क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“तिन्ही फॉर्मेटला भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर असण्याला अर्थ नाही.” - इंडिया टेस्टमधे पहिल्या नाही, दुसर्या क्रमांकावर आहे, सर.

“सचिनच्या शंभर शतकांच्या वैयक्तिक विक्रमाला की कुंबळेच्या ६०० विकेटच्या वैयक्तिक विक्रमाला?” - त्या १०,०००+ रन्स आणि ९०० विकेट्स इंडियाच्याच स्कोअरकार्डवर आल्या ना? का ते वेगळे मोजले गेले? काहीही हं ऋ…

हातकांगवा अन् कमिन्स ची पार्टनर शिप तोडायला पाहिजे. ५०+ केलेत

आपण जडेजा अन् अक्सर असा दोन्हीकडून एकाच टाईप चा अटॅक करतोय. ज्यानी सेट व्हायला हातभार लागतोय.
मिसिंग कुलदीप.

अटॅक मधे व्हेरिएशन पाहिजे. लय बिघडावायाला मधेच एखाद दुसरी ओव्हर कोहली / शर्मा / अय्यर नी टाकायला हवी (पण टाकणार नाहीत)

ह्या खेळपट्टीवर कुंबळेचे १०/१० आहेत.
त्यामुळे ४थ्या डावात प्रचंड दडपण असणार त्यामुळे पहिला डाव अडीचशेच्या आत गुंडाळायला हवा!

263...

शमी 4, आश्विन अन् जड्डू 3-3

आपण जडेजा अन् अक्सर असा दोन्हीकडून एकाच टाईप चा अटॅक करतोय. ज्यानी सेट व्हायला हातभार लागतोय.
मिसिंग कुलदीप. >> हो आज असं वाटलं खरं. एकूण एकच पेसर घेणे धाडसी आहे ऑसी कडून. आपली पहिली ईनिंग सगळे ठरवेल असे वाटतेय.

“मी मायबोली सोडून जाईल” - ह्या काव्याला फसणार नाही हा सर आम्ही. उगाच आशा लावता तुम्ही. >> +१. मागेही तू हे संगितले होतेस नि लोकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यावर शब्दछळ करून सरळ सरळ फसवणूक केली होतीस आमची. Happy प्रामाणिकपणे तू असलास किंवा नसलास तर मला तरी व्यक्तिशः काडिचाही फरक पडत नाही. मला फक्त तुझ्या इथल्या बातांबद्दल आक्षेप आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्कोअर पाहता पहिली ईनिंग फार महत्वाची.
गेल्यावेळी त्यांचा स्कोअर कमी असल्याने पुरेशी आघाडी घेणे जमले. अर्थात त्यातही आपल्या मिडल ऑर्डरने सालाबादाप्रमाणे टेंशन दिलेलेच. पण नेहमीप्रमाणे आधी शर्मा भक्कमपणे ऊभा राहिला मग लोअर मिडल ऑर्डरकडून काँट्रीब्यूशन आले आणि ईतका लीड मिळाला की सहजसाध्य विजय साकार झाला.

आता ऑसीजचा स्कोअर ईतका झालाय की आपल्याला चौथ्या डावाचे टेंशन काढायला पुरेसा लीड मिळणे सोपे नाही. अय्यर परतलाय हे छान झाले.

कालच्या दिवसाचे हायलाईट्स - भरतने घेतलेला स्मिथचा कॅच. जवळपास घोट्याजवळ घेतलाय तो. राहूलचे दोन्ही आणि कोहलीने स्लिपमधे घेतलेला कॅच. ख्वाजा आणि हँड्सकोंबच्या काऊंटरअ‍ॅटॅकिंग इनिंग्ज.

एक काळजीची गोष्टः जडेजाचे नोबॉल्स. पहिल्या मॅचमधे स्मिथ आणि काल हँड्सकोंब ह्या दोघांना त्याने नोबॉल्सवर आऊट केलंय.

वाट लगिंग...
बोले तो दुर्गती हो गयेली है...

शर्मा, जावई, पुजारा (0), अय्यर
चौघांना लायन नी काढलं...

भारताची अवस्था अशी झाली आहे की ऑस्ट्रेलियाला लीड किती कमी देऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. 150-200 मध्ये ऑल आऊट होतील बहुतेक. भारताची कसोटी जिंकायची आशा एकदम धूसर करून टाकली आहे. शेरदिल लायन फिरसे एकबार दहाडा है.

फिरकीचे त्रिकूट शिल्लक आहे आपले.
फलंदाजीचा भारही तेच वाहतील. अजून सामना बराच शिल्लक आहे.
या सामन्यात चौथ्या डावाचे टेंशन राहणार हे ऑस्ट्रेलियाची पहिली ईनिंग २६०+ ला संपली तेव्हाच म्हटलेले. आपणही पोहोचू त्या आसपास. त्यांना दुसऱ्या डावात शेपूट वगैरे न वळवळता गुंडाळायला हवे. आश्विनच सुरुवात करेल त्या डावाची. सामना चौथ्या दिवसाच्या लंचला संपेल असे वाटतेय. थोडे पेशन्स दाखवायला हवेत.

"पण नेहमीप्रमाणे आधी शर्मा भक्कमपणे ऊभा राहिला"
>>>

नोव्हेंबर २०१९ पासून शर्मा चे स्कोअर:
6, 21, 26, 52, 44, 7, 6, 12, 161, 26, 66, 25, 49, 34, 30, 36, 12, 83, 21, 19, 59, 11, 127, 29, 15, 46, 120, 32

50 : 4
100 : 3
टेस्ट : 17
इनिंग : 28

म्हणजे २८ पैकी ७ इनिंग मधे शर्मा भक्कम पणे उभा राहिला असं म्हणता येईल 40+ स्कोअर धरले तरी १०
(म्हणजे २५% किंवा फार तर ३०% वेळा)

असं डेटा न बघता डोळे झाकून 'नेहमीप्रमाणे' म्हणून जनरलाईज करायचं हे 'व्यक्तिपूजा' सदरात मोडतं...

