Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओडीन आणि रिओ हे शोलेतील जय
ओडीन आणि रिओ हे शोलेतील जय वीरू दिसतायेत.>>> ओड्या दिसण्यावर मारून नेतो गोंडसपणाच्या म्हणून
नैतर जाम शिष्ट, आगाऊ आहे
शेअरिंग वगैरे अजिबात चालत नाही
माझं ते माझंच, तुला हवं तर तुझं वेगळं घेऊन ये
माझ्या काठीला तोंड लावायचं नाही,
आणि बरं ती काय स्पेशल असते असाही नाही, तिथेच वाळक्या काटक्या पडलेल्या असतात त्याच उचलून टाकतो
पण त्याही दुसऱ्या कुणी घ्यायच्या नाहीत, घेतल्या की थेट मारामारीच
मस्त किस्सा!
मस्त किस्सा!
शाब्बास हॅरी! फोटोत काय मस्त
शाब्बास हॅरी! फोटोत काय मस्त पहुडलाय
ओड्या आणि रिओचा किस्सा धम्माल!
हॅरी आणि पालकांचे ही अभिनंदन!
हॅरी आणि पालकांचे ही अभिनंदन! मस्त झोपलाय की गडी:)
येडू बबडू ओडू... काय रे तुझे एकेक किस्से!
जय वीरु... खरंच. मस्तय तो विडीओ.
परवा सॅमीचा किस्सा.. तिला वेट कडे नेताना फार पळापळ होते. तिला कसं कळतं का माहित नाही पण तिच्या कॅरियर बॅगची चेन चुकून बाबाने ती जवळपास असताना उघडली. झालं तिने धूम ठोकली आणि अगदीच कुठेतरी दडी मारली. बेसमेंटच्या बॉयलररूम मधे सापडली एकदाची. मग मानेच्या इथे चिमटीत पकडून (जिथे माऊ आया पिल्लांना पकडतात ) बसवलं तिला त्यात आणि तिकडे डॉ. च्या डेस्कवर तोंड फिरवून बसली. जामच बघायला तयार नाही आमच्याकडे. डॉ आल्यावर मग घाबरगुंडी परत एकदा. मग बघायला लागली जसं काही हे नको तुम्हाला चालवून घेते.
हॅरीचं अभिनंदन
हॅरीचं अभिनंदन
<<परवा सॅमीचा किस्सा..>>
<<परवा सॅमीचा किस्सा..>>
हे वाचून स्नोईचा किस्सा आठवला. सगळ्यात पहिल्यांदा ती कॅट बास्केट मधे नीट बसली. त्यातून तिला डॉक्टरकडे नेले आणि ऑपरेशन करून आणले. परत ती त्यात बसायलाच तयार नाही.. कसेतरी करून चेकअपला नेले तर डॉक्टरकडे बघायलाच तयार नाही. तिने खाऊ देऊन पाहिला, कान- गळा खाजवून पाहिला, गप्पा मारून पाहिल्या पण स्नोई ढिम्म.....
हाहा स्नोई आणि सॅमी लांबच्या
हाहा स्नोई आणि सॅमी लांबच्या बहिणी लोल..
बसायची नवीन स्टाईल
ओडीन आणि रिओ - जय आणि वीरूची
ओडीन आणि रिओ - जय आणि वीरूची जोडी आवडली !
हॅरीचंही अभिनंदन आणि शाबासकी !!
वरच्या फोटोत सॅमी अगदी ऐटीत बसलीय.
>> कसेतरी करून चेकअपला नेले तर डॉक्टरकडे बघायलाच तयार नाही. तिने खाऊ देऊन पाहिला, कान- गळा खाजवून पाहिला, गप्पा मारून पाहिल्या पण स्नोई ढिम्म>>
हा अनुभव स्नोबाबतीत पण आहे. एखाद्या कुटुंबियांपैकी नसलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर मान खाली घालून उभा राहतो. बसला असेल तर विरुद्ध दिशेला मान फिरवतो. तुम्ही काहीही लाड करा, गोड बोला, खेळणं वाजवा, खाऊचे आमिष दाखवा 'No means NO'! मग ती व्यक्ती नजरेआड झाली की सगळं वागणं पूर्ववत! जणू काही झालंच नाही ! पण हे सरसकट नसतं. त्याचे काय नियम आहेत ते तोच जाणे !
(No subject)
आज बरेच दिवसांनी हवामान चांगले होते, पाऊस थांबून मस्त ऊन पडले होते आणि त्यात आम्हाला वॉल्कवर काठी सापडली मग काय ती हट्टाने घरी आणली, चांगली अर्धा mile चालून घरी आणलीच .
