Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओडिन ला कधी भेटलो तर "काय
ओडिन ला कधी भेटलो तर "काय लेका ओड्या, वळखल नाय का? " असा विचारावं इतका ओळखीचा वाटतोय.>>>

एलॉन कसला राजेशाही पोझमध्ये बसलाय, देखणा एकदम
लाना चा फोटो पण भारी, एकदम क्लासिक
कोकोनटचे पहिल्या फोटोतले एक्सप्रेशन कहर आहेत....अगदी तंतरलले समर्पक वर्णन
ओड्या आणि रिओची चांगली गट्टी
ओड्या आणि रिओची चांगली गट्टी जमलीय, एखादे दिवशी नाही आला तर ओडीनबुवांचा मूड जातो. मग पळत नाही खेळत नाही. काठी टाकली तर एकदाच आणून देतो.
एक दिवशी तर आम्ही चक्क तिथेच बसून राहीलो अर्धा तास वाट बघत आणि नाही येत म्हणल्यावर घरी आलो....
पण रिओ बाळ महाव्रात्य आहे. त्याच्या बाबाची प्रचंड कसरत होते त्याला सांभाळताना. एक तर वावरा आहे, अजिबात ऐकत नाही, आणि कचरा, दगड, काठी काय वाट्टेल ते खातो. त्याच्या बाबाला म्हणलं की त्याला कॅल्शियम व्हिटॅमिन वाढवा, फरक पडेल
एकदा तर कचऱ्यातून मेलेला साप घेऊन आला. आमच्या दोघांचे धाबे दणाणले. त्याच्याकडून काढून घ्यायला नो नो करत पळालो तर त्याने धूम ठोकली. मोठ्या प्रयत्नानी त्याला पकडून साप टाकायला लावला. फटके पण खाल्ले त्यासाठी तरी ऐकत नाही.
आता तर ओड्याने त्याला झाडांची पाने खायला शिकवलं आहे. मी मागे पण इथ लिहीलं होतं एक स्पेसिफिक झाड आहे त्याच्या पानांचा तोबरा भरायला ओड्याला आवडतं आणि आम्ही जातो तिथे अशी भरपूर रोपटी आहेत. ती शोधून शोधून खातो. कालच त्यांचे एका झाडापाशी उभे राहून बरेच गहन डिस्कशन पण झाले त्यावर. ओड्या चरता चरता त्याला सांगत होता, पळून दमलो ना ही पाने खायची, एनर्जी मिळते आणि बाबा जास्त ओरडत नाही. कुठं कचरा वैगेरे खातो, हे खाऊन बघ. मग रिओनेही दादा म्हणतोच आहे तर ऐकावं म्हणून दोन चार पाने चघळली.
ओड्याला म्हणलं नाही त्या सवयी लावू नको त्याला
मस्त आहेत ओड्या आणि रिओचे
मस्त आहेत ओड्या आणि रिओचे किस्से.
@आशुचँप ---> आईला !!! चक्क
@आशुचँप ---> आईला !!! चक्क साप !! तुमची नक्कीच पळापळ झाली असेल, कारण जरी मेलेला असला तरी विषारी असला तर दातात विष असते आणि ते तसाच इफेक्ट करू शकते
नाही, अगदी ताजा नव्हता
नाही, अगदी ताजा नव्हता
तिकडे कचरा पण जाळतात, त्यातच अर्धवट जळलेला हा साप होता
त्याला तेव्हापासून आम्ही जास्त मोकळा सोडतच नाही
कारण त्याला माहितीय की काही खायला घेतलं की हे दोघेही ओरडतात, म्हणून तो गुपचूप उचलतो आणि धूम ठोकतो
त्याचा बाबा म्हणतोय त्याला आता ते मझल च आणून लावतो
एक महिनाभर लावलं तर खायची सवय सुटेल
काहीतरी केलं पाहिजे मात्र, असाच तो खात राहील तर खात्रीने आजारी पडेल
इतकं गोंडस आहे ते बाळ, पण जाम उपद्व्याप करत
सगळया भुभूंचे किस्से मस्त
सगळया भुभूंचे किस्से मस्त
इथल्या मुला मुलींकरता
इथल्या मुला मुलींकरता एथ्निकवेअर.
पालकांना एखादेवेळी आवडेल असे वाटते
https://vastramay.com/collections/paws-by-vastramay
कसले क्यूट कपडे आहेत !
कसले क्यूट कपडे आहेत !
