Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माऊई हॅप्प्पी बर्थडे गोंडस!
माऊई हॅप्प्पी बर्थडे गोंडस!
सिंबा पण हॅप्पी किड एकदम !!
स्मिता... सविस्तर उत्तरं लिहायचा प्रयत्न करते. ही सगळी उत्तरं पूर्णपणे माझ्या २ मांजरांच्या अनुभवावरून लिहिली आहेत.
तर माझे प्रश्ण असे आहेत.
१. माझं घर ३ बेडरुम चं आहे आणि एक लहान ८ * १० ची टेरेस आहे. तर मांजर पाळण्यासाठी हे पुरेसं आहे का ? मला माहित आहे की एका लहान खोलित पण लोक मांजर पाळतात पण तरी मला हा प्रश्ण आहे. त्यांना फिरायची/फिरवायची कितपत गरज असते ? - माझ्यामते पुरेसं आहे . घर वरच्या मजल्यावर असेल तर टेरेस आणि घरातच ते फिरू शकतात. टेरेसला जाळी असेल तर बरं. नाहीतर कठड्यावरून उड्या वगैरे प्रयोग व्हायचे. माझं घर खालीच असं बैठं असल्याने ते त्यांचेच जा ये करतात एका दारातून. आम्ही फिरवायला वगैरे नेत नाही. कारण त्यांना लिश लावलेलं आवडत नाही. ते त्यांचे फिरून येतात ठराविक वेळेला (कसं माहित नाही) अर्थात गळ्यात कॉलर असतेच. मंकीच्या कॉलरला जीपीएस ट्रॅकर लावला होता कारण तो जरा लांब लांब जायचा. थंडीत मात्र पूर्णपणे घरीच. बाल्कनीचं दार थोडावळ किलकिलं ठेवतो. तिथून बघत बसतात बाहेर.
२. मांजराचे केस पडतात का ? शी शु चं ट्रेनिंग त्यांना >>> - हो माझ्या २ही ब्रीडचे थोडे केस गळतात पण अगदी जिथे तिथे नाही पडलेले दिसत. कोणती ब्रीड आहे त्यावर अवलंबून असावं.
बाकी ती घेते बर्या पैकी काळजी त्यांचे वॅस्किन शेड्युल सांभाळते , कधी खाऊ भरवणे, आता सॅमी एकटीच राहिल्याने तिच्याशी खेळते, वेळ देते तिला.वगैरे.
आंघोळ वगैरे घालणे पण आम्ही कधी करत नाही. कारण ते इतके स्वतःला चाटून चाटून क्लीन ठेवतात की गरजच नाही पडली तशी. नखं वगैरे वेट डॉ विजिट मधे कापायला सांगतो.
शी शु ट्रेनिंग म्हणाल तर ते स्वतःच शिकतात. लिटरबॉक्सची जागा एकदा फिक्स केली की त्यांचे बिझनेस उरकतात. एक दोन वेळाच आम्ही उचलून ठेवलं असेल तिथे बॉक्स आहे हे दाखवायला. अगदी २ महिन्यांची पिल्लं असल्यापासून ते त्या बॉक्स मधेच जातात. नो अॅक्सिडेंट्स. सॅमी कधीकधी उलटी करते कुठेही. (ओकरं बाळसं) लोल.. पण तिचे केस खूप जास्त असल्याने ती स्वतः चाटते तेव्हा तिच्याच पोटात जाऊन तेह हेअरबॉल्स बाहेर काढते. इती वेट.
३. आपण बाहेर किंवा गावाला जाणार असु तर त्यांना कुठे आणी कसं ठेवतात ? - आम्ही आत्तापर्यंत जास्तीत जास्त ३ दिवस गेलो आहोत. तेव्हा घरी २-३ ठिकाणी ३ दिवसाचं खाणं आणि पाणी विभागून ठेवतो. (हि इथल्या एका माबो आयडीने दिलेली आयडीया आहे) घरी कॅमेरा लावून जातो. अजून जास्त दिवस कधी गेलो नाहीये. पण विश्वासातले कोणी अधेमधे घरी येऊन चेक करू शकत असतील तर हरकत नाही जास्त दिवस जायला. पण जे कोण केअरटेकर असेल त्यांची लिटरबॉक्स साफ करायची तयारी हवी आणि फुड बाऊल भरून ठेवू शकतात पुढच्या काही दिवसांचे. मांजरी तशा इंडीपेंड्ट असतात. राहतात एकट्या.
