Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या ऑफिस च्या लँडलाईन वरुन
आमच्या ऑफिस च्या लँडलाईन वरुन बाहेर फोन करायचा असेल तर आधी झिरो डायल करायला लागतो. मी घरुन फोन लावताना हमखास आधी झीरो डायल करते आणि मग पलिकडुन जेव्हा ओपरेटरच्या सुमधुर आवाजात 'प्लीज चेक युवर नंबर' ऐकु येत तेव्हा ट्युब पेटते....
====================
हा हा हा.....हा हा हा... अगदी खरयं, माझं अनेकदा झालय तस...
माझ्या बायकोचा किस्सा.
माझ्या बायकोचा किस्सा. पिक्चरला जायचे ठरले. शुक्रवारी संध्याकाळी ती ऑफिसमधून येताना तिकीटे आणायला गेली, सीटी प्राईड मध्ये. तिकीटे काढताना नेमका फोन आला आणि फक्त दोन बाल्कनी ऐवढेच सांगितले. हातात आली ती तिकीटे पर्समध्ये कोंबून बाईसाहेब घरी आल्या.
दुसरे दिवशी सीटी प्राईडला गेलो. पिक्चर हॉलमध्ये जाताना तिकीटे दाखवली तेव्हा गेटकीपर म्हणाला "mam this is tickets of day after tomorrow,"
माझ्या बायकोने त्याचे लगेच भाषांतर केले. ती म्हणे "नाही असे कसे होईल आजचीच तिकीटे आहेत. तारीख पहा ना,"
त्या बिचार्याने सांगितले की मॅडम तिकीटे आजचीच आहेत, पण डे आफ्टर टुमारो चित्रपटाची आहेत.
तेव्हा डे आफ्टर टुमारो हा इंग्लिश चित्रपट लागला होता आणि बायको न पाहताच त्याची तिकीटे घेउन आली होती. मग काय तोच पिक्चर पाहीला. सुदैवाने बरा होता.
अहो निवांत पाटिल, काय भारी
अहो निवांत पाटिल, काय भारी आहात हो तुम्ही?

ashuchamp, मी पण बर्याचदा घरचा फोन उचलून "गुड मॉर्निंग सिटी बँक" किंवा "गुड मॉर्निंग ब्रिलियंस" अस म्हटले आहे.
आजच एच डी एफ सी बॅन्केत
आजच एच डी एफ सी बॅन्केत पॅन्टची चेन न लावता गेलो. बॅन्केत फिरणार्या सिक्युरिटी गार्डने नम्रपणे निदर्शनास आणून दिले.
मी पण बर्याचदा घरचा फोन उचलून
मी पण बर्याचदा घरचा फोन उचलून "गुड मॉर्निंग सिटी बँक"


फोन लावनारा चाट पडला असेल...
नानान्चे काय सान्गावे: एकदा
नानान्चे काय सान्गावे: एकदा European comiision च्या building मधे नाना स्वतहाच्याच विचारात खुद्द ladies tiolet मधे घुसले. आता बोला.....आणि त्यात एक गोरी आलि आणि नानान्चि भम्बेरी उडाली....पण मित्रान्नो पुधे काहि झाले नाही. पण पेशवाई खतर्यात होती......:)
>>आजच एच डी एफ सी बॅन्केत
>>आजच एच डी एफ सी बॅन्केत पॅन्टची चेन न लावता गेलो. बॅन्केत फिरणार्या सिक्युरिटी गार्डने नम्रपणे निदर्शनास आणून दिले
एच डी एफ सी बँकेची शिकूरिटी लय टाईट हाय तर
मी रीचार्जेबल सेल्स माउस
मी रीचार्जेबल सेल्स माउस मध्ये वापरते. आत्ता सकाळी उठुन पीसी चालु केला, मोबाइल चालु केला. ब्याट्रया
चार्जर मधुन काढ्ल्या व डायरेकट मोबाइल मध्येच घालायचा प्रयत्न केला.