ओडिन आणि रिओ चा किस्सा भारी आहे
लाना मला एक्दम लग्नात रुसुन
लाना मला एक्दम लग्नात रुसुन बसलेल्या सासु सारखी वाटतेय लोल...
लाना मला एक्दम लग्नात रुसुन
लाना मला एक्दम लग्नात रुसुन बसलेल्या सासु सारखी वाटतेय लोल...>>> उसके लिये गिफ्ट लानाभुल गये क्या?
ओडिन आणि शिष्यगणाचे किस्से भारी, त्याच वर्णन आशुचॅम्प करतात ते एकदम चित्रदर्शी असत.
१००१ वी पोस्ट टाकावी म्हणून
१००१ वी पोस्ट टाकावी म्हणून आले.

मागच्या पानावरच्या प्र चि तला तंतरलेला कोकोनट आणि रक्षक सिम्बा आवडला. इतरही माऊ आणि भू भू बाळं लोभस आहेत.
हर्पेन यांची लिंक पाहिली. आमच्या स्नो भूभूला कपडे, टोपी bandana असले काहीही आवडत नाही. अंग जोरजोरात झाडून, झटकून तीव्र निषेध नोंदवतो. फोटोचं तर त्याला वावडंच आहे. फोटोला पोझ कशी देऊ नये याचं डेमो उत्तम करेल
सिम्बा आणि कपडे यांचा ३६ चा
सिम्बा आणि कपडे यांचा ३६ चा आकडा आहे, काहीही घालू देत नाही अजिबात त्यामुळे तो नाद कधीच सोडला आहे मी. फोटो काढणे म्हणजे एक दिव्यच असते कारण फोटो काढणारा दिसला कि आम्ही त्याला किंवा मग कॅमऱ्याला चाटायला धावतो
कारण फोटो काढणारा दिसला कि
कारण फोटो काढणारा दिसला कि आम्ही त्याला किंवा मग कॅमऱ्याला चाटायला धावतो >> lol! सिम्बा च सगळच वेगळ आहे.मला अजुनही त्याचा लपलेला फोटो आठवुन हसु येतो.
मागच्या पानावरचा ततरलेले (टेन्डर) कोकोनट मिस झाल होते बर का? कोकोनट गोडूला आहे फार
ओड्याला कॅनाल ला पोहायला नेतो
ओड्याला कॅनाल ला पोहायला नेतो तेव्हा त्याला बघायला बरेचदा लोकं जमतात
काही जण कौतुक करतात
पण परवा एक काका इतके इमोशनल झाले
ओड्या बाटली घेऊन येतो तेव्हा दमलेला असतो, कारण कॅनाल ला पाण्याचा फोर्स बराच असतो
थोडा वेळ दम खातो आणि परत उडी मारायला सज्ज
तर हे काका वरून बघत होते आमचा खेळ
थोड्या वेळाने त्यांना अगदीच राहवेना म्हणे अहो बास करा
मला कळेना यांना काय झालं, मी प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितलं तर म्हणे अहो तो किती दमलाय, त्याला विश्रांती द्या
म्हणलं नई दमत तो, तास तासभर पोहतो
तरी त्याना काही पटेना, इतके कळकळून सांगायला लागले म्हणे इतका छान कुत्रा आहे तुमचा, नका त्याला असा त्रास देऊ, तुम्ही बाटली टाकली की तो आणणार च, दमला तरी
म्हणलं असं नाही हो, तो खरोखरच दमला की ढिम्म हलत नाही जागचा
तरी ऐकेनात, ते स्वतःच इतके अस्वस्थ झालेले
बरं काळजीपोटी सांगत होते त्यामुळे मला काही म्हणताही येईना
म्हणे त्याला घरी घेऊन जा, खायला द्या आणि झोपू द्या, उद्या परत आणा वाटल्यास पण एकाच वेळी जास्त दमवू नका
बापरे, इतका आग्रह म्हणल्यावर शेवटी मीच माघार घेतली म्हणलं ओड्या बास आजचं स्विमिंग
पण तो ढेकळ्या काय ऐकतोय, तो इतक्या लगेच पाण्यातून बाहेरच येईना, वर बाटली टाक लवकर म्हणून भुंकयला लागला
मी मधल्या मध्ये इतका कात्रीत सापडलो, त्यांना म्हणलं हे लास्ट मग आम्ही जातो घरी
आणि मग खरोखरच त्यांनतर त्याला काढला बाहेर आणि घरी घेऊन आलो
ढेकळ्या ओड्या। हा हा हा हा
ढेकळ्या ओड्या। हा हा हा हा
आशुचँप ---> ओड्या चांगलाच
आशुचँप ---> ओड्या चांगलाच स्वीमर दिसतोय। कसा काय शिकवलं त्याला पोहायला? काही टिप्स ?