४. त्यांना कोणते अन्न देतात ? - आम्ही ड्राय किबल्स देतो. कधीतरी सूप (त्यांच्यासाठीच बनलेले) कधीतरि चिकन बॉईल करून श्रेडेड. बाकी नाही काही खात ते दुसरं.
५. सगळ्यात महत्वाचं कोणतं मांजर पाळावं. ? भुभु प्रमाणे त्यात पण ब्रीड्स असतात का ? - असतात पण मला फारसं माहित नाही.
६. त्यांच्या मुळे घरात कोणाला काही आजार होउ शकतात का ? त्यांच्या साठी वॅक्सिन ई असतं ना ? ते कसं बघायचं ? केस गळु नये म्हणुन काय करायचं ? - काहींना माऊच्या केसांची अॅलर्जी असू शकते. माझ्या मुलीलाच नेमकी निघाली. अंगावर रॅश येते, घशात पुरळ वगैरे मग तेवढ्यापुरती औषधं घ्यावी लागतात. पण ती सोडून देणार नाही हे पक्कं माहित आहे. खूप सिव्हिअर नसल्याने चालून जातंय. पण काहींना अस्थमा वगैरेचा त्रास होऊ शकतो. काही वेगळ्या लक्षणांकडे लक्ष दिलेलं बरं.
बाकी वॅक्सिन वगैरे बद्दल वेट सांगतातच. पिल्लांना पहिलं १ वर्ष तरी असतात काही वॅक्सिन्स.
७. एकंदरीत घरात तोड्फोड्/पसारा हे मांजरं कितपत करतात ? - माझ्याकडे २ असल्याने कधी त्यांच्या भांडणात पळापळीत कधीतरी झालं असेल पण नेहेमी नाही. शक्यतो काचेचे फ्लॉवरपॉट, शोभेच्या वस्तू अधेमधे ठेवल्याच नाहीयेत जास्त. हां मात्र सोफ्याच्या पायांवर, लेदरच्या खुर्च्यांचे पाय भरपूर ओरखडले गेले आहेत.
मुळात बंदिस्त ठीकाणी प्राणी पाळणं मला पटत नाही पण अगदीच वेळ पडली तर माहिती गोळा करते आहे.
( अजुन एक म्हणजे, मुलांच्या आग्रहामुळे प्राणी पाळलेले इथे कोणी आहेत का ? मुलांचा त्या प्राण्यांमधला ईंटरेस्ट टिकुन राहतो का ? की काही दिवसांनी मुलं पण वैतागु शकतील ?) - मी च आहे. मुलीच्या सततच्या आग्रहामुळे माऊ घरात आल्या. ती अजूनही इंट्रेस्टने सांभाळते फक्त लिटर साफ कर म्हणून मागे लागावे लागते.
भावनेच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नाहिये तरी कृपया मदत करा.>>> शक्यतो सगळ्या फॅमिली मेम्बरशी बोलूनच निर्णय घ्या. मुलं मोठी असतील तर बरंच म्हणजे अगदी सगळं तुमच्या अंगावर नाही पडणार. तशा मांजरी एकदम लो मेंटेनन्स पेट आहेत.
बाकी तुम्हाला शुभेच्छा! अजूनही काही असेल तर विचारू शकता.
मस्त प्रतिसाद, ओळखीत कुणी
मस्त प्रतिसाद, ओळखीत कुणी विचारलं मांजरा बद्दल त्याना हेच देईन वाचायला
१. माझं घर ३ बेडरुम चं आहे
१. माझं घर ३ बेडरुम चं आहे आणि एक लहान ८ * १० ची टेरेस आहे. तर मांजर पाळण्यासाठी हे पुरेसं आहे का ? मला माहित आहे की एका लहान खोलित पण लोक मांजर पाळतात पण तरी मला हा प्रश्ण आहे. त्यांना फिरायची/फिरवायची कितपत गरज असते ?>> आरामात रहातात. टेरेस आहेच फिरायला माऊला. पण लहान असताना टेरेसवर एकटे सोडून चालणार नाही. बाल्कनी खिडक्या वगैरेलाही सेफ्टी नेट ग्रील वगैरे असेल तरच बरे म्हणजे ॲक्सीडेंट होणार नाही काही.
