क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेफजी, भारतातच नाही तर कुठेही कसोटी सामने सर्रास 2-४ दिवसात संपण हे खूप खटकणारं आहे व हे पीचमुळे होत असेल तर ते अधिकच वाईट आहे. ऑसी फलंदाज फिरकी खेळण्यात वाकबगार नसले, तरीही इतक्या हास्यास्पद तऱ्हेने ते सर्रास गुंडाळले जाणं हे पीचच्या सहाय्याशिवाय शक्य नसाव असं मला वाटतं ( आपली फिरकी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण याबद्दल नितांत आदर व कौतुक असूनही ! ).
कसोटी सामने सर्रास 2,3 दिवसांत आटोपले तर कसोटी सामन्यातला इंटरेस्टच नाहीसा होईल, ही खरी भीती आहे !

भाऊ , बहुतेक सिरीज ठरवणार्‍यांना त्याचा अंदाज असेल की काय असे वाटते. माझ्या आठवणीनुसार पूर्वी मॅचचा शेवटचा दिवस रविवार असायचा. या सिरीज च्या पहिल्या दोन मॅच मध्ये तरी तसे काही दिसत नाही.

*बहुतेक सिरीज ठरवणार्‍यांना त्याचा अंदाज असेल की काय असे वाटते. * - पीच क्यूरेटरवर त्यांचा पूर्ण भरवसा असावा Wink

अरे, उशीर केलास यायला ! हल्ली पांच नाहीं, दीड दिवसाचाच असतो ना आपला घरचा गणपती !!!20190816_200809.jpg

भाऊ, बर्याच दिवसांनी व्यंगचित्र पाहिलं. झकास आहे. तुमचा सगळीकडेच टेस्ट मॅचेस लवकर संपण्याचा मुद्दा समजला. बहुदा टेस्ट क्रिकेट रंगतदार, रिझल्ट ओरिएंटेड बनवण्याच्या उद्देशापायी हे होत असावं. त्यातून टेस्ट चँपियनशिप साठी असणारी पॉइंट सिस्टीम सुद्धा ह्याला हातभार लावत असेल कदाचित. गेल्या काही वर्षांत ड्रॉ टेस्ट्सचं प्रमाण कमी झालंय असं वाटतंय (डेटा तपासला नाही).

“ या सिरीज च्या पहिल्या दोन मॅच मध्ये तरी तसे काही दिसत नाही.” - त्याचं कारण बव्हंशी क्रिकेटर्सचं भरगच्च कॅलेंडर आहे. जर खरंच पाच दिवस टेस्ट्स चालल्या तर दीड महिन्यात ४ टेस्ट्स खेळून झाल्यावर प्लेयर्सना स्ट्रेचर्सवरून न्यावं लागेल.

टेस्ट क्रिकेट रंगतदार, रिझल्ट ओरिएंटेड बनवण्याच्या उद्देशापायी >> मला तरी सगळ्यांना टी २० ची झालेली सवय कारणीभूत असेल असे वाटते. त्यासाठी जो संयम लागतो त्याचा अभाव असेल.

भाऊंचे कार्टून भारीये Lol

“ टी २० ची झालेली सवय” - खरंय. ‘पेरावे तसे उगवते‘ ची ही क्लासिक केस आहे. टेस्ट क्रिकेट रटाळ झालं, लोकं सिरीजच्या सिरीज ड्रॉ खेळून काढायला लागली म्हणून त्यात रंगत आणण्यासाठी वनडे चा जन्म झाला. त्याही रेंगाळायला लागल्यावर विविध प्रयोगातून (पॉवर प्ले, सुपर-सब) टी-२० चा जन्म झाला. आता टी-२० च्या मानसिकतेतून रिझल्ट ओरिएंटेड आणि फास्ट पेस्ड टेस्ट्स (जो मूळ उद्देश होता) व्हायला लागल्या. वर्तुळ पूर्ण झालं.