ओड्या ढेकळ्या !!
ओड्या ढेकळ्या !!
एलोन ला पण कपडे अजिबात आवडत
एलोन ला पण कपडे अजिबात आवडत नाहीत ... एका मिनिटात ओढून काढतो
ओड्या चांगलाच स्वीमर दिसतोय. तुमच्या पोस्ट वाचून मला पण त्याला स्विमिंग ला घेऊन जावे वाटते पण आमच्या एलोन ला वाळवणे म्हणजे फार मोठे काम आहे . त्याला पुसायला आम्ही डबल बेडच्या बेडशीट वापरतो आणि नंतर जवळ जवळ तासभर हेअर ड्रायर घेऊन बसतो ... चालू बंद करत करत वाळवावे लागते त्याला
टिप्स अशा काही नाहीत
टिप्स अशा काही नाहीत
मुळातच लॅब हे जन्मजात स्वीमर असतात, त्यांना फक्त सुरुवातीला पाण्याची भीती घालवायला लागते, एकदा ते झालं की मग ते ऐकत नाही
आधी मी त्याला अंजरून गोंजारून उतरवला पण तिथेच डुंबत राहायचा, म्हणून मग मित्राचा डोगो अर्जेंटिनो होता त्याच्या साखळीला याला बांधला, तो याला सोबत घेऊन गेला कॅनालच्या मधोमध
आपण बुडत नाही म्हणल्यावर त्याचा कॉन्फिडन्स वाढला
आणि लहानपणापासून कॅनाल मध्ये उतरवल्याने तो आता अगदी प्रो झालाय
कितीही लांब बाटली टाका, कितीही पाण्याला फोर्स असू दे, तो बरोबर तिरका तिरका पोहत जातो
पण आमच्या एलोन ला वाळवणे म्हणजे फार मोठे काम आहे . >>>> ते आमच्याकडे पण, एक तर पोहून आला की तो फुल चार्ज झालेला असतो, इतकी मस्ती करतो की विचारू नका
त्याचा एक टर्किश टॉवेल आहे तो घेऊन त्याला पळापळ करायची असते आणि त्याला पकडून पुसून घेताना माझी अक्षरशः दमछाक होते
टॉवेल दोन्ही बाजूनी चिंब होईपर्यंत त्याला पुसतो आणि मग बायकोचा हेअर ड्रायर आहे त्याने सुकवतो
तेही करताना इतकं अंगात आलेलं असतं त्याच्या की माझं पार घामटं निघतं
आणि हे सगळं एक तासभर पोहून आल्यावर
मी म्हणतो अरे तुला दमवायला म्हणून नेतो रे, अजून चार्ज व्हायला नाही
आशु चॅम्प तुम्ही एक पुस्तक
आशु चॅम्प तुम्ही एक पुस्तक लिहा ना ओड्याच्या किस्याचं... खूप खुसखुशीत वाटतं वाचताना !!
ओडिन डायरी चेच काढायचा आहे
ओडिन डायरी चेच काढायचा आहे डोक्यात
पण कसं आणि काय करावं हे लक्षात येत नाहीये
ओड्याला म्हणलं नाही त्या सवयी
ओड्याला म्हणलं नाही त्या सवयी लावू नको त्याला Happy

हो नां ... अश्याने उद्या बाटली घेवुन बसायचे दोघे जण (....पाण्यातुन बाहेर काढलेली)
ओड्याचे स्विमिंग चे व्हिडिओ
ओड्याचे स्विमिंग चे व्हिडिओ पाहिलेत आधी. धडाधड उड्या मारतो पाण्यात! कसला हॅप्पी बॉय दिसतो पोहोताना

त्या नका हो नका वाल्या काकांचा किस्सा फनी आहे मात्र, त्यांच्या निरागस काळजी पोटी बिचार्या ओड्याचे स्विमिंग आटोपते घेतले
आशूचॅम्प विपु नाही बघत का
आशूचॅम्प विपु नाही बघत का तुम्ही तुमच्या
Also consider a documentary.
Also consider a documentary. I can write script.