त्यांना भुभू सारखे फिरवून आणावे लागत नाही. मांजरे आपापली सुटवंग असतात मोस्टली. (आमची माऊ १ bhk+ terrace अशी मुक्त फिरत असते. शिवाय फ्रिजचा टॉप, माळा, किचन शेल्फचा टॉप पोर्शन यावर तिचा स्पेशल ७/१२ आहे)
२. मांजराचे केस पडतात का ?> हो पडतात. भारतीय स्ट्रे कॅट्सचे मुळात केस पर्शीयन इतके भरघोस नसतात त्यामुळे पर्शीयनचे जितके पटकन नजरेस पडतील तितके इंडी ब्रीडचे पडत नाहीत नजरेस. तसच जर हेल्थ चांगली असेल तर नॉर्मल गळतात.
शी शु चं ट्रेनिंग त्यांना कसं देतात ?>> लिटर बॉक्स वापरायला किंवा एखादी माती भरलेली कुंडी वापरायला माऊ लवकर शिकतात. काही माऊ बाथरुममधे शी शू ला जातात. सवय करायच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत जसे लिटर बॉक्समधे आपल्या हाताने त्यांचा पंजा ठेवून त्यातली सॅंड उकरायची ॲक्षन करायची, सुरवातीला त्यांना लक्ष ठेवून लिटर बॉक्समधे आपणच ठेवायचे, बाहेर शी शू केली तर त्याचा वास लिटर बॉक्समधे टिश्यु चोळून लावायचा
लिटर बॉक्स वापरला कि ट्रिट द्यायची
मुळात मांजरे तशी स्वच्छता प्रिय असतात. घाण झाकण्याकडे त्यांचा नॅचरल कल असतो म्हणून लिटर बॉक्स किंवा कुंडीची सवय पटकन लागते.
३. आपण बाहेर किंवा गावाला जाणार असु तर त्यांना कुठे आणी कसं ठेवतात ?>> ओळखीच्या माऊ प्रेमी माऊ सेफ घरी सोय करणे, कुणाला दिवसभरात दोन तीन वेळा येऊन खाणे पिणे लिटर बॉक्स सफाई करणे जरा खेळणे करावयास सांगणे
सगळ्यात सेफ चांगल्या कॅट हॉस्टेल / बोर्डींग मधे सोय करुन जाणे किंवा घरातल्या मंडळींनी आलटून पालटून बाहेरगावी जाणे किंवा शक्य असेल आणि सेफ असेल तिथे माऊला सोबत नेणे
४. त्यांना कोणते अन्न देतात ?> कॅट फुड यामध्ये ड्राय आणि वेट असे पर्याय आहेत. वयानुसार पर्याय आहेत. फ्लेवर्स आहेत चिकन ओशन फुड क्रॅब वगैरे. वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. ॲमेझॉन आणि इतर ऑनलाईन पोर्टल्सवर डिल्स असतात. या व्यतिरिक्त फ्रेश चिकन फिश उकडून (काही जणं कच्च देतात आणि काही माऊ तसच खातात. काही माऊ दूध आवडीने पितात काही मात्र ढुंकूनही बघत नाहीत (घरचा अनुभव)
५. सगळ्यात महत्वाचं कोणतं मांजर पाळावं. ? भुभु प्रमाणे त्यात पण ब्रीड्स असतात का ?>> पर्शीयन विदेशी ब्रीड आहे. बेंगॉल कॅट्स ही एक हायब्रीड कॅट टाईप आहे. बाकी देशी मांजरांमधेही जिंजर कॅट, टॅबी कॅट, दोन डोळे दोन वेगळ्या रंगाची असलेली कॅट (heterocromatic cat), कॅलिको कॅट असे रंग / पॅटर्न वगैरेमुळे पडलेले प्रकार आहेत. अजूनही आहेत/असतीलच प्रकार, मी मला माहिती असलेले/आणि आठवलेले लिहीले.