भाऊ, या आजकालच्या तरुणांना पेशन्स नावाचा प्रकार माहित नाही हेच मुख्यतः कारण असावे कसोटी सामने ३-४ दिवसातच निकाली निघण्याचे..... बाकी पीच वगैरे लोक आपापल्या सोयीप्रमाणे बनवणारच त्याला काही इलाज नाही!!

प्रतिकूल परिस्थितीत दोन-दोन तीन-तीन सेशन टिच्चून खेळत राहण्याची मानसिकता आजकालच्या खेळाडूंच्यात जरा कमीच दिसते!!

व्यंगचित्र Lol

रविवारी सकाळी जे लोकं उशीरा उठले त्यांचेही असे झाले असावे..
तरी मी अलार्म लावलेला हे बरे..

असो, मी अगदींच हेकेखोरपणे हा मुद्दा लावून धरतोय असं मलाच वाटायला लागलं होतं; निदान ते अगदींच तसं नाही हे कळून बरं वाटलं. आता प्रत्यक्ष खेळाकडे वळावं हे उत्तम ! Wink
*आजकालच्या तरुणांना पेशन्स नावाचा प्रकार माहित नाही हेच मुख्यतः कारण असावे* - लिलावात कोटींच्या भावात कसोटीसाठी निवड केली, तर माझ्याही पिढीला लाजवेल अशा पेशन्सचं प्रदर्शन याच तरूण खेळाडूंकडून पहायला मिळेल ! Wink

प्रतिकूल परिस्थितीत दोन-दोन तीन-तीन सेशन टिच्चून खेळत राहण्याची मानसिकता आजकालच्या खेळाडूंच्यात जरा कमीच दिसते!!
>>
असंच खेळल्याने २०१८-१९ च्या सुमारास पुजारा अन् रहाणे च्या टेंपरामेंट वर प्रश्न उभे करून त्यांच्यावर नसतं प्रेशर टाकून त्यांचा गेम बिघडवाला

पुजारा परत आला (एकच फॉरमॅट खेळायचा हे डोक्यात पक्कं असल्यानं) पण रहाणे मात्र (व्हाइट बॉल खेळायच्या इर्षेच्या नादात) हाता तोंडाशी आलेला टेस्ट कॅप्टन शिप चा चान्स घालवून बसला...
आज त्याची रीप्लेसमेंट असलेला अय्यर फास्ट खेळतो या मुख्य मुद्द्यावर आत आला (आल्यावर त्यानी त्याचं स्पिन खेळायचं तंत्र दाखवून दिलं, पण ते नंतर)
जावई पण फास्ट खेळू शकतो या मुद्द्यावर च थोडाफार टिकलाय... तो ही स्लो खेळत असता तर आत्तापर्यंत बाहेर असता...

लोकांना पेशन्स वाला गेम बघायचा नाही म्हणून टेस्ट लवकर संपताहेत...

ऑस्ट्रेलियाचा टॅक्टीकल पराभव आहे हा. >> +१ त्यांना स्वीप नि फ्लिक्स मधला बॅलॅन्स साधता येत नाहिये नि आश्विन-जाडेजा च्या टीचून बॉलिंग मूले अ‍ॅडजस्त्मेंट करता येत नाहि आहेत.

अक, असहमतीचा प्रश्नच नाहीये, कारण “आपला मत्त बराबर जुळतां” >> इथे एक व्यक्ती वगळता राहुल वन डे मधे मिदल ऑर्डर म्हणून परफेक्ट फिट आहे ह्याबद्दल सगळ्यांचेच एकमत आहे.

राहुल ला लाँग रोप देणे पटले तरी वळत नाही. त्यामूळे इतरांना शॉर्ट रोप सुद्धा देता येत नाही ही मोठी गोच आहे. बहुधा एक दोन टेस्ट नंतर राहुल फॅमिली रीझन साही बाहेर जाईल असे वाटते. गिल ला टेस्ट मधे ओपन करायला लावू नये असे मला मनःपूर्वक वाटते. तो मधल्या फळीत आला तर धूमाकूळ घालेल.