आता यात भारतातले स्कोअर वेगळे करा.
ब्रॅडमॅननंतर मायदेशात सर्वाधिक सरासरी असणारा फलंदाज आहे तो.
सध्या फिरकीला गडबडणाऱ्या फलंदाजीत तो भक्कमपणे खेळतो.
आज गावस्कर कॉमेंटरीला त्याच्या स्पिन खेळतानाच्या कंट्रोलचे कौतुक करताना थकत नव्हता.
असो मी आणि गावस्कर, आम्हाला क्रिकेटघी अक्कल नाही. कबूल करतो. पुढे चला Happy

बाकी गेल्या दोन तीन वर्षात शर्मा विरुद्ध रहाणे पुजारा कोहली या त्रिकूटाचा रेकॉर्ड काढला तर उत्तर मिळून जाईल. पण आमचा शर्माच नावडता आहे. तर आम्ही ते आकडे ऊडवून लावणार...:)

१००-४
३४ पार्टनरशिप
जडेजा फलंदाजीला आला की लागलेली लाईन थांबते.
धोनीचा शिष्य झाला आहे याबाबतीत तो हल्ली

बाकी गेल्या दोन तीन वर्षात शर्मा विरुद्ध रहाणे पुजारा कोहली या त्रिकूटाचा रेकॉर्ड काढला तर उत्तर मिळून जाईल. पण आमचा शर्माच नावडता आहे. तर आम्ही ते आकडे ऊडवून लावणार
>>>

जो जेंव्हा चांगला खेळेल तो तेंव्हा चांगला, जो हगेल (जसा आज पुजारा हगला) तो त्या दिवशी वाईट.
जनरलायझेशन नाही. की या एकट्या च्या जीवावर सगळं झालं.

हा फरक आहे. ज्या दिवशी तुला कळेल तेंव्हा पुढे बोलू.

धोनीचा शिष्य झाला आहे याबाबतीत तो हल्ली
>>
परत व्यक्तिपूजा अन् जनरलायझेशन

जो जेंव्हा चांगला खेळेल तो तेंव्हा चांगला, जो हगेल (जसा आज पुजारा हगला) तो त्या दिवशी वाईट.
>>>

शक्य झाल्यास हे हगला वगैरे शब्द वापरू नका. हे शब्द आजकालच्या ट्रोलर्स क्रिकेटप्रेमींनी मार्केटमध्ये आणले आहेत

असो,
एखाद्या दिवशी कोणी अपयशी ठरेल त्याला मी नावे ठेवत नाही.
एखाद्या दिवशी कोणी चांगला खेळला तर लगेच त्याला डोक्यावर घेत नाही.
जे सातत्याने वरचेवर एका ठराविक मोठ्या कालखंडात घडते त्यावरूनच मत व्यक्त करतो.

जे वर्षानुवर्षे धोनी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये करत आला आहे ते हल्ली जडेजा कसोटीत करतोय यात जनरलायझेन काय आणि व्यक्तीपूजा कोणाची?

जे भारतासाठी सचिन तेंडुलकर करत आलाय ते आता कोहली करू लागलाय हे वाक्यही बरेचदा ऐकले असेलच. ते बोलणारे कोणाचे भक्त असतात का?

की शर्मा धोनी पंत अश्या ठराविक मंडळींचेच कौतुक केलेले व्यक्तीपूजा सदरात मोडते.

जे सातत्याने वरचेवर एका ठराविक मोठ्या कालखंडात घडते
>>>
3 वर्ष 3 महिन्यांच्या काळात २५-३०% सातत्य...

की शर्मा धोनी पंत अश्या ठराविक मंडळींचेच कौतुक केलेले व्यक्तीपूजा सदरात मोडते.
>>
सांघिक कामगिरीला श्रेय न देता केवळ एखाद दुसऱ्याला पूर्ण श्रेय देणं ही व्यक्तिपूजा नाही तर काय???

हा ताजा फोटो
अजून मागे जाऊन नंतर आणतो

हल्ली भारतीय पिच पुर्वीसारखे पाटा नाही राहिलेत. जिथे सामने अनिर्णितही व्हायचे. तर तीन दिबसात सामने संपत आहेत. तिथे शर्माची ७५ सरासरी मायदेशात आहे. अविश्वसनीय खेळाडू

IMG_20230217_033835.jpg

सांघिक कामगिरीला श्रेय न देता केवळ एखाद दुसऱ्याला पूर्ण श्रेय देणं ही व्यक्तिपूजा नाही तर काय???
>>>>

एखाद्याचे कौतुक केले तर बाकीच्यांचे श्रेय नाकारले असा अर्थ होतो का?
आणि जर कोणी अपयशी ठरत असेल तर उगाच अकरात खेळतोय म्हणून श्रेय द्यायचा अट्टाहास का?

भरतही आला आणि गेला...
आश्विनला त्याच्या आधी पाठवायला हवे होते असे वाटले..
अश्या सिच्युएशनला तरी आश्विन द फलंदाजवर जास्त जबाबदारी टाकावी. फार हट्टी आणि चिवट खेळाडू आहे तो.

आश्विनने विश्वास सार्थ ठरवला.
अक्षरसोबत शतकी भागीदारी करून गेला.
दुर्दैवाने त्याचे कौतुक करायची सोय राहिली नाही. अन्यथा अक्षरचे श्रेय नाकारल्याचा ठपका यायचा Happy

Pages