मला पर्शीयन कॅट्सचा अनुभव नाही. पण देशी ब्रीड आपल्या हवामानात रहाण्यासाठी ॲडाप्ट झालेल्या असतात म्हणून त्यामानाने कमी मेंटेनन्स.
६. त्यांच्या मुळे घरात कोणाला काही आजार होउ शकतात का ? >> काही व्यक्तींना ॲलर्जी असते (मांजरीच्या केसांची) श्वसनाचे विकार कि इतर काही ॲलर्जीक लक्षणे दिसू शकतात अशा व्यक्तींमधे. ॲंटी ॲलर्जन्ट घेऊनही मांजरे घरी पाळणाऱ्या व्यक्तीही मला माहिती आहेत आणि मांजर आणल्यानंतर हे ॲलर्जीचे लक्षात आल्यामुळे मांजरांना सोडून दिलेल्याही काही व्यक्ती पहाण्यात आहेत. ॲलर्जीबद्दल शंका असतील तर फॅमिली डॉक्टर आणि वेटर्नरी डॉक्टर दोघांचा सल्ला घ्यावा आधी.
त्यांच्या साठी वॅक्सिन ई असतं ना ? ते कसं बघायचं ? >> पहिल्या वर्षी ४ आणि त्यानंतर दरवर्षी २ प्रकारचे वॅक्सीन द्यावे लागते. यात कॅट फिवर आणि इतर काही आजार, रेबीज असे कव्हर होते. व्हेटर्नरीकडे गेल्यावर तो चार्ट देतो.
दर तीन महिन्यांनी डिवर्मिंग करावे असे वेट सांगतात. १२ महिन्यांपर्यंतच्या मांजरांसाठी ड्रॉप्स येतात आणि त्याहून मोठ्या मांजरांसाठी टॅबलेट्स येतात (हे दोन्ही एकतर वेट देतात किंवा कुठे मिळेल हे सांगतात. आपल्याला द्यायला जमेल असा कॉंफिडंस नसेल तर चार्जेस घेऊन वेट स्वतः मांजरांना डोस पाजतात.)
नखे ट्रिम करणे हे ऑप्शनल आहे आणि तो गृमिंगचा भाग आहे पण आपल्या हातावर नक्षी कमी करायची असेल तर ते नखे ट्रिम करावे हे उत्तम. हे मात्र जरा ट्रिकी असते म्हणजे अती कापायची नाहीत, त्यांच्या स्किनला दुखापत होता कामा नये आणि आपल्याला बोचकारले न जाता कापणे जमायला हवे. हे हि काम वेट किंवा गृमर्स करतात मोबदला घेऊन.
आंघोळ घालणे सक्तीचे नाही. हे काम वर्षातून २-४ वेळा केले तरी पुरे. (मांजरांना आंघोळ आवडत नाही आणि तशी त्यांची गरजही नाही ती. आपण आपल्या गाद्यांवर जास्त घाण नको म्हणून अधूनमधून पुसून घेणे / आंघोळ घालणे असे उद्योग करतो) (हे कामही गृमर्स मोबदला घेऊन करतात. घरी देखील करता येते आपले आपल्याला)
खाण्यापिण्याची जागा एकदा त्यांना कळली कि बाकी ते आपण ठेवलेला त्यांचा खाऊ खातात. लिटर बॉक्समधली शी शू दिवसातून एकदा किंवा फारतर दोनदा साफ केली तरी पुरते.
आमची माऊ ७-८ तास घरी एकटी रहाते आम्ही ऑफीसला गेल्यावर. लेक लवकर घरी आली कॉलेजमधून तरी किमान ५ तास तरी असते माऊ एकटी.
हि कामे म्हंटलं तर काहीच नाही प्रकारातली आणि म्हंटलं तर वाढीव काम प्रकारातली आहेत म्हणून मुद्दाम लिहिली.
बाजारात बरीच खेळणी उपलब्ध आहेत मांजरांकरता पण महागडे खेळ बाजूला रहातात आणि मांजरे आवडीने खेळतात ते एखाद्या दोऱ्याशी, पीस पडले असेल पक्षाचे त्याच्याशी किंवा कागदाच्या बोळ्याशी.