राहुल कधी वनडेमध्ये प्रेशर चेसमध्ये टेस्ट झाला आहे का पाचव्या नंबरवर.. नसेल तर त्याचा तोच वीक पॉईंट आहे. त्याला प्रेशर झेलता येत नाही म्हणावे तसे. मोठ्या स्पर्धांना अगदी सामान्य भासतो.

पुढील कसोटी पर्यंत एक मोठा ब्रेक आहे, ऑस्ट्रेलिया संघ पुनर्बांधणी करून चांगले आव्हान देईल असे वाटते.
भारतीय संघ पण एक दोन बदल करून खेळतील असे दिसतंय.
कोणी महिला वर्ल्ड कप फॉलो करत आहे का ? महिलांनी सेमी पर्यंत मजल मारली आहे , पण ऑस्ट्रेलिया पुढे नांगी टाकतील.

*पण ऑस्ट्रेलिया पुढे नांगी टाकतील.* - सामन्याच्याआधी त्यांना ऑसिजच्या (पुरुष) आत्ताच्या दोन सामन्यांचे हायलाइट्स दाखवावे ! Wink
महिला संघाला शुभेच्छा !

सामन्याच्याआधी त्यांना ऑसिजच्या (पुरुष) आत्ताच्या दोन सामन्यांचे हायलाइट्स दाखवावे ! Wink >> Happy आखाडा स्पिनिंग ट्रॅक करावा Wink

ग्रीन फिट असेल तर रेन्शॉ च्या जागी तो नक्की येईल. बाकी स्टार्क एखाद्या स्पिनरच्या जागीयेतो हे बघणे उत्सुकतेचे असेल.

एक गमतीची गोष्ट - भारतीय विकेट्स वर टॉस जिंकला की सामना अर्धाअधिक जिंकला असे मानले जाते.
https://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;filter...

२०१० पासून ऑसी टीम्स ने १२ पैकी दहा टॉस जिंकून एक सामना जिंअकला आहे Happy

जून पासून भारतीय संघाच्या कपड्यांवर अदिदास चा लोगो येणार...

२०२० ला नायके चा करार संपल्यावर आधी MPL आणि मग किलर या स्पोर्ट्स वेअर शी काहीही संबंध नसलेल्या कंपन्यांचे लोगो केवळ पैशाच्या जोरावर टीम किट स्पॉन्सर म्हणून लागलेले पाहून बेकार खटकायचं, बेटर लेट...

भारतीय विकेट्स वर टॉस जिंकला की सामना अर्धाअधिक जिंकला असे मानले जाते.
>>>>>

असे असते तर आपण ईतके अजिंक्य नसतो.
फक्त एक होते. टॉस जिंकणारी टीम चौथ्या डावात खेळायला नको या भितीने फलंदाजीच घेते. त्यामुळे टॉस जिंकल्यावर त्या परदेशी संघांना आनंद होतो ईतकेच.

कोणी महिला वर्ल्ड कप फॉलो करत आहे का ? महिलांनी सेमी पर्यंत मजल मारली आहे , पण ऑस्ट्रेलिया पुढे नांगी टाकतील.
>>
हे मिसलं होतं
ऑसी ना हरवणे अवघड आहे (गेल्या वर्षी फक्त भारतानेच त्यांना हरवलं होतं हे लक्षात घेता थोडा चान्स आहे इतकंच, पण मेजर चमत्कार व्हायला हवा)

ऑसी अन् इंग्लंड ची फायनल होऊन ऑसी जिंकण्याचे च जास्त चान्स आहेत.