तात्पर्य, सकाळच्या चहाचा एक तरी घोट घेण्याआधी कामाला सुरुवात करु नये. क्लिक. क्लिक.
हूडा, कहर केलास रे
हूडा, कहर केलास रे बाबा.............:हहगलो:
मामी, खरय अगदि.
मी एक्दा conductor la पैसे
मी एक्दा conductor la पैसे देऊन एक Golf Flake kings ची मागणी केलि होती.
नाना काय हो हे. तुमी बी?
नाना काय हो हे. तुमी बी?
नाना मग माचीस कोणाकडुन घेतलं
नाना
मग माचीस कोणाकडुन घेतलं ?
>>>>मग माचीस कोणाकडुन घेतलं
>>>>मग माचीस कोणाकडुन घेतलं ?
कंडक्टर ने जाळ काढला असेल...
मी एक्दा conductor la पैसे
मी एक्दा conductor la पैसे देऊन एक Golf Flake kings ची मागणी केलि होती. >>> एकदा नाही तर बर्याच वेळा माझं असं झालयं.
फक्त kings ऐवजी lights...
मला वाटायचं फक्त मी असं करतो...
आम्ही बहिणीच्या लग्नासाठी
आम्ही बहिणीच्या लग्नासाठी पुण्याला येत होतो. आता बस मघ्ये सगळे घरचे लोक/ मित्र वैगेरे होते.
बाजुच्या सीट वर एक अनोऴखी चेहेरा होता. आता मुलगाच आहे म्हणुन मी आपले बिनधास्त बोलत होतो. (च्यामारी , च्यायला वैगेरे )
पोचल्यावर सगळे लग्नासाठी कपडे चेन्ज करुन हॉल मध्ये आले...... तो अनोळखी चेहेरा चक्क पन्जाबी ड्रेस घालुन आला.
विचारल्यावर कळाले की ती बहिणीची मैत्रीण होती.
दिवसभर मी तिच्यापासुन तोन्ड लपवत फिरत होतो.
मी माबो वरिल पोष्ट वाचण्यात
मी माबो वरिल पोष्ट वाचण्यात दंग होतो दुपारी १.३० ची वेळ आणि रोज याच वेळी माझा कलिग येतो आणि मागुन माझी पाठ थोपटत म्हणतो "चला जेवायला".... आज त्याने काही न बोलता जरा जोरात मारले म्हणुन मी ही वैतागुन म्हणालो " चल ए शाण्या मी नाही येत जा.........
मागचे सगळे हसायला लागले मी ही पाहीले नाही, म्हटलं कलिगला हसत असतील ........ कोण होता माहिते आहे का?......... बॉस
आत्ताच त्याच्या केबीन मधुन बाहेर आलो सॉरी म्हणुन... (म्हणजे आधी लंच केले, मग केबीन मधे जाऊन सॉरी म्हणालो आणि कलिगची सवय सांगीतली तेव्हा त्याला खरं वाटलं ,अर्थात कलिगही बरोबर होता साक्षीदार म्हणुन)
>>आजच एच डी एफ सी बॅन्केत
>>आजच एच डी एफ सी बॅन्केत पॅन्टची चेन न लावता गेलो. बॅन्केत फिरणार्या सिक्युरिटी गार्डने नम्रपणे निदर्शनास आणून दिले
>>>एच डी एफ सी बँकेची शिकूरिटी लय टाईट हाय तर
अहो प्रविणपा, कसली टाईट सिक्युरिटी.. त्या सिक्युरिटी गार्डलाही सवय झाली असेल रॉबीनच्या वेंधळेपणाची..
हा ताजा ताजाच आहे ... आत्ता
हा ताजा ताजाच आहे ...