वर लस आणि डिवर्मिंग बद्दल लिहीलेय पण अजून एक मोठ्ठा एपिसोड असतो तो म्हणजे न्युटरिंग / स्पेयिंगचा म्हणजेच फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशनचा
याबद्दल मतमतांतरे आहेत. कोणी म्हणते त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आपण कोण तर कोणी म्हणते की वाढत जाणाऱ्या प्रजेच संगोपन झेपणारे नाही आणि त्यांना दरवेळी घर मिळवून देणेही सोपे नाही. वेट म्हणतात ऑपरेशन केल्याने तब्येतीच्या काही तक्रारी कमी होऊन आयुर्मान वाढते / आरोग्य चांगले रहाते मांजरांचे.
अर्थात हा निर्णय त्या त्या पेट पॅरेंटने घ्यावा. ऑपरेशन करायचे तर फीमेल कॅट पहिल्यांदा हिटवर येऊन गेल्या नंतर आणि बोक्याच्या बाबतीत ५-६ महिन्याचा झाल्या नंतर करण्याचा सल्ला वेट देतात. ऑपरेशनच्या आधी ब्लड टेस्ट वगैरे सोपस्कार डॉ समजावून सांगतात त्यामुळे त्याचे टेंशन नाही. ऑपरेशन फारसे मोठे नसते पण नंतर किमान १५ दिवस काळजी घ्यावी लागते. हे अर्थात त्यांच्या आयुष्यात एकदाच त्यामुळे आपल्याला एकदाच यासाठी काळजी घ्यावी लागते.
केस गळु नये म्हणुन काय करायचं ?> आहार योग्य तो ठेवायचा. मांजर हेल्दी असेल तर फरही शाईन करते आणि कमी गळतात केस. लाडच करायचे असतील आपल्याला तर केस कधीतरी विंचरायचे (हे खरतर करा किंवा करु नका आपली आवड आणि लाड. मांजरं चाटून स्वतःला साफ करत असतातच ते पुरते बरेचवेळा)
७. एकंदरीत घरात तोड्फोड्/पसारा हे मांजरं कितपत करतात ?>> जितकं लहान मुल करेल त्याहून कमीच खरतर. पण परत तेच प्रत्येक मांजराचा स्वभाव वेगळा. माझं मांजर शांत आहे म्हणून सगळीच तशी असतील असे नाही.
# प्रत्येक प्राणी जमातीची एक ढोबळ रुपरेषा आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांना अमुक लागते तमुक पद्धती चालतात असे वागतात असे आवडते तसे आवडत नाही असे ठरवतो.
#पण तरी प्रत्येक मांजर हे वेगळे असते जसे प्रत्येक मूल वेगळे असते तसेच. म्हणजे काही जनरल गाईडलाईन्स आहेत असे म्हंटले तरी काहीवेळा काही मांजरे (इथे कोणताही प्राणी मनुष्यासकट) ही वेगळीच वागतात. त्यांना त्यांच्या त्यांच्या पर्सनलाईज्ड आवडीनिवडी असतात, पर्सनॅलिटीही वेगळी असू शकते. मनुष्याच्या बाबतीत जनरलायझेशन जितपत परफेक्ट असेल तितपत ते मांजरांच्या बाबतीतही असतेच.
खर्च : वार्षिक वॅक्सीन खर्च - साधारण १०००-१२००/- एक वॅक्सीन डोस (मुंबईतला प्रायव्हेट वेट कडचा खर्च देतेय)
आजारी पडल्यावर किमान ५००/- per visit
Operation - याचे दर मुंबईतही वेगवेगळे ऐकलेत. ३०००-७०००/- असे रेट्स ऐकले आहेत. आमचाही याच ब्रॅकेटमधला highest side वाला
pawpulation control नावाची संस्था सांताक्रूझला आहे तिथे ऑपरेशन पैसे न घेता करतात असे ऐकले आहे पण मला अनुभव नाही.
खाण्याचा खर्च : घरातले फ्रेश चिकन फिश दूध दही भात वगैरे खात असतील तर कमी पण नुसते कॅट फुड खात असतील तर तो एक दरमहा खर्च आहे
लिटर बॉक्स महाग असतात. माझ्याकडेही आहे एक. पण आता तो माळ्यावर आहे. कारण माझ्या माऊला कुंडी आणि टब याचीच सवय आहे. टब तर मी प्लॅस्टीक सामानवाल्या दुकानातून घेतलाय. तो ब्रॅंडेड लिटर बॉक्सपेक्षा खूप स्वस्त मिळालाय.