आपण या वर्ल्डकप मधे खूप डॉट बॉल घालवले आहेत, त्यावर थोडा कंट्रोल हवा. तसंच जेमी फॉर्म मध्ये आहे, तिला परत ओपनिंग स्लॉट मधे ट्राय करायला पाहिजे (शाफाली चा स्ट्राईक रेट जरा गंडाला आहे. ओपनिंग तगडी झाली तर नंतर manage करता येईल, पण सुरुवातच स्लो झाली तर अवघड आहे.
बोलिंग मधे चटचट विकेट्स घेण्यावर भर द्यायला हवा, नाहीतर आयर्लंड नी पण जवळजवळ फेस आणला होता.

विमेन्स आयपीएल चा भविष्यात या दृष्टीनी फायदा करून घ्यायला हवा. मेन्स आयपीएल सारखं नको, की टूर्नामेंट सुरू झाल्यापासून एकही जेतेपद नाही.
ते सामने ब्रेबॉर्न अन् डी वाय ला होणार आहेत, त्या पीचेस पण बऱ्यापैकी पाटा आहेत.

"कोणी महिला वर्ल्ड कप फॉलो करत आहे का ? महिलांनी सेमी पर्यंत मजल मारली आहे , पण ऑस्ट्रेलिया पुढे नांगी टाकतील." - ही इंडियाची टीम चांगली आहे, पण ९० च्या दशकातल्या मुलांच्या टीमसारखी आहे. पोटेन्शियल आहे पण त्यांना सॉलिड व्हायला अजून थोडा वेळ लागेल.

"ऑसी अन् इंग्लंड ची फायनल होऊन ऑसी जिंकण्याचे च जास्त चान्स आहेत." - मलाही असंच वाटतंय. ऑस्ट्रेलिया शेकडो योजने पुढे आहे इतर टीम्सच्या.

महिला टीम बघून खरेच नव्वदीच्या दशकातला किंबहुना त्याच्याही पुढच्या दशकाच्या पुर्वार्धातला संघ आठवतो. वैयक्तिक कामगिरीत चमकणारा पण एक संघ म्हणून चॅम्पियन न वाटणारा. मोठ्या स्पर्धात आणि फायनल्सना कच खाणारा.

"ऑसी अन् इंग्लंड ची फायनल होऊन ऑसी जिंकण्याचे च जास्त चान्स आहेत." - मलाही असंच वाटतंय. ऑस्ट्रेलिया शेकडो योजने पुढे आहे इतर टीम्सच्या. > ते नेहमीच पायोनिञर असतात . मिथिला राज ची मुलाखत ऐकली होती नि त्यात महिला क्रिकेटर्स ना मिळत असलेला सपोर्ट बघता आपल्या मुली एव्हढे करू शकल्या हाच मोठा चमत्कार म्हणायला हवा. आयपील मुळे पैसा येईल नि अधिक अटेंशन मिळेल अशी आशा धरूया.

वेंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांचे ट्विटर वॉर चालू आहे आणि विषय आहे जावई. ते बघून वाटतं, कोणाला कशाच आणि बोडकीला केसाचं.
आकाश चोप्रा ला बहुतेक जावई मध्ये तो स्वतः दिसत असेल म्हणून सपोर्ट करतोय.

“आकाश चोप्रा ला बहुतेक जावई मध्ये तो स्वतः दिसत असेल म्हणून सपोर्ट करतोय.” - फरक इतकाच आहे कि आकाश चोप्रा बीसीसीआय च्या ऑफिशियल कॉमेंट्री पॅनेलवर आहे आणि प्रसादकडे बीसीसीआयचं कुठलंही पद नाही. नथिंग टू लूज Happy

चोप्रा पगारी असल्याने त्याच्यासाठी सारी खुदाई एक तरफ अन् बीसीसीआय का जमाई एक तरफ झालंय....

आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घ्यायचे ठरवलेलं दिसतंय.

हे सोडलेले हलवा कॅच शेवटी महागात पडतील.

१७३ लक्ष्य.
आव्हान संपुष्टात
आजही गचाळ क्षेत्ररक्षण

Pages