घरी आल्यावर काय तो आनंद आणि मग काठी चावून सगळीकडे त्याचे तुकडे तुकडे करून ठेवले म्हणून मग ओरडा पण खाल्ला

काठी मिळाल्याचा आनंद मावत
@मै अगदी अगदी करेक्ट. सिली &
@मै
अगदी अगदी करेक्ट. सिली & स्वीट बॉय. हाहाहा
भारी क्यूट मूड पकडलाय सिंबाचा
भारी क्यूट मूड पकडलाय सिंबाचा!
काठी, बॉल आणि icecream हे
काठी, बॉल आणि icecream हे सिम्बाचे वीक पॉईंट आहेत, त्यासाठी काहीही करायला तयार असतो पठ्ठा
आणि अजून एक बाकरवडी देखील खातो आवडीने एखादा तुकडा तरी द्यावाच लागतो नाही तर भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतो
बाकरवडी >>> पक्का पुणेकर
बाकरवडी >>>
पक्का पुणेकर सिंबा.
Great photo
Great photo
गोंडस माव्या ला वाढदिवसाच्या
गोंडस माव्या ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
इथं वयाने सगळ्यात सिनियर तोच आहे बहुदा
काठी मिळाल्याचा आनंद मावत
काठी मिळाल्याचा आनंद मावत नाहीये अगदी पोटात>> हो ना, खूप क्युट फोटो
काठी म्हणजे ओड्या ची पण अगदी फेव्हरेट, मारामाऱ्या होतात त्यावरून अजूनही
इथं वयाने सगळ्यात सिनियर तोच
इथं वयाने सगळ्यात सिनियर तोच आहे बहुदा>> स्वीटी आहे ना १४ पूर्ण १५ चालू.
माव्यास हॅपी बर्थडे. काठी प्रेम फारच गोड फोटो. निर्मळ निरागस व्यक्तिमत्वे.
(No subject)
सध्या सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेली एक भुभी आणि तिची चार पिल्ले . सुरवातीला सहा पिल्ले होती . आता चारच दिसत आहेत . बहुतेक १ महिन्याची आहेत .
सर्व माऊ बाळाच्या पालकांसाठी
सर्व माऊ बाळाच्या पालकांसाठी एक प्रश्ण आहे.
माझी मुलगी गेले काही दिवस मांजर पाळण्यासाठी फारच मागे मागली आहे.( वय वर्षे १२)
इतकं की आजकाल हा विषय निघाला तरी डोळ्यातुन गंगाजमुना सुरु होतात आणि मग मला फारच गिल्ट येतं.
मी आणि नवरा खरतर मानसिकरीत्या अजिबात तयार नाहिये प्राणी पाळण्यासाठी पण पोरीचं रडणं बघुन मला आजकाल विचार करावा असं वाटतय.
तर माझे प्रश्ण असे आहेत.
१. माझं घर ३ बेडरुम चं आहे आणि एक लहान ८ * १० ची टेरेस आहे. तर मांजर पाळण्यासाठी हे पुरेसं आहे का ? मला माहित आहे की एका लहान खोलित पण लोक मांजर पाळतात पण तरी मला हा प्रश्ण आहे. त्यांना फिरायची/फिरवायची कितपत गरज असते ?
२. मांजराचे केस पडतात का ? शी शु चं ट्रेनिंग त्यांना कसं देतात ?
३. आपण बाहेर किंवा गावाला जाणार असु तर त्यांना कुठे आणी कसं ठेवतात ?
४. त्यांना कोणते अन्न देतात ?
५. सगळ्यात महत्वाचं कोणतं मांजर पाळावं. ? भुभु प्रमाणे त्यात पण ब्रीड्स असतात का ?
६. त्यांच्या मुळे घरात कोणाला काही आजार होउ शकतात का ? त्यांच्या साठी वॅक्सिन ई असतं ना ? ते कसं बघायचं ? केस गळु नये म्हणुन काय करायचं ?
७. एकंदरीत घरात तोड्फोड्/पसारा हे मांजरं कितपत करतात ?
मुळात बंदिस्त ठीकाणी प्राणी पाळणं मला पटत नाही पण अगदीच वेळ पडली तर माहिती गोळा करते आहे.
( अजुन एक म्हणजे, मुलांच्या आग्रहामुळे प्राणी पाळलेले इथे कोणी आहेत का ? मुलांचा त्या प्राण्यांमधला ईंटरेस्ट टिकुन राहतो का ? की काही दिवसांनी मुलं पण वैतागु शकतील ?)