त्यात टाकायला सॅंड घेणार असू विकत तर तो खर्चही दरमहा खर्चात पकडावा लागेल.
घेण्याचे ठरविले तर घरातल्या प्रत्येक मेंबरला या जबाबदाऱ्या आणि खर्च यांची किमान माहिती असावी म्हणून इतके तपशीलात लिहीले.
हौस म्हणून घेऊन नंतर झेपत नाही म्हणून सोडून दिले तर त्या पिल्लांना त्रास होतो त्यापेक्षा आधीच विचार करुन निर्णय घेणे माणूस आणि मांजर दोघांसाठी चांगले.
मी काही आधीपासून प्राणीप्रेमी नव्हते. प्राणी द्वेषीही नव्हते मी. पण मी प्रचंड घाबरायचे. ॲनिमल फोबीयाच होता. बोबडी वळायची,हाताला घाम फुटायचा, पाय पळताही येणार नाही असे खिळायचे जमिनीला जर प्राणी एका अंतराच्या आत जवळ आला तर. पण हे सगळे गेल्या जन्मीचे माझे ट्रेट्स होते वाटावे इतका बदल माझ्यात माऊने केला. टाईम क्लॉकने मागे नेले मला तरी मी तिला दत्तक घेण्याचाच निर्णय परत घेईन.
घेण्याचे ठरले फायनली तर...
विकत घेणे हा एक पर्याय आहे (मला व्यक्तीश: तो पटत नाही पण पर्याय आहे हे कळावे म्हणून लिहीले) जनरली पर्शीयन,बेंगाल कॅट हे विकले जातात ब्रीडर्स कडून
पर्याय दुसरा दत्तक घेणे
दत्तक घेतानाही ओळखीच्या कोणाकडे मांजरीला पिल्ले झली तर तिथून किंवा कोणी ऱेस्क्युअर माहितीत असेल तर त्याला सांगून ठेवून किंवा फेसबुक आणि इतर ठिकाणी ॲडॉप्शन गृप असतात तिथून माहिती घेऊन ॲडॉप्ट करता येते
काही NGO किंवा कॅट ॲडॉप्शन सेंटर्स असतात तिथूनही ॲडॉप्ट करता येते. अशा ठिकाणाहून ॲडॉप्ट करताना त्यांची ॲडॉप्शन प्रोसेस पुर्ण करावी लागते. बरेचदा न्युटरिंग/स्पेयिंग करुन घेण्याबद्दल ते आग्रही असतात. (हे मला योग्य वाटते कारण ब्रिडर्स गैरफायदा घेतात तो टाळण्यासाठी न्युटरिंगचा आग्रह ते धरतात)
(मी स्पेयिंग करुन घेतले आहे माझ्या मांजरीचे. ती इंडी ब्रीडची आहे आणि रेस्क्यु कॅट आहे. ॲडॉप्ट केली तेव्हा ती जेमतेम २१ दिवसांची होती. जनरली ४५ दिवस झाल्यानंतर आईपासून पिल्ल वेगळी होतात आणि ॲडॉप्शनला देता येतात. पण आमच्या माऊची आई नव्हती. एकटी होती ती. म्हणून इतक्या लहान वयाची ॲडॉप्ट केली.)
प्रतिसाद फारच मोठा झालाय पण असूदेत घ्या गोड मानून
कविन मस्त माहिती! मी पण
कविन मस्त माहिती! मी पण विस्तारभयास्तव हात आखडता घेतला. ऑपरेशन बद्दल लिहिलंस ते बरं केलं.
त्यांच्यावतीने आपणच फार बोलतो 
प्रतिसाद फारच मोठा झालाय पण असूदेत घ्या गोड मानून Lol>>>>>>>>>>कोणत्याही पेट पॅरेंटसची हीच कहाणी असेल
सिंबा भारी खुश दिसतोय.
