.
त्यांचा तोल गेला असेल का? ही
त्यांचा तोल गेला असेल का? ही सीम्ड इन्सेक्युअर टू मी.>> तिला वापरून घेतले त्यामुळे तिला आपणही ग्रेट आहोत असे व्हिजन्स गैर समज झाले. पुढे जोडे खाल्ले व वेगळी झाली. पण दोघांनी मिळून गैरप्रकार किती उत्साहाने केले!!!
लोक्स बार्बी सिनेमा अमॅझॉन वर रेंट ने आला आहे.
करेक्ट तिला वापरुन घेतले
करेक्ट तिला वापरुन घेतले असावे.
लोकहो,
लोकहो,
आवडीचे गाजलेले आयकॉनिक्स संवाद आणि सीन्स इथे लिहा.
https://www.maayboli.com/node/84013
मी बघितलं आहे वाईल्ड वाईल्ड
मी बघितलं आहे वाईल्ड वाईल्ड कंट्री.
जेमतेम सतरा वर्षांची शीला ही अतिशय बुद्धिमान मुलगी चाळीशीच्या (ओशो रजनीश) माणसाच्या मांडीवर बसून त्याच्या डोळ्यात हरवते व प्रेमात पडते, त्याच्यासोबत दुसऱ्या देशात निघून जाते, त्याच्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करून काय काय करते/आयुष्य पणाला लावते . मग दोघं मिळून mass hallucination करून लोकांना ताब्यात काय घेतात. आणि अजूनही पस्तावा वगैरे नाही. उन्माद नाही तर दुसरं काय. तिचा वापर करून घेतला ह्यात तथ्य आहे, ती पण वहावत गेली.
It was very very creepy for me ...!
मी बघितलं आहे वाईल्ड वाईल्ड
मी बघितलं आहे वाईल्ड वाईल्ड कंट्री. >> सुपर ग्रिपिंग आहे ती सिरीज! सुरूवातीला believing in a cause टाइप लोक एकत्र येतात त्यात जेन्युइनली इंटरेस्ट असलेले. पण नंतर त्याचाही बिझिनेस्/संस्थान होते व काहीही करून ते प्रोटेक्ट करायला लोक कोणत्याही थराला जातात असेच चित्र दिसले त्यात.
बाकी सिरीयस गोष्टी कदाचित वेगळ्या धाग्यावर बर्या. पण एक मला गंमत वाटली होती हे पाहताना. ओरेगॉनच्या ज्या खेड्याजवळ हा आश्रम उभा राहिला तेथील अमेरिकन व बहुतांश कॉन्झर्वेटिव्ह लोक हे आश्रमवाले इथली फेथ/फॅमिली व्हॅल्यूज वाली संस्कृती बिघडवत आहेत असे म्हणू लागले. सहसा भारतात आपण हे पूर्ण उलट्या अर्थाने म्हणतो. पाश्चात्य लोक आपली संस्कृती बिघडवात वगैरे
आपण सगळेच एकमेकांना बिघडवतो.
आपण सगळेच एकमेकांना बिघडवतो. जिथल्या तिथे राहिलो तर त्यातल्या त्यात कमी बिघडू असा अर्थ निघतो यातून.
अरे पण ओशो ही (तुपकट व्हॉअ
अरे पण ओशो ही (तुपकट व्हॉअॅअंकलना मानवणारी रामराज्यांसारखी पुस्तकी आदर्श) भारतीय संस्कृती नाही ना! मॉर्मन लोकांना कुठे पचणार ते! आता परत मॉर्मन अॅरिझोनात करू नका. मॉर्मनना नावं ठेवायची आज उर्मी आहे.
घोस्ट बस्टर सोनी लिववर बघितला
घोस्ट बस्टर सोनी लिववर बघितला. मी येता जाता बघितला, मस्त टीपी होता. भूत कम साय फाय होता.
>>तेथील अमेरिकन व बहुतांश
>>तेथील अमेरिकन व बहुतांश कॉन्झर्वेटिव्ह लोक हे आश्रमवाले इथली फेथ/फॅमिली व्हॅल्यूज वाली संस्कृती बिघडवत आहेत असे म्हणू लागले.<<
याचं स्पष्टिकरण वेबसिरीज मधे आहे. ओरगन मधे जम बसल्यावर शीला मा अँड कंपनी स्टार्टेड टु बाइट मोर दॅन दे कुड च्यु. लोकल म्युनिसिपॅलिटि, शेरिफ ऑफिसच्या कारभारात ढवळाढवळ, टु गेट मोर क्लाउट. शिवाय फ्री सेक्स इन आश्रम वाज ए मेजर कंसर्न फॉर ब्रिंगिंग इन बिगर लेंस...