आशुचँप ---> एक दोन youtube
आशुचँप ---> एक दोन youtube लिंक द्या कि आम्हाला पाहायला
https://youtu.be/TMjIf1aon58
https://youtu.be/TMjIf1aon58
हा त्याचा तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला व्हिडिओ
यात आहेत पुढे स्विमिंग च्या क्लिप्स
आशूचॅम्प विपु नाही बघत का
आशूचॅम्प विपु नाही बघत का तुम्ही तुमच्या>>>
आता पहिली, केला रिप्लाय
भारी वाटलं तुम्हाला भेटून
मी ओडिनला कॅनाल ला घेऊन जात असताना मोटरसायकल वरून एकजण आले म्हणे तुम्ही आशु ना, म्हणलं हो तुम्ही कसं ओळखलं
म्हणे ओडिन कडे बघून
अश्याने उद्या बाटली घेवुन बसायचे दोघे जण>>>
बाटली दिसली की त्याला कळतं की आज पोहायला जायचं
सध्या तरी इतकंच कळतंय म्हणून बरंय
सो क्युट ओडिन. आमच्याकडे
सो क्युट ओडिन. आमच्याकडे पाणी/ भिजायला आजिबातच आव्ड त नाही. कधी कधी अवलिए म्हातारे भेटतात मात्र. एकदा मला जॉन्सन समोर एक जण काका भेटलेले. त्यांचा एकदम एकच धोशा अहो कुत्र्याला लीश लावु नका. काढा ती लीश. ते बरोबर चालतात. म्हणून स्वीटीची लीश काढायलाच सरसावला. मी बाबा पुता करून त्याला अहो नको नको म्हणून स्वीटीला बाजूस घेतले. एक function at() { [native code] } तेव्हा रोड क्रॉस कराय्ला लागायचा तेव्हा तर लीश हवीच. व बारके जमीनीसरपट कुत्रे एकदम रस्त्यावर आले तर भरधाव येणार्या गाड्यांना अपघात व्हायची मला फार भीती वाटायची. अजूनही वाट्ते. त्यामुळे आमची शिस्त की बाहेर पडले की लीश हवीच. आता हे त्या काकाला कसे समजवायचे!!
जॉनसनच्या पुढे बांधकामे चालू होती तिथे पण कुत्रे असायचे तेव्हा लीश गरजेचीच होती. स्वीटीची आई वीनी हीच लहान होती तेव्हा एकदा मी
बंजारा हिल्स च्या आमच्या रोडच्या पुढे स्कूटर वरुन आलेले व मागे मुलगी बसलेली. हिला स्कूटर वरुन भटकायला फार आव डायचे. हा भाग म्हणजे सध्या टीआर एसच भले मोठे कार्याल य आहे त्याची मागची बाजू साधारण. तर वीनी अचानक लीश असून सुद्धा एकदम स्कूटर वरुन उडी मारून आत दरीत पळत गेली. लैच फास्ट अरे अरे करेपरेन्त. स्कूटर बंद करुन थांबेपरेन्त गायब. इकडे ती गेली म्हणून मुलीने धाय मोकलून रडायला सुरुवात केलेली. तिला गप्प करु का कुत्र्याला शोधू असे झाले. मग चालत आत दरीत गेलो. तिथे वस्ती होती. व ही बाई पण शेपटी हालवीत आनंदात उभी. मग तिला लीश पकडून आणले. ते लोक म्हणले तुम्ही आला नसतात तर दहा मिनिटात आम्ही कुत्रा आम्हाला ठेवुन घेतला असता !!! की परत लेक रडायला सुरुवात. मग दोघींना घरी आणून पाणी पाजले. व गप्प केले. बंजारा हिल्स बघितलेत तर काही टेकड्या काही खोल दर्या काही झोपड्या काही आलिशान बंगले असा भाग आहे. काही भाग एकदम निर्मनुष्य. २००७ ची गोष्ट आहे.
आशुचँप ---> वा वा मस्तच विडिओ
आशुचँप ---> वा वा मस्तच विडिओ आहे. कसला मस्त पोहतोय ओड्या.
जम्पिंग प्रॅक्टिस विडिओ पाहून सिम्बाचे आठवले. त्याला मुलगी शिकवायला गेली तरी हा कधी काठी खालून तर कधी बाजूने येऊन ट्रीट मागायचा
सध्या त्याला आम्ही बाहेर जातांना घरात मोकळा ठेवून जाणे सुरु केले आहे. एकटा असेल तर जास्त गडबड न करता बसून राहतो आमची वाट पाहत. कुठलेही उद्द्योग केलेले नाही फक्त आम्ही बाहेर निघालो कि चेहरा अगदी केविलवाणा करून पाहतो
Pages