सिंबा भारी खुश दिसतोय. फिरायला मिळाल्याचा आनंद सेलिब्रेट करतोय. काठीची पार हालत करून टाकलेली दिसतेय
माऊई गोंडस दिसतोय. हॅपी
माऊई गोंडस दिसतोय. हॅपी बर्थडे माव्या
त्यांच्यावतीने आपणच फार बोलतो
त्यांच्यावतीने आपणच फार बोलतो Lol>> खरय
कविननी मस्त सविस्तर उत्तर
कविननी मस्त सविस्तर उत्तर दिलचं आहे.
शक्यतो रेस्क्यू केलेली आणली तर छान. त्यांनाही घर मिळतं.
बाहेरगावी जातांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो जर सोबत कोणी राहणार नसेल तर. भारतात अजून डॉग हॉस्तेल सारखी कॅट हॉस्टेल्स नाहीत. इकडे पुण्यात काही ठिकाणी घरी ठेऊन घेतात.
माझी एक मैत्रीण आठवडाभर घरी एकटी ठेऊन जाते. तिची मेड दिवसातून तीनदा येऊन ताजं खाणं, पाणी देणं, लिटर साफ करणं वगैरे करुन जाते.
नखं कापणं घरी जमत नसेल तर सरळ बाहेरुन करुन घ्यावं. बहुतेक क्लिनीक्स मध्ये सोय असते नाहीतर प्राण्यांचा खाऊ वगैरे मिळणार्या दुकानात चौकशी केली तर ते सांगतात.
आमचंही माऊ खूप शांत्त असतं जनरली, पण आजवर बरीच बेडशीट्स फाडली आहेत. आणि टेरेसला जाळी लावली आहे कठड्याला तरी तो आरामात चढून पलीकडे बीमवर जाऊन बसतो आणि परत येतो.
प्राणे पाळणं ही एक मोठी कमीटमेंट आहे. मुलं आग्रह करतात आणि नंतर बरेच्दा आपल्या व्यापात अडकतात. मग तुम्हाला / घरातल्या इतरांना बरीचशी जवाबदारी घ्यायला लागते. त्याची तयारी हवी. आणल्यावर, आता जमत नाही म्हणून परत देणे, सोडून देणे मात्र अजिबात करु नका.
हॅपी बर्थडे माव्या!!
हॅपी बर्थडे माव्या!!
खुप मस्त प्रतिसाद आले आहेत
खुप मस्त प्रतिसाद आले आहेत इथे.
आशुचँप, अंजली, कविन सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
बर्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. आता लेकीशी परत एकदा सविस्तर बोलुन तिचा विचार बदलतोय का बघते.
परत एकदा सर्वांना धन्यवाद.
स्मिता श्रीपाद,
स्मिता श्रीपाद,
इतरांनी सल्ले दिले आहेतच.मी एक वेगळा सल्ला देते.
मुलीचे लहानपण समृद्ध जावे वाटत असेल तर खरंच तिचे ऐका.
आमच्या लहानपणी घरी 13 मांजरे येऊन जाऊन होती.म्हणजे
एकावेळी 13 नव्हती. मांजरीला पिल्ले झाली की आजी गड्याला बोलावून मासे मार्केटमध्ये पोहोचवून द्यायची.
पहिल्या मांजरीचे बाळंतपण मी आणि दादा दोघांनी पाहिले होते.माऊला कळा येत असताना एक वेगळे ओरडत असे.एका कोपऱ्यात ती होती,पण आम्हाला पाहिल्याबरोबर आमच्यासोबत कॉट वर चढली.परात तिला खाली उतरवून तिच्या शेजारी आम्ही दोघे बसलो होतो. बाळे amchypudhyat जन्मली.
सकाळी जाग यायची ती छातीवर आलेल्या मऊच्या भाराने आणि हलकी गुर्गुर.मस्त वाटायचे.
बाकी त्यांना खायला देणे आईचे काम. litterbox नव्हते.एका घमेल्यात वाळू होती.त्यात ही मांजरे आपले विधी करीत.ती स्वच्छता पपा करीत.आम्हाला शाळा कॉलेज होते.
घर मोठे होते,पण घरात माणसे पण बरीच होती.पण मांजरासकट आम्ही मजेत होतो.खूप छान वाटायचे प्राणी पायात गडबडले की.