इंटरेस्टिंग वाटतंय.बघेन ही
इंटरेस्टिंग वाटतंय.बघेन ही डॉक्युमेंटरी.
प्राईम वर नसिरुद्दीन शाह चा टुडेज स्पेशल बघायला घेतला.चांगला वाटतोय.तो त्या हिरोच्या पाठीवर कागद ठेवून त्याला पत्ता लिहून देतो हे बघून लहानपणी भेटलेले बरेच लोक आठवले
हल्ली शेफ लोकांच्या आयुष्यावर बरेच पिक्चर बनतायत ना?
काही आठवड्यापुर्वी थेटरमधे
काही आठवड्यापुर्वी थेटरमधे ‘इन्साईड’ नावाचा सिनेमा लागला होता. स्टोरी वाचुन पहावासा वाटलेला पण राहुन गेला. तो आता प्राईमवर आलाय. पहावा झालं.
हो ही डॉक्युमेंटरी बघितली
हो ही डॉक्युमेंटरी बघितली होती.
वीरप्पनवरची डॉक्युमेंटरी (डॉक्यु-सीरिज) पण चांगली आहे. नाव विसरले. नेटफ्लिक्स. वीरप्पनची बायको आहे त्यात. अनेक डिटेल्स मला माहिती नव्हते ते कळले. शेवटी त्याला मारलं तेव्हाचं सगळं नियोजन वगैरे तर अजिबातच माहिती नव्हतं. ते प्रसिद्ध झालं नसावं तेव्हा.
माणसांना मारणं हे त्याच्यासाठी किती सहज झालं होतं हे बघून अंगावर काटा येतो. मुळशी पॅटर्न सिनेमात ओम भुतकर त्या हॉटेलमध्ये जेवणाऱ्या कुटुंबाला मारायला निघतो त्याची आठवण झाली. तो जेव्हा 'एकाला तरी मारतो रे' म्हणतो तेव्हाही अंगावर काटा आला होता.
याचं स्पष्टिकरण वेबसिरीज मधे
याचं स्पष्टिकरण वेबसिरीज मधे आहे. >>> हो बरोबर. पण ते कल्चर बिघडवणे वगैरे इव्हन आधीपासून, म्हणजे आश्रमात लोक येउ लागल्यापासूनच तक्रारी सुरू झाल्या होत्या असे अंधुक आठवते.
जेलर बघितला, अत्यंत रटाळ आहे.
जेलर बघितला, अत्यंत रटाळ आहे.
शेवटी त्याला मारलं तेव्हाचं
शेवटी त्याला मारलं तेव्हाचं सगळं नियोजन वगैरे तर अजिबातच माहिती नव्हतं. ते प्रसिद्ध झालं नसावं तेव्हा.
>>
एक थिअरी अशी पण ऐकली आहे की तो नैसर्गिक आजारांमुळे गेला. बायको नी नंतर बाकी मेंबर्स ची सिक्युरिटी अन् लुटीत वाटा घेऊन बॉडी पोलिसांना दिली. त्यांनी त्याच्या आसपास गोष्ट विणली अन् क्रेडिट घेतलं.
वाईल्ड वाईल्ड कंट्री बद्दल
वाईल्ड वाईल्ड कंट्री बद्दल कुतुहल जागृत झाले. नेटफ्लिक्स वर आहे का?
आहे. मी पण लिस्टीत टाकून
आहे. मी पण लिस्टीत टाकून ठेवलाय.
हड्डी - बटबटीतपणात, साउथच्या
हड्डी - बटबटीतपणात, साउथच्या सिनेमांना मागे टाकले.
रॉकी और राणी कि प्रेम कहानी
रॉकी और राणी कि प्रेम कहानी जबरदस्त चित्रपट आहे.. चुकवू नका... धर्मेंद्र ऐवजी अमिताभ आणि शबाना ऐवजी रेखा असती- कल्ला झाला असता... जया ने खडूस बायकोचा रोल चांगला केला आहे...
पैसे वसूल आहे चित्रपट.. धर्मेद्र शबाना लिप किस स्टोरी ची डिमांड आहे आणि फिट बसतो...
Pages