भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नसती राहीली दुसऱ्या दिवशी कदाचित. नवीच घेतली होती आणि ती बंजी कॉर्ड वाली चांगल्यातली होती. जीवावर आलं मला ती वाया घालवायला.

Happy Birthday Simba. Take longer walks have more naps get more treatos.

आशुचॅम्पचा सवाद वाचुन हहपुवा झाली तरी रिस्क घेतलित तुम्ही, मधे एका भटक्या कुत्र्याने लहान मुलाला भयकर इन्ज्युअर केल्याची बातमी वाचली, जपुन करा.
सर सलामत तो लिश पचास.
सिम्बाला हॅपीवाला बर्थडे.

F143BD0B-32A3-4B9D-A765-24D63D7594E5.jpeg

धन्यवाद सगळ्यांना !!!

आम्हाला फोटो काढायला अजिबात आवडत नाही. जो फोटो काढणार त्याच्याकडे आम्ही पळत सुटतो, एका जागी स्थिर उभे राहणे किंवा बसणे आमच्या रक्तातच नाही Lol Lol Lol

जो फोटो काढणार त्याच्याकडे आम्ही पळत सुटतो >>> Lol

बड्डे बॉयचा फोटो एकदम मस्त. हॅपी बर्थडे सिंबा!

हरितात्या, परवा तुमच्या सिंबाची वेगळ्याच कारणामुळे आठवण आली होती. 'आई पाहिजे' नावाचा पिक्चर लावला होता टाइमपास म्हणून. त्यात सदाशिव अमरापूरकरला पाहून आशा काळे एका खांबामागे लपते असं दृश्य होतं. त्यात ती लपली असली तरीही अर्धवट चेहरा दिसत होता. ते पाहून वाटलं की यापेक्षा सिंबा बराच चांगला लपतो Proud

त्यात ती लपली असली तरीही अर्धवट चेहरा दिसत होता. ते पाहून वाटलं की यापेक्षा सिंबा बराच चांगला लपतो ----> Lol Lol Lol

एक वाईट बातमी! काल संध्याकाळी मंकी गेला Sad Sad

दिवसभर घरीच छान खेळत होता, उड्या मारत होता. दुपारी अचानक उजवा पाय पॅरालाईझ झाला आणि काही वेळातच डावा पण. प्रचंड म्यांव म्यांव सतत करत होता. खुरडत घासटत तसंच पायर्‍या चढून बेडरुममधे आला. कपाटाच्या खाली जाऊन बसला. आम्ही फार घाबरलो ताबडतोब इमर्जन्सी मधे नेले. डॉ सांगितलं ब्लड क्लॉट झाल्यामुळे असं झालंय. ती पुन्हा लंग्स, ब्रेन कुठेही अफेक्ट करू शकेल. आत्ता पायावर गेलंय.
आता याचे चान्सेस कमी आहेत फार वाचण्याचे. जरी दुसरीकडे न्या, सर्जरी करा. नो गॅरंटी. सर्जरीचा फार मोठा खर्च सांगितला. केलाही असता पण फार उपयोग नाही.
कारण त्याला हार्ट मर्मर अशी काहीतरी कंडीशन होती जन्मापासून. कधी तो व्हिझिंग, पँटींग खूप करायचा स्पेशली बाहेरून फिरून आला की. तेव्हा डॉ ने अ‍ॅलर्जी असेल किंवा हार्ट कंडीशन असेल म्हटले होते आणि कार्डिओलॉजिस्टला एकदा दाखवा असा सल्ला दिला होता. पण अपॉईंटमेंट्स न मिळाल्याने ते पुढे ढकललं गेलं.

काल त्यामुळेच बिचारा देवाघरी गेला. डॉ म्हटले आता याला इंजेक्शन देऊन सुखाने जाऊ देऊयात. हा असा खुरडत फार नाही राहणार आता. माझी मुलं मी अक्षरशः ढसाढसा रडलो. हृद्य दुखणं काय ते काल कळलं. त्याच्यासाठी काल मग निर्णय घ्यावा लागला त्याला जाऊ देण्याचा. डॉ म्हटले तुम्ही कंफर्टेबल असाल तर समोर थांबा इंजेक्शन देताना आम्ही नको म्हटलं. फक्त एकदा शेवटचं भेटू दे. हात फिरवूदे. तसं करताना फार फार वाईट वाटलं. मोठे डोळे करुन बघत होता. वरचं शरीर ठिक होतं त्याच्याने इकडेतिकडे हलत होता. ट्रीट द्याय्चा प्रयत्न केला पण नाही खाल्लं काही.

आत्ता सकाळीही हे रडतच लिहितेय. कारण त्याचं ते मांडीवर येऊन बसणं, सकाळचे लाड, पायात पायात करणं खूप आठवतंय. फार लळा लागला होता पिल्लू तुझा. सॉरी नाही वाचवू शकलो. Sad मनाला फार लागलंय त्याचं असं अचानक जाणं.

सॅमी कालपासून शोधतेय त्याला. त्याची कॅरिअर बॅग हुंगतेय. मुलगी पण उदासच आहे दोघी एकमेकींजवळ झोपल्यात कालपासून.

बाप रे!!!! Sad म्हणुन पाळिव प्राणी पाळणं फार मोठी रिस्क असते. आमचा गिनीपिग मुलीच्या मैत्रिणींनी दत्तक घेतला मग ५ वर्षात तो गेला पण कसलाअ चटका बसलेला आम्हाला.
असो. काळजी घ्या.

अंजली Sad
तुला एक घट्ट मिठी. फारच धक्कादायक आहे हे.

मंकी Sad आम्हाला पण लळा लागला होता त्याचा इथे.

खूप चटका लावतात ही मंडळी. असे दोन अनुभव लहानपणीच घेऊन झाले आहेत त्यामुळे आता पेट आणायला मन धजत नाही.

मंकीचे वाईट वाटले. वेळेवर कार्डिओलॅाजिस्टची अॅपॅाइंटमेंट मिळाली असती तर बरे झाले असते कदाचित. टेक केअर

Pages