Please also check the. Cat
Please also check the. Cat care bafa by Jarbera Id. Very well written and lots of cat specific information.
ओडीन आणि रिओ सोबत आता टफी पण
ओडीन आणि रिओ सोबत आता टफी पण यायला लागला आहे ग्राऊंडवर. टफी म्हणजे तोच ज्याच्यावर ओड्याने अॅटॅक केला होता घरी आलेला असताना.
तो अजूनही थोडा घाबरतोच ओड्याला. पण त्यांना म्हणलं त्याला खेळू द्या एकत्र, आपोआपच गट्टी जमेल. आणि तसेच होतंय. बॉल आणि काठी आणायला हे दोघे पळतात, हाही त्यांच्यामागून पळतो. आणि परत येतो. पण काठी घ्यायाची हिंमत करत नाही. आणि खरेतर वयाने आणि आकारानेही तो मोठा आहे पण ग्राऊंडमध्ये रिओ त्याला सिनियर आहे. त्यामुळे तो जसा ओडीन त्याला वागवतो तसा तो टफीला वागवायला बघतो.
ग्रुपमध्ये आपलं स्थान फिक्स करण्यासाठी चाललेली त्यांची धडपड बघण्यासारखी असते. सध्या तरी ओड्या या तिघात अल्फा मेल आहे. तो जे करेल ते हे दोघे फॉलो करतात. त्याने दगडावर शू केली की हे दोघे रांगेने जाऊन तिथेच शू करून येतात.
की परत थोड्यावेळाने ओड्या तिथेच सेम जागी शू करतो की परत हे दोघे. अरे म्हणलं वेड लागलय का तुम्हाला....
अंजली, कविन, धनश्री मस्त
अंजली, कविन, धनश्री मस्त पोस्ट्स. स्मिता, माऊ घेतले तर इथे नक्की फोटो टाका .:)
Yes I have observed this
.
I have done two deliveries
पोस्ट माहिती धा ग्या वर शि फ् ट केली.
हे सगळे मेल च आहेत पण
हे सगळे मेल च आहेत पण
हे सगळे मेल च आहेत पण>> हो मी
हे सगळे मेल च आहेत पण>> हो मी माहिती म्हणून लिहिले होते. पोस्ट माझ्या माहिती धाग्यावर शिफ्ट केली.
(No subject)
रामनवमीच्या दिवशी घरी आगमन
रामनवमीच्या दिवशी घरी आगमन झाले. आमच्या परिवारात एक नविन छोटा गोड सदस्य अॅड झाला....
गोड आहे . काय नाव आहे ?
गोड आहे . काय नाव आहे ?
@ जाई >>> Roxy राॅक्सी
@ जाई >>> Roxy राॅक्सी
मुले व आई त्यांनी मिळवून ठरवले.
रॉक्सी चे स्वागत! क्यूट पपी!!
रॉक्सी चे स्वागत! क्यूट पपी!! कोणते ब्रीड आहे?
किती गोंडस दिसतोय रॉक्सी.
किती गोंडस दिसतोय रॉक्सी.
राॅक्सी मस्त नाव आहे, वेलकम
राॅक्सी मस्त नाव आहे, वेलकम
या धाग्यावर अजून एक GSD ऍड झालेलं पाहून आनंद झाला
हो एलॉन, सिम्बा आणि आता
हो एलॉन, सिम्बा आणि आता रॉक्सी
अरे वा, किती गोंडस आहे!
अरे वा, किती गोंडस आहे!
आशुचँप --->> एलॉन, या आधी कधी
आशुचँप --->> एलॉन, या आधी कधी ऐकले किंवा पाहिल्याचे आठवत नाही
कोकोनटला विसरू नका
कोकोनटला विसरू नका
एलॉन, या आधी कधी ऐकले किंवा
एलॉन, या आधी कधी ऐकले किंवा पाहिल्याचे आठवत नाही>>> बरेच दिवसात त्यांनी पोस्ट टाकली नाही
मोठा आहे वयाने
कोकोनटला विसरू नका>>> त्याला नई विसरलो हो
गोंडस बाळ आहे ते
ही लिस्ट फक्त जर्मन शेफर्ड ची होती
Pages