) मनातल्या मनात च्यायला फोन विसरलो म्हणत पर एक मजला वर चढुन घराचे कुलुप उघडुन फोनची शोधा शोध करु लागलो... बेड रुम, हॉल, किचन.. कुठंच दिसेना म्हणुन परत वैताग वैताग...


आत्ता ऑफिसला येतानाच केला. उशिर होतोय म्हणत आवरा आवर चालु होतं दरवाज्याला लॉक लावताना मोबाईल वर कॉल आला. मोबाईल वर बोलत बोलत लॉक लावुन जिना उतरत होतो.. नेहमी सारखं पाकीट, गाडीची चावी, रुमाल वगैरे सर्व घेतले कि नाहि हे चेक करताना जानवले की खिशात मोबाईल नाहिय (खरतर मोबाईल वर बोलणं चालुच होतं
फोन वर मैत्रीण विचारतेय काय झालं म्हणुन.. तिलाच अरे थांब रे एक मिनिट म्हणत माझी शोध मोहिम चालुच...
शेवटी लँड लाईन वरुन कॉल करुन पहाव म्हणुन लँड लाईन कडे वळलो... रिसिवर उचलनार इतक्यात जानवले की डाव्या कानाला मोबाईल लावुन गेले ५ मिनिट मि बडबडतोय...
माझं मलाच हसवं कि रडावं कळेना...
हा कालचा किस्सा.... तो ही
हा कालचा किस्सा....
कुलुप जरा जास्तच वर लावल्या सारखं वाटत होतं. मागे वळुन पाहीलं तर मी दरवाज्याच्या हँडलला कुलुप लावलेलं... खाली कडी मोकळीच होती.. 
तो ही ऑफिसला येतानाचाच...
नेहमी सारखं घराला कुलुप घातलं, जिना उतरनार इतक्यात जानवलं कि आज दरवाजाची कडी एवढी कशी वर आली....
हा किस्सा जुना (म्हंजे गेल्या
हा किस्सा जुना (म्हंजे गेल्या आठवड्यातला)
(खुप दिवस झाले टाकावं म्हणत म्हणत नेहमी सारखं विसत होतो...)
आणि विशेष म्हणजे तो माझा नाही.. माबो वरच्या मंजु चा आहे...
गेल्या रविवारी आम्ही भेटायचं ठरवलं होतं. मॅरेथॉन मुळे मला पोचायला वेळ होत होता, म्हणुन मंजु कॉल वर कॉल करत होती. आणि ट्राफिक मुळं मला कॉल उचलताही येइना...
कसा बसा नळ स्टॉप गाठला. हिचं फोन करणं काही थांबायला तयार नाही. हिची जरा खेचुत म्हणत गाडी साईडला घेतली नि कॉल उचल्ला.
"हॅलो... मल्ल्या कुठं आहेस?"....इति मंजु.
"..... The number you are trying to reach is either switched off or moved out of coverage area. Please try a....." इति मी....
"... टुँSSSSSक टुँSSSSSक "
माझं वाक्य पुर्ण व्ह्ययच्या आतच मंजेनं चक्क फोन ठेवलाच.
मल्ली हॅट्रीक!!! अजुन
मल्ली हॅट्रीक!!!
अजुन येउदे...
(No subject)
चला परत वेंधळेपणा सुरु झाला
चला परत वेंधळेपणा सुरु झाला तर?
भारताबाहेर राहण्याचा पहिल्याच
भारताबाहेर राहण्याचा पहिल्याच अनुभवासाठी सज्ज होऊन मी इडलीची कमतरता जाणवु नये यासाठी भारतातुन येताना मायक्रोवेव इडली स्टॅन्ड घेऊन आले.. आणि त्याचं माहितीपत्रक भारतातच ठेऊन आले.. पहिल्या प्रयत्नासाठी जेव्हा गिट्स जिंदाबाद करुन पहिल्यांद इडली मायक्रोवेव केली आणि मुबलक प्रमाणात केली.. संध्याकाळी नवर्याचे मित्र जेवायला येणार होते.. संध्याकाळी सगळ्यांना इडली सांबर दिले बाऊल मध्ये.. मित्राने चमच्याने इडली तोडायचा प्रयत्न केला आणि चमचा काहि इडलीत घुसेना.. चमचा जोरत घुसवला.. आणि इडली खुप चिडली.. ऊडुन जोरात लांब जाऊन पडली..