भावनेच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नाहिये तरी कृपया मदत करा.
धन्यवाद.
माझ्याकडे डॉग आहे त्यामुळे
माझ्याकडे डॉग आहे त्यामुळे बाकीच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत माझ्याकडे पण
मुलांच्या आग्रहामुळे प्राणी पाळलेले इथे कोणी आहेत का ? आम्ही आहोत
सरतेशेवटी आग्रह कोणाचा होता हे सगळं विसरून जातो आपण आणि पक्के प्रेमात पडतो आपण
सिम्बा फारच खुश झालाय कि
सिम्बा फारच खुश झालाय कि
येस्स! माउईचा काल वाढदिवस
येस्स! माउईचा काल वाढदिवस झाला! काल ३ वर्षाचा झाला. ओडिन मोठा आहे ना त्याच्यापेक्षा थोडा?

आम्ही घरीच केक केला होता, आणि सध्या बलून्स चे वेड आहे म्हणून भरपूर फुगे! जाम खूष होता गडी ! पाऊस असल्यामुळे फ्रेन्ड्स ना नाही बोलावले काल. आता वीकेन्ड ला घेऊन जाईन पार्क मधे. हे फोटो:
माऊईचे हसणे फारच गोड आहे...
माऊईचे हसणे फारच गोड आहे...
माऊईला happy birthday!
माऊईला happy birthday!
स्मिता श्रीपाद, 3 bhk म्हणजे घर मोठे आहेच. बाल्कनी मध्ये litterbox ठेऊ शकाल.
खरं तर हा धागा वाचून मलाही मांजर पाळाविशी वाटू लागली आहे.कुत्र्याचा सांभाळ करायचे त्राण नाही.
happy birthday !!! माऊई
happy birthday !!! माऊई
फारच सुन्दर फोटो
अश्विनी, किती छान दिसतायत
अश्विनी, किती छान दिसतायत पिल्लं. त्यांना खायला प्यायला मिळो. आणि गाड्यांपासुन संरक्षणही.
माव्याला हॅप्पी बड्डे.
माव्याला हॅप्पी बड्डे.

त्या दुसर्या फोटोत प्रॉपर हसून पोझ देतोय
सिंबा आणि त्याची काठी क्यूट
पहिला फोटो बघितल्यावर माऊई
पहिला फोटो बघितल्यावर माऊई म्हणजे फुग्यांच्या बरोबरीने ठेवलेलं सॉफ्ट टॉय वाटतोय.
म्हणजे दुसरा फोटो नसता तर मी फसलेच असते एक मिनिट.
हॅपी बर्थडे माऊई.
हाहाहा माव्याच्या चेहऱ्यावर
हाहाहा माव्याच्या चेहऱ्यावर हसू मावत नाहीये, कसला खुष झालाय गडी....
मला वाटत होतं ४ वर्षाचा आहे तो, ओडीन आता बरोबर ३ वर्षे ३ महिने
स्वीटी आहे ना १४ पूर्ण १५ चालू. >>
हा, या तर मग आज्जीबाईच झाल्या, ही सगळं पोरंच आहेत स्वीटीसमोर
इतकं की आजकाल हा विषय निघाला तरी डोळ्यातुन गंगाजमुना सुरु होतात आणि मग मला फारच गिल्ट येतं.मी आणि नवरा खरतर मानसिकरीत्या अजिबात तयार नाहिये प्राणी पाळण्यासाठी पण पोरीचं रडणं बघुन मला आजकाल विचार करावा असं वाटतय.
स्पष्ट बोलायचं झालं तर नका घेऊ, कारण मुलं नुसतीच खेळतात, कामं सगळी आपल्यावर पडतात. आणि आपल्याला आवड नसेल तर ती चिडचिड बिचाऱ्या माऊ भुभुवर निघते. त्यात त्यांची काही चूक नसते.
मांजराचा व्याप कमी असतो असे ऐकून आहे, पण तरीही त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांची दुखणी खुपणी काढा, त्यांचे फुड सांभाळा, कुठे बाहेरगावी जायचं असेल तर पहिले त्यांची सोय बघा अशी अनेक व्यवधाने असतात.
पुढच्या कित्येक वर्षांसाठी एक बाळ घरी आणणार आहोत या लेव्हलचा विचार करून मगच निर्णय घ्या. त्यातल्या त्यात एखादे थोडे ग्रोनअप माऊ दत्तक घेऊन सांभाळू शकता. ते त्यांची काळजी घ्यायला शिकलेले असतात. त्यामुळे त्यांना थोडी माया लावली की ते आपले होतात.
Pages