तो कावराबावरा झाला.. शेवटी कशीतरी तासभर ती इडली साम्बारमध्ये बुडवुन ठेवली तेव्हा कुठे ती नोर्मल दातांनी खाण्यायोग्य झाली.. त्यानंतर कधीही त्या इडलीचा विषय निघाला की तो मित्र म्हणतो की "त्या रात्री मी भारतात फोन करून सांगितलं की मी बेल्जीअम मध्ये इडली खाल्ली.. इतकी खाल्ली कि शेवटी मी पळुन चाललो तर त्या मित्रानी आणि त्याच्या बायकोनी बाल्कनीतुन फेकुन मारली... ४ इडल्या तोंडानी खाल्ल्या बाकीच्या म्हणजे काही पाठीवर काही डोक्यावर अश्या खाल्ल्या.. " त्या प्रकरणानंतर काही त्रास नको म्हणुन गुगल करुन पाहिलं तर त्या इडल्या ३ मिनिटे मायक्रोवेव मध्ये ठेवणं अपेक्षीत होतं आणि मी १५ मिनीटे ठेवल्या होत्या.. 
चिन्गुडि... गुगल देवो भव का ?
चिन्गुडि... गुगल देवो भव का ?
बरोबर... ओम गुगलायन मह: !!!!
बरोबर... ओम गुगलायन मह: !!!! सवाल अनेक जवाब सिर्फ एक.. गुगल देवो भव:
गुगलायन "मह:">>>>हा अजून एक
गुगलायन "मह:">>>>हा अजून एक वेंधळेपणा..:दिवा:
याला वेंधळेपणा म्हणावे का काय
याला वेंधळेपणा म्हणावे का काय माहित नाहि पण परवा नवरा ऑफिस मधुन परस्पर माझ्याबरोबर बाहेर येणार होता कुठेतरी मध्ये भेटायचे म्हणुन त्याला शनिवार वाड्यापाशी बोलावले अन संध्याकाळी काय डोक्यात होते माहित नाहि पण मी लक्ष्मी रोडवर जाऊन उभी राहिले आणी बराच वेळ त्याची वाट बघितली. मग घरी येऊन नेहमी प्रमाणे चिडचिडहि केली ..सर्व ऐकुन घेतल्यावर त्याने मला सा़गितले की तो माझी १ तास तिथे वाट बघुन आला होता..
चलो, मी ही आता इथे कन्फेशन
चलो, मी ही आता इथे कन्फेशन देउनच टाकतो. स्वतःचा अतिशहाणा समणार्या माझ्यासारख्यांसाठी हा लक्षात ठेवण्यासारखा अनुभव.
बायको मुलाला ख्रिसमसच्या सुट्टीत दिल्ली, आग्रा, जयपूर दाखवायच म्हणून २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर चा सगळा प्लान चॉकआउट केला. बायकोकडून अॅप्रूव्ह करुन घेतला आणि Make My Trip वरुन तिकीट्स आणि हॉटेलच पैसे भरुन सगळं बुकिंग केल.
नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात Make My Trip कडून Hotel चा Feedback Form आल्यावर परत तपासणी केली. बुकिंग चुकून डिसेंबराऐवजी नोव्हेंबरचं बुकिंग केलं होतं. पूर्ण पैसे भरुन
मल्ली , ग्रेट आहेस रे बाबा ,
मल्ली , ग्रेट आहेस रे बाबा ,

असुदे गेलात की नाही मग , की लागलं चंदन ???
Pages